ऑरिगाता- कागदी फुले-ज्वेलरी बॉक्स आणि फोटो फ्रेम.

Submitted by प्रज्ञा९ on 29 March, 2011 - 11:51

IMG_4619.JPGमी सध्या ऑरिगाता ही जपानी कला शिकतेय. ऑरिगाता हे ओरिगामी पेक्षा पूर्ण वेगळं आहे!

यात क्रेप पेपर्स चुण्या करून धुवून, ३-४ तास वाळवून, फेविकॉलने चिकटवतात. असे चिकटवल्यावर कागदाची जाडी आणि पर्यायाने स्ट्रेंथ वाढते. मग या कागदाची फुलं, पानं कापून त्या कापलेल्या आकारांना पीळ द्यायचा आणि २४ तास ती तशीच ठेवायची. दुसर्‍या दिवशी सगळे पीळ सोडवून थोडा आकार द्यायचा आणि मग फुलं, पानं वगैरे चिकटवायची.

मी ही सगळी प्रक्रिया खूपच थोडक्यात सांगितली आहे. या प्रकारच्या फुलांनी मी एक ज्वेलरी बॉक्स सजवला, त्याचं हे प्रचि.

प्रक्रिया करताना फोटो नाही काढले, पण पुढच्या वेळी नवीन काही सजावट करेन तेव्हा टाकेन इथे फोटो. Happy

ही फ्रेम. Happy कालच केली. आधीच सगळं मटेरिअल तयार होतं, आता नवीन कागद आणले की स्टेप बाय स्टेप देइन. यात लावायला माझ्याकडे फोटो त्याच मापात नाहिये Sad
सगळे ४*६ आहेत.

गुलमोहर: 

आता त्या जुलरी बॉक्सपेक्षाही फ्रेम जास्त मनमोहक दिसतेय.

>>> फ्रेम आहेच खूप जास्त छान! बॉक्स जरा लहान आहे आकाराने, त्यामुळे एक मोठं फूल त्यावर लावल्यावर बाकी काही करायला स्कोप नाही राहिला. आता नेक्ष्ट बॉक्सात जरा लहान फुले लावीन म्हणते!

भारतातले क्रेप पेपर्स पाण्यात भिजवून चालतील का त्याची शंका वाटतेय. त्यांचा रंग पण पटकन जातो. कुणी करुन बघितले, तर लिहाल का इथे प्लीज.

दिनेशदा,
पाण्याखाली धरली की इथेपण रंग जातोच थोडासा. तो रंग ग्लास मधे काढून ठेवायचा. मुख्य फूल कोणत्या रंगाचं हवंय ते आधीच ठरवून, तो कागद ओला करून त्या कागदाच्या दोन्ही बाजू किंवा एक बाजू काढून ठेवलेल्या रंगातल्या आपल्याला आवडेल त्या रंगाने शेडिन्ग करून घ्यायची. पानंही शेडिंग करून घेऊ शकतो. कागद नुसताच ओला करून घेतला की अगदी ५-६ थेंब रंग जातो जो आपण छोट्या ग्लास मधे घेऊन ठेवू. तेवढा रंग शेडिंगला पुरतो.

मी २-ply क्रेप पेपर वापरलाय. भारतातही मिळतो बहुतेक. साधारण वीतभर रुंदी आणि ३-४ फूट लांबी असते. आणि त्याच्या दोन्ही बाजूना एकाच रंगाच्या २ शेड्स असतात. (फिरत्या रंगाचा कपडा असतो तसं साधारण.) Happy

अप्रतिम आहे ही कला. मस्तच झालीयेत गं फुलं !!
फ्रेम तर अगदी खासच !!
बरीच मेहेनत दिसतेय. अजून काही केलंस तर फोटो चढव नक्की Happy

Pages