तुम्हे याद हो के न याद हो - ४

Submitted by बेफ़िकीर on 28 May, 2011 - 03:47

"कुठल्या कॉलेजलाय गं ती?"

"निवेदिता?"

"हं?"

"गरवारे"

"काय करते?"

"कॉमर्स.. एफ वाय"

"......."

"दादा... तिचे वडील सब इन्स्पेक्टर आहेत.. वाटत नाहीत नाही?"

"त्यात काय वाटायचंय?... तू तरी कुठे वाटतेस यडचाप असशील असे?"

"गप्प बस.. "

"वरून तरी तशी शहाणीच वाटतेस.."

"तू वरूनही यडचाप दिसतोस आणि खराही यडचापच आहेस..."

"मोठ्या भावाला असे बोलू नये.."

"मोठ्या भावाने स्वतःचा आदर ठेवून घ्यायला शिकावा आधी.. चल मला उशीर होतोय.."

पहाटे पाचची वेळ! रविवार! क्षमा तिच्या मित्रमैत्रिणींबरोबर सिंहगडला निघाली होती. संध्याकाळी परत! तिला बसस्टॉपपर्यंत सोडायला उमेश चालला होता. आई आणि बाबा उठलेले होते. पण ते त्यांच्या त्यांच्या व्यापात होते. आजोबाही जागेच होते पण ते पडून होते. क्षमा कालपासून उमेशलाही म्हणत होती की तूही चल आमच्याबरोबर! पण तो म्हणत होता की तुम्ही सगळे माझ्यापेक्षा लहान आणि खूप बावळट आहात. मी असल्या ग्रूपबरोबर सिंहगडला येण्यासाठी रविवारी सकाळी लवकर उठणे शक्य नाही. त्यामुळे फुरंगटून क्षमा रात्री दहापर्यंत त्याच्याशी बोलतच नव्हती. आणि नंतर तिने इतकेच विचारले होते की सोडायला तरी येणार आहेस की नाही! त्यावर तो 'जमणार नाही' असे म्हणाल्यावर आईने त्याला झापल्यामुळे त्याला तयारी दाखवावीच लागली व क्षमा हासली होती.

त्यामुळे आत्ता तो सकाळी लवकर उठल्यापासूनच वैतागलेला होता आणि क्षमाला यडचाप म्हणून मोकळाही झालेला होता. शेवटी दोघे घराच्या बाहेर पडले आणि वाड्याच्या दाराबाहेरही! तर उमेश चार पावले चालून पुढे गेला तर क्षमा दारातच उभी!

उमेश - आता त्या बाबूराव सणसांच्या पुतळ्यासारखी उभी काय राहिलीयस??

क्षमा - ती येतीय नं बया..

उमेश - कोण??

क्षमा - निवेदिता..

ठण्ण! खट्ट! ढॉम्म्म्म्म्ब!

तिच्यायला??? निवेदिता येतीय???? या बावळटने आपल्याला हे आत्ता सांगावं??

आता एकदम भूमिका कशी काय बदलायची आपली? आपल्याहून लहान असली तरी क्षमालाही कळेल की आपण का यायला तयार झालो आहोत अचानक??

उमेश - याचसाठी... याचसाठी मी तुमच्याबरोबर येत नाही...

क्षमा - का???

उमेश - सगळ्या मुली... मी येऊन काय करणार??

क्षमा - ई मुलं आहेत की तीन??

उमेश - कोण मुलं आहेत??

क्षमा - राजेश आहे... सुमेध आहे.. पक्या आहे..

उमेश - हे कोण आहेत पक्या बिक्या??

क्षमा - आमच्या वर्गातलेत..

उमेश - अन हे तू मला आत्ता सांगतीयस.. मला काय सिंहगड आवडत नाही??

क्षमा - दादा तुला म्हणलेवते हं?? मुलंही आहेत म्हणून..

उमेश - जाउदे आता.. आता माझं आवरूनही व्हायचं नाही..

क्षमा - तू काय नववधू आहेस आवरायला?? येत असलास तर चल पटकन... आम्ही थांबतो दोघी..

अत्यंत वैतागल्यासारखा आणि 'ऐन वेळी सांगता तुम्ही हे सगळं' असा चेहरा करून उमेश पुन्हा घरात गेला.

आई - हे काय??

उमेश - बावळट आहे ती... मला वाटलं फक्त मुली चालल्यात..

आई - मग??

उमेश - मुलंही आहेत..

आई - मग??

उमेश - मग मला काय प्रॉब्लेम आहे जायला??

आई - मग??

उमेश - अगं मग मग काय?? आता मीही चाललोय....

आई -मग जा की?? ती कालपासून तेच म्हणत होती की?

उमेश - हो पण दहा मुलींमध्ये मी एकट्याने जायचं का??

आई - मुलं आहेत ना? मग जा आता...

उमेश - तुला तर कधी एकदा मी जातोय असंच झालेलं असतं..

आई - नाही रे बाळा.. हे घे चहा.. आईला कधी वाटेल का आपला मुलगा बाहेर जावा सारखा?

उमेश - पाणी तापलंय का?

बाबा - तुझी आंघोळ म्हणजे काय मुघल बादशहाचे स्नान आहे का? स्वतः लाव गीझर!

उमेश - जाऊदेत गार पाण्यानीच करतो..

आई - अरे काय हे उमेश???

उमेश - एक तर आधीच उशीर झालाय.. आलोच आंघोळ करून..

बारा मिनिटे सत्तावीस सेकंद!

आंघोळ, कधी नव्हे ती मिळेल ती पावडर फासणे, भांग पाडणे, त्यातल्यात्यात बरा टीशर्ट आणि जीन्स चढवणे आणि शूज घालणे! या क्रियांना एवढा वेळ लावून उमेश उत्साहाच्या सर्वोच्च शिखरावरून वाड्याच्या दाराबाहेर आला तर...

क्षमा - ती नाही येत आहे... बरं नाहीये... चल लवकर आता..

उमेश - आSSSSSSSSSSS

क्षमा - काय झा.. क.. अरे काय झालं????? आं??? दादाSSSSS

उमेश - लच... कला... पाय लचकला..

क्षमा - आई??? ए आई... दादाचा पाय लचकला... लवकर ये..

आईला ते ऐकूच गेलं नाही. क्षमा उमेशच्या पायावरून हात फिरवत होती. तो वेदनांनी विव्हळल्यासारखे करत होता. तेवढ्यात मागून आवाज आला..

"काय झालं?? लागलं?? कसं काय???"

हे काय??? आली??? ही आली?? च्यायला आली की राव ही!

आता पाय बरा होणं अत्यावश्यक आहे..

निवेदिता तयार होऊन आली होती.

क्षमा - काय गं?? काकू म्हणाल्या बरं नाहीये..

निवेदिता - बरंय गं.. मी जाऊ नये म्हणून काहीतरी सांगत असते ती... याला काय झालं??

क्षमा - पाय मुरगळलाय..

उमेश - आहाहाहाहाहाहाहा.. काय नस नसेवर चढलीवती.. बाप रे.. हं... चला आता...

क्षमा - हे काय?? पाय थांबला दुखायचा???

उमेश - नसेवर नस चढली की तेवढ्याचपुरत दुखतं... चल आता.. बघत बसू नकोस..

निवेदिता - चढता येईल का?? डोंगर??

उमेश - आता वेदना कमी होतायत... चला चला...

आनंदाचे डोंगर मनात घेऊन उमेश पुढे! चक्रावलेली क्षमा मागे! आणि मिश्कीलपणे हासणारी निवेदिता तिच्याबरोबर!

असं त्रिकुट निघालं भल्या पहाटे!

निवेदिता - तू गेलीयस कधी? सिंहगडावर??

क्षमा - दोनदा.. तू??

निवेदिता - मी आज पहिल्यांदाच..

उमेश मागे वळून कर्त्या पुरुषाप्रमाणे बोलला..

उमेश - काही विशेष नाहीये.. कुणालाही चढता येतो सिंहगड!

फारच धीर बीर आल्यासारखा चेहरा करून मुली निघाल्या मागोमाग!

तेवढ्यात याज्ञवल्क्य आश्रमापासचं कुत्रं भुंकलं! त्याचा आवेश पाहून उम्याही हादरलेला होता. पण इज्जतीचा सवाल वगैरे असल्यामुळे त्याने एक दगड उचलल्याची अ‍ॅक्शन केली. तर ते जास्तच भुंकलं! मग खरच एक दगड उचलून फेकला उम्याने! मग घाबरून पळालं कुत्रं! विजेत्याच्या थाटात उम्या मागे पाहू लागला. दोघींच्या चेहर्‍यावर अंधुक प्रकाशात त्याला कौतुकाची झलक दिसली असावी.

उमेश - या भागात हल्ली फार कुत्री झालीयत..

कॉर्पोरेशनचा कर्मचारी असल्याच्या थाटात म्हणाला उमेश!

चालत चालत भिकारदास मारुतीपाशी आले तर... एक म्हणजे एकही जण नाही..

निवेदिता - हे काय????

उमेश - आजचंच ठरलवतं ना??

क्षमा - म्हणजे काय!

उमेश - मग गेले कुठे सगळे??

क्षमा - मला काय माहीत??

एटीजी उपहार गृह! पाटी वाचून सगळे तिथे गेले. गगन चहा करत होता. वसंता गल्यावर बसून देवापुढे उदबत्ती लावत होता.

उमेश - काका? आत्ता एक बस गेली का हो सिंहगडला?

वसता - हो.. दहा मिनिटे झाली...

उमेश - आता पुढची??

वसंता - एक तासाने!

वैतागलेच सगळे!

क्षमा - तुझ्यामुळे उशीर झाला... कालच हो म्हणाला असतास तर??

उमेश - मला काय माहीत मुलंही येणार आहेत म्हणून.. ते तू मला आज सांगीतलंस..

क्षमा - मग मुलींमध्ये आलास तर काय धाड भरणार होती का तुला??

उमेश - बघा.. आहे का? सहा मुली अन मी एकटा?? वेड लागलंय का मला??

निवेदिता - पण आता काय करायचंय काय??

उमेश - काय करणार?? बसायचं एक तास इथेच..

क्षमा - आता काय बसण्यात अर्थ आहे इथे?? आपण पोचेपर्यंत ते सिंहगडावरही पोचलेले असतील..

उमेश - मग म्हणणं काय आहे तुझं?

क्षमा - जाऊ आता घरी... इथे एक तास थांबायचं अन उन्हात चढायचा होय गड??

उमेश - मग चला...

सगळेच वैतागले होते.

निघाले परत!

उमेश - अजून ऐका माझं... एक तास म्हणजे काही फार नाही.. सहज जाईल एक तास.. मस्तपैकी गडावर जाऊन येऊ... काय गं??

निवेदिता - मला चालेल...

क्षमा - मग काय करायचंय?? थांबायचंय का??

उमेश - थांबूSSSS नाहीतरी घरी बसून काय करणार आहोत..

पुन्हा आले सगळे! यावेळेस एटीजीमध्येच बसले. एकेक मिसळ झाली. मग चहा आला. गगनचा अफाट आवाका आणि अती परिपक्व बोलणे यामुळे करमणूक होतच होती. पंधरा मिनिटांनी क्षमा अचानक ओरडली.

दोघे दचकून तिच्याकडे पाहायला लागले..

उमेश - काय गं??????

क्षमा - अय्या माझा क्लास आहे आज.. विसरलेच काय होते मी बावळटासारखी..

निवेदिता - मग??

क्षमा - आई जाम झापेल बुडला तर.. आज स्पेशल शिकवणार होते... रविवारी कधीच क्लास नसल्यामुळे लक्षातच राहिले नव्हते..

निवेदिता - मग चला घरी..

उमेश - चक्रमच आहे..

क्षमा - अरे चक्रम काय?? रविवारी सुट्टी असते क्लासला.. आत्ता आठवलं मला आज सुट्टी नाहीये ते..

उमेश - पहाटे मिसळ खायला गेलोवतो असं सांगू आता वाड्यात..

निवेदिता तोंडावर हात ठेवून हासली. नुकतेच उजाडत असणार्‍या सकाळी तिचे ते खळखळून हासणे फारच विलोभनीय वाटले उम्याला! क्षणभर तो तिची ती मोहक अदा पाहातच बसला. तिला जाणीव झाली तसे तिने हासणे थांबवले.. हाही विभ्रम भारीच होता.

क्षमा - मी काय म्हणते.. तुम्ही जा की दोघं?? पक्याला तू ओळखत नसलास तरी स्वप्नाला ओळखतोस ना?? स्वप्ना ज्या ग्रूपमध्ये आहे तोच ग्रूप!

निवेदिता - नाही.. जाऊ की सगळेच घरी..

निवेदिताचे ते शरमून उच्चारलेले वाक्य ऐकून आणि तिच्या चेहर्‍यावरचे ते काहीसे बावरलेले भाव पाहून उम्याच्या मुठभर हृदयात कळाबिळा आल्या.

उमेश - तसं खरं.. काही हरकत नाही म्हणा.. नाहीतरी पहाटे उठलोच आहोत.. आता सिंहगडचा बेत फसला यावॠन वाड्यात टोमणे ऐकण्यापेक्षा एक तास उशीरा गेलेलं परवडलं..

निवेदिता - हो पण ... क्षमा बिचारी एकटीच..

उमेश - ती बिचारी वगैरे नाहीये.. तिचा क्लास आहे म्हणून चाललीय घरी.. काय गं??

क्षम - तशी बिचारीच आहे मी..

उमेश - कसली आलीयस बिचारी?? चांगली विचारी आहेस.. काय करायचंय आता??

क्षमा - तुम्ही जा दोघं.. तुम्ही कशाला परत येताय?? मी जाते घरी..

उमेश - इतक्या सकाळी एकटी??

क्षमा - सकाळ म्हणजे काय रात्रंय?? चल.. बाय गं नितू..

'नितू'! निवेदिता या नावाचा शॉटफॉर्म! अत्यंत आवडला उम्याला!

निवेदिता - ए नकोSSSS... सगळेच घरी जाऊयात..

क्षमा - दादा काय खाणारे का तुला??

निवेदिताच्या मुळच्याच गोर्‍यागुलाबी चेहर्‍यावर त्या प्रश्नाने आलेली लाललाल छटा पाहून उमेश पुन्हा हरखला.

निवेदिता - बाबांना पटायचं नाही..

क्षमा - त्यात काय पटायचंय??? माझ्या ग्रूपबरोबर गेलात म्हणून सांगणार ना मी?? नाहीतरी ग्रूपबरोबरच जाणार आहात की??

निवेदिता - तुमच्य ग्रूपमधल्या कुणाचा कसा काय क्लास नाही मग आज??

निवेदिताने अत्यंत महत्वाचा प्रश्न ऐन वेळेस टाकल्यामुळे उमेश वैतागलाच होता. पण प्रश्न खरच महत्वाचा होता.

क्षमा - अगं हा कॉलेजच्या मुलामुलींचा ग्रूप आहे.. क्लासला त्यातलं कुणीच नाहीये..

एक स्तब्ध शांतता! अनेक प्रश्न विचारणारी! आणि कोणत्याच प्रश्नाचं उत्तर निदान त्या क्षणात तरी न देणारी!

आता उमेशला थोडातरी मानभावीपणा करायलाच लागणार होता.

उमेश - हिला सगळं ऐन वेळेला आठवतं! हेच काल आठवलं असतं तर तिघांना आज हा त्रास झाला असता का? पहाटे उठा.. तयार व्हा.. इथे या.. मिसळ खा.. चहा प्या... आणि सिंहगड नाहीच एवढं करून..

क्षमा - तुला जा म्हणतीय ना मी?? उगाच काय तणतणतोयस??

उमेश - चल ग निवेदिता... आपण जाऊ आपले..

अत्यंत त्राग्याने उच्चारावे तसे ते वाक्य उम्याने उच्चारले.

निवेदिता - मला कसंतरीच वाटतंय.... क्षमामुळे सगळं ठरलं आणि तिचंच कॅन्सल झालं आणि आपणच जायचं.. कसं दिसेल हे??

उमेश - बघतंय कोण दिसायला??.. हिच्या क्लासची आठवण हिला आत्ता झाली त्याला आपण काय करणार?? हिच्यामुळे जरी ठरलेलं असलं तरी आपण आपल्याच पायांनी सिंहगड चढणार होतो ना?

या वाक्यावर मात्र दोघीही माफक हासल्या.

क्षमा - बसा तुम्ही... मी निघते.. बाSSSSय..

असे बोलून क्षमा तरातरा निघालीही! निवेदिताला काही करताच येईना!

अक्षरशः श्वास घेतला तरी ऐकू जाईल इतकी शांतता होती दोघांच्या मनात आत्ता! एक सुखद थिजलेपण! एक सुखद हुरहूर, नांव नसलेली जाणीव.. दुसर्‍याचं हवहवंसं अस्तित्व नकोनकोसेही असण्याची जाणीव.. तीही केवळ शरमेखातर!

उमेश तर रस्त्याकडेच पाहात बसला होता.

निवेदिता आवडायला लागल्याच्या केवळ चौथ्या दिवशी एका सुखद आणि धक्कादयक योगायोगाने ती आणि आपण इतक्या समीप?? तेही दिवसभर?? तेही ट्रीपला??

नाचावं का उड्या माराव्यात का लाज वाटल्यामुळे नुसतं बसून राहावं हेच त्याला कळत नव्हतं! असंही नव्हतं की निवेदिता यायला तयार नव्हती. ती तयार असल्याचे तर तिच्या चेहर्‍यावरूनच जाणवत होते. पण तरी तिचं तयार असणं हे उमेशला पराकोटीचा ताण देणारं वाटत होतं! कारण आजच्यासारखा दिवस पुन्हा येईलच असे नाही. आजच... आजच तिला आपल्याबद्दल 'तसे' वाटायला लागलेच पाहिजे. त्यासाठी आपले वागणे अत्यंत व्यवस्थित असायला हवे.

आणि निवेदिता????

अत्यंत अवघडलेपण संपूर्ण शरीरावर पांघरून घेऊन तटस्थ बसलेली होती. नजर जमीनीकडे! लज्जेने आणि अचानक उद्भवलेल्या प्रसंगाने हृदयातून निर्माण झालेले रोमांच अंगाच्या प्रत्येक बिंदूवर पसरलेले! गाल जमेल तितके लाल झालेले! ओठांना पकडून ठेवायची दातांना झालेली घाई! बोटांचा ओढणीशी अव्याहत चालू असलेला चाळा! नजरेच्या कोपर्‍यातूनचुमेशचे मन आणि विचार वाचण्याची नव्यानेच लाभलेली हातोटी!

थंड गार वारा! एक शुभ्रधवल सकाळ!

त्या सकाळीला अत्यंत मिश्कील, हसरे आणि लाजरे बनवणारे तेरा वर्षाच्या गगनचे ऐकू आलेले वाक्य..

"देखा साब.. क्या जमाना आया है.. कबाबमे जो हड्डी थी उसे वापस भेजदिया इन लोगोंने.."

चटकन निवेदिताने फिरवलेली मान! जणू ते वाक्य ऐकलंच नाही अशी! आणि आणखीन असे कोणतेही वाक्य ऐकू येऊ नये अशी इच्छा! वसंताने गगनला मारलेला धपाटा!

'महकणे' म्हणजे काय याचा निवेदिता पहिल्यांदाच अनुभव घेत होती... संपूर्ण शरीर.. स्वतःचेच शरीर तिला आता गुलाबाच्या फुलासारखे वाटू लागले होते..

आणि गगनचे ते वाक्य ऐकून झटकन निवेदिताकडे बघताना उमेश एका स्वर्गीय, अनोख्या विश्वात केवळ निमिषार्धातच हारवलेला होता.

एक संपूर्ण आयुष्य कुर्बान करावे अशी ही सकाळ संपूच नये असे दोघांना वाटत असतानाच...

... टिंग टिंग... टिंग टिंग..

भिमा ते खानापूर..

लाल डबा रुजू झालेला होता.. ड्रायव्हर आणि कंडक्टर चहा घ्यायला एटीजीमध्ये आले...

उमेशने बस निघण्याची वेळ विचारल्यावर म्हणाले... "पाच मिनिटात निघंल... बस्सा"

आणि... बसच्या एका मागच्या सीटवर दोघेच... एकमेकांच्या शेजारी बसले ... तेव्हा बसमध्ये एक म्हणजे एकही पॅसेंजर नव्हता...

आणि पाच मिनिटांनी खरच बस निघाली... तेव्हा उमेशने दोन फुल्ल खानापूर अशी तिकीटे घेतल्यानंतर कंडक्टर पुढच्या सीटवर जाऊन ड्रायव्हरशी गप्पा मारू लागला तेव्हा...

खिडकीत बसलेल्या निवेदिताच्या चेहर्‍याची लाली चोरत चोरत पुर्वेला सूर्यराजा उगवत होता... पण त्याला तू चोरताच येत नव्हती पूर्णपणे.. कारण निवेदिताच्या चेहर्‍याची लाली तर कमी झाल्यासारखी वाटतच नव्हती... मग नुकसान भरपाई म्हणून सूर्य तिच्या भुरभुर उडणार्‍या काळ्याभोर केसांना स्वतःचा सोनेरी रंग प्रदान करत होता...

आणि व्यवहार ठीकठाक झाल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ निवेदिताच्या ओठांवर अत्यंत हलकेसे हसू फुटले तेव्हा...

.... तिच्या केसांनी होणार्‍या सुखद गुदगुल्या अधिक तीव्रतेने व्हाव्यात या अभिलाषेने उमेश किंचितसा तिच्याकडे सरकत होता....

एका अनामिक... अनसंग.. परंतु... अत्यंत गुलाबी प्रेमकथेचा ...

... आज आरंभ झाला होता...

गुलमोहर: 

बेफिकिरजि
काही लोक म्हणजे "दुसर्याला शिकवते ज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असे असतात"
तुमची कादंबरी चालु राहुद्या.

????

पहा पहा, अजुन वाट पहा, खुप विनवण्या करा....... गुणगाण करा मग केव्हातरी बेफिकीर विजेत्याच्या आवेशात पुढचा भाग टाकतील.

नाहीतरी त्यांचेकडुन दुसरे काय अपेक्षित आहे म्हणा Happy

पु. ले.शु. बाकी चालु द्या.

कोणाचेही न ऐकता नवा भाग टाकाच. छानच चाललीय कादम्बरी. ज्यान्ना टीका करावी वाटते त्यान्ना ती करु द्या - तुम्ही आमचे जे सुन्दर मनोरन्जन करताहात, ते सुरुच ठेवा. तुमच्या बाकी सगळ्याच कादम्बर्या वाचून काढल्या - नवा भाग लवकर येत नाही त्या रागावर! पु. ले.शु.!

अमी

सर ... अहो लिहा की पुढचे ..
च्यायला रोज लॉगीन करतोय तर काय सापडत नाही तुमचे नवीन.
ह्या कादंबरी पासून उसंत हवी असेल तर मस्त बोका लिहा ...
बोका लिहिताना ह्या वेळेस थोडा जास्त अभ्यास करून लिहा अशी विनंती.

नमस्कार,
सर फक्त लिहीत रहा......वाचणारे वाचतील...
कुणी काहीही म्हणु देत....

ईथे आवर्जुन सान्गायचय्..माझ्या ऑफीसातील माझ्या मैत्रीणी तुमच लिखाण नियमित वाचतात्...नवीन भाग न आल्यामुळे रोज मला सान्गातात तु बोल त्यान्च्याशी...की सवय झालीय त्यान्च्या लिखाणाची....त्यामुळे...प्लीज आमच्यावर अन्याय होउ देउ नका.....अगदी विचारातही नको असलेल्या लोकान्चा विचार करण्यापेक्षा आम्हा वाच्कान्चा विचार करा.....

वाचणे किन्वा नाही हा choice या लोकान्ना आहे......so dont bother about them.......वाचणारे पण आहेत्....and we appreciate ur work.......so आमच्यावर अन्याय होउ देउ नका .......पु ले शू...........अनुमोदन.....

सर, निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, पण या आधी सुद्धा अश्या प्रतिक्रिया आल्या आहेत आणि येतच राहतील पण त्यांच्यामुळे तुम्ही थांबणार आहात का?
उद्या नवीन भाग आला की हेच लोक (थांबवा सांगणारे) वाचतील,नाही आवडलं म्हणुन वाचायच थांबणार नाहीत आणि खोचक प्रतिक्रिया देतीलच.... पण तुम्हाला लिहायच आहे की नाही हे महत्वाचं...........
खरय श्वेतु.......
.......अहो नकारात्मक प्रतिक्रिया देण्यासाठी देखील या लोकाना वाचण्याचे कष्ट घ्यावेच लागतात...आणी यातच तुमच यश आहे....शिवाय पर्यायाने आम्हा वाचकान्च ही हीत आहेच की......असो स्वभावाला औषध नसत....

प्लीज लिहा....वाट पाहतोय...

सावरी

बेफिकिरजी,
busy आहात कि प्रतिक्रियांमुळे नाराज आहात, म्हणुन लिखाण थांबले आहे. दुसरया काहि कामामुळे लिखाण होत नसेल , तर नक्किच पाहिजे तितकी वाट पाहु, पण फक्त काहि प्रतिक्रियांमुळे लिहित नसाल तर मात्र रागवावे लागेल तुमच्यावर.

मित्रांनो,

जे काय मला जमले ते लिहीत गेलो व काहींना ते आवडत गेले व त्यांनी दाद दिली. ज्यांना आवडले नाही त्यांनी स्पष्टपणे सांगीतले की आवडले नाही.

पण तरी ज्यात मी इन्व्हॉल्व्ह्ड असायचो ते लेखन इतरांना (बहुतांशी) आवडले.

तुम्हे याद हो के न याद हो - ही मोमीन खान मोमीन यांची गुलाम अली यांनी गायलेली गझल! मोमीन हे गर्भश्रीमंत, वैद्य व बुद्धिबळ पटू होते व सहज करमणूक म्हणून शायरी करत असले तरीही गालिब व जौक या समकालींनाच्या तोडीस तोड अशी त्यांची शायरी झाली ही बाब अवाक करणारी आहे.

वो जो हम में तुम में क़रार था तुम्हें याद हो के न याद हो
वही यानी वादा निबाह का तुम्हें याद हो के न याद हो

वो नये गिले वो शिकायतें वो मज़े-मज़े की हिकायतें
वो हर एक बात पे रूठना तुम्हें याद हो के न याद हो

कोई बात ऐसी अगर हुई जो तुम्हारे जी को बुरी लगी
तो बयाँ से पहले ही भूलना तुम्हें याद हो के न याद हो

सुनो ज़िक्र है कई साल का, कोई वादा मुझ से था आप का
वो निबाहने का तो ज़िक्र क्या, तुम्हें याद हो के न याद हो

कभी हम में तुम में भी चाह थी, कभी हम से तुम से भी राह थी
कभी हम भी तुम भी थे आश्ना, तुम्हें याद हो के न याद हो

हुए इत्तेफ़ाक़ से गर बहम, वो वफ़ा जताने को दम-ब-दम
गिला-ए-मलामत-ए-अर्क़बा, तुम्हें याद हो के न याद हो

वो जो लुत्फ़ मुझ पे थे पेश्तर, वो करम के था मेरे हाल पर
मुझे सब है याद ज़रा-ज़रा, तुम्हें याद हो के न याद हो

कभी बैठे सब में जो रू-ब-रू तो इशारतों ही से गुफ़्तगू
वो बयान शौक़ का बरमला तुम्हें याद हो के न याद हो

वो बिगड़ना वस्ल की रात का, वो न मानना किसी बात का
वो नहीं-नहीं की हर आन अदा, तुम्हें याद हो के न याद हो

जिसे आप गिनते थे आशना जिसे आप कहते थे बावफ़ा
मैं वही हूँ “मोमिन”-ए-मुब्तला तुम्हें याद हो के न याद हो

मोमीन खान मोमीन (तखल्लुस - मोमीन) (१८०० ते १८५१) यांच्या या गझलेत अव्यक्त / असफल प्रेमावरचे अत्यंत बोचरे भाष्य आहे.

एक प्रेमकथा लिहिण्याचे मनात होते व या गझलेवरून त्याला ट्रिगर मिळाला असेही म्हणता येईल. ही कथा लिहिताना मला इन्टरनेट, मोबाईल फोन, फेसबूक, ट्विटर हे युग नको होते. त्यामुळे आपोआपच कथा १९८५ च्या आधीच्या काळात जाऊन पोचली. संगणकीय युग नको असण्याचे माझे कारण असे आहे की त्यात प्रेमाचे विविध पैलू, जे माझ्या काळातील लोकांनी अनुभवलेले आहेत, ते येणार नाहीत. उदाहरणार्थ निवेदिताचे जर उमेशवर खरे प्रेम असेल तर सिंहगडला येतोस का असे ती त्याला एसेमेस करून आदल्या रात्रीच विचारूही शकते. मग हा भाग रसरशीत करता आला नसता. (आत्ताही आहे असे दावा नाहीच, केवळ तुलना करायची होती.) (मग या युगात प्रेमच नसते का - असे मला म्हणायचे नसून केवळ शुद्ध व अडथळे असलेले प्रेम दाखवायचे होते. ) आता या काळातील प्रेम म्हंटल्यावर मी प्रथम दिल्लीतील मुस्लिम वस्तीतील प्रेमावर कथा लिहिण्याचे ठरवले. पण त्यात मराठी भाषा फारच थोडी आली असती. शेवटी ठरवले की मराठी मातीचीच प्रेमकथा लिहायची. १९८५ च्या आधीचा काळ म्हंटल्यावर पुण्यात वाडा संस्कृती होती. (पुण्यात सर्वाधिक काळ काढल्यामुळे पुणे इतकेच!)

आपोआपच दास्ताने वाडा आणि रास्ते वाडा यांची तुलना होऊ लागली. दिपू काजलचा प्रवास जीपमधून होता. सिंहगड सहल काहीशी महेश व नैनाप्रमाणे झाली असावी.

आता मला इतके समजत आहे तर मी आधीच का थांबलो नव्हतो? - कारण मला माहीत होते की ही कथा पुढे अत्यंत रोचक व भिन्न होणार होती. ही प्रेमकहाणी मला खूप चांगली बनवायची होती.

ही कहाणी का थांबवली असे काही वाचकांनी प्रतिसादांमधून मला प्रेमाने विचारले. मला वैताग आला म्हणून थांबवली. बाकी काहीच म्हणायचे नाही. मी विजेत्याच्या आवेषात पुन्हा लिहावे म्हणून मला माझे गुणगान नको आहे आणि काहीच नको आहे.

मानभावीपणे मी असे म्हणू शकतो की 'इतक्या इतक्या वाचकांनी मला लिहायची विनंती बिनंती केल्यामुळे' मी सन्मानाने पुन्हा लिहीत आहे वगैरे! Happy मला तसे काही म्हणायचे नाही.

एकच विनंती आहे की मला प्रतिसादच नको आहेत. निदान चांगले तरी! कृपया कुणीही चांगले , सकारात्मक, प्रोत्साहनात्मक असे प्रतिसाद देऊ नयेत. स्पष्ट, रोखठोक, बोचरे, खास ड्यु आय डी काढून घेतलेले, गप्पांच्या पानांवर अव्याहत बोचरी टीका करण्यातून वेळ मिळाल्यावर दिलेले असे प्रतिसाद जरूर द्यावेत, मी माझ्या लेखनाच्या खाली बघणारच नाही. मात्र 'लेखन आवडल्याचा' प्रतिसाद कृपया कुणीही देऊ नये इतकीच विनंती! म्हणजे विपूही करू नयेत.

(आजवर तरी कशाला प्रतिसाद बघितलेत मग? - असा प्रश्न असल्यास आजवर मूर्खपणा केला, आता सुधारलो आहे असे उत्तर गृहीत धरावेत. जे कोण सहृदय प्रतिसादक आहेत त्यांच्यासाठी ही विनंती की सकारात्मक प्रतिसाद देऊ नयेत कृपया )

(हे माझ्या सर्वच लेखनाबाबत आहे अशी विनंती! तुम्हे याद हो के न याद हो - ही कथा मला वेळ मिळेल तशी पूर्ण करेन असे आत्ता वाटत आहे.) (असे कोणी आंतरजालावर कुनाला सांगत नाही, सांगू शकत नाही वगैरे याची जाणीव आहे, तरीही ही केवळ एक विनंती आहे. )

सर्वांच्या प्रेमळ,. स्पष्ट व बोचर्‍या प्रोत्साहनाचे खूप खूप आभार!

-'बेफिकीर'!

बास्स्..बास्स्....बास्स झाला तुझा 'हट्टीपणा'...................!
ठिकै देवा... चल तुझी मर्जि....., नाही देणार प्रतिसाद या पुढे तुझ्या कोणत्याही रचनेला.... हा माझा शेवटचा प्रतिसाद तुझ्या या ढासळलेल्या मनोवृत्तिच्या वरील प्रतिसादावर... आणि या गोड कादंबरीच्या 'या' गोड भागावर.

अरे ज्यांना आपण 'स्पष्ट' प्रतिसाद म्हणत आहात्....ते फक्त उपहास आहेत्..थट्टा आहे...मस्करी आहे... आपल्या प्रत्येक रचनेची. जर तुम्हाला मोमीन खान च्या गजलेने ट्रीगर दिला होता..आणि १९८५ चा काळ साकारायचा होता...तर ते लेखाच्या 'प्रस्तावनेत' स्पष्ट कराचे होते. म्हणजे कुणाचा गैर समज काहीसा तरी कमी झाला असता..पण नाही.....आता तर लेखाच्या सुरुवातिल भलीमोठी 'सुस्पष्ट' 'प्रस्तावना' देणारे आपण आणि त्यात मा.बो शासनाचे आभार मानणारे आपण (ती सुध्दा वाचायला कित्ती छान वाटायचे) कुणाच्या तरी (मला माहीत आहे ती व्यक्ति) टिकेला घाबरुन बावरुन ती सुध्दा 'आखुडती' घेतली.

पण तुझ्या या निर्णयांत तुला नाही वाटत की कळत नकळत तु आपला स्वार्थ साधु पाहतोस......तुच श्रेष्ट आहेस असं सांगु पाहत आहेस्...वाटत असेलही पण...या टिका टिप्प्णी च्या मौसमात 'सैरभैर' होउन कसं चालेल महाराजा ...असले एकांगी निर्णय घेउन..निव्वळ आपल्या 'हट्टाला' शरण जाउन...आपण जसे नाही आहोत तसेच वागुन कसे चालेल..?

भुषणराव माफ करा पण वरील आपल्या प्रतिसादावरु मी हाच दोन निष्कर्ष काढु शकलो, एक, आपण खुपच 'हट्टी' आहात्.....'हट्टी'... 'जिद्दी' नाही...'जिद्द' वेगळी असते. 'हट्टी' आहात.

दुसरे, आपण एक १००% खचलेल्या मनोधैर्याचे व्यक्ति आहात...कारण,
<स्पष्ट, रोखठोक, बोचरे, खास ड्यु आय डी काढून घेतलेले, गप्पांच्या पानांवर अव्याहत बोचरी टीका करण्यातून वेळ मिळाल्यावर दिलेले असे प्रतिसाद जरूर द्यावेत, मी माझ्या लेखनाच्या खाली बघणारच नाही.>> असे विधान तोच करु शकतो जो काहीच करु शकत नाही...किंवा झालेल्या 'टिकांवर' आपला 'राग' अगदी प्रखरतेने (स्वतःला हवा तसा) व्यक्त करु शकत नाही.

अशा व्यक्तिला हा उपायही कमी वाट्ला तर...तो...पुढील 'अवजार' (चाहत्यांच्या भावनांचे प्रेत) वापरण्यासही मागे पुढे पाहत नाही....

<मात्र 'लेखन आवडल्याचा' प्रतिसाद कृपया कुणीही देऊ नये इतकीच विनंती! म्हणजे विपूही करू नयेत.>.

आपण या टिकां समोर हारलात 'भुषणराव' Lol Lol .....हो मी वेडा झालोय.....वेडावलोय मी....आणि इतका प्रचंड रागावलोय की हतबल होण्याशिवाय.. हासण्याशिवाय काहीच करु शकत नाहीय्...(अगदी तुम्ही त्या प्रतिसादां बद्दल ज्या प्रकारे 'राग' व्यक्त केला आहे तशी परिस्थिती) ...मझ्या ध्यानी मनीही नव्हते 'भुषणरावांसारखा' बेफिकीर' माणुस एक्-दोन दिड्कीच्या (च्यायचा..घो.. त्यांच्या) प्रतिसादांना चक्क घाबरला....हाहा... हाहा...चक्क घाबरला....हाहा..हाहा..हाहा..हाहा...बदलुन टाका....बदलुन टाका हे 'टोपण नाव' नाही जागलात.....हाहाहा....... नाही मी नशेत नाहीय....पण..

आज...आज...तुमचा 'प्यासा' अवतरेल दुबईत्.....

वो जो हम में तुम में क़रार था तुम्हें याद हो के न याद हो
वही यानी वादा निबाह का तुम्हें याद हो के न याद हो

कभी हम में तुम में भी चाह थी, कभी हम से तुम से भी राह थी
कभी हम भी तुम भी थे आश्ना, तुम्हें याद हो के न याद हो

विनंती: आपण आपला वरील प्रतिसाद मनापासुन दिला असल्यास सहाजिकच माझा या प्रतिसादाचा राग येईल..हो..हो..नक्कीच येईल. कृपया माझ्या बद्दलचा 'राग' इथे माबोवर शब्दांत व्यक्त करावा (कसाही असला तरी)...आम्ही प्रेमांत सुध्दा रागावतो...उलट उत्तर देणार नाही. जिव देउ शकतो ही गोष्ट वेगळी...ते आपणास कळणार नाही...'संवेदनशिल असणे' हे आपण मानता...पण आपणात ती नाही...फक्त आपल्या काळ्या अक्षरांत.

धन्यवाद!**

नमस्कार,

नाना..हे प्रोफाईल मधे असत....
माझ्या नाववर क्लिक केलत की विचारपुस (विपु) म्हणुन एक असेन तिथे जाउन बघा...तिथे आपन एक्मेकाना सन्देश पाठवु शकतो...

सावरी

oh yes....i think i got it....धन्यवाद सावरी....

हे खोचक टिकाकार आणि स्पेशली चातकरावांसाठी,

तुम्ही Mental आहात का?
का त्या बे.फी. ला सातावत आहात.............?
नाही वाचयच बोलतोय आणि त्याच धाग्यावर दहा वेळा येउन प्रतिसाद ही देतात.
तुम्हाला मनोविकार झाला आहे का?
चल मी तुला आज एक मा.बो. कर म्हणुन एक challenge देते किंवा अस समज की, बे.फी. चा पंखा म्हणुन एक अवहान देतेय.
तुला नाही आवड्त ना बे.फी.चे लेख. ते हस्यास्पद असतात ना?
मग आजपासुन तुम्ही एक कादंबरी लिहा. अगदी रोझ किंवा दिवसाआड एक भाग अपेक्षित अशी.
प्रतिसाद जसा ज्याला योग्य वाटेल तो प्रामाणिक पणे देइल.

IT's OPEN CHALLENGE FOR YOU>>>>>...
अम्हाला ही पाहु देत कि जो लोकांना इतकी नाव ठेवु शकतो तो स्वतः किती कौतुकास्पद काम करु शकतो...........

चांगभलं यांचा आय्पी अन पर्यायाने नाव व लोकशन सापडले आहे Happy

अजिबात विचार करु नये अशी व्यक्ती आहे ती ....

बाकी सविस्तर बोलुच

!!

चरैवति चरैवति !!

अतीशय हळूवार, तरल, आपल्या खुप जवळची वाटावी अशी प्रणयारंभाची, पुढे काय याची हुरहुर लावणारी कथा मला खुपच आवडली.

>>चांगभलं यांचा आय्पी अन पर्यायाने नाव व लोकशन सापडले आहे

टग्या, शिंच्या शिळी बातमी काय देतोस? जाउदे ना यार, फ्रस्ट्रेटेड व्यक्ती आहे ती Wink Light 1 तू म्हणतोस तसं अजिबात विचार करु नये अशी.

Pages