या आईला तर काही, काही कळत नाही..

Submitted by सांजसंध्या on 3 May, 2011 - 22:08

या आईला तर काही, काही कळत नाही..
------------------------------------------

या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा..जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते..खाण्यासाठी रागे भरते
इतक्या सक्काळी सक्काळी ..भूक लागत नाही
या आईला तर काही....काही कळत नाही .................................१

दूध पितां पिता कार्टून , बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना, काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते..बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते..रडू देत नाही
या आईला तर काही....काही कळत नाही..................................२

कपडे, भांग, पावडर, शूज..सारं करून देते
बस येईल म्हणून मला ..बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून..भरभर येते
फूल तोडून देते तिला..कौतुकच नाही
या आईला तर काही..काही कळत नाही....................................३

शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू...एव्हढेच म्हणते
अभ्यास काय दिलाय माझा.. हेच पाहत बसते
तिचं चित्रं काढलेलं...लक्ष देत नाही
या आईला तर काही..काही कळत नाही...................................४

होमवर्क..खाणं, क्राफ्ट ..डायरी शोधते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं, कळतच नाही
या आईला तर काही..काही कळत नाही..................................५

दमून जाऊन झोप येते..आईला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला या, जरा वेळ नाही
पापा घेत राहते तेव्हां ..अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला चालत नाही
या आईला तर काही..काही कळत नाही.................................६

संध्या
३१ ऒगस्ट २०१०
११:१९ PM

( या आधी ऑर्कूटवर पोस्ट केलेली )

गुलमोहर: 

छानच!:)

दमून जाऊन झोप येते..आईला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला या, जरा वेळ नाही
पापा घेत राहते तेव्हां ..अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला चालत नाही
या आईला तर काही..काही कळत नाही.................................६

संध्या शेवटचं कडवं वाचून डोळ्यात पाणी आलं ग माझ्या !................. काही वर्षांपुर्वी प्रत्यक्ष अनुभवलेली आणि आता तुझ्या संपुर्ण कवितेतून व्यक्त झालेली व्यथा काळीज चिरत गेली !!!!!! घरट्याबाहेरचे अथांग क्षितिज काबिज करण्यासाठी झेपावलेल्या पक्षिणीची आणि तिच्या इवल्याशा पिल्लांची व्याकुळता कालही तिच होती आणि आजही तिच आहे !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! .............................

खरं सांगा. कविता तुम्ही लिहिली की एखाद्या बाळाने?

असा प्रश्न पडावा, इतुका नेमकेपणा आणि सच्चाई उतरलीय कवितेत.
ज्याला त्या-त्या अवस्थेत शिरता येतं, तोच असे लिखान करू शकतो.

आवडत्या दहात नोंद करू का? Happy

Pages