सुट्टीच्या दिवशी ऑफिसच्या दिशेने

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 2 May, 2011 - 03:37

माझ्या ऑफिसच्या परिसरात भरपुर झाडे आहेत. ऑफिसच डोंगराळ भागावर आहे. शिवाय थोडे पुढे गेल्यावर जंगल आहे. रोज ऑफिसला जाताना अनेक झाडं न्याहाळते. पण रुखरुख लागायची की एवढी सगळी झाडे मी पाहते पण फोटो काढता येत नाही. म्हणुन गुडफ्रायडेच्या दिवशी नेमकी पर्यावरण दिवस होता. आदल्यादिवशीच नणंदेला येशीलका म्हणुन विचारले. ती अतिउत्साहात तयार झाली. सकाळी ६ लाच नणंदेला घेउन ऑफिसच्या एरियात गेले आणि खालील फोटो कॅमेर्‍यात कैद केले.

१) धामणीचा रानमेवा. पिकल्यावर हे लाल होतात आणि गोड लागतात.

२)धामणीची फुले

३) सोनमोहर

४) रस्त्याला रोज ह्या चिंचा मला वेडावत असतात.

५) जवळून यम्मी.

६) झाडावरच फुटलेल्या चिंचा

७) कुड्याचे झाड फुलांनी भरले होते.

८) हा पण कुडाच आहे का ? की वेगळे झाड आहे ? हे मोहाचे तर झाड नाही ना ?

९) थोड पुढे गेल की एक शंकर मंदीर लागत. त्या शंकर मंदीराच्या बाजुला बेलाची झाडे आहेत. बेल सध्या मस्त हिरवागार झाला आहे.

१०) त्या बेलाच्या झाडाला बेलफळे लागली होती.

११) रस्त्यात शिवणीचे झाड सापडले. शिवणीला फळ लागली आहेत. जुन्या आठवणी लगेच ताज्या झाल्या. लहानपणी शिवणीची फळे पिकुन पिवळी धम्मक झाली की ती सोलून त्याची बी खडबडीत दगडावर चोळून फोडून त्यातील रानमेवा खाण्याचा मोठा छंद होता आम्हाला.

१२) शिवणीची फळे

१३) मग भेटले भुताचे झाड (नाव बरोबर आहे ना ? की वेगळे झाड आहे हे ?) बापरे पळा पळा भुत !

१४) भुताच्या झाडाला हे फुल लागले होते.

१५) अजुन एक फुल की फळ ?

१६) त्याच्याच थोडया बाजुला काकडाला मोहोर लागला होता.

१७) मध्ये मध्ये काकडेही लागली होती.

१८) बांडगुळाला धरलेली फुले. दिनेशदांनी फोटो काढायला सांगितला होताच.

१९) सुगरणींनी घरटी बांधलेली मस्त झोके घेत होती.

२०) थोड जवळ जाउन बघा.

२१) आंबाड्या सारखी दिसणारी फळे

२२) देवचाफाही जागोजागी दिसतो.

२३) शिषिराची फुले

२४) पेरूचे फुल

२५) तुम्हाला जळवळ्यासाठी हा फोडलेल्या चिंचांचा फोटो

अजुन भरपुर झाडे आहेत ज्यांचे फोटो काढायचे राहिलेत.पुढच्या खेपेस त्यांचे फोटो कॅमेर्‍यात कैद करायचे आहेत.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तो.पा.सु. तो.पा.सु. तो.पा.सु. तो.पा.सु.तो.पा.सु. Sad
ईंग्रजी चिंचा . एकदम मस्त आणी तो खोपा पण काय सही आहे Happy
त्यात कोणी राहत होते का?

ओ, आता बघितल्यावर जरा वेगळी वाटताहेत. हा काळा कुडा पण नाही. आणि मोह हि नाही.
आणि, घारापुरीच्या बेटावर पण हि सगळी झाडे आढळतात !

मस्तच गं जागु.
कित्ती कित्ती दिवसांनी धामणं बघितली.. पिकायला लागली की भरपुर मुंगळे असतात त्या झाडावर.. पहिला वळवाचा पाऊस झाला की पिकायला लागतील.

विलायत चिंचा न आवडणारी मी एकटीच आहे बहुतेक. आमच्या घराच्या दारात असुनही कध्धीच खाल्याचं आठवत नाही. Uhoh

साधना, जिप्सि आता त्याला फळ आल्यावर बघायला जायला लागेल म्हणजे ते नक्की काय आहे ते समजेल.
शांकली, रुणुझुणू, दादाश्री, स्वाती, विजय धन्यवाद.
आवळा सुगरण नव्हती त्यात.
पंधरा दिवसांपुर्वी घारापुरीला गेले होते पण रात्र असल्याने झाडांचे दर्शन नाही झाले.
हो वर्षा ही विलायती चिंचच.
चिंगी माझ्या नणंदेला पण नाही आवडली पण मला आवडते.

मस्त फोटो... चिंचा भारीच....
ते भुताचे झाड म्हणजे 'खाय खुसली' आहे का? प्रचंड खाजवते त्याने जर अंगाला लागले तर.... त्याच्या बिया जंतावर औषध म्हणुन देत असत फार पुर्वी...

मस्तच गं ! त्या विलायती चिंचा (हो, आम्ही त्याला विलायती चिंचाच म्हणायचो लहानपणी) बघून तोंडाला पाणी सुटले. Happy
धन्स अ टन !!

ते भुताचे झाड म्हणजे 'खाय खुसली' आहे का? प्रचंड खाजवते त्याने जर अंगाला लागले तर.... त्याच्या बिया जंतावर औषध म्हणुन देत असत फार पुर्वी...
<<< खरेच की. आता ओळखले. Happy

निवांत पाटील त्या कुयलीच्या वेली असतात. ७ नंबरच्या फोटोचे निरिक्षण करा त्यात उजव्या कोपर्‍याच्या खालच्या बाजुला खाज कुयलीचे बोंड आहे. त्या वेलीची मुळे ही चावायला देतात जंतांच्या नाशासाठी.

जागू तै,
सगळे फोटो मस्त...
त्या भुताच्या झाडाला आमच्या गावाकडे "कांडोळ" म्हणतात.
आता भर उन्हाळ्यात सगळं रान काळपट दिसत असताना ही कांडोळ लक्ष वेधून घेते.
Happy

अखि, प्रज्ञा, धन्स.
झुझी धन्स. मी कांडोळ कांडोळ ऐकत होते. ह्याच झाडाला कांडोळ म्हणतात हे आत्ता कळल.

जागु, फोटोचा नं चुकलाय काय? पण बरोबर आहे ते फळ / शेंग खायखुजलीची आहे.... पण त्याला भुताचे झाड का म्हणतात?

जागू इतक्या सुंदर निसर्गरम्य रस्त्यावरून हपिसात जातेस रोज? मस्तच. आणि ते शिरिषाचं फूल आहे का...देवचाफ्याच्या खालचं? बहुतेक टायपो असावा. आणि फोडलेल्या चिंचेतलं खोबरं कसलं डेलिशस दिसतय! मस्त फोटो!

छान

निवांत पाटील त्या झाडाचे नाव झुझीने सांगितले कांडोळ म्हणून. त्याचे खोड पांढरे असते व ते काळोखातही पांढरे दिसते म्हणुन त्याला भुताचे झाड म्हणतात. ते कुयलीचे बोंड वेलीला लागते त्या झाडाला नाही.

होय मानुषी ते शिषिराच फुल आहे.

स्मितहास्य धन्स.

बी. धन्स.

Pages