केरळ डायरी: भाग ३

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

भाग १: http://www.maayboli.com/node/22402
भाग २: http://www.maayboli.com/node/25445

जवळजवळ संपुर्ण केरळच हिरवेगार आहे. ज्याच्या त्याच्या दारी केळी व नारळाची झाडे तर असतातच. आजकाल अनेकदा नारळ काढायला लोक मिळत नाहीत (कारण सर्व तरुण मुले गल्‍फला जाऊ पाहतात - याच मुळे सर्व विज्ञानशाखांच्या वर्गांमध्ये सुद्धा ८० टक्के मुली. महाराष्ट्रात असे केवळ मायक्रोबॉयलॉजी च्या वर्गात दिसु शकेल). महात्मा गांधी विद्यापिठात तर हिरवाईचेच राज्य आहे. बॉटनीच्या शाखेने अनेक उपक्रम राबवुन नाव-पत्यासहीत अनेक वृक्ष लावले आहेत, त्याचप्रमाणे पावसाचे पाणी साठविण्याचे काही प्रयोग तेथे चालतात. भरपुर पक्षी तेथे वास्तव्य करुन असतात हे वेगळे सांगायला नकोच. पक्षीदर्शनाकरता रोज सकाळी मी दोन कॅमेरे व एक दुर्बीण घेऊन बाहेर पडायचो. अनेकदा सुंदर धुके असायचे. या फेऱ्यांमधीलच बरेच पक्षी 'हा पक्षी कोणता?' मध्ये टाकले आहेत.

cP1030624.JPG
(निर्मनुष्य सकाळ, छोटे डांबरी रस्ते व मस्त धुके)

cP1030635.JPG
(अनेक प्रकारची फुले तर असतच)

cP1050889.JPG
(बांबुचे एक बन)

cP1030630.JPGcP1030652.JPGcP1030646.JPGcP1030633.JPG
(जिकडे-तिकडे अनेक कोळी सुद्धा गाणी गात, जाळी विणत सावजांच्या प्रतिक्षेत असत. अर्वाचीन जाळ्यांचे अवशेष दवबिंदुंची माळ बनवत आजुबाजुच्या सौंदर्यात भर घालीत)

-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०
Buckminster Fuller हा एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी जन्मलेला काळाच्या पुढे असलेला डिझायनर. त्याने जिओडेसीक घुमट बनवुन त्यांची वजनवहनाची महती लोकांना पटवली (या प्रकारच्या वास्तुचा शोध मात्र त्याने लावला नव्हता, तो Walther Bauersfeld या जर्मन विशारदाने खगोलशास्त्रीय तारालय म्हणुन वापरण्याकरता लावला होता). सध्या हे डिझाईन सर्वत्र दिसते. निव्वळ कर्बाच्या अणुंचे बनलेले अनेक महत्वाचे (उपयोगी) आणि तितकेच सुरस रेणु असतात. काही नळ्यांसारखे असतात तर काही चेंडुंसारखे. सर्वातप्रथम, १९८५ साली, C60 नेमका कसा असतो हे कळले. त्या चेंडुच्या जिओडेसीकशी असलेल्या साधर्म्यामुळे त्याचे Buckminster Fuller वरुन buckminsterfullerene असे नामकरण करण्यात आले. (आता केवळ कर्बाच्या बनलेल्या सगळ्याच रेणुंना फुलरिन्स असे संबोधल्या जाते). बकमिन्सटरफुलरीनचे स्ट्रक्चर शोधुन काढले त्या शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषीक प्रदान करण्यात आले. त्यापैकी एक मागील भागात उल्लेखिलेले सर हेरॉल्ड क्रोटो.

त्यांचे संशोधन सुरु आहेच, पण त्याच्यतिरीक्त शैक्षणीक व्हिडीओ बनवणे व धर्मांमुळे होणाऱ्या अधर्माविरुद्ध आवाज उठविणे हे ही करतात. त्यांच्या बरोबर एका संध्याकाळी कुमारकोम बॅकवॉटर्सवर हाऊसबोटीतुन एक सहल घडली व या विषयांवर गप्पा झाल्या.

cP1060933.JPG
(सर क्रोटो पत्निसह)

cP1060981.JPG
(सर क्रोटो महात्मा गांधी विश्वविद्यालयातील इरुडाईट प्रोग्रामचे संचालक अरविंदाकुमार यांच्यासोबत)

cP1060957.JPGcP1060966.JPGcP1060990.JPG
(हाऊसबोटी व मावळणारा सुर्य)

cP1060999.JPG
(चायनीज फिशींग नेट्स उर्फ 'चीना-वाला' ही पन्नास-साठ फुटी जाळी वापरायला ५-६ लोक लागतात. चौदाव्या शतकापासुन केरळात त्या वापरल्या जात असाव्यात)

sP1010164.jpg
(आळशी पाणकावळे चायनीज फिशींग नेटचा वापर करतांना)

sP1010148.jpg
(जाळे टाकायच्या तयारीत कोळी)

sP1010152.jpg
(एका ठिकाणी खूप मोठ्या संख्येत बदके होती. बोटीत असल्याने जवळ मात्र जाता आले नाही)

पुढील भाग मंदिरांबद्दल ...

-----------------------------
http://en.wikipedia.org/wiki/Buckminsterfullerene
---------------------------------------------------------
मधले भाग अजुन तयार नाहीत
भाग ७: http://www.maayboli.com/node/23569
भाग ८: http://www.maayboli.com/node/23702
भाग ९: http://www.maayboli.com/node/23781

विषय: