Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उन्हात ठेउन गुलकंद करायचा
उन्हात ठेउन गुलकंद करायचा असेल तर 'घट्ट झाकणाच्या' काचेच्या बरणीत गुलाबाच्या पालळ्या आणि पत्रि खडीसाखर एकत्र करुन ठेवावी.
त्यामुळे आजुबाजुची धुळ कचरा असे काही त्यात मिसळण्याची शक्यता नसते.
अरेरे, गावठी गुलाब लावायला
अरेरे, गावठी गुलाब लावायला हवा होता
हरकत नाही, या वर्षी लावते. निदान पुढच्या वर्षी गुलकंद बनवता येईल.
माझ्याकडच्या गावठी गुलाबाचा
माझ्याकडच्या गावठी गुलाबाचा फोटो उद्या टाकते.
लसणीच्या पातीची चटणी कशी
लसणीच्या पातीची चटणी कशी करायची? आज अमेरिकेत पहिल्यांदा मला ताजी , कोवळी लसणीची पात मिळाली. आणि तेही अमेरिकन दुकानात. त्यामुळे कोण कौतुक
पातीचं पिठलं करून झालं लगेच संध्याकाळी.
माझ्याकडे एक किलो गुलकंद
माझ्याकडे एक किलो गुलकंद आहे, महाबळेश्वरला गेलेलो तेव्हा आणलेला. तीन महिने झाले त्याला.कसा संपवू??????????????/
हे पण गवठी गुलाब.
हे पण गवठी गुलाब.
उजू, गुलकंद शक्यतो
उजू, गुलकंद शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात खातात, कारण त्याचा गुणधर्म शीत आहे म्हणून. तसाही गुलकंद नुस्ता खायला छान लागतो. शिवाय दुधात घालूनही खाता येतो. त्याची बर्फीही करतात. बंगाली मिठाईत तो पनीर सोबत वापरुन गोडधोड बनवतात. त्याला ब्रेडवर टोस्ट करुन स्प्रेडसारखेही खाता येऊ शकते. अनेक प्रकार आहेत. हा बघ गुलकंद बर्फीचा एक प्रकार http://food.sify.com/specials/indian_sweets/Gulkand_and_Khoya_Burfi-139886
आणि ही पनीर गुलकंद लाडू ची आम्ही सारे खवय्ये मधली रेसिपी : http://www.youtube.com/watch?v=xEPusWWo3fM
सावनी माझी आई तरी लसणाची
सावनी माझी आई तरी लसणाची पात, मीठ आणि लाल तिखट पाणी न घालता मिक्सरवर वाटते. साधीच आहे कृती पण लसणाचा स्वाद छान लागतो त्यात. खाताना वरुन तेल (ऑलिव्ह घातलेस तर मस्तच ) घालुन खायची.
सावनीची गुलकंद बर्फी ची
सावनीची गुलकंद बर्फी ची रेसेपी होती जुन्या मायबोलीत. बघते मिळाली तर लिंक देते.
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/113743.html?1194957082
ही लिंक. सॉरी , सीमाची रेसेपी आहे. सावनीने केल्याचं आठवत होतं त्यामुळे मला वाटलं तिचीच आहे रेसेपी.
गुलकंद पानात घालून खातात.
गुलकंद पानात घालून खातात. मुंबईत यासाठीच सर्वात जास्त गुलकंद लागत असेल.
कोल्हापूरला गुलकंद बर्फी मस्त मिळते.
अरुंधती, खुप जूना फोटो होता तो. मी शोधायला आळस केला !!
लसूण पात, कोरडे खोबरे, लाल
लसूण पात, कोरडे खोबरे, लाल तिखट मीठ मिक्सरमधुन काढ. मस्त चटणी होते. >>> ही मिनोतीने दिलेली पद्धत.
हा पातीचा अजून एक प्रकार.
लसणाची पात, हिरव्या मिरच्या, खडं मीठ पाट्यावर वाटायचे. कच्च तेल घालून भाकरीबरोबर चापायचे. तिखट झेपले नाही तर खाताना थोडा दाण्याचा कूट घालावा. (ही आईची पद्धत)
गुलकंद आईस्क्रिमही होते,
गुलकंद आईस्क्रिमही होते, जळगाव मधे खाल्ले आहे.मोदक करताना सारणात घालता येईल.संपवायची घाई नसेल तर फ्रिजमधे टिकेल.
गुलकद रोज दुधात घालुन प्या .
गुलकद रोज दुधात घालुन प्या . पट्कन संपेल आणि जास्त कष्टही नाही करावे लागणार
धन्स सगळ्यांना. सध्या तरी
धन्स सगळ्यांना.
सध्या तरी फ्रिजमध्येच थेवलाय. बघू पनीर गूलकंद लाडू करेल थोडे.
दूधात घालून प्यायला हरकत नाही, पण वजनाच काय??????????
कॄपया मला मेथिचे लाडु आणि
कॄपया मला मेथिचे लाडु आणि खारिख खोबेर्याचे लाडु याचि रेसिपि सांगा.
चंपी, जुन्या मायबोलीत ही कृती
चंपी, जुन्या मायबोलीत ही कृती सापडली मेथीच्या लाडवांची: http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/117761.html?1160669014
थँक्स सिंडी आणि दिनेशदा! आता
थँक्स सिंडी आणि दिनेशदा!
)
आता करतेच हे लाडू पन मला हे सांगा अळीव ला इंग्लिश मधून काय म्हनतात्?(इथे मिळेल कि नाहि काय माहिति
चंपे, मला इथे मिळाले नव्हते
चंपे, मला इथे मिळाले नव्हते आळीव. आईच येताना घेऊन आली होती.
मला कॅनबरात मिळाला म्हणजे सिडनीत तुला डिंक नक्की मिळेल
चंपुतै कुरीअरने पाठ्वू का?
चंपुतै कुरीअरने पाठ्वू का?
मामी लाडूच पाठवा कि आणि
मामी लाडूच पाठवा कि आणि लाडवासोबत तुम्हिहि आल्या तर आनखिनच छान ...सोने पे सुहागा
लाजो डिंक मिळतो ग.
आमच्याकडे उड्दाच्या डाळीच पीठ
आमच्याकडे उड्दाच्या डाळीच पीठ आहे बरच. त्यचे डोसे , घावन अस काही करता येइल क? मी कान्दा दही, लाल तिखट कोथिम्बिर मीठ घालुन कालवते ते पण छान लागत ...पण अजुन काय करता येइल?? क्रुपया लवकर सुचवा......
cutepraju
cutepraju :
http://happyburp.blogspot.com/2006/09/away-from-grind-didir-dosa.html
डोसा
http://delectable-victuals.blogspot.com/2007/09/rice-idlee.html
इडली
http://www.chillimix.com/indian-recipe/appetizer/murukku.html
मुरुक्कु
http://www.harekrsna.com/practice/prasadam/recipes/breads4.htm
चकली
हे माझ्याकडील गावठी गुलाब.
हे माझ्याकडील गावठी गुलाब.


जागु, गुलांबांची पाकृ हवीय का
जागु, गुलांबांची पाकृ हवीय का तुला?
बरं, मला कुणीतरी गोडा मसाला करण्यासाठीचं इन्ग्रेडियंट्स आणि प्रमाण सांगा. साबांनी घरी कधी केला नाहिये आणि आई नेहमी करायची पण तिला विस्मृतीमुळे सांगता येणार नाही.
अश्विनी http://www.sanjeevkap
अश्विनी
http://www.sanjeevkapoor.com/Recipe.aspx?RecipeId=570&Header=Indian%20Re...
इथे संजीव कपूर ची गोडा मसाला ची रेसिपी आहे...
अश्विनी अग मागची चर्चा बघ.
अश्विनी अग मागची चर्चा बघ. गुलकंद करण्यासाठी गावठी गुलाब लागतात. त्याचे फोटो मागितले होते इथे. ते टाकले आहेत.
अश्विनी जुन्या माबो वर पण आहे गोडा मसालाची पाकृती विविधा मध्ये मसाले आहेत तिथे.
गोडा मसाला संजीव कपुरचा का?
गोडा मसाला संजीव कपुरचा का?
रुचिरामधली गोडा मसाल्याची रेसिपी छान होते.
प्रियाची गोडा मसाल्याची रेसिपी इथे आहे - http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103383&post=801922#P...
अजुन ब्लॉगरच्या रेसिपीज इथे पहा - http://thecookscottage.typepad.com/curry/2005/07/goda_masalamaha.html
http://madteaparty.wordpress.com/2007/06/15/goda-masala/
थँक्स गं संजीव कपूरचा गो.म.
थँक्स गं
संजीव कपूरचा गो.म. आपल्या घरगुती मसाल्यासारखाच होतो का? म्हणजे अगदी महारास्ट्रीयन पद्धतीचा?
बाकीच्या पण गो.म. रेसिपी बघून प्रिंट्स घेते. नक्की घरी करणार आता गो.म.
आपल्या आया आणि सासवा जे परंपरागत पदार्थ, मसाले करायच्या ते आपण खरंच शिकून घेतले पाहिजेत. नाहीतर सगळं काळाच्या पडद्याआड जाईल आणि ते पदार्थ फक्त विकतच मिळतात, घरी बनूच शकत नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल.
जुन्या हितगुजमधे पण मिळाला
जुन्या हितगुजमधे पण मिळाला गोडा मसाला. आधी सर्च मारला तर मिळालाच नव्हता.
Pages