घरगुती पिझ्झा

Submitted by Chintu on 21 May, 2011 - 10:19

लागणारा वेळ:
१ पिझ्झासाठी १५ मिनीटे

लागणारे जिन्नस:
४ मोठे बटाटे
१ मध्यम लाल कांदा बारिक चिरून
१ मध्यम टोमॅटो बारिक चिरून
२ मध्यम सिमला मिरची बारिक चिरून
मूठभर कोथिंबीर बारिक चिरून
धणे पावडर
जीरे पावडर
लाल तिखट
चवीपुरते मीठ
चवीपुरती साखर
तेल

क्रमवार पाककृती:
१. चिरलेला कांदा, टोमॅटो , सिमला मिरची, कोथिंबीर एकत्र करुन घ्या.
२. बटाटा एका पिझ्झा साठी लागतील इतकाच एका वेळी किसून घ्या.

३. त्यामधे १ छोटा चमचा धणे पावडर, १ छोटा चमचा जीरे पावडर, १ छोटा चमचा लाल तिखट, चवीपुरते मीठ, चवीपुरती साखर घालून मिश्रण एकत्र करून घ्या.

४. तवा थोडा तापवून , त्यावर थोडं तेल सोडून बटाट्याचा किस गोल आकारात पसरवून घ्या.

५. आत त्यावर कांदा, टोमॅटो , सिमला मिरची एकत्र मिश्रण पसरवून झाकून ठेवा.

६. ६-७ मिनिटा नतर झाकण काढून पिझ्झा अर्धा दुमडा.

७. तयार पिझझा हा असा दिसतो.

अधिक टिपा:
१. तव्यावर बटाट्याचा किस टाकण्याआधी थोडं तेल सोडाव, तसच कडेने तेल सोडल की क्रिस्पी होतात.
२. हे गरम असतानाच खाल्ल तर छान चव लागते.
३. लहान मुलांसाठी करायच असल्यास मिश्रणात चीझ घातल्यास चांगले लागतात.
४. बटाटा एका पिझ्झा साठी लागतील इतकाच एका वेळी किसून घ्यावा. अन्यथा काळा पडतो.
५. यात साखर असल्याने थोडा करपल्यासारखा दिसतो.

वाढणी/प्रमाण:
वर दिलेल्या प्रमाणामध्ये ह्या फोटोतल्या साईज सारखे साधारण ८ होतात.

माहितीचा स्रोत:
१.अश्याप्रकारच्या आणि अगदी ह्याच प्रमाणातली रेसिपी अंतरजालावर उपलब्ध असेल तर माहित नाही,
२.या प्रकाराचे नाव माहित नाही , आम्ही याला घरी पिझ्झाच म्हणतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे पाकृ. नताशा, अगं कदाचित लहान मुलांना इंटरेस्टींग, 'हटके' वाटावं म्हणून ठेवलं असेल हे नाव.
बटाट्याचं थालिपीठ खा म्हणलं की नाकं मुरडतील पण तेच बटाट्याचा पिझ्झा म्हणलं की उत्सुकतेपोटी का होईना खातील न Happy आमच्याकडे ह्या अश्याच ट्रीक्स शोधाव्या लागतात Happy

साधारण एका थालिपिठाला जेवढे तेल लागते तेवढेच लागेल... चित्रात दिसत आहे तेवढा चमचा तेल कडेने सोडावे लागेल... पिझ्झा उचलता येण्याइतपत...

सावनी : हो खर आहे... लहानपणी सिमला मिर्चि खायला नाक मुरडायचो तेव्हा आई हा पदार्थ करायची.. खर तर हा पदार्थ लहान मुलासाठीच आहे.. तेव्हा पिझ्झा वैगेरे बाहेर जाउन खाणे माहित नव्हते... मग पिझ्झा म्हट्ल की आम्ही खुशीत हे खायचो..

एकदम इंटरेस्टींग नी हटके. माझ्या घरी हे धावेल Happy करुन पाहायलाच हवे असे.

दिनेशदांच्या इ-मेजवानीत बटाटा थालिपिठ आहे तसेच साधारण दिसतेय...

मस्तच आहे प्रकार हा पण..

आज मी उत्तपम बनवला आणि त्यावर पिझ्झाचे संस्कार केले. वरून लोणी पण टाकलं. करून बघा आणि आवडतय का सांगा

चिनूक्स : हो 'रोश्टी' गूगल वर पाहिला, सधारण सारखाच आहे.

दिनेशदा : तुमचा प्रतिसाद पाहुन छान वाटल. तुमचे सगळेच लेख वाचतो. तुम्ही दिलेल्या टिप्स खुपच उपयोगी असतात. खर आहे नॉन स्टिक तव्यावर केला तर तेल अगदी कमी लागेल पण बटाटा तेलात फ्राय होण्याइतपत तेल घालावे लागते, नाहितर छान चव नाही येत.

मक्याचे दाणे सुद्धा चांगले लागतात यात. आतले मिश्रण आपल्या आवडीनुसार घाला पण सिमला मिर्ची हवीच्..तिच्यामुळेच वेगळी चव येते.

सगळ्याचे आभार, या पदार्थाचा स्त्रोत माहित नाही त्यामुळे नाव सद्धा माहित नाही...

हा पदार्थ आई करते, तिला तुमचे अभिप्राय कळवतो.

छान Happy

मलाही रोश्टी सारखाच वाटतोय. पण सिमला मिर्ची वगैरे घातल्यामुळे छान चव येत असेल Happy करुन बघेन Happy