मेथी, टोमॅटो, कोथिंबीर

Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50

घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या सासरी पिवळ्या चाफ्याचं झाड आहे त्याला ६०-७० फुलं दररोज येतात! इतका भन्नाट वास येतो!>> आहाहा हा
नंदिनी. सांग ना मीरी कशी लावलीस. पुण्यात लागेल का? म्हणजे गावावरुन रोप आणता येईल.

इथला सल्ला घेउन दुधी च्या फुलांचे परागीकरण केले आणि मस्त एक दुधी आला. इतर फारसे वाढले नाहीत पण. काय कारण असेल? एक छोटा आहे अजुन पण बाकी काहीच नाहीत. अजुन फुले येतील का? Dudhi Bhopla.jpg

लिना, मस्त वाढलाय कि दूधी भोपळा. घरच्या घरी यापेक्षा मोठा नाही व्हायचा.
स्वाती, अगदी ताजी सोनचाफ्याची फूले मिळत असतील, तर तूरटीचा संपृक्त
द्राव करुन तो एका बाटलीत भरायचा. त्यात ती फूले टाकायची आणि
बाटली लाखेने सील करायची. आतली फ़ूले वर्षानूवर्षे उत्तम टिकतात.
पूर्वी कोकणात, घरोघरी अश्या बाटल्या असायच्या.
मिरीचा वेल कोकण भागातच होतो. त्याला उष्ण व दमट हवामान लागते.
त्याच प्रकारातला, म्हणजे खायच्या पानाचा वेल, पूण्यात होऊ शकेल.
या दोन्ही वेलाच्या जाडसर फांद्या लावाव्या लागतील.
पिंपळी पण व्हायला हरकत नाही, त्याचे झुडूप असते. आणि ती औषधी आहे.

मिरीचा वेल कोकण भागातच होतो.>> हो गावाला घरी आहे. म्हणुन विचार करत होते इथे लावता येइल का? पण हवामानामुळे शक्य दिसत नाहीये. पण विड्याचा नक्की लावुन बघेन.
माहिती बद्दल धन्यवाद Happy

इथला सल्ला घेउन दुधी च्या फुलांचे परागीकरण केले आणि मस्त एक दुधी आला >> नक्की कसे केले परागीकरण ? मी पण दुधी लावलाय , पण फुल येऊन सुकून जाते Sad

मी लसुण लावला आहे. आता १० दिवस झाले पण काहीच आले नाही. धणे सुद्धा लावले आहेत (भरडुन) पण काही नाही आले.

लसुण जूना असेल तर तो उगवत नाही. कधी कधी साठवणीतल्या लसणाला
कोंब येतात, ते चांगले रुजतात.
धणे पण जूने असतील. आता उकरुन, दुसरे काहितरी लावता येईल.

धन्यवाद दिनेशदा. घरीच नाही तर बाजारातल्या इतर दुधीं पेक्षा ही हा मोठाच आहे. पण मला माहिती हवी आहे की हा दुधी येउन गेला तर आता अजुन फुलं येणार की तो वेल जाइल आता? अजुन फुलं तरी दिसत नाहीयेत. एक छोटा आहे अजुन वेलावर.
दिप्सः मेल फुलांचे पराग एका ब्रश ने फिमेल फुलांना लावले. फिमेल फुल म्हण्जे ज्याला छोटे भोपळे आहेत ते.
साधना चे आभार.

दीप्स, नरफुलातले पराग पेंटब्रशने उचलुन घ्यायचे आणि ते ओवरीजवाल्या फुलावर शिंपडायचे...हे मागे दिनेशनी सुचवलेले Happy

(तुला वेलावर दोन प्रकारची फुले दिसतील, एक फुल नेहमीसारखे ते असते नरफुल तर एक फुल इंचभर कारले/दुघी/भोपळा वगैरे जसे रोप असेल तसे फळ घेऊन आलेले असेल. ही असते ओव्हरी आणि ओव्हरीपुढे असते ते मादीफुल. नरफुलाच्या मधे जिथे पाकळ्या सुरू होतात तिथे पुंकेसर सापडतील.)

मी तर सरळ ते नरफुल तोडुन त्याच्या पुंकेसरातले पराग मादीफुलावर शिंपडायचे.. एकदा हे काम झाले की ते नरफुल हवेय कोणाला??? Proud आधीच आपल्या मातीतली शक्ती मर्यादीत, ती काम झालेल्या नरफुलांवर वाया कशाला घालवायची ??? Proud

मिरी कुंडीत लावता येईल की नाही शंका वाटते. त्याला पाणी भरपुर लागते असे कोकणात ज्यांनी लावलेय ती माझी मावशी सांगत होती, शिवाय आधारही मजबुत लागतो. मोस्ट्ली माडाच्या झाडावर सोडुन देतात मिरीचा वेल. कुंडीत खायची पानांचा पानवेल मात्र मस्त होतो. माझ्याकडे होता... Sad पण खुपच पसरायला लागला म्हणुन शेवटी काढुन टाकला.

अरे कोणी वाचतंय का?
उपाय सांगणार्‍यास मी अर्धे राज्य बक्षीस देईन Happy

माझ्याकडे कढीलिंबाच्या पानांवर बारीक बारीक काळे ठिपके आले आहेत.त्यासाठी काही उपाय आहे का?
मी बायोकल्चर वापरून झाडे लावली आहेत. त्यासाठी कमीत कमी माती आणि शक्य तितका ओला कचरा वापरते.

तीन आटवड्यापूर्वी देशी मिर्ची, ड्बू मिर्ची व कांद्याची पात , या सगळ्यांचे तरू लावले आहेत. परंतू ड्बू मिर्चीला फूल येते व जाते. रोपांची वाड कमी आहे. कीड लागलेली म्हणून रोगर व झाडांचे टअ‍ॅनीक फवारले. त्याला पण आटवडा झाला. कोणाला उपाय माहीत आहे का? मोग्र्याचा फोटो खूप छान आहे. मी कालच नर्सरीतून आणून लावला.

धन्यवाद दिनेशदा. परत प्रयत्न करेन.

माझी मोहरीची झाडे मात्र छान दिसतात, छोटीच आहेत अजुन. इथे फोटो कसा लावयचा?

स्वाती, मिरीचा वेल माडाच्या आजूबाजूने लावलाय. बहुतेक कुंडीत वगैरे वाढणार नाही. त्याची वेगळी काळजी वगैरे काही घेत नाही आम्ही.

आमच्या रत्नागिरीच्या पूरपावसाने सर्वच झाडाची भरपूर वाट लावली. आता श्रावणात परत भाज्या लावाव्या लागतील.

आजच्या वार्‍यात पावसात माझी बहुतेक सगळी झाड गेली. Sad वार्‍याचा जोर इतका होता की एखाद दोन वगळता सगळ्या कुंड्या फुटल्या माझ्या Sad

हाय रे देवा,.... मनिषा खरेतर मी आज तुला फोन करणार होते, नविन मेंबर स्थिरावले की नाही ते विचारायला Sad

ओह्ह मनिषा! वाईट वाटले खूपच Sad वारं पाहून कुंड्या आडोशाला ठेवायचे, किंवा हलवून ठेवायचे लक्षात आले नाही का? कुंडी फुटली चक्क? बापरे! काय जोर असेल!

मी पेरलेल्या धन्यातून कोंब आलेत, पण त्याचा आकार बघता त्याचा आणि कोथिंबीरीचा काही संबंध असेल असे वाटत नाहीये!! Biggrin काय आलेय देव जाणे Uhoh बहुदा मातीत असलेलेच काहीतरी उगवलेय..

पहिली दोन पाने आणि नंतरची पाने यात फरक असतो खुप.. त्यामुळे पुनम, सचिनचे ऐक... Happy

अर्थात धन्यातुन भोपळ्याच्या पानाच्या आकाराचे काही दुसरे उगवले तर मात्र..... Happy

मनिषा, कुंड्या गॅलरीच्या कठड्यावर होत्या काय??? आता झाडे संभाळ. मुळांना त्याच मातीच्या आवरणाखाली ठेव म्हणजे सुखरुप राहतील. हवेला एक्पोज झालेली मुळे फारतर अर्धा तास जगतात, नंतर झाडे माना टाकतात.

मुळांना मातीत गुंडाळुन ठेव, आता हवेत आर्द्रता खुप आहे त्यामुळे तग धरतील दुस-या कुंड्या आणेपर्यंत. प्लॅस्टिकच्या कुंड्या घे, पर्यावरण-मैत्री करणा-या नसल्या तरी सोयीच्या पडतात.

नंदिनी, मनिषा,
पावसाने घातलेल्या थैमानाबद्दल वाचले. जपून रहा.
पाऊस पडायला हवाच होता,
झाडे, नवीनही लावता येतील.

मानक, इथे मदतसमितीचा बीबी आहे या विषयावर.
आम्हालाही आवडेल बघायला.

माझ्याकडे वाढलेली रोपे

तुर
Tur.JPG

काकडी
Kakadi.JPG

रंगित तेरड्याच्या फुलांची रोपे
Terada.JPG

अरे कोणी वाचतंय का?
उपाय सांगणार्‍यास मी अर्धे राज्य बक्षीस देईन Happy

माझ्याकडे कढीलिंबाच्या पानांवर बारीक बारीक काळे ठिपके आले आहेत.त्यासाठी काही उपाय आहे का?
मी बायोकल्चर वापरून झाडे लावली आहेत. त्यासाठी कमीत कमी माती आणि शक्य तितका ओला कचरा वापरते.

कबूतर,
ब्लॅक स्पॉट्स का येतात ते इथे दिलय. इथे गुलाबावर पडलेल्या ब्लॅक स्पॉट बद्दल माहिती आहे, कदाचित तुम्हाला उपयोगी पडेल.
हे वाचलत का? तिथे घरगुती उपायांमध्ये नीम ऑइल स्प्रे करायला सांगीतले आहे.

मी लिंबाचे झाड लावले आहे. पण अगदी ३-४ च लिंब पुर्ण मोठी होतायत. फळं खूप लागतात पण थोडी मोठी झाली की गळून जातायत. काही कोणाला उपाय माहिती आहे का?

मी पहिल्यांदाच झाडांना एकटे सोडून गावी गेलेले. पण राहिली बिचारी नीट. इतकी शांत व प्रेमळ सोबत करतातेत. हे मी आधीच करायला हवे होते असे वाट्तेय. मनिषा, सारी परत लावावी लागतील काय?
पाड्स मध्ये सात दिवस तूफान आले होते त्याची आठवण आली.

सचिन, लसूण तयार होणार नाही (त्यासाठी बिया लावाव्या लागतील)
पण हि लसणाची पात वापरता येईल. (चटणी, भाजी वा ऑमलेट मधे )

रचना, झाडाला जितकी लिंबे पोसता येतील, तेवढीच टिकतात.
झाड थोडे अजून वाढू दे.

Pages