भरली ढेमशी

Submitted by चिनूक्स on 22 April, 2011 - 03:38
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१. अर्धा किलो कोवळी ढेमशी
२. कांदा - एक मोठा
३. लसूण - सहा पाकळ्या
४. आलं - अर्धा इंच
५. सुक्या खोबर्‍याचा कीस - दोन चमचे (भाजलेला)
६. भाजलेले तीळ - दोन चमचे
७. जिरेपूड - एक लहान चमचा
८. धणेपूड - एक लहान चमचा
९. लवंग - ४
१०. वेलदोडा - दोन (सालासकट)
११. कोथिंबीर - अर्धा वाटी
१२. गूळ
१३. आमचूर
१४. तेल
१५. मीठ
१६. तिखट

क्रमवार पाककृती: 

१. ढेमशी धुऊन, त्यांची देठं काढून घ्या. ढेमशी मोठी, आणि जरा जून असतील तर सालंही काढावीत. नंतर चमच्याने आतला गर काढून घ्यावा. थोडा गर ढेमशांमध्ये राहू द्यावा. बिया असतील तर त्या टाकून द्याव्यात. गर मात्र राखून ठेवावा.
२. कांदा बारीक चिरावा. किंचित तेलावर तो गुलाबी परतावा.
३. थोड्या तेलावर आलं, लसूणही परतून घ्यावं.
४. लवंग आणि वेलदोडे भाजून घ्यावेत.
५. परतलेला कांदा, आलंलसूण, खोबर्‍याचा कीस, तीळ, लवंग-वेलदोडे, कोथिंबीर, धणेजिर्‍याची पूड, चवीप्रमाणे तिखट, मीठ, गूळ, आमचूर आणि ढेमशांतला गर एकत्र करून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
६. हे सारण ढेमशांमध्ये भरावे.
७. कढईत नेहमीपेक्षा जरा जास्त तेल गरम करावे. उरलेलं वाटण तेलात परतावे.
८. वाटणाला तेल सुटलं की त्यात ढेमशी घालावून थोडा वेळ परतावीत.
९. नंतर भाजीत पाणी घालून कढईवर ताट ठेवून शिजवावी.
१०. भाजी शिजत आली की त्यात थोडं हिंग आणि हवा असल्यास अर्धा लहान चमचा गरम मसाला घालावा.
११. भाजी शिजली की वरून कोथिंबीर घालावी.

वाढणी/प्रमाण: 
तीन माणसांसाठी
अधिक टिपा: 

१. ढेमशी शक्यतो कोवळी घ्यावीत. जून ढेमशी लवकर शिजत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!! Happy

इथे भाजीवल्याकडे भाजी घेताना कच्चे टोमॅटो आणि ढेमश्यांमधे आमचा गोंधळ व्हायची दाट शक्यता आहे, तेव्हा जास्त आगाऊपणा न करता भाजीवाल्यालाच 'ढेम्शी दे' सांगायला हवं. Happy

धन्यवाद चिनूक्स Happy हे तर दिसतं भाजीवाल्याकडे. पण मंजूडी म्हणाली तसं मी कच्चे टॉमेटोच समजत होते इतके दिवस.:-) ढेमशी सोडून सगळं साहित्य नेहमी असतं घरात. ढेमशी मिळाली की करते.

ढेमशी सोडून सगळं साहित्य नेहमी असतं घरात. ढेमशी मिळाली की करते

अरे वा.. माझ्याकडे नेमके उलटे असते... Happy

पाकृ एकदम मस्त. खायला कशी लागतील माहित नाही. दर वेळेला 'बदलुन' हा टॅग पाह्ल्यावर 'बहुतेक फोटो अ‍ॅड केले असतील' असे वाटुन आले पण अजुन काही सुगृहीणीच्या किंवा सुगृहस्थाच्या हातच्या ढेमश्यांचे फोटो दिसले नाहीत.

साधना, माझी गणना कशात करतेस ते माहित नाही पण हा फोटो. बर्‍याच वर्षापुर्वीचा आहे. फोटो काढला होता म्हणजे कृति पण लिहिली असणार मी इथे त्यावेळी. कांदा लसणीच्या जागी, बेसन वापरले होते.

टिंडा म्हणजेच ढेमसे? Uhoh
वर्गात काही मुली ढेमश्याची म्हणून एक भारी भाजी आणायच्या - त्यातले ढेमसे शेवग्याच्या शेंगांसारखे दिसायचे
- कुणाला माहितेय का ह्या प्रकाराबद्दल?

नानबा, (आपल्या Wink ) सातारा भागातले ढेमसे तु म्हणतेस तसे वेगळे असतात. राजगिरा/तांदुळजा/माठ असल्या कुठल्या तरी भाजीचे जून देठ बाजारात विकायला मिळतात ते म्हणजे ढेमसे Happy त्याची दाण्याचे कूट, कारळ्याचे कूट वगैरे घालून 'कोरड्यास' करतात. ते लय म्हंजे लयच भारी लागते ... स्लर्प....

मला पण हा प्रकार फक्त टिंडे म्हणूनच माहीती होता यालाच ढेमसे म्हणातात हे अम्रेकितेच कळते.

गूळ सोडला तर अगदी माझ्या सासूबाईंची पद्धत आहे ही , खास नागपुरी Happy . तेल जरा जास्त घातल्याशिवाय मजा येत नाही . Wink Happy

माझी आणि दिनेशदांची जुन्या मायबोलीतली ढेमश्यांची रेसिपी इथे आहे .

http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/59974.html?1120061597

मिनोती, नानबा -

http://www.misalpav.com/node/14863
या पानावर जागूचा 12/10/2010 - 13:06. चा प्रतिसाद बघ. Happy

जागू कुठे आहे? ती अजून माहिती देऊ शकेल कदाचित. Happy

राजगिरा/तांदुळजा/माठ असल्या कुठल्या तरी भाजीचे जून देठ बाजारात विकायला मिळतात ते म्हणजे ढेमसे

हे जुन देठ मुंबईच्या बाजारात गणपतीच्या आदल्या दिवशी पोत्यानी येतात. गेल्या वर्षी रु.१५ ला एक दांडी होती. दरवर्षी किंमत वाढतेय. आमच्या घरी तरी त्याला माठाची भाजीच म्हणतात. गणपतीच्या दिवशी मी एक स्पेशल भाजी करते त्यात ह्याचे देठ आणि कोवळी पाने वापरते. ह्या देठी, अळू, आंबाडे, मका कणसे आणि थोडे उकडलेले काळे वाटाणे वापरुन हिरव्या मसाल्यात ही भाजी अगदी मस्त होते.

आता मुळ ढेमसे - आज मुद्दाम ढेमसे विकत आणले आणि रात्री करणार आहे. चांगली झाली तर फोटो पोस्टते Happy

चीनुक्स यांनी जी लिंक दिलेय त्याप्रकारे कच्चे टोमाटो वाटतायत, दुसरा काही प्रकार डोंबिवलीत बघितल्यासारखा वाटत नाही.

Hi Chinooks !

I think this is somthing different, what is " Dhemshi" ? Do you have pic of it w/out any dish prepared of it please ? Please dont mind my question, I'm just too curious abt it.

Dhemshi, sounds qute !

thanks !

Dhemashyaachi evadhi interesting bhaji hou shakate? Happy karaayla pahije...

विदर्भात अशी भाजी नेहेमी होते.

याचा एक दुसरा प्रकारही होतो. तो विनाकटकटीचा... ढेमसं चिरून फार मोठ्या बिया काढून टाकाव्यात. आता याची भिजवलेल्या ह. डाळ घालून नेहेमीप्रमाणे भाजी करावी, अंगाबरोबर रस असावा. मस्त होते. Happy

काय नाव आहे ढेमशी :). मी आज पहिल्यांदीच ऐकल . भरली ढेमशी. अगदी पोटोबा भरल्याचा फिल येतो. मस्त पाकृ Happy

Pages