वेगन मँगो मूस

Submitted by क्ष... on 7 July, 2008 - 12:39
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२-३ आंब्याच्या फोडी
१/२ पॅक सिल्कन सॉफ्ट टोफ़ु (साधारण ५-६ औंस)
३-४ टेबल्स्पून साखर
१/२ टीस्पून वेलची पावडर
३-४ केशर काड्या
१ संत्र्याचा रस
१/२ लिंबाचा रस

१/२ कप पाणी
३ टेबल्स्पून अगार अगार फ्लेक्स

क्रमवार पाककृती: 

आंब्याचा रस साधारण २ कप होईल इतके आंबे घ्यावेत.
एका लहान पातेल्यात पाणी तापयला ठेवावे. तोपर्यन्त आंब्याच्या फोडी, साखर, टोफ़ु, वेलची पावडर, केशर, संत्र्याचा रस, लिंबाचा रस एका मिक्सरच्या भांड्यात घालून नीट बारीक करून घ्यावे. पाणी उकळले की त्यात अगार अगार फ्लेक्स घालून नीट हलवून गुठळ्या काढाव्यात. त्याला एक उकळी आली की ते गरम मिश्रण मिक्सरच्या भांड्यात (आंब्याच्या मिस्र्ह्रणात) ओतावे. हे पूर्ण मिश्रण आता साधारण २-३ मिनीटे मिक्सरमधून फिरवावे. ज्या भांड्यात हे सेट करायला ठेवायचे असेल त्या भांड्यात ओतावे. ते भांडे साधारणपणे ८-१० तास सेट होण्यासाठी फ्रीजमधे ठेवावे. (फ्रिझरमधे ठेवु नये). वाढतेवेळी पाण्यात बुडवलेली सुरी मूसच्या कडेने फिरवून ताटात उलटे टाकावे. मूस केकप्रामाणे नीट कापता येतो. सर्व्ह करताना एखादी आंब्याची फोड सोबत ठेवावी.

माझ्या इतर रेसीपीसाठी भेट द्या -
http://vadanikavalgheta.blogspot.com/

वाढणी/प्रमाण: 
६-८
अधिक टिपा: 

१. मुळ कृतीमधे क्रीमचीज किंवा कूल व्हीप किंवा व्हीपिंग क्रीम आहे. मी ते खात नसल्याने ती consistency येण्यासाठी मी टोफु वापरला आहे.
२. ताजा आंबा मिळत नसेल तेव्हा २ कप कॅनमधला पल्प वापरायला हरकत नाही.

(इथे लिहिलेला वेळ हा फक्त तयारीसाठी लागलेला वेळ आहे. फ्रिजमधे ठेवण्यास लागणारा वेळ ६-७ तास. )

माहितीचा स्रोत: 
स्वतःचा शोध!
आहार: 
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

समजा टोफू हि नसेल वापरायचा तर काय वापरता येइल ?

Creme Cheese वापरतात.
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

'टोफूही' असं म्हणतोय तो, म्हणजे क्रीमचीज नकोच आहे.
बटर किंवा बटर सबस्टिट्यूट आणि एग रिप्लेसर चालेल का? म्हणजे या रेसिपीत क्रीम चीज किंवा टोफू चे काम आहे ते यांनी होईल का?

बरोबर लालू, टोफू नि Diary Product पण नसेल वापरायचे तर काय करता येईल ? Rice Milk with Banana puree असे काही वापरले तर consistency येईल का ?

Rice Milk with Banana puree >>> ह्याने ओरिजीनल मँगो फ्लेवर जाईल ना?

Proud नीट वाचले नाही की असे होते बघा.
केळ्याने आंब्याचा फ्लेवर कमी होईल. मी एग रीप्लसेर वापरत नाही. थोडा विचार करुन सांगते.
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

ह्याने ओरिजीनल मँगो फ्लेवर जाईल ना?>> actually एव्हढा फरक नाही जाणवत. At least smoothy मधे तरी जाणवले नव्हते. बघू मिनोतीला काही सुचतेय का अजून ?

कोकोनट क्रीम हा एक पर्याय होवू शकेल. आदल्या रात्री फ्रिज मधे ठेवलं तर whip पण करता येतं असं ऐकलंय.

कोकोनट क्रीम हा एक पर्याय होवू शकेल. >> nut based पण काहिही चालत नाही Sad

असामी, जर केळ्याने आंब्याचा फ्लेवर कमी होत नसेल तर ते वापरायला हरकत नाही. थोडे क्रीमी होऊ शकेल. अजुन एक शक्यता अशी वाटली की कॉर्नफ्लोअर थोड्या राईस मिल्क मधे उकळून ते थोडे घट्ट होईल ते वापरू शकशील(आपण देशात कस्टर्ड करायचो ना ते). मला या वीकेंडला करायला जमले तर थोडे करून पाहीन मग डीटेल सांगेन.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

साधारणपणे, जवसाची पूड जर पाण्यात भिजवली तर ती थोडी चिकट होते. आणि ती सेट व्हायला मदत करते. हेच मिश्रण अगदी केकमधेहि अंड्याच्या जागी वापरता येते. प्रकृतीसाठी ते उत्तम आहेच पण रंग नजरेआड करायला हवा. इथेहि ते चालू शकेल.

Thanks Everyone !!! corn, diary, soy derivatives, nuts चालत नसल्यामूळे जवस किंवा बनाना cream एव्हढेच option उरतात.

दिनेश जवसाला English मधे काय म्हणतात ?

Flax seeds म्हणतात. Flax Seed Meal तुला Whole foods मध्ये मिळेल.
http://www.bobsredmill.com/catalog/index.php?action=showdetails&product_...
हे तर ग्रोसरी स्टोअर च्या organic सेक्शन मध्येही मिळते. जवसाची चटणी करायला हे वापरता येते. अगदी बारीक पूड नसते, पण चालू शकेल.

ओह Flax Seeds नाही चालत, त्या cereals च्या broad group मधे येतात.

कल्पना नाही चालतील का खरेच ते Sad

असामी, मी परवा तांदुळाचे पीठ घालून करुन बघितले रे. पण बहुदा त्याला अगार अगार जास्ती लागते त्यामुळे ते सेट नाही झाले. आज थोडे जास्त घालून पाहीन. आनि बघते सेट होते का ते.
----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

किती घातलेलेस ग पीठ तू ? आम्ही आज बनवणार आहोत म्हणून try करीन

मी १२ कप सोया दूध वापरले त्याला २ टेबलस्पून पीठ पाण्यात कालवून उकळत्या दूधत ओतले. ते थोडे घट्ट होत असताना १ टेबलस्पून अगार अगार पावडर घातली. ते उकळले की पल्पमधे मिसळून सेट करयला ठेवले.

थोडे घट्टसर झालेय पण कापण्याजोगे नाही.

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

असामी
तुला जिलेटीन नाही का चालणार? व्हेगन रेसिपी मधे चालणार नाही. पण अलर्जी नसेल अन व्हेगनच असाव प्रकार अशी अट नसेल तर जिलेटीन घालून करता येइल.
अन कोकोनट क्रीम मधे नट्स कुठून आले. का नारळाची पण अलर्जी आहे?

शोनू कोकोनट हा नट धरतात. प्रश्न वेगनचा नसून allergy चा आहे. जिलेटीन मधे नक्की काय काय असते ते फार संदिग्ध लिहिलेले असते Sad

प्लेन ( अन फ्लेवर्ड ) जिलेटीन मधे फक्त जिलेतीन प्रोटीन असते- जे प्राणिज असते. इथे आहे बघ थोडी माहिती -http://en.wikipedia.org/wiki/Gelatin
शीट जिलेटिन सगळ्यात शुद्ध जिलेतीन असते असं ऐकलंय.
विकि वर जिलेटीन च्या ऐवजी वापरता येणारे पदार्थ पण दिलेत.

यात तोफूऐवजी पनीर घातले तर चालेल का?
तसेच फ्रिजमधे एकदा सेट केल्यावर दुसर्‍या दिवशी तो डबा फ्रिजमधून काढून तासाभराच्या अंतरावर दुसर्‍या ठिकाणी नेला आणि फ्रिजमधे ठेवला तर चांगले राहिल का?