मी..

Submitted by निवडुंग on 27 May, 2011 - 04:40

मी मी म्हणत,
मी ला पोसत,
धुडकावलं सगळंच,
हृदयाच्या जवळचं,
अन् दूर कुंपणावरचं.

सावपणाचे धडे शिकवत,
लुटला सर्वांचा मी,
जो नाही बधला,
त्याचा झिडकारला मी.

माझ्याहूनही प्रचंड मोठा,
झाला कधीच मी,
छद्मी हसत आयुष्याची बाजी हरवून गेला,
मजला माझाच मी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सावपणाचे धडे शिकवत,
लुटला सर्वांचा मी,
जो नाही बधला,
त्याचा झिडकारला मी.

माझ्याहूनही प्रचंड मोठा,
झाला कधीच मी,
छद्मी हसत आयुष्याची बाजी हरवून गेला,>>

खूप सुंदर ओळी!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!