लग्न-घटीका

Submitted by वर्षा_म on 15 December, 2010 - 04:35

उल्हासजींच्या अनुमतीने Happy

http://www.maayboli.com/node/21903

===================================

लग्न लग्न ते काय असे हे, झाल्यावाचुन कळेच ना
म्हणती जैसे स्वर्ग कधीही, मेल्यावाचुन दिसेच ना

करुया आता लग्न म्हणूनी, मुलगी काही मिळत नसे
तिच्याच शोधात होतो आणिक, मलाच ती स्वप्नी दिसे

लग्न स्वप्न जागेपणी पडते, झोप उडवते, मना ग्रासते
लग्न -ध्यास अन लग्न -पूर्ति मग, आयुष्याचे ईप्सित होते

लग्न या विषयावरी, सल्ले नुसतेच एकायचे
जगाने कितीही समजावले, करुन असते पहायाचे

लग्न हे जणू उदीष्ट की, ज्यावर ना काही पर्याय
विघ्न विघ्न अन विघ्न आहेत, सुचवा मला काही उपाय

खळखळुन सोबत हसणारी, रागावुन मग रुसणारी
मुलगी मिळे ना एखादी, आनंदाने मला स्विकारनारी

काळी-नकटी जरी चुकुन हसली, अप्सरा ती मज वाटे
तिचाही मग नकार मिळता, तिळा तिळाने जीव तुटे

मीलन, संगत, अतूट नाते गुण लग्नाचे किति वर्णावे
स्वातंत्र्यातील सुख हे, पारतंत्राशिवाय कसे कळावे

गुलमोहर: 

वर्षा ....... मस्तच ..... आणि किती Prompt
Lol Lol Lol

हा झब्बू वर झब्बू .....

निनादती ते सनइ-चौघडॆ, भरली लग्नाची घटिका
त्या मूर्खाला नसते ठाउक, स्वातंत्र्याची भरली घटका

छान जमला

<<स्वातंत्र्यातील सुख हे, पारतंत्राशिवाय कसे कळावे<<
वर्षे ___/\___ धन्य! Lol उगाच लोक तुला 'विडंबन सम्राज्ञी' म्हणत नाहीत!