आदित्यचे मिष्टान्नशास्त्रातले प्रयोग

Submitted by स्वाती_आंबोळे on 28 March, 2011 - 12:09

प्रयोग पहिला : दह्याचे ... गुल्ले!

mol_gatr.JPGप्रयोग दुसरा : रोज सीरप पर्ल्स

rose_cav1_0.JPGप्रयोग तिसरा : टोमॅटो सूपचे नूडल्स

soup_ndls2.JPGsoup_ndls3.JPG

प्रयोग त्याने बर्‍यापैकी स्वतंत्रपणे केले आहेत. म्हणजे काही तापवायचं वगैरे असेल तेवढी माझी देखरेख होती. (आणि अर्थातच आवराआवरी!)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Aditya,

Special invitation to you for next GTG in NC. We will have Molecular Gastronomy as a theme. I will keep everything ready including couple of assistants Happy

सही! एकदम कल्पक आणि सुंदर दिसतायत पदार्थ! आदित्य, खरंच छान केलेस!
सायोसारखीच पानाच्या फोटोबद्दल मलाही उत्सुकता आहे.

अभिनंदन, मिष्टान्न शास्त्र नाव खूप आवडले. पर्ल्स व नूडल्स खूप क्यूट. नूडल्स जराशी जास्त ऑरेंज जिलेबी पण वाटते आहे. चिंगुली मिंगुली प्लेट Happy

सही!! रोझ सिरप पर्ल्स आणि नूडल्स सूप बेष्टे Happy

दह्याचे गुल्ले म्हणजे नक्की काय केलं होतं स्वाती? आणि सुपाच्या नूडल्स तोंडात घातल्यावर विरघळतात का?

Seems really delicious and mouth watering!!! sweets !! my weakest point!!!!

All dishes are so yummy!! Good job Aditya and waiting for some new colorful mouth watering recipes as well. If possible, could you post the step by step recipe for each dish?? Dying to try those....

Thanks and Regards,
Swati and Aditya

सायो, पांढरी बॅकग्राउंड आहे, त्यामुळे तसं दिसतंय.

मंजूडी, दह्याचे गुल्ले म्हटलं ते दिसायला रसगुल्ल्यांच्या जवळपासचं दिसतंय म्हणून. या प्रयोगांमधे खाण्यालायक रसायने (एडिबल केमिकल्स) वापरून नेहमीच्या पदार्थांना हे निराळे आकार दिले जातात.
सूपचे नूडल्स चक्क जिलेटिन घालून केले आहेत - आपण फळांची वगैरे जेली करतो, साधारण त्याच प्रकारे. जिलेटिन घातलेले मिश्रण रबरी नळ्यांमधे भरून थोडा वेळ त्या नळ्या बर्फाळ गार पाण्यात ठेवल्या, आणि 'जेली' सेमीसॉफ्ट असतांनाच नळ्यांतून बाहेर काढली.

दह्याचे गोळे करतांना त्यात कॅल्शियम लॅक्टेटची पावडर मिसळली होती आणि मग त्या मिश्रणाच्या 'बुंद्या' सोडियम अल्गिनेटच्या द्रावणात हलकेच सोडल्या. यामुळे त्या 'बुंद्यां'वर एक प्रकारचे पातळ सेमीसॉलिड आवरण तयार झाले. (आत दही नेहमीच्याच कन्सिस्टन्सीचे राहिले.) त्यामुळे हा एक गोळा तोंडात टाकला की ते आवरण फुटून दही खाल्ले जाते. रोज सीरपचे पर्ल्स याच पद्धतीने केले.

आदित्यने केलेल्या दहीगुल्ल्यांच्या जवळ जाणारे फोटो मला इथे सापडले.

आता पुढचा प्रयोग करतांना स्टेप बाय स्टेप फोटो काढेन. Happy

वा........ सही !! इतक्या हौसेने लेक करतोय म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे हो स्वातीताई Happy

सायो, पांढरी बॅकग्राउंड आहे, त्यामुळे तसं दिसतंय.

>> बघ सायो, मी म्हंटलं नव्हतं ..

स्वाती, आदित्य ला गॅस्ट्रॉनॉमी बद्दल उत्सुकता/आवड कशामुळे निर्माण झाली? अजय चा बीबी/लेख वाचून की आधीपासूनच cooking + science behind cooking अशी आवड होती?

त्याला कुकिंग, फूड डेकोरेटिंग इ.ची आवड उपजतच आहे. (मुख्य म्हणजे फूड कन्झ्यूमिंगची आवड आहे. Happy )
किचनमधे कायम लुडबूड असते. वीकेन्डला एखादी पोळी स्वतः करण्यापासून नैमित्तिक मोदक वगैरेंमधे त्याचा सक्रीय सहभाग असतोच. साधा चिवडा बोलमधे काढून घेतांनाही काहीतरी काजू उचलून मध्यभागी ठेवणे वगैरे 'डेकोरेशन' असतंच! Proud

त्याने मॉ.गॅ.बद्दल आधीही फूड नेटवर्कवर काहीतरी कार्यक्रम पाहिला होता असं मला नंतर कळलं. पण अजयचा लेख/फोटो, विशेषतः त्यांनी स्वत: केलेलं हनी काव्हिआर बघून त्याला 'हे आपल्या आवाक्यातलं आहे' याचा शोध लागला. Happy ते किट वगैरे त्याचं त्यानेच शोधलं इन्टरनेटवरून.

सर्व मावश्या आणि मामांचे खूप खूप आभार. त्याला अगदी स्पेशल वाटलं सगळे अभिप्राय बघून. Happy

या प्रयोगांमधे खाण्यालायक रसायने (एडिबल केमिकल्स) वापरून नेहमीच्या पदार्थांना हे निराळे आकार दिले जातात.
>>> ओह ओके. लालूच्या रेसिपीवर हेच विचारून आले. अतिशय इन्टरेस्टिंग! रोज सिरप पर्ल्स काय मस्त दिसतायेत!

Pages