माझीया बाळा----

Submitted by प्रभा on 29 April, 2011 - 08:50

''माझीया बाळा''
--------------
माझीया बा--ळा तू खारे ''साखर- पोळी''
श्रेयस्-बा-ळा तू खारे साखर-पोळी,
खाण्याचा तुज - अति कन्टाळा
खे-ळण्याचा एकच चाळा,
मित्र- मैत्रीणी करशी गोळा
भरली शा--ळा,
लोण्याचा--गोळा,
तू खारे श्रेयस बाळा--
ही बघ आली चिऊताई
सोबत घेउन पिल्लान्नाही,
म्याऊ--म्याऊ करुनी मनीमाऊही
सान्गते का--ही,
भात आणि द--ही,
तू खारे श्रेयस बाळा--
हा बघ आला ससा चिमुकला
कासवासही घेऊन आला,
हुप-हुप करुनी माकड त्याला
सान्गते आ--हे
दूध आणि पो--हे
तू खारे श्रेयस्-बाळा--
ही बघ आली श्रियाताई
सवे घेऊनी सान्वीलाही,

'' बर्थ्-डे '' ला तू लवकर येई
खेळ खे--ळूया,
केक खा--ऊया,
आधी खारे दूध-शेवाया--
श्रेयस्-बाळा------
भात कालवुनि तत्पर आई
घास भरविण्या अधिर होई,
बळजबरीने मान्डीत घेई
भरविते घा--स,
पन्च-प्रा-णा--स,
तू खारे आम-रस पोळी
श्रेयस- बाळा-----
घास भरविता झोपुनी गेला
स्पर्श आईचा सुखवी त्याला,
डोळे भरुनी न्याहाळी त्याला
पटापट घे--ई,
मुके ती आ--ई,
निजला ग माझा बाळ
वाजवू नका तुम्ही टाळ,
गुणी माझा श्रेयस-बाळ
----------------------
,

गुलमोहर: 
शब्दखुणा: