जरा हटके.....!!

Submitted by Kiran.. on 8 April, 2011 - 23:59

एकटं कधी राहू नये म्हणतात. आणि राहीलंच तर रिकामं राहू नये.. नाहीतर सैतानाचं थैमान चालू होतं. पण माझ्यासारखे लोक्स गर्दीतही एकटे असतात. समोर घडणा-या प्रसंगापासून एकदम अलिप्त राहून स्मरणरंजनात किंवा कल्पना विलासात मग्न होतात..

वेगात विचार करणं आणि त्या विचारात दंग राहणं हा वेळ चांगला घालवायचा चांगला मार्ग असला तरी आपल्या आजूबाजुंच्यांना त्याचा चांगलाच त्रास होतो. कित्येकदा काय विचार करत होतास या प्रश्नाला उत्तर देता येत नाही..

म्हणजे असे विचार जे सांगितले तर वेड्यात जमा करतील. इतरांपेक्षा / जगावेगळे असे विचार, कल्पना प्रत्येकवेळी काय सांगणार ? पण त्या कुठंतरी मांडताही आल्या पाहीजेत. असे बरेचसे लोस विचार असतील ना.. ते शेअर करूयात इथं

उदा. कधी कधी असं वाटतं आपण जन्मालाच आलो नसतो तर काय झालं असतं ? हे जग चालूच राहीलं असतं ना ? कि हे जग पण अस्तित्वात नसतं ? काय माहीत !! आपणच नसतो तर काय पडलीये ना आपल्याला ? म्हणजे कुणाला ? जो नाहीच त्याला काय पडणार ? आणि कशाची ?
खरंच कशाचंच अस्तित्व नाही असं असू शकतं का ? कि हे सगळं सापेक्ष ..

बास्स.... नाहीतर हे पोष्टायचंच राहून जाईल. मग तुम्ही तरी काय वाचणार आणि काय लिहीणार ना ? तर मग येऊ द्यात तुमचं मनोरंजन !!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय आवडला हा विचार!

कालच प्रकाशित केलेल्या http://www.maayboli.com/node/24929 गझलेचा मतला असाच आहे.

याइथे नसतोच मी तर काय असते याइथे
याइथे नसतोच मी तर काय नसते याइथे

==============================

'मी इथे नसतोच तर' म्हणजे नक्की काय हाच प्रश्न छळत आहे या लेखामुळेही!

धन्यवाद!

धन्यवाद बेफिकीर..

सकाळी पाहीला मी तो मतला आणि गझलही.. अर्थात हे विचात खूप वर्षांपासून मनात येतात आणि त्यात रमायला आवडतं. असाच छंद कुणाला असेल तर शेअर करावं एव्हढी माफक अपेक्षा !!

आपण जन्माला आलो नसतो तरीही हे जग तसच चालल असत.पण आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीना ,
जीवाना आपल्यामुळे मिळालेल सुख दु:ख मिळाल नसत हे खर.त्यामुळे त्यांच्या जीवनात जी जी परीवर्तन
घडली ती घडलीच नसती ,ती जगाच्या व्यवहारात सूक्ष्म ,भव्व्य ,सुधीर ,अधीर ,उल्लेखनीय ,अनुल्लेखाला पात्र अशा स्वरूपाची असू शकतात .मला वाटत आपल प्रत्येक कर्म तसच नैश्कर्म्य आपल आयुष्यमान
ठरवत असावेत .आपण किती जगणार हे जन्मताच ठरलेल आहे अस वाचल्याच आठवत .पण अस असेल
तर आपण पूर्ण कळसुत्री बाहुल्या होतो ,मग चालविता धनी तोची .अस कदाचीत नसेल .आपल्या भाव
भावना ,विचार ,क्रियाशक्ती याचा पण काही रोल असेल ,पण त्याचा पण स्वामी तोच असावा .शेवटी तोच
सर्वश्रेष्ठ हे अगदी खर .
आपल्याला काय पडलीय?-मला वाटत की मुळात आपल्याला काहीतरी पडलेली असते म्हणूनच आपण जन्माला येतो .प्रत्येक जीवाची जन्म घेण्याची आंतरीक तळमळ त्या त्या जीवाच्या जन्माला कारणीभूत असावी कदाचीत .जस की एखादा चोर आहे .तो मनात चोरी करण्याचा प्लान करत आहे व त्याच वेळी त्याचा जर मृत्यु झाला तर हा अतृप्त विचार त्याच्या जन्माला कारणीभूत होउ शकत असावा व चोरी करण्याच्या गुणानी युक्त जीव जन्मत असावा .मग त्या जीवाला त्याची अतृप्त इच्छा पुरविण्यासाठी जे जे काही गरजेच आहे ते ते कौशल्य,व या गुणानी युक्त घर ,परीस्थिती ,व्यक्ती ,जीव जन्माबरोबर मिळत असावेत .
जर त्याच्या पदरी काही पुण्य असेल तर तो मनुष्य म्हणून जन्मेल पण चोराच्या घरात जन्मेल .जर त्याने कधीच चोरी केली नसेल पण पर्रीस्थिती परीवश चोरीचा प्लान करत असेल तर त्याला परीस्थितीपरीवश चोरी कराव्या लागणार घर जन्म्ताच मिळत असेल .जर त्याची धारणा चोरी करण हेच योग्य अशी असेल तर त्याचा जन्म चोरी हा पिढ्यान्पिढ्या पेशा असलेल्या घरात होईल .जर त्याने या जन्मात अनेकाना सुपंथ दाखवला असेल तर त्याला सुपंथ दाखवणारे लोक या जन्मात भेटतील .
जर त्याच कर्म पुनः मनुष्य होण्याजोगा नसेल तर त्याला मांजरीचा जन्म मिळेल .जर त्याने कुणालाच कधीच कसलीच मदत केली नसेल तर ती मांजरी सुद्धा आयुष्यात हेल्पलेस असेल ,त्या व्यक्तीने खूप दान केल असेल तर तर ती मांजरी धनीक माणसांच्या घरी जन्मेल .जर सात्वीक,राजसी ,तामसी दान घडल असेल तर त्याप्रमाणे तिला सात्वीक ,राजसी ,तामसी श्रीमंताच घर जन्मताच मिळेल अस मला आपल उगाच वाटत .म्हणुनच चांगले विचार ,चांगले आदर्श,चांगल्या कल्पना,
चांगल कार्य याला जास्त महत्व आहे .
कशाचच आस्तित्व नाही -मला वाटत अस कधीच होत नसाव व झालच तर कल्पांतात होत अस कुठेतरी वाचल्याच आठवत .तरीपण पाच तत्व तर असतीलच .मग पुन्हा पुनर्निर्मितीची इच्छा कार्यान्वीत होत असावी .आस्तित्वहीन अवस्था योग्याना प्राप्त होत असावी .त्यांच पंचतत्वात कार्यशक्तीच्या स्वरुपात विलीनीकरण होत असाव ,म्हणजे कस शरीर नाही ,फक्त चैतन्यरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या ह्रुदयात राहून मार्गदर्शन करणारी ,चेतन अचेतन कार्यरत करणारी शक्ती .
चांगल्या सवयी,चांगल कार्य या जन्मात नव्हे तर देहांतानंतरसुद्धा शास्वत सूख देत असाव .

जन्म घेतलाच नाही यापेक्षा आपलं अस्तित्व , शारीरिक किंवा चैतन्यरूपी तर काय... असा विचार असावा कदाचित. अस्तित्व नसल्याने विचारही नसणार आणि मग हे चराचर, ही सृष्टी, हे विश्व यांचं अस्तित्व हा सापेक्ष भाग बनतो असं म्हणावंसं वाटतं.

मनात कधी कधी विचार येतात .........पन खरेच विचित्र असतात ..............ते व्यक्त करण्या साठी हा बाफ आहे का?????????

मनात कधी कधी विचार येतात .........पन खरेच विचित्र असतात ..............ते व्यक्त करण्या साठी हा बाफ आहे का?????????

हो त्यासाठीच तर आहे. आपल्या मनातील विचारांवर लिहूयात, दुस-यांचे वाचूयात... गप्पा मारूयात.

मला अस वाटत की जर सर्व जग हे गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार चालत आहे तर हे आकर्षण शिथील होउ नये म्हणून आपण काय करू शकतो ?जस की पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर कमी जास्त होउ
नये किंवा पृथ्वी सुर्याच्या कक्षेतून कधीच सुटू नये यासाठी आपण काय उपाय योजना करू शकतो ?
कदाचीत सूर्य उपासना व नित्य नैमितीक यज्ञ याच साठी तर करत नसावेत ?हल्ली तर ते कुणी फारस मानत ही नाही .माझ फक्त एस्.एस्.सी.पर्यंतच फिजिक्स या विषयाच ज्ञान असल्याने कदाचीत मला अस वाटत असाव.तुम्हाला काय वाटत ?

.......देव म्हणजे काय..? ते आधी पृथ्वी वर होते.......नंतर कुठे गेले..का...गेले......आपण त्यांना का नाही पाहु शकलो.....आणि अजुन ही का पाहु शकत नाही......मरण आल्या वर नेमके काय होते....??

या जगात जसे आपण कम्पुटर आणला तसाच देवा ने आपल्याला आणले असावे......त्याच्या कामा साठी ....कम्पुटरसाठी तर आपन त्याचे देवच आहोत आपनच त्याला निर्मान केले...आणी शेवटी तोच या जगा वर राज्य करणार आहे...आपल्याला हद्द पार करुन..सुरुवातीला सजिवाला सर्व गोष्टी साठी देव लागत होता......हळुहळु त्याने स्वतः वरचे नियंत्रण वाढवुन देव फक्त नाम मात्र ठेवला कालांतराने सजिव स्वतः सारखे अपत्य तयार करु लागला आपल्याला हद्द पार करुन.......बहुदा आपण सुध्दा देवाला हद्द पार केले आहे....तो लांब बसुन आपल्या वर नियंत्रण ठेवत आहे......आपण त्याला नाही पाहु शकत कारण त्यानेच आपणास निर्माण केले आहे......तोच करत आहे......त्याने प्रत्येकाला काही ना काही कारणासाठी बनवलेले आहे.....जसे आपन रोबोट निर्माण करतो तेच त्याने सुध्दा केले आहे...कोणी अभियंता कोनी आर्टिस्ट इत्यादी........

मरण आल्या वर शरीर बन्द पडते.....त्यानंतर काही नाही.......जसे एका ऱोबोट ला आपण बंद करतो.......त्याला बंद झाल्या वर काय वाटते.....?? काही ही नाही......शांत झोपल्या सारखे..........

एके दिवशी रोबोट सुध्दा आपल्याला हद्दपार करेल.........आणि मनुष्याला देव मानु लागेल.....आणि त्याच्या दंतकथा इतर र्रोबोट ना सांगु लागेल........त्यांच्या साठी पहिले, दुसरे, तिसरे, चौथे महायुध्द हे रामायन , महाभारत सारखे असेल.............

.......