बोस्टनमधली खादाडी

Submitted by अजय on 25 May, 2011 - 13:23

बोस्टन आणि आजुबाजुच्या परिसरातली खादाडीची ठिकाणं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिया रेस्टॉरंट
लोवेल.

1270 Westford St (Drumhill Rd)
Lowell, MA 01851
(978) 454-7777

ड्रमहील रोटरीकडून मिडलसेक्स रस्त्याकडे जायच्या मार्गावर. पालिका बझारच्या इमारतीत, पण समोर.

इथे दर बुधवारी संध्याकाळी/रात्री अनलिमिटेड चाट बफे असतो.

चाट्(पाणिपुरी, भेळपुरी, पापडीचाट), पावभाजी, २-३ इंडियन चायनीज, इडली, डोसा असे १४-१५ प्रकार असतात. डेझर्ट म्हणून २-३ वेळेला आंबा कुल्फी (हो अनलिमिटेड) आणि खीर होती. एकदा गाजर हलवा आणि कुल्फी होती.

रविवारी रात्री
अनलिमिटेड दक्षिण भारतीय भोजन

अजय हे तर माझ्यापासुन ८ माइल्वर आहे.
मी एक वर्षे लोवेल मधेच होते रहायला.
तुम्ही इथेच आहात काय?
चाट बफेट ला मागच्याच आठवड्यात गेले होते, गोड चटणी म्हणुन गोड तिखट सिरप सारखे होते काहीतरी, पण मंचुरीयन खुप मस्त, लाजवाब, टेस्टी मिळते Happy

मिंग्स पण आलं ना आता वेस्टबोरो ला. बॉलीवूड ग्रिल पण चांगलयं. कबाब फॅक्टरी, बुखारा. बॉस्टन मधली बरीच देशी रेस्टॉरंटस पालथी घातलीयेत. Happy

नॅशुआ मधे २ नवीन सुरे झालेत,ग्लोबल फ्लेवर्समधे "करी एक्स्प्रेस्स" आणि मेहमान जवळ "गॉर्मेट इंडीया"

वेस्ट्बरो मधे शाळेच्या जवळ एक कोरियन बार्बेक्यू प्लेस आहे. तिथे आपल्या टेबलवर बार्बेक्यू करत नाहीत, पण जेवण मस्त आहे. त्यांच्या किमचीच्या व्हरायटीसुद्धा छान आहेत.

अजय मला पण त्या प्रिया रेस्टॉरंटबद्दल माहित नव्हतं. Thanks Happy
पण माझ्या पासून लांब आहे ते. ३० माइल्वर ..
काल लेक्सिंग्टन मध्ये आम्ही Royal India Bistro मध्ये गेलो होतो..बरं होतं तसं.
waltham ला पण बरीच आहेत तशी ..तिकडचं अजून Dosa Factory सुरु नाही झालं बहुतेक.

पोंगल आणि रितु कि रसोई पण चांगली आहेत. पोंगल चा buffet छान असतो. रितू मधे वडापाव, रगडा types गोष्टि मिळतात, fast food joint आहे mainly.

Ashland च्या 'Dosa Temple' मध्ये डोसे चांगले मिळतात..मला त्यांचा 'घी रोस्ट मसाला डोसा' आवडतो..

रीतू कि रसोई दिसायला फास्टफूड जोईंट आहे पण प्रत्यक्षात जास्त आहे. सध्याचे बॉस्टन परिसरातले सगळ्यात लोकप्रिय होऊ घातलेले रेस्टॉरंट आहे. एका शनिवारी रात्री १ तास वेळ लागला मला इतकी गर्दी होती.
माझ्या माहितीचे एक कुटुंब सध्यातरी आठवड्यात २ दा जाते तिथे रोज नवीन मेनु असल्याने.

नेहमीच्या गोष्टींबरोबर रोज वेगळा मेनू
बुधवारी रात्रीबफे
शनिवारी रविवारी विशेष डिशेस.

सोमवारी बंद आणि इतर दिवशी रात्री ८:३० वाजताच बंद होते.