चटपटीत भेळ

Submitted by मुरारी on 29 March, 2011 - 03:03

थोडक्या कष्टात दाबून काही खायचं असेल तर भेळेला पर्याय नाही
चटपटीत भेळ (४ माणसांसाठी)

साहित्य :

कुरमुरे - ८ वाट्या
फरसाण - २ वाट्या
बारीक शेव - १ वाटी
कोथिंबीर , पुदिना - २ वाट्या
लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या - ५,६
टोमाटो, उकडवलेले बटाटे, २ कांदे (बारीक चिरलेले)
खजूर - १ वाटी
चिंचेचा कोळ - अर्धी वाटी
गुळ - १ चमचा
जिरं, मीठ , चाट मसाला चवीपुरता
100B0790.jpg

कृती :-

गोड चटणी :- सर्वप्रथम खजूर, गुळ, चिंच पाण्यात ५-६ मिनिटे उकळवून घ्यावी
मग त्यात जिरं, मीठ घालून , घोटून गाळण्याने गाळून घेतली , कि झाली गोड चटणी तयार

तिखट चटणी :- हिरव्या मिरच्या,कोथिंबीर, पुदिना, लसूण, मीठ झकास मिक्सर मधून वाटून घावे , तिखट चटणीही झाली तयार .

आता वाट कसली बघताय, करा सर्व एकत्र, वरतून चाट मसाला भुरभुरवा , आणि शेव आणि कोथिंबीर टाकून पेश करा
100_0880.jpg100B0830.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप खूप सुरेख असे प्रकार भरपूर जण असलो का करायला मजा येते खूप मस्त कमी वेळात खूप मस्त पोट भरून निघत आणि हे खावून झाल्यावर लगेच पाणी पुरी पण हवी आता त्याची कृती दाखवा..

छान फोटो.

व्ही टी ला विठ्ठल कडे, एक कोरडी चटणी मिळते (चण्याची) ती पण आवश्यक वाटते मला.

(का कुणास ठाऊक, माझे आणि भेळेचे कधी जूळलेच नाही. कच्चा कांदा मला अजिबात आवडत नाही.
बाकी प्रकार म्हणजे पाणीपुरी, दहीपुरी, दही बटाटा पुरी, शेव पुरी, रगडा पॅटीस, दही भल्ले, दिली चाट, पापडी चाट, बास्केट चाट सगळे आवडतात.)

प्रसन्न, मी तेच म्हटलं अजून भेळ रेसिपी कशी नाही? हा लहान थोरांपासून सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय! धन्स!
आंबट कैरी बारिक चिरुन>> शुभांगी अगदी अगदी... आताच मिटक्या मारतेय.. मला तर थेट कुडाळवरून कैरी आलेय पार्सल साबांकडून.. Wink
विचारच करत होते, तिचं काय करावं बरं... Happy "युरेका!" झालंय आता.. धन्स शुभांगी आणि प्रसन्न!

प्रसन्न, वरची प्रचितली भेळ सुकी दिसतेय... खजूर चटणी, हिरवी चटणी नाही टाकलीय काय??

दिनेशदा, एक कोरडी चटणी मिळते (चण्याची)>> अशी चटणी नाही ट्राय केलेय कधी... काय काय असतं त्यात? अम्म चवीत काही फरक पडतो का? चिवड्यात टाकायची डाळ आणून घरी मिक्सरला लावून वापरली तर चालते का?

भेळ हा माझ्यासाठी ऑल टाईम फेव चटकदार पदार्थ आहे... आजारपणाने तोंडाची चव गेली वाटली की औषधांच्या गोळ्या रिचवत मस्त एक प्लेट चटकदार भेळीने तोंडाची चव परत आणायची...

१ दिवस तर पोहे, उपमा, डोसे, घावण सगळे नाष्टा प्रकार करून कंटाळल्यावर सकाळी सकाळी मस्त ओली भेळ केली... नवर्‍याने आधी नाक मुरडलं सकाळी भेळ काय??? पण नंतर दोन प्लेट खरंच दाबून भेळ खाल्ली.. काही नाही जमलं तर भेळीची गाडी टाकू शकतो अशा कॉम्प्लीमेंटसह!!! आहा धन्य झाले मी... Blush

.

फ्ग

चणे शेंगदाण्यापैकी जे चणे असतात. ते सोलून (काळे मोठे चणे घेतले तर सोलायला सोपे जातात )
बारिक पूड करायची. त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, हिंग आणि जिरेपुड घालायची. झाली चटणी तयार.

अशीच फुटाण्याची पण करतात. त्यात हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, चिंच वगैरे वाटून टाकतात. अर्थात हि चटणी ओलसर होते. पण ती उसाच्या रसाबरोबर मस्त लागते.

प्रसन्न, वरची प्रचितली भेळ सुकी दिसतेय... खजूर चटणी, हिरवी चटणी नाही टाकलीय काय??

@ ड्रीम गर्ल

हो अगं, फोटो काढायचे होते, म्हणून जरा तिला सजवली होती...

फोटो काढून झाल्यावर उरलेला संयम संपला ,आणि हाताला लागेल ते सामान त्या पातेल्यात घालून, मिटक्या मारीत भेळेचा फडशा पडला गेल्या

मस्त.

माझाकडे fried noodels आहेत,पण माहित नाही कसे करायच ते भेळ कोणी सांगेल का त्यासाठी कोणत्या वस्तू लागतात त्या, मी करीन म्हणते..