मासे २३ - चिंबोरे (खेकडे)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2011 - 08:08
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

४-५ खेकडे
आल लसुण पेस्ट १ चमचा
मिरची, कोथिंबीर पेस्ट १ चमचा
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
एक मोठा कांदा
२ चमचे मसाला
हिंग, हळद
चविपुरते मिठ
थोडा चिंचेचा कोळ
वाटण : १ कांदा व पाव वाटी सुके खोबरे किसुन भाजुन वाटावे
१ चमचा गरम मसाला.
थोडी कोथिंबिर
तेल

क्रमवार पाककृती: 

चिंबोरे साफ करुन घ्यावे. साफ करुन म्हणजे चिंबोरीचे दोन मोठे नांगे काढुन घ्यायचे, बाकीच्या नांग्यांचे वाटुन गाललेले पाणि घ्यायचे त्यामुळे रश्शाला दाटपणा येतो पण हे ऑप्शनल आहे. नंतर चिंबोरे मधुन कापुन त्यातील काळी पिशवी काढून टाकायची. जर चिंबोरे छोटे असतील तर आख्खे टाकले तरी चालतील.

भांड्यात तेल टाकुन लसणाची फोडणी द्यायची. मग त्यावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तळावा. आता त्यात आल, लसुण पेस्ट टाकुन हिंग हळद, मसाला, चिंबोरे, मोठे नांगे टाकुन चिंबोरे बुडतील एवढ पाणी टाकायच. आता १० मिनीटे उकळू द्याव मग त्यात गरम मसाला, चिंचेचा कोळ, मिठ, कोथिंबीर टाकुन थोडा वेळ उकळवुन गॅस बंद करावा. चिंबोरे शिजण्यास थोडा वेळ लागतो म्हणुन मिडीयम गॅसवर १५ मिनीटेतरी शिजु द्यावे.

वाढणी/प्रमाण: 
लहान
अधिक टिपा: 

चिंबोर्‍यां मध्ये बरेच प्रकार आहेत. समुद्रातील चिंबोरे, शेतातील चिंबोरे, खाडितील खेकडे, डोंगरातील मुठे हे काळे कुळकुळीत असतात. समुद्रात तर बरेच प्रकारचे चिंबोरे मिळतात अगदी रंगित सुद्धा. ह्या चिंबोर्‍यांमध्ये कॅल्शियम भरपुर असत. हे गरमही असतात. काही जणांना अ‍ॅलर्जीहई असते चिंबोर्‍यांची. पण लहान मुलांना जेवणात चिंबोरे म्हणजे मेजवानीच. जर जेवणात चिंबोरा असेल तर १ तास तरी जेवणाला लागतोच. शिवाय ताटात हा पसारा होउन दोन हात खाण्यासाठी वापरावे लागतातच.

चिंबोर्‍यांचे अजुन सुप, सुके करता येते. तसेच पिठ भरुन कालवणही करतात.

चिंबोर्‍या घेताना कडक बघुन घ्यायच्या. जर चिंबोरे दाबल्यावर आत जात असतील तर ते पोकळ असतात. भरलेल्या चिंबोर्‍यांमध्ये लाख (गाबोळी मिळते) ती मिळाली म्हणजे पर्वणीच.

दिवाळीच्या आसपास खाडीत तसेच खाडीलगतच्या शेतात छोटी छोटी चिंबोरी मिळतात त्यांना पेंदुरल्या म्हणतात. ह्या पेंदुरल्या आतमध्ये पुर्ण लाखेने भरलेल्या असतात. लाख म्हणजे ह्यांची गाबोळी.

माहितीचा स्रोत: 
आई व सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भ्रमरा दुसर्‍या किबोर्डला आता प्लास्टिक कोटि.न्ग करुन घे कारण ह्या खेकड्याचा अजुन काही पाकक्रूती |टाकायच्या आहेत.
चातक :स्मितः

जागू.. कहर.. कहर माजवलाय नुसता... काय त्या रेसीप्या आणि काय ते फोटू... जीव गेलाय...
मला तर मटणपेक्षा चिकन.. चिकनपेक्षा मासे आणि माश्यांपेक्षा पण खेकडे... लय लय आवडतात..

खेकडा सूप आणि खेकडा तंदूरच्या रेसिप्या टाक ना.. Lol
तू तुझ्या घरी एक चिंबोरी गटग ठेवतेस का? मज्जाच येईल... Happy

मित्रांनो जिवंत चिंबोर्या कधीही उकळत्या तेलात टाकू नका ,त्याऐवजी त्यांना दोनचार तास आधी फ्रिजरच्या आईस कंपार्टमेँटमधे ठेवल्यास ते सुप्तावस्थेत जाऊन मरतात, मग ते तुम्ही वापरा ,जरा माणसात येऊन स्वयंपाक करा तिथे खेकडावृत्ती दाखवु नका.

अँटीमॅटर
कुर्ल्या (चिंबोरी) बनवणे फार क्लेशदायी असते.त्यांचे डेंगे (मोठे हात/पाय) कोळणीकडून तोडून आणलेले
असतात.घरी उरलेले ८ पाय तोडायचे.डोक्यावर बत्ता मारुन कवच दूर केल्यानंतर कुर्ल्या शिजायला पडतात.
तोपर्यंत त्यांचा जीव गेलेला असतो.भीषण बाब आहे ती पाय तोडायची.माझा हात फ्रॅक्चर झाल्यावर ती गोष्ट
फारच जाणवली................पण खायला अप्रतिम!
शेवटी जीवो जीवस्य जीवनम! असे म्हणून टाकायचे!

ब्वॉर

Chimborysnche paay kadhayacha sagalyat sopa upay mhanje tya pishvit bandhun fridger msdhye ardha tas thevayachya mag tya melyavar sahaj paay kadhata yetat.

<< आधिचा ला़ळ गळुन निकामी झाला. >> मला कळतंय , हा विनोद नाही. कारण जागूजींच्या रेसिपीज मीं पण आधाशीपणे वाचतों.

सुनिता काही दिवसांत देतेच.

निलेश, भाऊ धन्यवाद.

गोष्टीगावाचे- तुम्ही म्हणताय मसाला भरलेल्या त्या भरुन केलेल्या असतातच. दक्षिणाला (अविगा म्हणतेय त्या) वेगळेच म्हणायचे आहे.

दक्षे भरलेल्या चिंबोर्‍या म्हणजे चिंबोर्‍यांची लाख म्हणजे जशी माशांमध्ये गाभोळी सापडते तशी ऑरेंज, य्ल्लो कलरमध्ये चिंबोर्‍यांची लाख सापडते. ही टेस्टी असतेच शिवाय अश्या चिंबोर्‍यांना मांसही भरपूर असते.

ही बघ लाख

ही लाखेने भरलेली चिंबोरी.

डावीकडचा नर आणि उजवीकडची मादी.

हा तयार रस्श्याचा घ्या. Happy

जागू.. भारी फोटोज ! चिंबोर्‍या खाण्यास कधी आमंत्रण मिळतेय याची वाट बघतोय..

Pages