फ्रेंच ओपन - २०११

Submitted by Adm on 17 May, 2011 - 21:18

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सुरु होत आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकीत नदाल, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकीत फेडरर ह्यांच्या विजेतेपदासाठी चुरस असेल.
महिला एकेरीत वॉझनियाकी आणि किम ह्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन मिळाले आहे. ह्या दोघींव्यतिरिक्त गतविजेती स्किवोने, स्टोसुर, शारापोव्हा ह्यांचा खेळ कसा होते हे पहाणेही महत्त्वाचे ठरेल.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार, मानांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकले तर उपांत्यफेरीचे सामने ह्याप्रमाणे होतील.

पुरुष एकेरी :
नदाल वि सोड्या
मरे वि मेल्झर
फेरर वि फेडरर
बर्डीच वि जोको

महिला एकेरी :
वॉझनियाकी वि स्टोसुर
झ्वोनारेवा वि स्किवोने
ना ली वि अझारेंका
शारापोव्हा वि किम क्लायस्टर्स.

ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या म्याच मध्ये तिसर्या सेटला १-५ ने पिछाडीवर असूनही टाय ब्रेकरमध्ये सेट नेऊन सहज जिंकला नदाल!

काही पॉइन्ट्स तर २३-२४ रॅलिज चालले!.

वॉझनियाकी टॉप सीड का होती कुणी सांगू शकेल का...तिचे नाव पण फारसे ऐकण्यात, वाचण्यात नव्हते..आता अशाही बाई हान्तूकोव्हाकडून हरल्यात...

गेली वॉझनियाकी... किरकोळीत गेली.. म्हणजे परत एकदा विल्यम्स भगिनींना आरडाओरडा करायचा चान्स.. एकही ग्रँडस्लॅम न जिंकता ही कशी काय वर्ल्डनंबर वन होऊ शकते म्हणून...

आशु.. ती ग्रँडस्लॅममध्ये फेल्यूअर आहे पण बाकीच्या स्पर्धा जिंकत असते.. आणि सध्या तिचे गुण बाकी सगळ्यांपेक्षा जास्त आहेत...

नादाल चा खेळ फिका पडतोय का? काल फार प्रयत्न करावे लागले त्याला जिंकण्यासाठी .. जरी स्ट्रेट सेट्स मध्ये जिंकला तरी ते सहज नव्हतं!

शॅरापोव्हा जिंकली की गेली?

अरे एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे.. महिलांच्या टेनिसमध्ये हे वर्षानुवर्षे चालू आहे. त्यातल्या त्यात त्या विल्यम्स् भगिनींनीच सातत्य राखले आहे.

नादाल चा खेळ फिका पडतोय का?
>> हो, मलापण काल क्षणचित्रं बघून असंच वाटलं. माझा होरा असा आहे की नद्दू ह्यावेळी मध्येच कुठेतरी हरेल. बघू आता काय होतंय ते.

मी नादाल ला खूप आधीपासून फॉलो करत नाही .. रादर टेनीस च मागच्या वर्षीपासून पुन्हा बघायला सुरूवत केली आहे खूप वर्षांनीं .. तर मला तरी नादाल चा खेळ क्लासी वाटला नाहीये .. तो चांगला अ‍ॅथलीट आहे, पॉवरफुल आहे, जिद्द, डिटरमिनेशन आहे, थोडक्यात टेक्नीक मध्ये परफेक्शन पण टेनिस मात्र खूप चांगलं नाही त्याचं असं मला वाटतंय गेल्या काही मॅचेस बघून आणि ज्योको, फेडरर चा खेळ बघून ..

खरंतर फेडरर सारखं टेनीस कोणाचंच नाही बहुतेक .. ज्योको तरूण आहे (फेडरर पेक्षा), अतिशय उत्कृष्ट अ‍ॅथलीट आहे आणि टेंपरामेंट चांगली आहे, म्हणून पुढे जाईल पण फेडरर सारखा खेळ नाही नाडाल आणि ज्योको चा ..

बाकी कोणाला असं वाटतं का की अपुर्‍या अभ्यासावरचं निरीक्षण माझं आहे हे?

वुमेन्समध्ये कोणीही खेळत असले तरी काय फरक पडतो. हेनीन आणि से/वी विल्य्मस आणि थोडीफार क्लायस्टर्स सोडून ना कुणाकडे आपली स्वतःची स्टाईल आहे ना स्वतःचा गेम.
म्हणून आपण नेहमी त्यातल्या त्यात शारापोवा, वोझिनियाकी, झ्वेनारेवा याच जिंकत राहो अशी प्रार्थना करावी.

वॉझनियाकी टॉप सीड का होती कुणी सांगू शकेल का >>>> व्ह्यूअर्स चॉईस अ‍ॅवार्ड माहीती आहे ना. Wink

फेडरर = लता = दैवी गुणवत्ता, चमत्कार(याचा अर्थ मेहनत नाही असे नाही)
राफा= आशा = ढोर मेहनत, स्वतःचा खेळ उंचावण्याचा, वेगवेगळ्या सरफेसेसनुरूप कौशल्य बाणवण्याचा सतत प्रयत्न.
तरीही मनःसामर्थ्यात राफा फेडररपेक्षा सरस आहे असं मला वाटतं.
***
फेडररचा खेळ टॉपला होता (होता म्हटल्याबद्दल मारायला येणार नाही ना कोणी) तेव्हा त्याच्या जवळपास येणारं कोणी नव्हतं, त्यामुळे त्याचा खेळ आणखीनच सहज वाटायचा. पण गेल्या २-३ वर्षात जोकोविच,डेल पोट्रो, बर्डिच , सॉडर्लिंग, कधीतरी रॉडिक यांच्यामुळे पुरुषांमधली स्पर्धा खूपच रंगतदार झाली आहे.

सानिया मिर्झाने एलिना व्हेस्नेनाच्या साथीने खेळताना प्रथम मनांकित जोडी जिसेला डुल्को-फ्लेव्हेया पेनेटा यांचा ६-०,७-५ असा पराभव करून महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

आज राफा नादाल काय विचित्र बोलला त्य लुबिचीच शी मॅच जि़ंकल्यावर? म्हणे मी ५ वेळा इथे जिंकलो आहे, माझं टेनीस काही खुप चांगलं होत नाहीये पण मी प्रयत्न करेन .. माझ्यावर काही "ऑब्लिगेशन" नाही सहाव्यांदा जिंकण्याचं" .. असं कसं बोलला तो? Uhoh

नंबर वन सीडने असं बोलावं???

त्यालाच नम्रता, पाय जमिनीवर असणं असं म्हणतात. नाहीतर क्वार्टर फायनलच्या पुढे जाता येत नाही आणि म्हणे संभाव्य विजेता/फायनलिस्ट मीच असं म्हणत राहायचं याला काय अर्थ आहे.

मान्य पण थोडा कॉन्फीडन्स किंवा अगदीच काही नाही तर पॉझिटीव्ह नोटवर सोडायचं ना .. मला तर त्या "ऑब्लिगेशन" शब्दामुळे एक प्रकारचा 'बेपर्वा' अ‍ॅटिट्युड वाटला .. 'मी माझं बेस्ट टेनिस खेळायचा प्रयत्न करेन' नुसतं असं बोलला असता तर मला जास्त पटलं आणि आवडलं असतं ..

मी राफाची मॅचनंतरची प्रश्नोत्तरं पाहिली नाहीत. पण वृत्तपत्रात वाचले की त्याने "I have improved since the tournament started. I'm able to play better and I'm going on to continue on this path" असं म्हटलेलं वाचलं. तसे पण त्याचे इंग्लिशचे वांदे आहेत.

मला वाटतं तो फार सेन्सिटिव्ह मोडवर आहे. त्याचे #१ चे लेबल जवळ जवळ जाण्यात आहे हे समोर दिसतयं. कठिण आहे. शिवाय त्याला इंग्रजीत फारसे जमत नाही. तो बराच प्रामाणिक आहे, जे वाटतं ते बोलतो असे मला वाटते.

भरत आणि सुमंगल, त्याचं इंग्लीश फ्लुएंट नाही हे कळतंय .. आणि माझंही इंग्लीश फार चांगलं आहे असं नाही, तसंच तो प्रामाणिक, नम्र, निगर्वी आहे हे ही जाणवतं .. फक्त एक जी जिंकण्यासाठीची ओढ, त्वेश हवा तो त्याने दाखवला नाही एव्हढंच मला म्हणायचं आहे .. ह्यातून त्याने त्याच्या opponents (पक्षी: ईतर प्लेयर्स) ना पॉझिटीव्ह मेसेज पाठवला नाही असं मला वाटलं .. असो! Happy

सशल मला वाटतं राफाला जे काही दाखवायचं ते कोर्टात उतरल्यावरच दाखवतो.
कोर्टच्या बाहेर अगदी साधा, सरळ सज्जन, नम्र, गुणी बाळ ..हे सगळं खरंखुरं. सामना/चॅम्पियनशिप जिंकल्यावर तो समोरच्या खेळाडूला चक्क सॉरी म्हणाला एकदा!

काल मॉम्फिल्सने फेडररला जराही त्रास दिला नाही. पहिल्याच सेटमध्ये त्याला धाप लागली होती. फरेरने ५ सेट खेळवल्याचा परिणाम.
बोपन्ना कुरेशी ची ब्रायन बंधूंबरोबरची मॅच काल अर्धी राहिलीय. बरोबरीत.

राफाने सोड्याला ३ सेट्समध्ये हरवलं... !
यंदा पुरुषांमध्ये पहिले चार खेळाडू सेमीफायनलला आलेत...

राफा वि मरे आणि जोको वि फेडरर.

हो ना .. खूपच इंटरेस्टींग होणार semis ..

पण मला फेडरर आणि ज्योको मधलं कुणीच हरायला नकोय .. Uhoh आणि राफाही हरायला नको आहे (जरी मी आधीची विधानं केली असली तरी मयेकरांनीं माझं मतपरिवर्तन केलेलं आहे .. Happy

हा हा हा! कित्ती ते प्रेम.
अहो पण अश्याने खेळ कसा काय जिंकणार? टेनीस कसं पुढं जाणार?
फार्फार तर राफा शकिराची(?) तारीख पक्की झाली की मिरोस्लावा वहिनी त्यांना केळवणाला बोलावतील आणि त्यांच्या राजुरावांनी राफाभाऊजींना हरवून जिंकलेला एकमेव फ्रेंच कप अर्धा मिनिट हातात घेऊ देतील असं काहीतरी होण्याची शक्यता आहे. Proud

मला तरी राफा-रॉबीन मॅच फार उत्साहवर्धक वाटली नाही.
आता फेडी-जोको मॅच मस्त व्हावी आणि काहीही करून फेडी-राफा फायनल होऊन फेडीने २०११चे दुकान उघडावे आणि हो! वर सांगितलेले भविष्य खरे ठरावे.

Pages