"सुविचार सृष्टी"

Submitted by चातक on 26 April, 2011 - 04:39

नमस्कार मंडळी...

हा धागा मराठी, हिंदी, तसेच इंग्रजी या भाषांतील "सुविचार" इथे एकत्रित करणे, या हेतुने बनविला आहे. इथे आपण स्वत:चे किंवा एकलेले, आठवलेले 'सुविचार' "प्रतिसाद" रुपात देउन आपली "सुविचारांची संस्कृती" जतन करण्यास हातभार लावु शकता.

इथे सर्व प्रकारचे 'सुविचार' आपण देउ शकता..त्यामुळे "सुविचारांना" कोणतीच 'सीमा' नाहीय. अगदी आपल्या दररोजच्या व्यवहारात सहजच मनात आलेले लहान-सहान विचार, सुबोध प्रसंग, जे काही क्षण डोक्यात प्रकाश पाडुन जातात, जे कुणाशी तरी 'शेअर' करावे.., असे वाटतात पण ज्यासाठी वेगळा 'धागा' काढणे शक्य होत नाही.

असे विचार आपण इथे "शब्दरुपात" अनेकांपर्यंत पोहचवु शकता.. Happy

धन्यवाद!
चातक.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

" 'सुविचारांमुळे' माणसांत माणुसकीचे 'तेज' अखंड झळकत राहते "

।।तम्सो मां जोतिर्ग्मय।।
।।असतो मां सत्गमय।।

या उक्तीं प्रमाणे.

१) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
२) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान
४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.
५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.
६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.
७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.
९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !
१०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
१२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
१३) आपण जे पेरतो तेच उगवतं.

-१-कोणताही कलाकार हा काहितरी साध्य करण्याच्या इच्छेने भारलेला असतो. त्याला काही कोणाला हरवायची इच्छा नसते – ऍन रॅंड.

-२-आजूबाजूला कोणी नसतानाही जेव्हा विनाकारण तुम्हाला हस येतं, तेव्हा खुशाल समजावं की तुम्ही मनापासून हसतायं – ऍंडी रूनी.

-३-आज तुम्ही शांतपणे झाडाखाली स्वस्थ बसू शकताय, याचं मुख्य कारण म्हणजे फार पूर्वी कोणीतरी हे झाडं लावून, वाढवलंय – वॉरेन बफे.

-४-प्रत्येक कतीचा परिणाम आनंदातच होईल असे नाही; पण आनंदप्राप्तीकरता काहितरी कृती करण्याला पर्यायच नाही – बेंजामीन डिस्त्रायली.

-५-इतरांचं ऐकून घेणं तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं इतरांनी ऐकावं किंवा त्यांचा नेता त्यांनी तुम्हाला करावं अशी अपेक्षा तुम्ही करणं चूकीचं नाही का ? – सॅम रेबर्न

-६-संवादातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ’जे बोलंलंच गेलेलं नाहिये ते ऐकणं’ – पीटर ड्रकर

-७-आयुष्यात दोनच गोष्टी प्रमाण मानल्या जातात. कारणं आणि परिणाम. पण दुर्दैवाने यातली कारणं फारशी विचारात घेतली जात नाहितं.

—————-

****** --तुमचं एक मिनिट तुम्हाला/इतरांना किती महत्वाचं आहे, हे तुम्ही बाथरूमच्या कोणत्या बाजूला आहात त्यावर अवलंबून असतं

५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.
१६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.
१७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
१८) आधी विचार करा; मग कृती करा.
१९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,

" तरुणपणी ज्यांचं पटत नाही अशी मनं वृद्धापकाळात जवळ येतात. पहा ना, ३ आणि ६ सारखे निर्जिव आकडे सुद्धा साठी उलटली की गुण्यागोविंदानं रहातात. "

"सिंहाची आयाळ उंदीर कुरतडतात, उंदराची शेपटी सिंह कुरतडत नाही"

गुलाबाला काटे असतात असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो असे म्हणत हसणे उतम

१.आपलं काम साधायचं असेल तर भिडस्तपणा सोडुन दिला पाहिजे, वासरुला गाईला ढुश्या मारल्याशिवाय दुध मिळत नाही.
२.पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेल्या उन्हाळ्यावर तुमचं खर वय ठरतं

केस वाढवून देव आनंद बनण्यापेक्षा,ज्ञान वाढवून विवेकानंद बना. Happy

" तलवारीच्या घावापेक्षा 'शाब्दीक' घाव जास्त प्रभावी ठरतात "

तेव्हा बोलताना 'विचारपुर्वक' आणि नेमकेच बोलावे.
Happy

सुवाच्च्य अक्षर हाच खरा दागिना ||

( माझे मराठी हस्ताक्षर सुवाच्य केल्या बद्दल मायबोली चे शतशः आभार Biggrin )

"'ज्ञानदान' हे जगातील कोणत्याही दाना पेक्षा श्रेष्ट होय"

"ज्ञान वाटल्याने ज्ञान वाढते"

"आळस हा माणसाचा शत्रु आहे" - मो.क.गांधी

Pages