कुणाला काय त्याचं?

Submitted by निवडुंग on 8 May, 2011 - 15:43

काल अवसच्या रातंला,
पाल भयाण चुकचुकली,
शकून होता का अपशकुन?
कुणाला काय त्याचं?

कुत्र्याच्या इमानदारीने,
लोंडा घोळत लाळ घोटली,
हाड हाडच झाली ना जीवाची?
कुणाला काय त्याचं?

मदिरेच्या धुंद प्याल्यात,
तुझीच प्रतिमा थरथरली,
अतॄप्त तहान वाहवली.
कुणाला काय त्याचं?

सिगरेटच्या धुम्रवलयात,
धुसरलं पोळलेलं हृदय अन् शरीर,
रात गाढ बिनधास्त सुखावली.
कुणाला काय त्याचं?

नीरव डांबरी रस्त्याची शांतता,
माझ्या रक्ताने शहारली,
बघ्यांचा क्षणिक चिवचिवाट,
मेला का जगला?

खरंच..
चार दिस उलटल्यावर,
कुणाला काय त्याचं?

गुलमोहर: 

नीरव डांबरी रस्त्याची शांतता,
माझ्या रक्ताने शहारली,
बघ्यांचा क्षणिक चिवचिवाट,
मेला का जगला?

काटा आला वाचून!

विदारक!

मदिरेच्या धुंद प्याल्यात,
तुझीच प्रतिमा थरथरली,
अतॄप्त तहान वाहवली.
कुणाला काय त्याचं?

सिगरेटच्या धुम्रवलयात,
धुसरलं पोळलेलं हृदय अन् शरीर,
रात गाढ बिनधास्त सुखावली.
कुणाला काय त्याचं?

नीरव डांबरी रस्त्याची शांतता,
माझ्या रक्ताने शहारली,
बघ्यांचा क्षणिक चिवचिवाट,
मेला का जगला? >>> छान कविता लिहली आहे.

नीरव डांबरी रस्त्याची शांतता,
माझ्या रक्ताने शहारली....
खरंच..
चार दिस उलटल्यावर,
कुणाला काय त्याचं?.......वाह

ऋतुवेद..
खूप आभार ! Happy

दक्षिणा,
आपला प्रतिसाद सुखद धक्का होता अ‍ॅक्चुली ! आपण म्हणता, तर नक्कीच हालवतो आता इथून.. Happy
खूप खूप धन्यवाद.. Happy