"सुविचार सृष्टी"

Submitted by चातक on 26 April, 2011 - 04:39

नमस्कार मंडळी...

हा धागा मराठी, हिंदी, तसेच इंग्रजी या भाषांतील "सुविचार" इथे एकत्रित करणे, या हेतुने बनविला आहे. इथे आपण स्वत:चे किंवा एकलेले, आठवलेले 'सुविचार' "प्रतिसाद" रुपात देउन आपली "सुविचारांची संस्कृती" जतन करण्यास हातभार लावु शकता.

इथे सर्व प्रकारचे 'सुविचार' आपण देउ शकता..त्यामुळे "सुविचारांना" कोणतीच 'सीमा' नाहीय. अगदी आपल्या दररोजच्या व्यवहारात सहजच मनात आलेले लहान-सहान विचार, सुबोध प्रसंग, जे काही क्षण डोक्यात प्रकाश पाडुन जातात, जे कुणाशी तरी 'शेअर' करावे.., असे वाटतात पण ज्यासाठी वेगळा 'धागा' काढणे शक्य होत नाही.

असे विचार आपण इथे "शब्दरुपात" अनेकांपर्यंत पोहचवु शकता.. Happy

धन्यवाद!
चातक.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर कधी कोणी तुमचं मन दुखःवलं तर
निराश होउ नका कारण
हा निसर्गाचा नियम आहे...!!!
ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच
झाडावर लोक जास्त दगड मारतात...!!!

--------------

क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.

---------------

जो गुरुला वंदन करत नाही, त्याला आभाळाची उंची लाभत नाही.

----------------

फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.

Pages