विपू करण्याबाबत काही नवीन नियम.

Submitted by जीएस on 23 May, 2011 - 18:06

सध्या नव्या नियमांचा मोसम आहे, त्यामुळे सगळ्यांनाच उपयोगी पडतील असे काही नियम बनवले आहेत. जाणकारांनी कृपया भर घालावी.

(१) खालील नियम सर्व विपुकर्त्यांवर बंधनकारक असून त्यांचे उल्लंघन केल्यास आमचे आंतरजालीम कायदा सल्लागार श्री. चिनूक्ष हे विश्वात कुठेही आपल्यावर 'पुणे मनपा माहिती तंत्रज्ञान अधिनियम १८५०' नुसार फायदेशीर कारवाई करू शकतील.

(२) वेळ अमूल्य आहे. आपली विपू थोडक्यात व नेमकेपणाने करा.

(३) एकदा विपू करून उत्तर न आल्यास, पुन्हा विपू करा.
(३)(अ) पुन्हा विपू करून उत्तर न आल्यास, पुन्हा कधीही विपू करू नका.

(४) विपू म्हणजे भोचकपणा नव्हे. या ( किंवा कुठल्याही) दोन शब्दामधला फरक समजून घेण्यासाठी शब्दार्थ बीबी ला भेट द्या.

(५) सर्वांचेच नवे लेखन नवीन लेखन मध्ये दिसते. सबब येथे रिक्षा फिरवू नका.
(५) (अ) अजिबात फिरवू नका.
(५) (ब) 'एकदाच' सुद्धा नाही.
(५) (क) "हे जरा वाचणार / बघणार का? " असे म्हणून पण नाही.
(५) (ड) "ही माझी रिक्षा" असे म्हणत म्हणत पण नाही.
(५)(इ) "ही मा़ही रिक्षा" असे म्हणून त्यापुढे स्मायली दिला असेल तरी सुद्धा नाही.
(५)(फ) तरीही रिक्षा फिरवल्यास अपमान होईल.

(६) महिलांबद्दल अथवा कुठल्याही स्त्रीलिंगी सजीव अथवा निर्जीव वस्तूबद्दल अपमानास्पद अथवा मध्ययुगीन मानसिकतेसह लिहिण्यास सक्त मनाई आहे. असे करणार्‍यास ताबडतोब पार्ल्याक्का ब्रिगेड (पुरोगामी गट) च्या तावडीत देण्यात येईल.

(७) फ्रेंडशिप मिळणार नाही.
(७)(अ) अजिबात नाही.
(७)(ब) 'जस्ट फ्रेंडशिप' सुद्धा नाही.
(७)(क) तुमच्या माझ्या आवडी निवडी जुळत असल्या तरीही नाही.
(७)(ड) तरीही फ्रेंडशिप मागितल्यास अपमान होईल.

(८) कृपया ज्यामुळे परराष्ट्रांशी संबंध बिघडतील, अणुयुद्धाचा धोका निर्माण होईल, परग्रहवासीयांच्या भावना दुखावल्या जातील अथवा परमेश्वरी कोप होईल अशी कुठलीही विपू मला करू नये.

(८)(अ) एखाद्या विपुमुळे परग्रहवासीयांच्या भावना दुखावल्या जातील किंवा नाही याबद्दल श्री. आस्चिग यांचा निर्णय अंतिम मानला जाईल.
(८)(ब) सर्व प्रकारच्या परमेश्वरांच्या कोपाबद्दल श्री. विकु निवाडा करतील.

(९) हिंदू वगळता इतर कुठल्याही जातिधर्मांची निंदा करणे हे प्रतिगामीपणाचे व भावना दुखावणारे असल्याने त्यास सक्त मनाई आहे.

(१०) घासून गुळगुळीत झालेले असले तरी हे सांगणे आवश्यक आहे की दुपारी एक ते चार विपू बंद राहील.

(११) लेख, कविता, प्रचि आवडल्यास तिकडेच प्रतिसादात तसे लिहावे, तिकडे न लिहिता विपू लिहून तिकडचा टीआरपी कमी करू नये. केल्यास जशास तसे अवलंबण्यात येईल.

(१२) आपण मला विपू लिहायला आला होतात हे विसरून, मला इतरांनी केलेल्या विपू वाचत बसू नये.
(१२)(अ) वाचल्याच तर मी त्यावर त्या इतरांना केलेल्या विपू वाचायला जाउ नये.
(१२)(ब) तेही केलेत ( तुम्ही अशक्य आहात!) तर त्याबद्दल फाजील चौकशा करू नये.
(१२)(क) केल्यास अपमान होईल.

(१३) विपुत धन्स, धन्यू असले आंग्लाळलेले मराठी शब्द वापरल्यास, अपराध्यास सत्वर झक्कींच्या तोंडी दिले जाईल.

(१४) तुम्ही एकाच्या विपुतून दुसर्‍याच्या, तिथुन पुढे तिसर्‍याच्या असे करत माझ्या विपुत पोहोचला असाल तर अजूनही वेळ गेलेली नाही. ताबडतोब, मंदार जोशी यांचा 'व्यसन' हा लेख वाचावा आणि मुक्तांगण गाठावे ही नम्र विनंती.

(१५) आणि हो, माझ्या विपुत आपले स्वागत आहे Happy

गुलमोहर: 

जबरी Rofl
११ नं तर एकदम मान्य! विशेषतः 'तिकडे वाद होईल/चर्चा भरकटेल म्हणून विपूत लिहिले' असल्या बोटचेप्या साळसूदपणावर कडक बंदी असावी Proud
आपल्या किंवा दुसर्‍याच्या विपूचे स्क्रीनशॉट्स घेणे व ते सहा महिन्यानंतरच्या भांडणात वापरणे यावरही बंदी हवी Wink

आपल्या किंवा दुसर्‍याच्या विपूचे स्क्रीनशॉट्स घेणे व ते सहा महिन्यानंतरच्या भांडणात वापरणे यावरही बंदी हवी >>> आगलाऊ Rofl

GHD is one of the world’s leading monster headphones engineering, architecture and environmental consulting companies.bose oe Wholly-owned by its people, GHD is focused exclusively on client success.GHD is recognised for its chi nano commitment to sustainable development chi hair dryer, safety and innovation. We care for chi flat iron the wellbeing of our people, babyliss pro straightener communities and the environments in which dr dre headphones we operate. www.newelectroniclife.com .

GHD is one of the world’s leading monster headphones engineering, architecture and environmental consulting companies.bose oe Wholly-owned by its people, GHD is focused exclusively on client success.GHD is recognised for its chi nano commitment to sustainable development chi hair dryer, safety and innovation. We care for chi flat iron the wellbeing of our people, babyliss pro straightener communities and the environments in which dr dre headphones we operate. www.newelectroniclife.com .

Marilyn Monroe spoke for women designer shoes all over the world when she said, "I don't know who invented yves saint laurent shoes high heels, but all women owe ysl pumps him a lot!" And, really, ysl booties what's not to love? A pair of high heel pumps can do wonders for your posture, give you that ysl sandals extra boost of confidence, and lengthen your legs like no other shoe.

जी एस,
मला ही कलमं जामच आवड्लीत

(७) फ्रेंडशीप मिळणार नाही.
(७)(अ) अजिबात नाही.
(७)(ब) 'जस्ट फ्रेंडशीप' सुद्धा नाही.
(७)(क) तुमच्या माझ्या आवडी निवडी जुळत असल्या तरीही नाही.
(७)(ड) तरीही फ्रेंडशीप मागितल्यास अपमान होईल.

Overall लै हसले... भन्नाट कल्पना... Happy

Lol
"मी तुला लिहिलेली विपू चुकून साजिर्‍याच्या विपूत गेली. आता तिथे जाऊनच ती वाच. हे सांगण्यासाठी ही विपू" अशी सिंडीच्या विपूत आलेली एक महान विपू यानिमित्ताने आठवली. Lol

सिंडी काय सांगते साजिर्‍या..
तिच्या प्रकृतीची चौकशी केल्यास ती मंजू किंवा प्राचीला उत्तर देते आणि वरून 'कमाल आहे, तू त्यांच्या विपुत जाऊन वाचले असशील, असे मला वाटले' असे सांगते. Proud Light 1

जबरी Rofl
५,७,१२ पुणेरी वाटले. पार्ल्याक्का ब्रिगेड जाम आवडले.
अ‍ॅडमिनच्या विपूत काय काय असेल नै

Pages