मेथी, टोमॅटो, कोथिंबीर

Submitted by admin on 9 July, 2008 - 21:50

घरी भाज्यांची लागवड.
या अगोदरचं हितगुज इथे वाचा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅलो चे एखादे पान कापून वेगळ्या कुंडीत पुरले तर ते रुजेल का ? त्याला कशा प्रकारची माती लागेल ?

त्या पानाबरोबर तोडतानाच काही मुळे पण आली असतील तर रुजेल. नुसते पान नाही रुजत. कोरफडीला साधारण नऊ दहा महिन्यानच जमिनीतून नवीन फुट येते ती दुसर्‍या कुंडीत लावलेली सगळ्यात चांगले. माती पाण्याचा निचरा होणारी हवी खताची फारशी जरुरी नसते. वर्षातून एकदा शेणखत / काँपोस्ट पुरते.

रच्याकने कोरफडीचा काय उपयोग करावा? मी सहज मिळाली म्हणून लावली होती आता मस्त फोफावली आहे.

कोरफड, पाने कापुन फ्रिजमधे १-१ महिना राहतात. त्याचा गर चेहरा, हात, पाय, केसांना लावावा. चटका बसल्यास, आग होत असल्यास तो गर वापरावा. खोकल्याला देखिल (कोरडा) कोरफड हे छान औषध आहे.

रच्याकने, तरिही संपली नाही तर, तो गर ड्ब्यात भरुन पाठवा मी वापरेन :), असा रेडीमेड गर मिळत असेल तर नाही कोण म्हणेल?

मोनाली Happy घरी जुनी आणि नवीन अशी दोन्ही मंडळी आहेत ज्यांचा कोरफडीवर डोळा आहे. त्यांना पहिला उपयोग बरोबर माहित आहे. पण मी त्यांना बिलकुल हात लाउ देत नाही सध्या.

चटका बसल्यास, आग होत असल्यास तो गर वापरावा. खोकल्याला देखिल (कोरडा) कोरफड हे छान औषध आहे. >> या उपयोगांबद्दल धन्यावाद,

पण मी त्यांना बिलकुल हात लाउ देत नाही सध्या.>>> पण का? अजुन १ - मेंदी भिजवताना पण त्यात हा गर टाकता येतो.
कोरफडीच्या जातीची खात्री करुन बिन्धास्त खा. हो पण कडु लागते हां.

माधव, पुरुषांसाठी पण कोरफडीचे अनेक उपयोग आहेत. त्याचा छोटासा तूकडा आफ्टरशेव्ह म्हणून वापरता येतो. केसातून फिरवल्यास जेलचे काम होते. डोळ्यावर ठेवल्यास जागरणाचा त्रास, जळजळ तर थांबतेच पण डोळे आले तरी हा उपाय करता येतो. खोकला वगैरेवर उपाय आहेतच, पण लिंबाच्या सरबतात देखील तो गर वापरता येतो.

@लालू, अरे वा, कुंडी त लाऊन पण इतक्या प्रमाणात आणी एव्हढ्या मोठ्या ढब्बू मिर्च्या आल्या.
केव्हढी मोठी आहे कुंडी ? किती दिवस लागले?

निराली, ६-८ आठवडे झाले असतील. कुंडी फार मोठी नाही, १६ इन्च आहे. मिरच्या अजून इथे मिळतात त्या मानाने लहानच आहेत, पण मी आता काढेन भरल्या मिरच्या करायला. आधी ४-५ लागून मोठ्या झाल्या त्या काढल्यावर एकदम बर्‍याच आल्या.

लालू,मस्तच दिसतायत मिरच्या.अश्याच लाल्,पिवळ्या मिरच्या लावता येतिल का?

>त्या पानाबरोबर तोडतानाच काही मुळे पण आली असतील तर रुजेल. नुसते पान नाही रुजत. >> व्यवस्थित रुजते Happy माझ्याकडची कोरफड पान लावूनच रुजलेली आहे.

मी बाग्कमात अगदी नविन आहे... अणि माज्या परसात सध्या काही झाडे लावतेय

मला एक पेरू च मोठ रोप दिल एकानि.....लावून साधारण एक आठवडा झाला.....
रोज पानी घालते थोड ख़त ही घातलय...पण पानानी मान ताकलिये....रुजेल असा वाटत नाहीये Sad ....काय करता येइल अजुन वाचवन्या साठी??

काही झेंडू ची नविनच लहानशी रोप लावालियेत...पण त्याची पण काही आल्या सारख्या खाऊन संपवतात....रोपच्या काडयाच उरल्यात ...ह्यावर ही के करता येइल ??

आणि ओवा कसा रुजवायचा???

मी बाग्कमात अगदी नविन आहे... अणि माज्या परसात सध्या काही झाडे लावतेय

मला एक पेरू च मोठ रोप दिल एकानि.....लावून साधारण एक आठवडा झाला.....
रोज पानी घालते थोड ख़त ही घातलय...पण पानानी मान ताकलिये....रुजेल असा वाटत नाहीये ....काय करता येइल अजुन वाचवन्या साठी??

काही झेंडू ची नविनच लहानशी रोप लावालियेत...पण त्याची पण काही आल्या सारख्या खाऊन संपवतात....रोपच्या काडयाच उरल्यात ...ह्यावर ही के करता येइल ??

आणि ओवा कसा रुजवायचा???

मी एका महिन्यांपूर्वी मिरचीच्या बिया पेरलेल्या. बरीच रोपे उगवली पण एकच रोप टिकले. त्याची सुद्धा वाढ होत नाही आहे. काय कारण असेल?

सदाफुलिला अगोदर दर दिवस भरपूर पाणी घालायचो. १ -२ आठ्वड्यानी पाने काहितरिच जास्त यायला लागली आणि फुले यायचीच बंद झाली आहेत. काय करावे?

सदाफुलिला अगोदर दर दिवस भरपूर पाणी घालायचो. १ -२ आठ्वड्यानी उकर काढुन मातीत थोडे गांडुळ खत टाकले. त्यानंतर पाने काहितरिच जास्त यायला लागली आणि फुले यायचीच बंद झाली आहेत. काय करावे?

दिनेशदा, जागु, साधना.. ह्या सगळ्या गप्पा वाचुन मला तर झाडाच वेड च लागल आहे.. ईथे फिरताना. मी झाड च बघत फिरते.... अरे हे झाड तर दिनेशदा बोलत होते.. अरे ह्या झाडा बद्दल तर जागु साधना बोलत होत्या.. हेच वेडा मुळे मला पण माझ्या घरी एखाद झाड लावावेसे वाटत. आहे..
पण आता ईथे थंडी चालु झालिय.. आणि सुर्यप्रकाश पण हळु हळु कमि होईल... तर ह्या वातावरणात मी मेथी लावली तर येईल का? किंवा दुसरे काय लावु शकेन...

दीपा,

लंडन अन इंग्लंडचा बराचसा भाग हार्डीनेस झोन ८ मधे मोडतो.

http://en.wikipedia.org/wiki/Hardiness_zone#Britain_and_Ireland_Hardines...

प्लांट्स फॉर हार्डीनेस झोन ८ असे गूगल केले तर बरीच माहिती मिळेल. अर्थात हार्डीनेस हा अंगणात किंवा बालकनीत उघड्यावर ठेवता येणार्‍या झाडांविषयी.

मोगरा, कढीपत्ता, तुळस, अबोली , अनंत, रातराणी, विड्याची पानं, हळद , मरवा, जास्वंद ही झाडं हिवाळ्यात घरात अन उन्हाळ्यात अंगणात असं करून झोन ४,५ मधे पण अनेक वर्षे टिकतात.

तुमच्या इथे रोझमेरी, लॅव्हेंडर वगैरे बाहेर सुद्धा टिकू शकतील.

क्यू गार्डनच्या साईटवर किंवा गार्डन वेब.कॉम इथे बरीच माहिती मिळेल.

मेथी, मोहरी, मुळ्याचा पाला, अरुगुला ( रॉकेट ) हे प्रकार घरात उगवतील.

मेधा खुपच छान माहिती दिलीस...धन्यवाद ...मी आधि मेथी तर नक्किच लावुन बघेन.. कारण मला झाड लावायला स्कोप फक्त किचन च्या खिडकि वरच आहे.. Sad

ह्या खेपेला तुळस उन्हाळ्यात छान वाढली. थंडी पडायला लागल्यावर घरात आणली तर सगळी पानं एका आठवड्यात पडून गेली. आमच्या इथे थंडीत ३०-४० F असतं टेंपरेचर. क्वचीत ३-४ दा थोडासा स्नो पडतो. उन्हाळ्यात बाहेर ठेवल्यावर परत रुजेल का मातीत पडलेल्या बियांमुळे?

शिमला मिरची कशी लावावी,?<< याचे बी मिळते, बी लाऊन रोपे तयार करायची आणी बागेत तयार केलेल्या वाफ्यांमधे लावायची

पुदिन्याचे रोप लावावे लागते, एक काडी लावली तरी ती जमिनीवर पसरते

Pages