पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१

Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10

पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर

या ठिकाणी
आणि या ठिकाणी

अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत पोहे अजिबात चांगले मिळत नाहीत आणी मला फक्त तेच चांगले बनवता येत होते भारतात होतो तेंव्हा..

ईकडे २ प्रकारचे पोहे मिळतात .. POHA THIN and POHA THICK

POHA THIN -- पाण्यात किती वेळ भिजवु तेच कळत नाही(१,२,३ मि .. ट्राय केले) .. एकदम चिखल होतो ,, मग त्या चिखलाचे समोसे/वडे करावेसे वाटतात Sad ..

POHA THICK-- पाण्यात कितीपण वेळ भिजवले तरी हे पोहे कडक होतात.. एकदा जाम चिडलो.. ह्य पोह्याला जवळ्पास १०-१५ मि. भिजवले.. थोडे ठिक भिजल्यासारखे वाटले.. पण सगळे रबरा सारखे झालेले :(...

हा एकच माझ्या आवडिचा पदार्थ आहे जो मला बनवता येतो आणी सिंगल असल्यामुळे हॉटेल शिवाय पर्याय नाही ऊरत बाकीच्या डिशेश साठी :(...

कुणाकडे काही आयडिया असतील तर जरुर कळवा Happy

किशोर, कांदेपोह्यांसाठी पोहा-थिक हेच पोहे वापरा किंवा मिडीअम मिळतात का ते पहा. जाडे पोहे असतील तर चाळणीमधे न भिजवता पातेल्यात पाणी घालून आपण तांदूळ धुतो तसे धुवा/भिजवा. पाणी किंचीत राहिले तरी हरकत नाही.

जर पातळ पोहे असतील तर दडपे पोहे, लावलेले पोहे असले प्रकार करता येतात.

ज्वारीच्या लाह्यांचा चिवडा मस्तच होतो. लाहीपीठ करुन- दूध-साखर घालून किंवा ताक-मिरची घालून मस्त लागते.

लाह्यांच्या पीठाचे लाडूही होतात छान आणि गोकुळाष्टमीला करतात तसा लाह्यांचा गोपाळकालाही करता येतो, दही, मिरची, लोणच्याचा खार, पोहे वगैरे घालून. तसेच आटवलेल्या दुधाला उकळी आणून त्यात साखर, वेलदोडा पूड व लाह्यांचे पीठ घालून खीरही बनवता येते.

गोपालकाला... धन्यवाद अकु.. मिनोती चिवडा नक्की करते आहे. नेहेमीच्याच चिवड्याच्यासारखाच न??

खुप जास्त रस उरला असेल तर तो आटवुन ठेव. घट्ट गोळा होईपर्यंत. पाण्याचा अंश निघुन जायला पाहिजे. हा आटवलेला रस नंतर बर्फी, पेढे, आंबा आईस्क्रिम, आंबा पोळी वगैरे साठी वापरता येतो. टिकतो ही खुप दिवस. नुसता खायला पण मस्त लागतो Happy

Thank you Arundhati and Priti. ५ वाट्या तान्दुळ बरोबर झाला.

आटवायचा कसा? ग्यास वर?<<< हो. किंवा मी स्लो कुकर मधे करते. लोएस्ट सेटिंगवर ठेवते. मधे मधे फक्त स्पॅत्युलाने बाजुने स्क्रेप करायचा. बाकी काहिही लक्ष ठेवाव लागत नाही. मस्त घट्ट गोळा जमतो.

माझ्याकडे ओटस , सोयामिल्क , भरपुर आहे. ते सम्पवण्यासाठी काय करता येइल?
सोयामिल्क आणि ओटस मिक्स कोणाला आवडत नाही खायला. ते मलाच सम्पवावे लागते. ह्याच्याव्यतिरिक्त अजुन काही करता येणार असेल तर सान्गाल का?
सोयामिल्क नुस्ते प्याय्ला पण आवडत नाही. काय करु????

निर्मयी, लोण्यावर आवडीच्या भाज्या परतून (बटाटा, कांदा, गाजर इ.) त्यात सोयामिल्क घालून उकळायचे, मीठ, मिरपूड घालून सूप बनवायचे.

केळी, चिक्कू वगैरे फळे वापरून त्यांना सोयामिल्कबरोबर ब्लेंडरमधून काढायचे (साखर/ मध आवश्यक वाटल्यास) व मिल्कशेक करायचा.

जयु, कुंदा हाताने बारीक कुस्करुन त्याचे सारण भरुन मस्त कुंदा पोळ्या होतात.
कुंदा फारच तुपकट असेल तर त्यात थोडा भाजलेला खवा घाल आणि एकदा परतुन घे. आणि मग आपण खव्याच्या/सांज्याच्या पोळ्या करतो तश्या कर Happy

सगळ्यांना पाठ्वते ,पण final product मला पाठ्वा म्हणजे झालं.... Happy
प्रतिसादाबद्दल थन्क्स .

घरि गोड्खाउ कुणि नाहि. पण गुलाबजाम मधे घालता येइल काय ?
पोळ्या करुन बघते.

Pages