लेग लेक्सचे खग

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

काल येथुन जवळच असलेल्या लेग (Legg) लेक्सना नवी लेन्स (Olympus Zuiko four/thirds 70-300 35mm equivalent 140-600) अजमावयला म्हणुन गेलो होतो. ६० नंबरचा फ्रीवे बनवतांना माती करता खणलेले भल्यामोठ्या गड्ड्यांचे स्वरुप बदलवुन हे तीन कृत्रीम तलाव बनवण्यात आले आहेत. सप्ताहांताला थोडीफार गर्दी असते, खास करुन हिस्पॅनीक लोकांची. काही ठिकाणी बरळणारे रेडीओ पण ऐकु येतात. मास्यांसाठी गळ लाऊन खूप लोक बसले असतात.
पाणी म्हणजे पक्षी असे माझे साधे समीकरण होते. निराशा झाली नाही.

हात जरी स्थीर ठेवायला कठीण नसले तरी वजनामुळे ट्रायपॉड बरा पडतो. ट्रायपॉड वापरणे आत्ता थोडेबहुत जमु लागले आहे. तरी लेन्स बदलणे वगैरे सारखे प्रकार केले नाहीत. फोटो क्रॉप केले असले (काही वेळा योग्य आकारात बसविण्याकरता जरा जास्तच) तरी टच केलेले नाहीत - त्याबद्दल शिकावे लागणार आहे. जाणकारांनी सल्ले जरुर द्यावे. फोटो कढतांना हिस्टोग्रामचा वापर मात्र केला आहे.

oeP5073246.JPG
(१)
oeP5073247.JPG
(२)
oeP5073254.JPG
(३)
एका झाडावर विराजमान ग्रेट ग्रे हेरॉन

oeP5073290.JPG
(४)
वेस्टर्न ब्लु बर्ड

oeP5073294.JPG
(५)
पर्पल मार्टीन?

oe3P5073275.JPG
(६)
रॉबीन

oeP5073265.JPG
(७)
स्वीफ्ट्स
oeP5073202.JPG
(८)
oeP5073206.JPG
(९)
oeP5073207.JPG
(१०)
मास्याची वाट पाहुन, पकडुन खाणारा ग्रेट ग्रे हेरॉन
oe3P5073199.JPG
(११)
oeP5073213.JPG
(१२)
oeP5073242.JPG
(१३)
oe3P5073214.JPG
(१४)
पाणकावळे व त्यांची घरटी
oeP5073173.JPG
(१५)
oe1P5073170.JPG
(१६)
oe2P5073170.JPG
(१७)
oeP5073176.JPG
(१८)
गीज व गीजलींग्स
oeP5073228.JPG
(१९)
एक बारका हेरॉन
oeP5073150.JPG
(२०)
नटालचा सुतार (दूसरा शॉट मिळायच्या आत फरार झाला)
oeP5073237.JPG
(२१)
कासवः काहो, ही बोट नेमकी सुटते केंव्हा? मी नेहमीप्रमाणे जरा घाईत आहे.

हायर-रेझ चित्रे पहायची असल्यास संपर्क साधा.

हो, पुढची स्टेप फिल्टर शिवायचे फोटो - फिल्टर किट मधले व त्यामुळे स्वस्त आहे - तशी लेन्स देखील महागडी नाही ;-(

दोन छबींमधील शार्पनेसची तुलना करायची असल्यास जास्त हायर फ्रिक्वेन्सीज कशात आहेत यावरुन कळेल. तसा प्रोग्राम लिहिणे कठीण जाऊ नये. कोणीतरी लिहिले ही असावेत.

नेटवर टेस्टींग चार्ट्स सापडले आहेत.

सावली उत्तम माहिती.
If you shot them in RAW, did you use some (default) preset while converting them to JPEG? Instead of that (in addition to exposure adjustment) you can also select proper 'white balance' for faithful color presentation and also apply sharpening (RAW photos are inherently soft)
तुझी लेन्स Olympus 70-300mm f/4-5.6 ED Zuiko Digital असेल तर, हे sharpness reports बघ,
http://www.slrgear.com/reviews/showproduct.php/product/1102/cat/15

सॅम्स, लिंक्स करता धन्स Happy

मी अनेक फोटोज मध्ये वाईड ओपन आणि मॅक्स फोकल लेन्ग्थला वापरत होतो - स्टॉप्ड डाऊन आणि १००-२०० मध्ये वापरुन पाहीन. लोकांचे रिव्युज तर मस्त आहेत.

वेब वर भरकटतांना 'डॉग' लेन्स हा शब्दप्रयोग सापडला - म्हणजे अर्थात अनुपयोगी लेन्स - बहुदा फेकण्याजोगी. त्याचा उगम मात्र कळला नाही. कोणी सांगु शकेल?

सगळेच्या सगळे फोटो आवडले Happy अज्जिबात न कळणार्‍या टेक्निकल डिटेल्सने भरलेल्या पोस्टींकडे तु.क. Proud

:ठार अडाणी पण सगळीकडे नाक खुपसायचा छंद असलेली बाहुली: >>> साधना, हे माझंच वर्णन ना? Uhoh Wink

आज काही फोकस टेस्ट्स केल्या. पण त्रायपॉडवरही शटर दाबल्यावर कॅमेरा हलतो Sad
रिमोट रिलीज पण नाही.
१० सेकंद डिले वापरुन उद्या पुन्हा टेस्ट्स करायचा विचार आहे.

Pages