केनयामधे ब्रिटीशांनी एक महत्वाकांक्षी रेल्वेलाईनीचा प्रकल्प पूर्ण केला. मोंबासा-नैरोबी-किसूमु ते पुढे लेक व्हिक्टोरिया मार्गे युगांडा पर्यंत हि रेल्वेलाईन जाते. अजूनही ती चालू आहे, पण तिचा केनयाच्या अर्थव्यवस्थेतील हाअभार नगण्य आहे.
या प्रकल्पासाठी भारतातून मजूर नेण्यात आले होते. त्यात बरेच गुजराथी आणि पंजाबी शिख होते. या दोन्ही समाजातले लोक मग इथेच स्थायिक झाले. आणि आज इथे जी भारतीय संस्कृती नांदताना दिसते त्याचे श्रेय या दोन्ही समाजांना आहे.
इथली देवळे आणि गुरुद्वारा, भव्य आणि प्रेक्षणीय आहेत. अश्याच एका गुरुद्वाराला मी आज भेट दिली.
नैरोबी मोंबासा रोडवर, नैरोबीपासून १७० किमी वर मकिंडो नावाचे गाव आहे आणि तिथे हमरस्त्यावरच हा गुरुद्वारा आहे. खूपच विस्तीर्ण आवार आहे.
गुरुद्वारा, दरबार, तर आहेतच पण रहायची देखील उत्तम सोय आहे. हॉस्पिटल आहे. विस्तीर्ण आवारात मोकळे फिरणारे मोर. पेरू, बोरे, आंबा, जांभूळ, पपई, लिंबू यांची नीट जोपासलेली झाडे, मूलांसाठी खेळायची साधने सगळे आहे.
जाताना अथी रिव्हर ओलांडली कि आपण रिफ्ट व्हॅलीत प्रवेश करतो. दोन्ही बाजूला विस्तीर्ण गवताळ प्रदेश. मधूनच दिसणारे खास आकाराचे डोंगर. यातून हा प्रवास होतो.
गेल्या गेल्या गुरुद्वारात माथा टेकला, तर तिथे कडा प्रसाद मिळाला. मग नाश्ता करायला गेलो. पुरी, माखी दाल, बटाटा भाजी, मठरी, लोणचे असा भरगच्च नाश्या. व सोबत चहा. मग सगळे आवार आम्हाला मोकळेच. पेरु, बोरे असले प्रकार माझ्या तावडीतून सुटणे अशक्य. अनेकवेळा चकरा मारुन, तिथले प्रत्येक झाड मी निरखून घेतले.
थोड्या वेळाने जेवणाची वेळ झाली. जेवणात रोट्या, सूजी हलवा, भात, डाळ, कारल्याची भाजी, बटाट्याची भाजी, बुंदी रायता, फ्रूट सलाद, अनेक प्रकारची लोणची, ताक अशी रेलचेल होती. आग्रह करकरुन वाढ होते पण कुणी ताटात काही टाकू नये, असा कटाक्षही होता. त्या लंगरमधली व्यवस्था एखाद्या तारांकीत हॉटेलच्या तोडीची होती. बहुतेक कामं स्वयंसेवकच करत ह्ते पण स्थानिक माणसेही होती. इथे अनेक देवळात / गुरुद्वारात ही माणसे मन लावून सेवा करताना दिसतात.
भरपेट जेवल्यावर आम्ही लॉनवरच ताणून दिली. तसा हवेत उष्मा नव्हता, पण नैरोबीमधली थंड हवा अंगवळणी पडल्याने, आम्हाला जरा गरम वाटत होते. तरी दुपारचा चहा घेऊन आम्ही निघालोच.
त्या गुरुद्वाराच्या बाहेरच स्थानिक भाजी मार्केट होते. तशी नैरोबीच्या सिटी मार्केटमधे ताज्या भाज्यांची रेलचेल असते, तरी पण मला तिथे शिरायचा मोह आवरला नाहीच. उगाचच बरीच खरेदी केली.
दुपारनंतर या व्हॅलीत वादळी पाऊस पडतो. असाच एक दूरवर पडणारा पाऊस टिपता आला.
आम्ही त्याच्या तडाख्यातून तिथे बचावलो, पण घरी आल्यावर मात्र तो पडलाच.
तर ही चित्रझलक..
१) ही सुरवात. विस्तीर्ण गवताळ प्रदेश, दूरवर डोंगर आणि ढग.
२) हे आमचं ड्यूक्स नोज बरं का. याला पाहून माझ्या मनात आले, जर गिरिराज माझ्याबरोबर असता आणि माझं वय (शारिरीक) जरा कमी असतं, तर आम्ही एकमेकांना या डोंगरावर चलायचा नक्कीच आग्रह केला असता.
३) हा कधीकाळी ज्वालामुखी असणार, आता सगळीच टोकं झिजलेली दिसताहेत. पण आकार मजेदार आहे नाही ?
४) हा फोटो बघून तूम्हाला इथल्या टोपोग्राफीची नीट कल्पना येईल
५) हे आहे गुरुद्वारा
६) हे तिथले हॉस्पिटल
७) हे तिथले विस्तीर्ण आवार, त्यामागे राहण्यासाठीची घरे.
८) तिथल्या लंगरमधे चहाचा स्वाद घेताना मी
९) तिथे मुक्त वावरणारे मोर
१०) सध्या त्या परिसरात या फूलांची चलती आहे. सगळीकडे हिच दिसत होती. फोटोत गोखरू पण आहे
११) इथे बिटकीची फूले आपल्याकडच्या पेक्षा जरा जास्त उमलतात, मोठीही असतात.
१२) तसेच आपल्याकडे कण्हेरीच्या शेंगा क्वचितच दिसतात, इथे मात्र खूप दिसतात.
१३) इथल्या लोकजीवनात मानाचे स्थान असलेला बाओबाब किंवा सेतूर. आपल्याकडे याला गोरखचिंच म्हणतात. याच्या फळाचा गर खाद्य तर असतोच, पण पाण्याचे दुर्भिक्ष झाल्यास, याच्या खोडातून भरपूर पाणी मिळू शकते.
१४) आणि आता पावसाचा पाठलाग
१५) जरा जवळून
१६) आता अंगावरच आला की !
१७ ) पण नाही, परत सगळे निरभ्र...
यातले अनेक फोटो, चालत्या गाडीतून काढले आहेत. तेव्हा..
मामे जाम खेचत असतेस हं.
मामे जाम खेचत असतेस हं.
बोले तो एकदम झक्कास
बोले तो एकदम झक्कास भटकंती...
यातले ते रिफ्ट व्हॅलीचे फोटो कोणते नक्की?
माहिती व फोटोज दोन्ही छान.
माहिती व फोटोज दोन्ही छान. खासकरून १, ३ व ४ था मस्त.
गौतम, सगळे रस्तेच रिफ्ट
गौतम, सगळे रस्तेच रिफ्ट व्हॅली मधे आहेत.
ओह ओके, वरुन फोटो घेतले असतील
ओह ओके, वरुन फोटो घेतले असतील तर तेही टाका...
मोर, आणि फुलांचे फोटो खूप
मोर, आणि फुलांचे फोटो खूप आवडले..
मस्त फोटु ..
मस्त फोटु ..
मस्त.....
मस्त.....
खासच आहेत फोटो, त्याबरोबर
खासच आहेत फोटो, त्याबरोबर प्रत्तेकाची माहिती पण मस्तच
वा!
वा!
रंग खुप सुंदर आहेत.. आवडले.
रंग खुप सुंदर आहेत..
आवडले.
नेहमिप्रमाणेच सुंदर वर्णन व
नेहमिप्रमाणेच सुंदर वर्णन व फोटो. सर्व काहि तुमच्याप्रमाणेच क्लासिक.
फोटो क्र. १३ जबरी आहे. बाकी
फोटो क्र. १३ जबरी आहे.
बाकी त्या कण्हेरीच्या शेंगा मी पुण्यात पण बघीतल्या आहेत.
व्वा, मस्त फोटो..
व्वा, मस्त फोटो..
सुंदर
सुंदर
मस्त दिनेशदा बिटकीची फुल
मस्त दिनेशदा
बिटकीची फुल पाहीली आणि आठवणी ताज्या झाल्या.
किती वर्ष झाली नैरोबी पाहून. आम्ही ठरवलेल पुढच्या खेपेस आयव्हरी कोस्टला येताना नी जाताना इथे रहायच कालिमांजारो वगैरे पहायला पण ती पुढची खेप कधी आलीच नाही.
तो भन्नाट वारा आठवतोय डोळे उघडे ठेऊन बाहेर बघता येत नव्हत पहील्यांदाच मी आग्रह केला असेल काचा लावायचा.
बाकि तुझा फोटो मस्त आलाय खर सांगयच तर लंगर मे लंगूर
किलिमांजारो चा फोटो,
किलिमांजारो चा फोटो, फुजियामाचा म्हणून खपवता येईल, इतके साम्य अहे.
आणि गुगु, सरळ लालतोंड्या म्हण कि !
दिनेशदा,सगळे फोटो छान आलेत.
दिनेशदा,सगळे फोटो छान आलेत.
सही फोटो आहेत.... या कि
सही फोटो आहेत....
या कि सगळ्यांनी भटकायला.>>>> चला मे महिन्यात टपकतो तिकडे... भारत्तात परत जाताना चांगला हॉल्ट आहे...
दिनेशदा, एकदम झकास फोटो
दिनेशदा, एकदम झकास फोटो आहेत...
डिस्कव्हरी चॅनलवर नैरोबी जसं दिसतं त्याच्या एकदम वेगळं! मस्तच !
दिनेशदा, सुंदर सफर घडवलीत,
दिनेशदा,
सुंदर सफर घडवलीत, तुमच्याबरोबर कुठेही फिरायला नक्कीच आवडेल - कारण माहितीचा खजिनाच असणार मग आमच्याबरोबर !
Pages