फ्रेंच ओपन - २०११

Submitted by Adm on 17 May, 2011 - 21:18

यंदाच्या उन्हाळ्यातली पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अर्थात फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा येत्या रविवारी म्हणजे २२ मे रोजी सुरु होत आहे. पुरुष एकेरीत अग्रमानांकीत नदाल, जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला नोव्हाक जोकोविच आणि तृतीय मानांकीत फेडरर ह्यांच्या विजेतेपदासाठी चुरस असेल.
महिला एकेरीत वॉझनियाकी आणि किम ह्यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन मिळाले आहे. ह्या दोघींव्यतिरिक्त गतविजेती स्किवोने, स्टोसुर, शारापोव्हा ह्यांचा खेळ कसा होते हे पहाणेही महत्त्वाचे ठरेल.

जाहिर झालेल्या ड्रॉ नुसार, मानांकित खेळाडूंनी आपापले सामने जिंकले तर उपांत्यफेरीचे सामने ह्याप्रमाणे होतील.

पुरुष एकेरी :
नदाल वि सोड्या
मरे वि मेल्झर
फेरर वि फेडरर
बर्डीच वि जोको

महिला एकेरी :
वॉझनियाकी वि स्टोसुर
झ्वोनारेवा वि स्किवोने
ना ली वि अझारेंका
शारापोव्हा वि किम क्लायस्टर्स.

ह्या स्पर्धेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नदाल अचानक चांगला खेळायला लागला वाटतं. सोड्याने निराशा केली राव. सरळ सेटमध्ये हरला.

मयेकर, पटले नाही. 'मी सहाव्यांदा जिंकलेच पाहिजे असे नाही' असे म्हणणे ही काही नम्रता नव्हे. आत्मविश्वासाचा थोडा अभाव वाटतो.

फेडरर जोकोला हरवू शकणार नाही असे वाटते. क्लेवर फार पॉवर लागते आणि स्टॅमिना पण. जोको तरूण आहे आणि फॉर्मात आहे. त्यामुळे ह्या दोन्हीत तो फेडररपेक्षा सरस वाटतो.

सेमीफायनलच्या वेळा इतक्या वाईट आहेत की काहीही पहायला मिळत नाही. :|

मयेकर, आमच्या कंपूतल्या लोकांना तुमच्या कंपूत ओढू नका उगाचच.. Proud Light 1

जोकोला अजून एक फायदा असा झालाय की त्याला क्वार्टर फायनल खेळावी लागली नाही. त्यामुळे त्याला चांगली विश्रांती मिळाली असेल. एवढं करून जोको हरला तर फेडरर नदालला हरवेल फायनलमध्ये..

मागच्या वेळी पहिले चार जण सेमी मध्ये कधी आले होते ? फ्रेंच ओपनसाठी हे नवल असावे.

टेनिस इतिहासतज्ञ सांगू शकतील काय ?

२००६ मध्ये बहुतेक.. आजच्या सकाळ मध्ये तरी तसेच आले आहे..

यंदा धाग्याची प्रसिद्धी खालवली आहे पण.. फारच कमी पोस्ट आल्यात... असे का बरे... फार काही विशेष घडले नाही म्हणून की काय....

पुरुष एकेरीत पहीले चौघे एकमेकांविरुद्ध तर महिला एकेरीत पहिल्या चारातली एक पण नाही.. पाच सहा आणि सात मात्र आहेत..

पग्या.. तू वर्तवलेल्या भाकिततील फक्त दोन सामने बरोबर ठरले.. नदाल विरुद्ध सोड्या.. आणि ली ना विरुद्ध आझारेंका...

दुहेरीत पण थोडी फार तशीच परिस्थिती.. पुरुष दुहेरीत दोन्ही अव्वल टीमस मधेच बहुतेक अंतिम सामना होणात पण महिला दुहेरीत वरच्या टीम्स पैकी कोणीच नाही आणि मिश्र दुहेरीत टॉप सीड आणि दुसरी बिगरमानांकीत जोडी...

.....आता फेडी-जोको मॅच मस्त व्हावी आणि काहीही करून फेडी-राफा फायनल होऊन फेडीने २०११चे दुकान उघडावे आणि हो! वर सांगितलेले भविष्य खरे ठरावे.....

चमन....अगदी माझ्या मनातल बोललास बघ! खर म्हणजे फेडरर आतापर्यंत या स्पर्धेत(या वर्षी) एकही सेट हरलेला नाही. मला असे वाटते की त्याच्यात अजुनही ग्रँड स्लॅम जिंकण्यासारखा खेळ बाकी आहे.. गेल्या ८ वर्षातला ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा त्याचा हातखंडा व त्याच्या खेळातली मंत्रमुग्ध करणारी सहजसुंदरता इतक्यात अस्तास जायला नको असे मला राहुन राहुन वाटते व त्याच्यातल्या व राफामधल्या गेल्या ४-५ वर्षातल्या अविस्मरणिय फायनल्स तर केवळ अप्रतिम! राफा-फेडरर प्रेमीच नाही तर तमाम टेनीस शौकिनांना ती पर्वणिच होती... (आणी हे मी बोर्ग्-मॅकेन्रो ,मॅकेन्रो-कॉनर्स्,कॉनर्स्-बोर्ग व बेकर्-एडबर्ग फायनल्स बघीतलेल्या असुनही म्हणत आहे...) म्हणुन परत एकदा या वर्षी फ्रेंच ओपन फायनल या दोघातच व्हावी असे मला वाटते.. नो ऑफेन्स टु ४५-० रेकॉर्ड ऑफ जाकोव्हिक धिस यिअर..

अरे वा! सशल.. चला.. मायबोलिकर टेनिसप्रेमींच्या संख्येत तु अजुन एकाने वाढ केलीस..

तुझ्या राफा व फेडररच्या खेळाबद्दलच्या प्रश्नांची भरत मयेकरनी अचुक उत्तरे दिली आहेत. तसच सुमंगलने राफाच्या कच्च्या इंग्लिशबद्दल सांगीतलेच आहे... त्याला नेमके काय म्हणायचे आहे ते त्याला इंग्लिशमधुन निट सांगता येत नाही असे मला नेहमीच वाटते.. उत्तराच्या शेवटी.... यु नो? असा प्रतिप्रश्न त्याच्या प्रत्येक उत्तरानंतर असतोच असतो...:) भरत मयेकर म्हणतो त्याप्रमाणे मलाही तो नेहमी सरळ,उदार व खिलाडुवृत्तीचाच आहे असे वाटते. सोडर्लिंगला स्ट्रेट सेट्स मधे हरवुन त्यानेही फेडरर्-जाकोव्हिकला दाखवुन दिले आहे की ..वन्स अगेन.. लाइक लास्ट ६ यिअर्स...ही इज द मॅन टु बिट अ‍ॅट रोलँड गॅरस!

<<मयेकर, पटले नाही. 'मी सहाव्यांदा जिंकलेच पाहिजे असे नाही' असे म्हणणे ही काही नम्रता नव्हे. आत्मविश्वासाचा थोडा अभाव वाटतो.>>
फचिन, क्ले कोर्टवरल्या दोन सलग फायनल्स हरल्यावर आणि पहिल्याचे फेरीत ५ सेट खेळल्यावर विजेतेपदासाठी मीच फेव्हरिट असं म्हणायला आत्मविश्वासाची नाही तर अभिनयाची गरज असते. आपला खेळ कसा होतोय हे त्यालाच सगळ्या जास्त कळत असेल ना?

*यंदा क्ले कोर्टवर पण खेळाडू नेटजवळ येताहेत, सारख्या आपल्या बेसलाइनवरून रॅली आणि कोणीतरी कंटाळून केलेली अनफोर्स्ड एरर यापेक्षा हे बघायला मजा येते.

*तेवढं त्या सुसाट वार्‍याने पॅरिसच्या बाहेर जाणारी फ्लाइट घेतली, तर खेळाडूंना नीट खेळता येईल.

*निकोलस माहूतने जॉन इस्नर बरोबरच्या आपल्या 'त्या' मॅचवर पुस्तक लिहिलेय. म्हणजे परत हे दोघे टेनिस कोर्टवर समोरासमोर आले, तर प्रेक्षकांना उशाला काय घ्यायचं याचा प्रश्न पडायला नको.

*शारापोव्हाला ना ली झेपत नाहीय का?
*बार्टोली बाई फोरहँड पण दोन्ही हातांनी मारतात? असं करणारं आणखी कोणी आहे का?

*मार्टिना हिंगीस विमेन्'स लिजंड्स मध्ये खेळताहेत.

फचिन, क्ले कोर्टवरल्या दोन सलग फायनल्स हरल्यावर आणि पहिल्याचे फेरीत ५ सेट खेळल्यावर विजेतेपदासाठी मीच फेव्हरिट असं म्हणायला आत्मविश्वासाची नाही तर अभिनयाची गरज असते.<<

नक्किच भरतजी. मला नदाल गावराणी वाटतो; आडदांड, दणकट पण थोडा बुजलेला. आणि फेडी पॉलिश्ड.

मयेकर, तुम्ही सशलच्या 'तो असे का म्हटला?' ह्या प्रश्नाचे 'नम्रता' असे उत्तर दिलेत. ती काही नम्रता नव्हे, एवढेच मला म्हणायचे होते. इंग्रजीचा प्रश्न असू शकेल. फारफार तर प्रामाणिकपणा म्हणता येईल. बाकी इतरवेळी त्याने सगळीकडे खिलाडूवृत्ती दाखवली आहे ह्यात काहीच वाद नाही.

यंदा धाग्याची प्रसिद्धी खालवली आहे पण
>> हो ना.. मयूरेश नाहीये. पराग विशेष लिहित नाहीये. पन्ना, सिंड्रेला नाहीयेत. Uhoh

ही बार्टोली म्हणजे मागे कधीतरी जिंकलेली ना? पराग नेहमी हिची चेष्टा करतो.. Proud

फचिन, मेरी पिअर्स बाईंना बार्टोलीला बघून मोनिका सेलेसची आठवण येते त्यामुळे बार्टोली आता परागची 'अति-फॅब-फेव' खेळाडू असणारच नै का Proud

बाकी नदाल नम्र, प्रामाणिक, कष्ट्करी इ.इ. आहेच. सोड्याच्या मॅचनंतर तो स्वतः म्हणाला की आज माझा खेळ जसा पाहिजे तसा झाला Happy

ली ना आणि शारापोव्हाची मॅच म्हणजे झुल्यासारखी होतेय.. एकदा हिचं पारडं उंच तर एकदा तिचं .. त्यातून वाराही भरपूर आहे कोर्ट्वर!

शारापोव्हा गेली. बार्टोली ने दुसरा सेट घ्या पहिल्या तर आपटली. सध्या तरी बरी खेळतेय असे दिसते.

धागा लोकप्रिय न होण्यामागे कदाचित आयपील आणि NBA कारणीभूत असावं. (खेळ, धागे नाही) पण NBA ने निराशा केली आता टेनिसचाच आधार. ह्यावेळी NBA चा धागा पण ओसाड पडला होता. पब्लीक लिहित नाही किंवा पाहतही नाही.

शारापोव्हाला हाणा !! फ्रेंच ओपन जिंकण्याची ह्या वेळेइतकी सुवर्णसंधी तिला परत कधी मिळेल काय माहित... वाया घालवली पण !! सर्व्हिसचं काहितरी करा म्हणं..

मेरी पियर्स आणि पन्नालाही हाणा !! बार्टोली आणि मोनिका सेलेसची कंप्यारिझन.. अरे अरे अरे !!

फचिन.. अरे ती बार्टोली जिंकत नाही हाच तर प्रॉब्लेम आहे. ती आधीच्या फेर्‍यांमध्ये चांगल्या खेळाडूंना हरवते आणि मग स्वतःही हरते.. म्हणजे "तुला नाही मला नाही घाल तिसर्‍याला" सारखं झालं.. Uhoh

यंदा फ्रेंच ओपन फार पाहिली नाही.. वेळा विचित्र होत्या आणि मधे ५ दिवसांची सुट्टी झाली.. त्यात अजिबातच काही बघता आलं नाही...

आणि मागच्या वर्षीची चँप स्किवोनी परत फायनलला आलीये! Happy ६-३, ६-३

पग्या, मला हाणून उपयोग नाही.. बार्टोली तुझी फॅबफेव आहे हे नक्की आहे Wink

मयेकर आणि मुकुंद, फचिन ने आधी सांगितलंच .. तो नम्र, प्रामाणिक, निगर्वी वगै वगैरे आहे ह्यात वादच नाही .. असो, इंग्लीश वर त्याची कमांड नाही आणि सुमंगल म्हणतेय त्याप्रमाणे तो गावरान आणि फेडरर पॉलिश्ड हेच खरं असावं ..

मुकुंद राफा, फेडरर मॅचेस इतक्या झाल्या ना आता ज्योको ला संधी हवी .. (मला मनातून अजूनही तिघेही जिंकावे असंच वाटतंय .. :p)

मयेकर आणि मुकुंद, फचिन ने आधी सांगितलंच .. तो नम्र, प्रामाणिक, निगर्वी वगै वगैरे आहे ह्यात वादच नाही .. असो, इंग्लीश वर त्याची कमांड नाही आणि सुमंगल म्हणतेय त्याप्रमाणे तो गावरान आणि फेडरर पॉलिश्ड हेच खरं असावं ..>>सशल झक्की झाल्यासारखे का लिहायला लागलिये अचानक Lol

< राफा, फेडरर मॅचेस इतक्या झाल्या ना आता ज्योको ला संधी हवी .. (मला मनातून अजूनही तिघेही जिंकावे असंच वाटतंय >

सशल आपण फायनल एका बाजूला फेडरर , जोको, राफा याच क्रमाने(प्रत्येकी एकेक सेट) विरुद्ध मरे(याच्याबाजूने कुणीच नाही) अशी ठेवुया. मग होईल तुमच्या मनासारखे. शेवटचा सेट मात्र राफा खेळेल.
फेडरर स्वतःच्याच प्रेमात पडलेला दिसतोय. स्पेशल शुज, जॅकेट आणि काय काय...

बरं मला प्लीज कोणी भारतात सेमीज कधी पहायला मिळतील याच्या वेळा सांगेल का? नेट वरुन स्केड्यूल बघता येत नाहीये.

>>> फेडरर स्वतःच्याच प्रेमात पडलेला दिसतोय. स्पेशल शुज, जॅकेट आणि काय काय...

राफाच्या प्रेमापोटी म्हणता का असं?

अहो प्रत्येकाचा शेवटी धंदाच .. Happy

नदाल ने पहिला सेट घेतला.
फचिन, बेट वैगेरे नाही रे. तो छान जिंदादिल आहे. आणि कदाचित फेडरर आवडत नाहि हे देखिल असेल. फेडीला ग ची बाधा आहे असे नाही का वाटत कुणाला?

बापरे, तुटुन पडु नका हं फेडी प्रेमी. नसेलहि, पण मग मलाच..............

फेडीला ग ची बाधा आहे असे नाही का वाटत कुणाला? >>> नाही वाटत, आणि झाली तरी ती त्याला होऊ नये तर मग आणि कुणाला व्हावी. Proud

राफा नम्र, मवाळ बोलला की म्हणता ह्याला आत्म्विश्वास नाही. फेडी आत्मविश्वासाने बोलला की म्हणणार ह्याला 'ग' ची बाधा झाली.
आपला तो जोको दुसर्‍याचं ते ... असंच ना Wink

Pages