आंबटशौकिन पणा म्हातारचळ वगैरे वगैरे ..

Submitted by असो on 24 May, 2011 - 23:50

आंतरजालावर जसं चांगलं आहे तसच निषिद्धही बरच काहि आहे. श्लील अश्लील वगैरेच्या आपल्या कल्पनांना हादरे बसतील असं बरचसं..

जालामुळं विचारसरणी, संस्कृती वगैरे वगैरे मधे वेगाने फरक पडतोय का ? आजवर स्त्री पुरूष ज्या बाबतीत एकमेकांशी बोलायला देखील टाळत होते अशा गोष्टींवर येणा-या काळात फोरममधे चर्चा घडून येतील का ?

अशा चर्चा घडून आल्यास त्या चर्चेत सहभागी होणारे लोक असंस्कृत म्हणवले जावेत का ? कि जाहीर वक्तव्ये केल्याने कुणी विकृत ठरू शकेल ? समलिंगी संबंधांना प्रतिष्ठा प्राप्त होत असताना एखाद्याने त्यावर चर्चेचे आवाहन केले तर आपण त्या व्यक्तीला आंबटशौकीन म्हणणार का ?

ऑर्कूटवर माझे एक मित्र आहेत. माझ्यापेक्षा वयाने खूपच मोठे आहेत. विचारसरणी, वय, जात, धर्म यामधे कुठेही समानता नसतानाही मैत्री होउ शकली याचं कारण म्हणजे त्यांचा स्पष्टपणा. जे काही म्हणायचंय ते तोंडावर आणि स्पष्टपणे बोलणारा हा मनुष्य निर्मळ मनाचा आहे हे त्यांच्याशी नंतर झालेल्या कित्येक भेटींमधून जाणवत राहीलं. जरी त्यांनी वय हा फॅक्टर मैत्रीत आड येउ दिला नसला तरीही इथून पुढे त्यांचा उल्लेख काका असाच केलेला बरा.

काका आपली विचारसरणी आणि लैंगिक विषयावरील मतं, साहीत्य यावरून अनेकदा ऑर्कूटवर अडचणीत आले. एकदा तर मुलीच्या वयाच्या एका कन्येने पब्लिक फोरममधे त्यांच्याबद्दल अगदी वैयक्तिक शेरे मारले होते. पण काकांनी तिला कधीच उत्तर दिले नाही. तसच त्यांच्या एखाद्या शृंगारिक कवितेवरून वादंग निर्माण झाले तेव्हाही काकांनी पुन्हा तिथे आपले मतप्रदर्शन टाळलेले आहे.

या बाबतीत त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांचं म्हणणं इतकच होतं कि आयुष्यभर सर्व जबाबदा-या पूर्ण पाडल्यानंतर आयुष्य म्हणजे काय याची उजळणी सुरू होते. इतर सर्व प्राणीमात्राप्रमाणेच मनुष्य या प्राण्यालाही पोटाची आणि मनाची भूक असते. निसर्ग आपले काम करत असतो. आपण नैसर्गिक शैलीकडून कृत्रिम शैलीकडे जात असतो. नियम वगैरे बनवत असतो. ज्या गोष्टींवर सर्वात जास्त बोलायला पाहीजे त्यावरच बोलायला आपण बंदी घालून बसतो. हे पटतं..

काका कधीही कुणाशीही वैयक्तिकरित्या आंबटशौकिनपणा करीत नाहीत. जे बोलायचं त्याबद्दल फोरममधे चर्चा सुरू करतात. ज्याला या चर्चेत भाग घ्यायचा त्याने घ्यावा किंवा दुर्लक्ष करावे. पण कधीही काहीही न लिहीणारे लोक अशाच टॉपिक्सवर उगवतात आणि मग जहरी आणि एकतर्फी टीका सुरू होते. काकांच म्हणणं इतकंच नेटवर येणारे असे किती स्त्रीपुरूष आहेत जे पॉर्न साइटस पाहत नाहीत ? मग त्यावर चर्चा केली तर श्लील अश्लीलतेचं अवडंबर कशाला माजवता ? अनेकदा या विषयाचं / हेतूचं आकलन करून न घेताच वादंग सुरू झालेले दिसतात. कायदे नक्कीच आहेत, पण त्यांचा वापर करायचा कि नाही हे लोकांच्या विवेकावरच ठरतं.

नुकतच ऐकण्यात आलं कि एका ठिकाणी एका महिलेने त्यांच्याविरूद्ध आजवरची सर्वात तिखट मोहीम उघडली आहे. ती काय आहे आणि कशा प्रकारची आहे याबद्दल फारशी माहीती नाही पण त्यांना म्हातारचळ लागला आहे असे उल्लेख झाल्याची ऐकीव माहीती आहे.

पब्लिक फोरममधे माझी मुलगी स्वतः वावरते अशी कल्पना केली तर तिला लज्जा उत्पन्न होइल असे विषय हाताळल्याबद्दल काकांशी चर्चा नक्कीच करता येईल. पण कदाचित बदलत्या काळानुसार मलाच माझ्या मुलीला समाजात, आभासी जगात कसं वावरावं याचं शिक्षण द्यावं लागेल. माणसं ओळखायला शिकवावं लागेल. सर्वात महत्वाचं तारतम्यभाव कसा बाळगावा हे शिकवावं लागेल. चूक असेल तर विरोध नक्कीच व्हावा त्यासाठी पण हेतू स्वच्छ आहे कि नाही हे तपासून पहायला तर हवं ना ? चर्चेने चूक सुधारता येते यावर विश्वास असायल हवा.

एखाद्या व्यक्तीबद्दल माहीती न करून घेता, तिच्याशी चर्चा न करतच तिच्यावर वाट्टेल ते आरोप केले जाणं, एखाद्या सत्तरीच्या इसमाला लिंगपिसाट, सैतान ठरवणं हे शिष्टसंमत आहे का असाही एक प्रश्न इथं उपस्थित होतोय.

तुम्हाला काय वाटतं ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्यामते तुम्ही जे लिहिलंय, ती झाली तुमची बाजू.. म्हणजेच तुमचा त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन. पण त्यांच्या लिखाणातून, उघड प्रतिसादातून कोणता अर्थ व्यक्त होतो ते महत्वाचं आहे. कोणत्याही प्रकारचं वाचन केल्यानंतर त्यातून आपण आपल्याला लागतील ते अर्थ घेत असतो. हे ७० वर्षाचे गृहस्थ काय लिहितात हे त्यांनी तपासायला हवं.. असं वाटतंय.. तुम्ही एक पुरूष आहात, त्यामुळे एखाद्या स्त्रिला जे जाणवू शकतं तेच तंतोतंत तुम्हाला जाणवू शकेल का? कारण स्त्रियांना जन्मत:च सिक्स्थ सेन्स असतो... कोण व्यक्ती (विशेष करून पुरूष) कोणत्या भावनेने आपल्याशी काय बोलतोय ते स्त्रिया पटकन ताडू शकतात.. त्यामुळे तिथे त्यांच्याबद्दल जे बोललं जातं त्यात अगदीच तथ्य नसेल असं मला वाटत नाही.
जर ते काका खरोखरी तशा अर्थाने काही लिहित नसतील आणि तरिही गैरसमज होत असतील तर दोन पर्याय आहेत एक तर काकांनी पुढाकार घेऊन संवाद साधावा, कारण वाद हा त्यांच्यावर सुरू आहे. किंवा आंतरजालावर भटकू नये. कारण त्यांना तिथल्या मर्यादा समजत नाहीत.
मी माझ्या मनाशी प्रामाणिक आहे, किंवा मला माहीत आहे ना मी काय लिहितोय ते, मग झालं, मला इतरांशी मला काहीही देणंघेणं नाही. हा विचार टोकाचा आहे आणि तो प्रत्येकवेळीच उपयोगी पडतो असं नाही. आपण समाजाशी प्रत्यक्ष्-अप्रत्यक्षरित्या जोडले गेलेलो असतो, त्यामुळे आपली इच्छा नसतानाही काही बाबतीत संयम हा बाळगावाच लागतो.

स्त्रियांना जन्मत:च सिक्स्थ सेन्स असतो

आणि तरीही एवढ्या स्त्रीया फसतात म्हणजे आशचर्यच नै का? मुळात ऑर्कुटवर पु म्हणूण वावरनारी व्यक्ती पुरुषच असते आणि स्त्री नाव घेऊन वावरणारी व्यक्ती स्त्रीच असते, असे तरी कुठे आहे?

लिंगपिसाट हे ठरवताना प्रत्यक्ष्य कृती झालेली अपेक्षित आहे का नुस्तीच बडबड्/लिखाण? हे म्हणजे खुनाची चर्चा चार वेळा केली तर अट्टल खुनी ठरवण्यासारखे वाटते ना?

आणि मुळात समोरच्याने सुरु केलेले संभाषण संपवण्याचा ऑप्शन प्रत्येकाला असतो. मग जेण्व्हा सिक्स्थ सेन्सने कळले की हा माणूस तसा आहे, त्यानंतरही त्या बायका संवाद का आनि कुठल्या विषायावर करत होत्या?

आपण भारतीय हिपोक्राट आहोत. वपु नी एका ठिकाणी म्हटलं होते की .. मनात आले ते मनात ठेवले की सभ्य आणि तेच बोलून दाखवले की असभ्य,अश्लील. मी परदेशि लोकांशी बोललो तेव्हा त्यांचे हे मत आहे की तुम्ही भारतीय हिपोक्राट आहात. हे आपण मान्य करणार नाहि कदाचित कारण... संस्क्रुती वगैरे .. ते फक्त ती एक गरज एवढच समजतात हा फरक . असो.