मु.पो. तेर्से बांबार्डे, तालुका - कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग... म्हणजेच कोकणात असलेला एक गाव.. माझाच गाव ता... गेली पाच वर्ष जाउक जमणा नाय.. तसा माका तर गणपतीतच कोकणात जाउक आवडता.. पण म्हटला उन्हाळ्यातच जाउन येउ.. तसापण शालेय शिक्षणानंतर उन्हाळ्यात कधीच गावी गेलो नव्हतो.. म्हणान जमात तसा फक्त तीन दिवसाचो मुक्काम करुन इलय.. या भेटीत हातात डिजीकॅम असल्याने जास्तच उत्सुकता
मुंबईत्सून गावाकडे जाताना एकदा गोवा गाडीत बसला की मगे कधी मुंबईच्या बाहेर पडतोय असा असा वाटीत रवता.. रस्त्यात लागणारे वळणावळणाचे घाटरस्ते, नद्या, रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी कौलारु घरे, आंबा-फणस-काजी यांनी बहरलेली झाडे इ... सगळा चित्र कसा मस्त डोळ्यासमोर येता नि कधी एकदाचो गावी पोचतय म्हणान मन कासावीस होउन जातय..
एकदा घरी पोचलय की मगे न्हाणीघरातल्या गरम पाण्याने फ्रेश होउन लगेच स्वयंपाक घरात मांडी घालून पाटावर बसूचा नि समोर ताटातल्या 'उकड्या तांदळाची पेज नि वालीच्या गराची उसळ' खाण्यासाठी रेडी !! नि ढेकर इलो की मगे भटकंतीसाठी बाहेर पडूचा!! त्यातलेच काही निवडक प्रची..
प्रचि १
(न्हाणीघर ... आता घरोघरी संडास बाथरुम बांधलेले आसत.. पण पाणी गरम करुक काळवंडलेलो माठ व्हयोच )
प्रचि २
(उन्हाळ्यात ह्या हमखास दिसणारा ह्या दृश्य.. सुकी लाकडा, शेणी नि कुडी.. नि मागे घर दिसताहा ता आमचा "मांगर" - पावसात या घरातच शेतकामे उरकली जातात.. जा मी अजून कधी बघूक नाय..)
प्रचि३
(शेणाने सारवलेला आंगण नि मध्ये असणारी तुळस )
प्रचि ४
(सुप्रभात.. थोडासा उजाडला की ह्यांच्या कामांका सुरवात.. )
प्रचि ५
(आमच्या घराजवळच गर्द झाडीत असणारी देवळी.. माझा आवडता ठिकाण.. इथेच मगे दुपारी वार्याने होणारी पानांची सळसळ नि पक्ष्यांची नॉन स्टॉप सुरु असणारी किलबिल ऐकत एक डुलकी घेतोच..)
प्रचि ६
(शेतातून जाणारी पाऊलवाट.. खरे तर पावसात इला की दोन्ही बाजूस भातशेतीचे पांघरलेले हिरवे गालीचे दिसतले..)
प्रचि ७
(भाटीयेवरची नारळांची बाग)
प्रचि ८
(नि तिकडेच असणारे वालीच्या शेंगांचे मळे.. इथे पण पावसानंतर सगळे कसे हिरवे हिरवे..)
प्रचि ९
(कुडी..)
प्रचि १०
(मायबोलीवरील भाऊंनी आपल्या डिजीटल चित्रातून "साकव" ची ओळख करून दिली आहेच.. हाच तो साकव.. )
प्रचि ११
(ह्या साकवावरून पावसात चालताना जपूनच.. नायतर व्हाळात पडलोच समजूचा..)
प्रचि १२
(आंबा,फणस इ. झाडे वगळता बहुसंख्याने आढळणारे ऐनाचे झाड.. .)
प्रचि १३
(काळ्या ढगांमुळे सुर्यदेवांनी केलेले वेषांतर.. )
प्रचि १४
(कोंड- नदीच्या खोलगट भागात टिकून रवलेला पाणी..)
प्रचि १५
(गुरांका पण अंघोळ व्हयीच..)
प्रचि १६
(उन्हाळ्यातही पाणी टिकवून धरणारी नदी.. पावसात माका या अँगलने फोटो काढूचा तर होडीयेत बसूक लागात..)
प्रचि १७
(आटलेल्या नदीचे पात्र)
प्रचि १८
(वेळ सूर्यास्ताची.. मी तर तिन्ही दिवसांचे सूर्यास्त टिपण्याचे मनाशी पक्के केले होते..)
प्रचि १९
(नदी ओलांडूक होडीची गरज उन्हाळ्यात तरी नाही)
प्रचि २०
(सूर्य मावळलो आता गुरांका घेउन घरी जाउची वेळ.. )
प्रचि २१
(अंधार पडला म्हणान काय झाला.. कामं सुरूच रवतत)
प्रचि २२
(शेतातून आणलेल्या मिर्च्यांचे देठ कापण्याचा काम..)
प्रचि २३ कोकणमेवा -
माझा दुर्भाग्य असा की आंबे कच्चेच होते.. फणस, रतांबे, करंदा (करवंदा), जाम असा सगळा खाऊक गावला..
या भेटीत विविधरंगीपक्षी दिसले नाय तर नवलच.. भटकंती करताना त्यांका कॅमेर्यात टिपूचा म्हणजे मस्तच टाइमपास..:)
प्रचि २४
कोकणाता कितीही फिरला तरी कमीच.. नि खयपण गेला तरी मन रमतेच.. मगे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असो वा घराकडची नदी असो.. तेव्हा परतीच्या प्रवासाला निघूचा म्हणजे साहजिकच कठीण ! नि तुमचा मुक्काम जास्त दिवस असेल तर जीवाची जास्तच घालमेल !! त्यात निघताना सगळ्या थोर व्यक्तींचे आशिर्वाद घेउन निघताना घराकडच्या लोकांच्या पापण्या ओलावलेल्या.!.घरी पोचलस की लगेच फोन कर म्हणत निरोप देणारी मंडळी.. 'पुन्हा कधी येणार' म्हणत अगदी रस्त्यापर्यंत सोडूक येणारी बच्चाकंपनी.. खराच.. कठीण असतो तो प्रसंग.. गाडीत बसला की अनुभवलेल्या सगळ्या गोष्टींचा फ्लॅशबॅक चालू होतो.. नि मुंबई येउच नये असा वाटीत रवता.. बरा. मुंबईत पोहोचेस्तोवर मोबाईलवर दोन तीनदा फोन येउन जातो.. खय आसस ? पोचलास की नाय ? विचारपुस होतेच.. नि एकदा मुंबईत इला की गावच्या दौर्याचो कितीपण हँगओवर असांदे.. ऑफीस गाठावेच लागते..
गाव पाहुन गावालाच गेल्यासारखे
गाव पाहुन गावालाच गेल्यासारखे वाट्ले, अति सुन्दर , मस्त, अवर्ननिय. मज्जा आलि पाहुन
very beautiful snaps taken at
very beautiful snaps taken at the right time...
refreshing mind of the past time .....
खुपच मस्त
खुपच मस्त
एकद म सहि आलेत फोटओ...
एकद म सहि आलेत फोटओ... मस्त् च.... भाषआ पण गोड वाटते....
अरे वा!! मस्तच.. हे माझं आजोळ
अरे वा!! मस्तच.. हे माझं आजोळ आहे. धन्यवाद यो..
रे यो, आज बगलय हो लेख-- किती
रे यो, आज बगलय हो लेख-- किती बरा वाटला ता काय सांगू?
ह्या सगळा बघतच ल्हानपण गेला--महती आता कळताहा!!
तुळस तर माझ्या वेंगुर्ल्याच्या आजोळातलीच!!
ह्या काय घातलयच मी "निवडकात"!
सहीssssssssssssssssssssssssss
सहीsssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss एक से एक फोटो. स्मित>> एकदम
पहिला फोटो पाहुन २०-२५
पहिला फोटो पाहुन २०-२५ वर्षांपुर्विचं न्हाणीघर डोळ्यासमोर आलं. बायांसाठी पुर्णपणे केळीच्या बनाने वेढलेलं. आणि बाप्यालोकं तर आलटुन्-पालटुन घराजवळील माड किवा एखाध्या झाडाच्या बुंध्यात आंघोळ उरकायचे. अजुन एक ठळक गोष्ट म्हणजे प्रत्येक घराभोवती असलेला गडगा (जांभ्या दगडाचं कुंपण) आणि त्याला असलेला तीन आडव्या बांबुंचा दरवाजा... त्यालाहि काहितरी नांव आहे; आत्ता आठवत नाही. सुंदर फोटो.
तीन आडव्या बांबुंचा दरवाजा.
तीन आडव्या बांबुंचा दरवाजा. >> आखांडो!
एकदम मस्त... फोटो आणि
एकदम मस्त... फोटो आणि वर्णन...
मनपूर्वक धन्यवाद तुमच्या
मनपूर्वक धन्यवाद

तुमच्या सगळ्यांच्या जुन्या आठवणी दाटून आल्या हेच खूप आहे
यो रॉक्स! फोटो पाहून
यो रॉक्स! फोटो पाहून गावाकडच्या आठवणीनी मन व्याकूळ झाले.
दिनेशदा, तुम्ही म्हणजे "हा सूर्य आणि हा चंद्र" अशाप्रकारे फोटो दिलेत. वा!
गिरीश, विपू पहा.
रॉक्स, यु रिअली रॉक्स ! सगळे
रॉक्स,

यु रिअली रॉक्स !
सगळे फोटो खास ...
पण प्रचि १५ मधले गाईच्या,जनावरांच्या डोळ्यांत देखील किती तेज आहे ना ! (बदलेल्या जीवनशैलीमुळे शहरातल्या अनेक लोकांतसुद्धा अस तेज दिसतं नाही आजकाल).
सगळे फोटो एकदम मस्त.... गावची
सगळे फोटो एकदम मस्त.... गावची आठवण आली खुप...
खूप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प
खूप्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प्च छान............. अप्रतिम
मीया पन मालवणई आसय कसालाचा
मीया पन मालवणई आसय कसालाचा माका फोटु लय आवाडल गावाक जावन इल्लया सारका वाटला
मुक्ता
बघल्यार वाडीची आठवण इली.
बघल्यार वाडीची आठवण इली.
वा फारच छान. सगळेच फोटो
वा फारच छान. सगळेच फोटो मस्त!! पाहून कोकणात गेल्याचा भास झाला.सगळीच दृश्य मला भरपूर आवडली .
कधी येऊ.. मी पण
मस्त आहेत सगळे फोटो.. माझ
मस्त आहेत सगळे फोटो.. माझ कोकणात गाव का नाही
मस्त मस्त मस्त प्रचि १७
मस्त मस्त मस्त प्रचि १७ सह्हीच!
सर्व कोकणच फोटोंतून उभे केलंस
सर्व कोकणच फोटोंतून उभे केलंस यो रॉक्स .कोकणी शेतकरी अति लोभाने पिकावर ,भातावर ,रानात विषारी फवारे मारत नाही त्यामुळे किटक आणि पक्षी टिकून आहेत .पाण्याचे झरे निर्मळ आहेत .पण कोकण रेल्वेची तिकिटे सुटीत उडून जातात .
Pages