अजून मला आठवतात तुझ्यासोबतचे क्षण..
परत एकदा प्रेमात पडल्यासारखं काहीतरी झालेलं..
मनात म्हटलं हे काय भलतच,
आणि आयुष्याच्या अशा वळणावर...?
बरं.. तू असा जगमित्र,
मला अजून माझाही शोध नीटसा नाही लागलेला..
अनंत विस्तारलेली क्षितिजं समोर घेवुन तू उभा,
आणि मी परतीच्या वाटा बंद झालेल्या वळणावर..
प्रश्न तुझ्या वार्यालाही फिरकत नाहीत,
आणि माझ्यासमोर उत्तरांचीच कोडी..
अजून आठवतात ते क्षण.. वेडावलेले..
युगांनंतर जिवंत झाल्यासारखं वाटलेलं..
गुलमोहराच्या झाडाखाली,
अमलताशाला कवेत घेवुन येणारं वारं,
स्पर्शून जात होतं तुझ्या-माझ्यातील पोकळीला..
तुझ्या पौर्णिमेच्या सावळ्या चेहर्यावर
अष्टमीचा चंद्र वितळत चाललेला...
तुला खूप काही सांगायचं असताना,
न सुचलेले अर्धे-अधिक शब्द,
आपल्या त्या खळाळत्या हास्यात वळते करुन घेत होतास तू..
आणि तुला शहाणा म्हणू की वेडा ह्या संभ्रमात
मी अधिकाधिक रुतत चाललेली...
अजूनही आठवतात ते सगळे क्षण..
अशावेळी माझीच नजर लागू नये तुला चुकून,
म्हणुन लपवुन टाकते तुला
माझ्या मनाच्या घनगर्द अंधारात..
आणि मग कधी एका क्षणी,
तुझं अस्तित्व विसरुन, स्वतःतच गुंग होऊन,
खोल उतरत रहाते त्या अंधारात..
आत.. आत.. खूप खोल..
आता वर पाहिलं तर आभाळही दिसत नाही..
खालच्या खोलीचा अंदाजही येत नाही..
अशा वेळी मला मग सोडावेच लागतात,
जिवाच्या आकांताने तुझ्या प्रतिमेचे घट्ट धरुन ठेवलेले हात..
हा तळ माझ्या एकटीचा..
ही वाटही माझ्या एकटीचीच..
पण आता व्याख्येत अडकुन रहायचा कंटाळा आलाय रे..
कशाला नसते अट्टहास..
हे जे काही आहे
त्यासकट मला आठवतात अजूनही..
तुझ्यासोबत घालवलेले काही क्षण...
सानिका, गणेश.. खूप खूप
सानिका, गणेश..
खूप खूप आभार...
काय बदललं ब्वा??
काय बदललं ब्वा??
आवडलं खूप..!!
आवडलं खूप..!!
व्वाह!!! अफाट सुंदर
व्वाह!!! अफाट सुंदर
कमालीची सुंदर....... भावार्थ
कमालीची सुंदर.......
भावार्थ अतिशय सुंदर असतो तुमच्या कवितेत.....
तुमच्या अशा कवितांचा एखादा कवितावाचनाचा कार्यक्रम झाला तर काय मजा येईल....
मनातलं मनापासून मनःपूर्वक
मनातलं मनापासून मनःपूर्वक लिहिलं की ते इतकं सुंदर असणारच .
सर्वांचे खूप खूप आभार..!
सर्वांचे खूप खूप आभार..!
निशदे, बापरे! अजून बराच लांबचा पल्ला गाठावा लागेल वाचन वगैरे होण्यासाठी. फक्त सुरुवातच करतेय मी आत्ता कुठेशी.. प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद..
मुक्ता खूप सुंदर. तुमच्या
मुक्ता खूप सुंदर. तुमच्या परवानगीने वहीत लिहून घेणार. एकटेपणाची सोबत.
Welcome to the
'Own the experience not the person' club.
व्वॉव!!! जबरदस्त लिहिलंय!!
व्वॉव!!!
जबरदस्त लिहिलंय!!
निशदेंना जोरदार टाळ्या!! ह्या कविता प्रत्यक्ष ऐकायला खूप आवडतील... तुम्ही सादर करता का?
आजचा अजेंडा - तुमच्या इथल्या कविता वाचणे.. ही दुसरी की तिसरीच वाचलीये..
मुक्ताबाई तुमची कविता खूप
मुक्ताबाई
तुमची कविता खूप आवडली. उत्कृष्ट शब्दयोजनेत उत्कट भावना नेमके प्रमाणे पोचवण्याचा अप्रतिम आविष्कार.
अश्विनीमामी, व्व्वा...! भारीच
अश्विनीमामी,
धन्यवाद...
व्व्वा...! भारीच क्लब.. कधीपासून याची मेंबर आहे माहित नाही पण नाव आज मिळालं. खूप आभार आपले. अर्थातच वहीत लिहून घ्यायला परवानगीची गरज आहे का?
हितचिंतक, अहो, सुरुवात आहे अजून.. सादर वगैरे विचारही नाही केलेला... प्रतिसदाबद्दल धन्यवाद..!
खूप खूप आभार विक्रम३११...
खूप छान
खूप छान ,,,,,,,,,,,,,,आज......आत्तापासूनच मी आपणास आमच्या आदर्श गुरूवर्य घोषित करत आहे!!!
मनातलं ,मंनापासून ,मन:पूर्वक
मनातलं ,मंनापासून ,मन:पूर्वक लिहून झालं तर ते सुंदरच असणार .
बापरे... अनामिका... इतकं ओझं
बापरे... अनामिका... इतकं ओझं नका टाकू हो... अजून नीटशी सुरुवातही नाही झालेली माझीच....
कमलाकर..
अतिशय सुंदर, मुक्ता. शब्दांत
अतिशय सुंदर, मुक्ता.
शब्दांत अगदी नेमकं सांगता सांगता अर्थात विरघळत जाते शेवटी...
.......पण आता व्याख्येत अडकुन रहायचा कंटाळा आलाय रे..
कशाला नसते अट्टहास..
हे जे काही आहे
त्यासकट मला आठवतात अजूनही..
..........
दाद, तुमच्या दाद देण्यात एक
दाद,
तुमच्या दाद देण्यात एक अख्खी कविता असते...
शब्दांत अगदी नेमकं सांगता सांगता अर्थात विरघळत जाते शेवटी...>> व्वा..!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद..!
बाई गं तुला अक्षरशः साष्टांग
बाई गं
तुला अक्षरशः साष्टांग नमस्कार. काय लिहीतेस अफाट !
आणि मग कधी एका क्षणी, तुझं
आणि मग कधी एका क्षणी,
तुझं अस्तित्व विसरुन, स्वतःतच गुंग होऊन,
खोल उतरत रहाते त्या अंधारात..
आत.. आत.. खूप खोल..
आता वर पाहिलं तर आभाळही दिसत नाही..
खालच्या खोलीचा अंदाजही येत नाही..
अशा वेळी मला मग सोडावेच लागतात,
जिवाच्या आकांताने तुझ्या प्रतिमेचे घट्ट धरुन ठेवलेले हात..
Superb Mukta!! apratim!!!
purn kavitach sundar.. pan varachya oli vishesh awadalya!!!!!
वाह!
वाह!
Kiranyake, जुई, मीन्वा, खूप
Kiranyake, जुई, मीन्वा,
खूप खूप धन्यवाद..!
मुक्ता कविता किती आवडलीये हे
मुक्ता
कविता किती आवडलीये हे कोणत्या शब्दांत सांगावं तेच मला समजत नाहीयै...
आवडत्या दहात !
"तुझ्या पौर्णिमेच्या सावळ्या
"तुझ्या पौर्णिमेच्या सावळ्या चेहर्यावर
अष्टमीचा चंद्र वितळत चाललेला..."
अप्रतिम!!!
छान!
छान!
Pages