Submitted by विशाल कुलकर्णी on 14 April, 2011 - 07:56
माज आता मला टाळला पाहिजे
'मी'च माझ्यातुनी गाळला पाहिजे
हाय झाल्या किती गोड जखमा नव्या
घाव ओला जुना वाळला पाहिजे
यार माझी तुम्ही याद ठेवाल का?
आज गोतावळा पाळला पाहिजे...
जीवनाने जिवापाड सांभाळले
काळही तेवढा भाळला पाहिजे
वाक थोडा 'विशाला' जरासा अता
गर्व, मोठेपणा जाळला पाहिजे!
वृत्त : स्त्रग्विणी
लगावली : गालगागालगा गालगागालगा
विशाल...
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
चांगली गझल विशाल. भरती के
चांगली गझल विशाल. भरती के अलफाँज टाळायचं बघ.
जीवनाने जिवापाड सांभाळले
काळही तेवढा भाळला पाहिजे...हा शेर सुंदर झाला आहे.
मला अजुनही भरतीचे शब्द वेगळे
मला अजुनही भरतीचे शब्द वेगळे काढता येत नाहीयेत दादा. त्याचे काही निकष असतात का? आभार..
माज आता मला टाळला
माज आता मला टाळला पाहिजे
'मी'च माझ्यातुनी गाळला पाहिजे
भारी!
आशय मस्त आहे रे.
माज आता मला टाळला
माज आता मला टाळला पाहिजे
'मी'च माझ्यातुनी गाळला पाहिजे
हाय झाल्या किती गोड जखमा नव्या
घाव ओला जुना वाळला पाहिजे
जीवनाने जिवापाड सांभाळले
काळही तेवढा भाळला पाहिजे
या वरील तीनही शेरांत एकही शब्द विनाकारण घुसडला आहे असे जराही जाणवत नाही.पण,
यार माझी तुम्ही याद ठेवाल का?..........इथे ''यार'' नसता तरी शेराचा अर्थ तोच असता.
आज गोतावळा पाळला पाहिजे...
वाक थोडा 'विशाला' जरासा अता....''थोडा'' आणि ''जरासा''..एकच अर्थ्,म्हणजे एक शब्द भरतीचा आहे.
गर्व, मोठेपणा जाळला पाहिजे!.......,''गर्व'' जाळला पाहिजे हे ठीक आहे..कारण गर्व हा अवगुण आहे,पण ''मोठेपणा'' का? मोठे असणे हे तर चांगले आहे ना?..मोठेपणा म्हणून भरतीचा वाटला. असो...अर्थात हे सरावाने घटत जाईल..चिंता नको.
मतला आवडला! छान प्रयत्न
मतला आवडला!
छान प्रयत्न
जीवनाने जिवापाड
जीवनाने जिवापाड सांभाळले
काळही तेवढा भाळला पाहिजे >>> हा शेर छानच!!
भरती के अल्फाज़ बद्दल डॉकशी सहमत!! दुसर्या शेरात 'हाय' हा सुद्धा भरतीचाच आहे.
पुलेशु.
धन्यवाद कैलासदादा
धन्यवाद कैलासदादा
रामकुमारजी, कणखर, क्रांतिताई मनःपूर्वक आभार !!
छान
छान
जीवनाने जिवापाड
जीवनाने जिवापाड सांभाळले
काळही तेवढा भाळला पाहिजे >> हा सही आहे.
जीवनाने जिवापाड
जीवनाने जिवापाड सांभाळले
काळही तेवढा भाळला पाहिजे >>> मस्तच
बाकी डॉ. नी सांगितले आहेच...
जीवनाने जिवापाड
जीवनाने जिवापाड सांभाळले
काळही तेवढा भाळला पाहिजे...हा शेर katil झाला आहे.
zadun sagali gazal fadu zaliye re!!!
मिल्या, हबा मनःपूर्वक आभार !
मिल्या, हबा मनःपूर्वक आभार !