विपू करण्याबाबत काही नवीन नियम.

Submitted by जीएस on 23 May, 2011 - 18:06

सध्या नव्या नियमांचा मोसम आहे, त्यामुळे सगळ्यांनाच उपयोगी पडतील असे काही नियम बनवले आहेत. जाणकारांनी कृपया भर घालावी.

(१) खालील नियम सर्व विपुकर्त्यांवर बंधनकारक असून त्यांचे उल्लंघन केल्यास आमचे आंतरजालीम कायदा सल्लागार श्री. चिनूक्ष हे विश्वात कुठेही आपल्यावर 'पुणे मनपा माहिती तंत्रज्ञान अधिनियम १८५०' नुसार फायदेशीर कारवाई करू शकतील.

(२) वेळ अमूल्य आहे. आपली विपू थोडक्यात व नेमकेपणाने करा.

(३) एकदा विपू करून उत्तर न आल्यास, पुन्हा विपू करा.
(३)(अ) पुन्हा विपू करून उत्तर न आल्यास, पुन्हा कधीही विपू करू नका.

(४) विपू म्हणजे भोचकपणा नव्हे. या ( किंवा कुठल्याही) दोन शब्दामधला फरक समजून घेण्यासाठी शब्दार्थ बीबी ला भेट द्या.

(५) सर्वांचेच नवे लेखन नवीन लेखन मध्ये दिसते. सबब येथे रिक्षा फिरवू नका.
(५) (अ) अजिबात फिरवू नका.
(५) (ब) 'एकदाच' सुद्धा नाही.
(५) (क) "हे जरा वाचणार / बघणार का? " असे म्हणून पण नाही.
(५) (ड) "ही माझी रिक्षा" असे म्हणत म्हणत पण नाही.
(५)(इ) "ही मा़ही रिक्षा" असे म्हणून त्यापुढे स्मायली दिला असेल तरी सुद्धा नाही.
(५)(फ) तरीही रिक्षा फिरवल्यास अपमान होईल.

(६) महिलांबद्दल अथवा कुठल्याही स्त्रीलिंगी सजीव अथवा निर्जीव वस्तूबद्दल अपमानास्पद अथवा मध्ययुगीन मानसिकतेसह लिहिण्यास सक्त मनाई आहे. असे करणार्‍यास ताबडतोब पार्ल्याक्का ब्रिगेड (पुरोगामी गट) च्या तावडीत देण्यात येईल.

(७) फ्रेंडशिप मिळणार नाही.
(७)(अ) अजिबात नाही.
(७)(ब) 'जस्ट फ्रेंडशिप' सुद्धा नाही.
(७)(क) तुमच्या माझ्या आवडी निवडी जुळत असल्या तरीही नाही.
(७)(ड) तरीही फ्रेंडशिप मागितल्यास अपमान होईल.

(८) कृपया ज्यामुळे परराष्ट्रांशी संबंध बिघडतील, अणुयुद्धाचा धोका निर्माण होईल, परग्रहवासीयांच्या भावना दुखावल्या जातील अथवा परमेश्वरी कोप होईल अशी कुठलीही विपू मला करू नये.

(८)(अ) एखाद्या विपुमुळे परग्रहवासीयांच्या भावना दुखावल्या जातील किंवा नाही याबद्दल श्री. आस्चिग यांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
(८)(ब) सर्व प्रकारच्या परमेश्वरांच्या कोपाबद्दल श्री. विकु निवाडा करतील.

(९) हिंदू वगळता इतर कुठल्याही जातिधर्मांची निंदा करणे हे प्रतिगामीपणाचे व भावना दुखावणारे असल्याने त्यास सक्त मनाई आहे.

(१०) घासून गुळगुळीत झालेले असले तरी हे सांगणे आवश्यक आहे की दुपारी एक ते चार विपू बंद राहील.

(११) लेख, कविता, प्रचि आवडल्यास तिकडेच प्रतिसादात तसे लिहावे, तिकडे न लिहिता विपू लिहून तिकडचा टीआरपी कमी करू नये. केल्यास जशास तसे अवलंबण्यात येईल.

(१२) आपण मला विपू लिहायला आला होतात हे विसरून, मला इतरांनी केलेल्या विपू वाचत बसू नये.
(१२)(अ) वाचल्याच तर मी त्यावर त्या इतरांना केलेल्या विपू वाचायला जाउ नये.
(१२)(ब) तेही केलेत ( तुम्ही अशक्य आहात!) तर त्याबद्दल फाजील चौकशा करू नये.
(१२)(क) केल्यास अपमान होईल.

(१३) विपुत धन्स, धन्यू असले आंग्लाळलेले मराठी शब्द वापरल्यास, अपराध्यास सत्वर झक्कींच्या तोंडी दिले जाईल.

(१४) तुम्ही एकाच्या विपुतून दुसर्‍याच्या, तिथुन पुढे तिसर्‍याच्या असे करत माझ्या विपुत पोहोचला असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही. ताबडतोब, मंदार जोशी यांचा 'व्यसन' हा लेख वाचावा आणि मुक्तांगण गाठावे ही नम्र विनंती.

(१५) आणि हो, माझ्या विपुत आपले स्वागत आहे Happy

गुलमोहर: 

१०) घासून गुळगुळीत झालेले असले तरी हे सांगणे आवश्यक आहे की दुपारी एक ते चार विपू बंद राहील..
Lol

Lol

Lol

ते अ‍ॅडमिनच्या विपूत जाऊन विचारणारे
तुम्ही झोपला आहात काय?
तुम्हाला भेटता येईल काय?
मी नाई कै त्यानेच्/तिनेच माझी पहिली खोडी काढली
अ‍ॅडमिन इकडे बघा, अ‍ॅडमिन त्याला हाकला.

अश्या सरकार दरबारी फिर्याद नेऊन विपू लिहिणार्‍यांबद्दल पण काहीतरी लिहाच.

अश्विनीमामी .......... मस्त लिहीले आहे. मला ते खरेच नियम वाटले म्हणून सकाळधरनं वाचलेच नव्हते.
>>> Rofl

बरं मग, विपु कर्राच्ची का न्हाई ?

आजकाल मोदकांचा सुळसुळाट झालाय त्या चालीवर तूला मी १०/१००/१०००/१००००/ १० चा क्ष वा घात.. विपु करीन असे लिहिले तर ती दोस्ती समजायची का धमकी समजायची ?

आपल्यापुरती विपु ची सोय बंद करता येईल का ? (मला नाही कर्राच्ची .)

आपलीच पाककृति सापडत नसेल आणि "त्या" तिथे लिहायला बंदी असेल, तर ती पाककृति विपु त लिह्हाच्ची का ?

नियम अपडेट कर्रा जी !

अवल, तुझ्या प्रश्नाचे उत्तर १२१४४ वर दिले आहे
हे तुझ्या विपूमधे नमुद करणार होतो, पण या नव्या नियमांनी धास्तावलो.
म्हणुन इथे लिहायचे ठरवले.

खरंतर in lieu of विपू सारखे हे प्रकार सगळ्यात जास्त चलती असलेल्या बाफ वर लिहायला हवेत. झक्कींच्या लग्नाच्या बाफवर लिहिणार होतो, पण चुकुन त्यामुळे ते सन्यास सोडुन पळाले तर काय घ्या?

रच्याकने, sqrt(144)=12

Proud

Pages