बॅक टु बेसिक्स

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

वॉटर कलरचे बेसिक वॉशेस वापरुन चित्र काढायचा प्रयत्न करतोय. थोड्क्यात चित्र सिम्प्लीफाय करायचा प्रयत्न करतोय.
थोडा गृहपाठ

homework1.jpg

विषय: 
प्रकार: 

हे बेसिक आणि सिंपल? मग कॉम्ल्पीकेटेड कसे असेल.
आवडले हे सांगणे न लगे.
वॉटर कलर वॉश, हे वेगळे तयार करावे लागतात का? की पाण्यात थोडा रंग घातला की ते ते वॉश तयार होतात?
पॉटरीत पण वेगवेगळ्या प्रकारचे वॉश वापरतात, पाण्यात कोबाल्ट कार्बोनेट मिसळून निळा , कॉपर कार्बोनेट मिसळून हिरवा इ. वॉश तयार करतात.

सर्वाना धन्यवाद.
वॉटर कलर २ किंवा तीन लेयर्स/ वॉशेस मधे संपवायचा जाणिवपुर्वक प्रयत्न करतोय. चित्र करुन झाल्यावर बर्‍याच गोष्टी करेक्ट कराव्याश्या वाटतात आणि रंग मळकट/ ओपेक होत जातात. या चित्रात ते मुद्दाम टाळलेय. बारिक काम टाळण्या साठि पक्त २ ईंच प्लॅट ब्रश आणि १२ नं राऊंड ब्रश वापरला.
ह्या खर तर बेसिक गोष्टी आहेत पण अमलात आणायला प्लॅन करुन काम करावे लागते.

रुनी-
वॉटर कलर वॉश, हे वेगळे तयार करावे लागतात का? की पाण्यात थोडा रंग घातला की ते ते वॉश तयार होतात?
>>> मी रंगात पाणी घालतो Wink
वॉटरकलर मधे रंग तयार करण्या येवढेच किंवा थोडे जास्तच तो कसा अल्पाय करायचा याला महत्व असते. कागद आणि रंगा प्रमाणे बदलते . थंब रुल म्हणायचा तर पहिला वॉश २० % रंग + ८० % पाणि
दुसरा वॉश ३०/३५ % रंग + पाणि आणि शेवटचा वॉश ४० ते ६० % रंग आणि उरलेले पाणी.

सुंदर.

पाटील,
अप्रतिम आहे हे चित्र.
तुमच्या चित्रांचं प्रदर्शन पुण्यातही भरवाल का?

Pages