फ्रेंच ओपन - २०११

Submitted by Adm on 17 May, 2011 - 21:18

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सुरु होत आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकीत नदाल, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकीत फेडरर ह्यांच्या विजेतेपदासाठी चुरस असेल.
महिला एकेरीत वॉझनियाकी आणि किम ह्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन मिळाले आहे. ह्या दोघींव्यतिरिक्त गतविजेती स्किवोने, स्टोसुर, शारापोव्हा ह्यांचा खेळ कसा होते हे पहाणेही महत्त्वाचे ठरेल.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार, मानांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकले तर उपांत्यफेरीचे सामने ह्याप्रमाणे होतील.

पुरुष एकेरी :
नदाल वि सोड्या
मरे वि मेल्झर
फेरर वि फेडरर
बर्डीच वि जोको

महिला एकेरी :
वॉझनियाकी वि स्टोसुर
झ्वोनारेवा वि स्किवोने
ना ली वि अझारेंका
शारापोव्हा वि किम क्लायस्टर्स.

ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही.. कुठल्याही सेट्चा पहिला गेम झाला की ब्रेक घेतात. आणि मग नंतर प्रत्येकी २ गेम नंतर ब्रेक.. त्यामुळे तसं वाटतय तुला.

फेडीचा आत्ताचा डिफेन्स जबरा!!!

बाबो, पुन्हा टायब्रेकर!
सहसा टायब्रेकर फेडरर जिंकतो त्याच्या सर्व्हिसच्या बळावर. आताही तेच होईल असा माझा अंदाज आहे..

फेडी जिंकला.....................

बास रे बास फचिन, तेवढं एक झालं की मग लंडन ऑलिंपिक गोल्डमेडल सोडून आपल्याला आयुष्यात काहीही नको. मग नंतर फेडरर देववर्मन कडून हरला तरी वाईट वाटणार नाही. Proud

जोकोला आता पुन्हा पुढच्या वर्षीच्या ऑओची वाट बघत बसावं लागेल. Wink

नदाल फेडिला रविवारी हरवेल. जोको फायनलला आला असता तर एकवेळ गोष्ट वेगळी होती. नदाल बोर्गच्या रेकॉर्डची बरोबरी करणार...

Pages