अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण

Submitted by अभय आर्वीकर on 7 April, 2011 - 09:47

अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या "भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला" पाठींबा दर्शविण्यासाठी आणि "जनलोकपाल विधेयकाच्या" सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले आहे. त्यापुढील आंदोलनाची दिशा एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच जाहिर केली जाईल.

-----------------------------------------------------------
दि. ९ एप्रिल २०११

केंद्र शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे अण्णा आज दि. ९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपोषण सोडणार हे माहित असूनही बापूकुटीसमोर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मग उपोषण सत्याग्रहाचे रूपांतर "विजयी मेळाव्यात" झाले आणि यापुढेही अण्णांच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्याचा संकल्प करण्यात आला.

"भ्रष्टाचार चले जाव" चे नारे देवून दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Sewagram Anna2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गंगाधर पंत

येगळी चूल का मांडलिसा ? या कि जरा चावडीवं .. तुमच्या आंदोलनाला बी आमी पाठिंबा देऊ कि !!

येगळी चूल का मांडलिसा ?

वेगळ्या बाफच्या अनुषंगाने म्हणता काय?
जेव्हा वाचनाला फार कमी वेळ उपलब्ध असतो तेव्हा कुठे काय चाललेय, याची काहीही माहितीच नसते.
तसे असेल तर कृपया लिंक द्यावी. Happy

केंद्र शासनाने मागण्या मान्य केल्यामुळे अण्णा आज दि. ९ एप्रिलला सकाळी १० वाजता उपोषण सोडणार हे माहित असूनही बापूकुटीसमोर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मग उपोषण सत्याग्रहाचे रूपांतर "विजयी मेळाव्यात" झाले आणि यापुढेही अण्णांच्या आंदोलनाला सक्रिय पाठींबा देण्याचा संकल्प करण्यात आला.

"भ्रष्टाचार चले जाव" चे नारे देवून दुपारी १.०० वाजता कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

अण्णागिरी करुन चांगले काम केलेत... गंगाधरजी तुमचे आणि तुमच्या समवेत सामिल झालेल्या सर्वांचेच अभिनंदन.

केंद्राने मागण्या मान्य केल्या म्हणले विजय मिळाला असे होत नाही. सतत जागरुक रहावे असे वाटते. अण्णांच्याच शब्दात हि केवळ सुरवात आहे, अजुन बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. एक अण्णा दिल्ली हलवतील, पण प्रत्येक गावात, जिल्यात एक अण्णा हवेत एव्हढी प्रचंड भ्रष्टाचारांच्या कामाची व्याप्ती आहे.

मुटेजी,
अण्णांच्या या आंदोलनाला देशातल्या सर्व घटकातुन उठाव/पाठींबा मिळाला पाहिजे
तुमच्या योगदानाबद्दल अभिनंदन !
Happy