Submitted by विशाल कुलकर्णी on 12 May, 2011 - 02:18
दहावी, बारावी,
इंजीनिअरींग.........
मग असंख्य इंटरव्ह्युज...
शेकडो नकार पचवल्यानंतर,
पदरात पडलेली अनपेक्षीत नोकरी!
मग सुरू झालं नवं चक्र...
रिपोर्टस् , टार्गेट्स, कोटेशन्स
अधुन मधून फसवी इन्क्रिमेंटस्....
.......
.........
...........
नाहीच आठवत आता मला...
घोंगावणार्या वार्याबरोबर पुढे जाताना,
मागे बसलेल्या तुझ्या, ओढाळ केसांचा तो मादक गंध...
शेवटचं कधी गेलो होतो गं आपण फिरायला?
गेल्या कित्येक दिवसात मी अनुभवलीच नाहीये..
मज्जा तुझ्या रुसव्यातली...
तुझा रुसवा घालवताना तुझ्या हट्टासमोर मान तुकवण्यातली...
माझं...
माझं "मोरपिस" हरवलंय बहुदा कुठेतरी !
विशाल
गुलमोहर:
शेअर करा
मस्तय रे विशाल. अज्ञातांना पण
मस्तय रे विशाल. अज्ञातांना पण अनुमोदन.
विशालदा, पर्थला येताना घेऊन
विशालदा, पर्थला येताना घेऊन ये मोरपिस बरोबर
धन्स रे भ्रमरा ! लाजो
धन्स रे भ्रमरा !
लाजो
छान लिहिलंय...
छान लिहिलंय...
खुपच छान ! मी मात्र ते मोरपिस
खुपच छान ! मी मात्र ते मोरपिस नीट जपुन ठेवलय मनात !
खुप दिवसांनी दिसलीस वैशु !
खुप दिवसांनी दिसलीस वैशु ! धन्यवाद , साधना तुझेही
अनेक मोरपिसं जपून
अनेक मोरपिसं जपून ठेवण्यापेक्षा एखादंच पुरेसं होतं तुझ्यावाचून माझ्यासाठी आणि माझ्यातल्या तुझ्या आठवणींसाठी !
वा ! ही वाचली की तिला समजेल
वा !
ही वाचली की तिला समजेल की आहे तुझ्याजवळ मोरपीस, फक्त कधी कधी ते आहे तुझ्याजवळ हे विसरतोस तू
मस्तच ! विशाल, मस्तच
मस्तच !
विशाल, मस्तच कविता.
मलाच काय, प्रत्येकाला असंच वाटत असेल ...
विशाल सापडलं की नाही मोरपिसं
विशाल सापडलं की नाही मोरपिसं ?:P
माझं... माझं "मोरपिस" हरवलंय
माझं...
माझं "मोरपिस" हरवलंय बहुदा कुठेतरी !
विशालजी
आठवणींचे पुस्तक हळुवार उघडून पहा !!!!!!
नक्की सापडेल मोरपीस .....
आणि हो त्याचा सुखद स्पर्शही बोलेल हळुवार गतस्मृतींच्या गुजकथा .
धन्यवाद मंडळी ! एवढा भरभरून
धन्यवाद मंडळी !
एवढा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षाच नव्हती मला...
मनःपूर्वक आभार !
अरे मोरा; सॉरी चोरा....लोक
अरे मोरा; सॉरी चोरा....लोक तुझ्या कविता मोरपिसासारख्या जपून ठेवतात म्हणे वहीत. अन तूच म्हणतोस 'माझं मोरपिस हरवलंय'!
अरे बाबा एकदा तिच्या मयूरपंखी डोळ्यांच्या शेजेवर काही क्षण सगळे 'मी'पण विसरून विसावून बघ; आयुष्यभर भिजल्या मोरपिसाचा स्पर्श जाणवत राहील....प्रत्येक क्षण नव्या आठवणींचा जन्म घेउन!
मस्त लिहिलं आहेस...
मस्त लिहिलं आहेस...
वाह विशाल थोडक्यातच पण खूप
वाह विशाल
थोडक्यातच पण खूप काही..
बेटा ,'' मोरपीस ''खूपच छान .
बेटा ,'' मोरपीस ''खूपच छान .
शोधूही नकोस रे, तेच आणि तसेच
शोधूही नकोस रे, तेच आणि तसेच परत कधीच मिळत नाही!>>>>>>> प्रचंड अनुमोदन.(म्हणुनच तर ते स्पेशल असतं.)
कविता सुरेखच आणि आगावाचा प्रतिसाद अगदी माझ्या मनातला.
छान ... अगदी साध्या शब्दात,
छान ... अगदी साध्या शब्दात, प्रभावीपणे व्यथा मांडलेय.
ही असली मोरपीसंच, अस्तित्वाला ’जीवन’ संज्ञा देतात.
!
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार !
उम्या
छायाताई, तुमचा प्रतिसाद प्रचंड सुखावून गेला............., मी तुमचे आभार मानणार नाही !
Pages