पक्षाने कापलेले अंतर

Submitted by टवणे सर on 25 June, 2008 - 05:14

असे समजा की सिकंदराबाद स्टेशन ते सी.एस.टी हे अंतर १००० किमी आहे आणि रेल्वेचे रूळ अगदी सरळ रेषेत आहेत.
सकाळी ९ वाजता एक आगगाडी सीएसटी पासुन सिकंदराबादला जायला निघते. वेग १०० किमी प्रति तास (युनिफॉर्म वेग). दुसरी आगगाडी सिकंदराबाद पासुन सीएसटी कडे जायला निघते त्याच दिवशी सकाळी १० वाजता. वेग ८० किमी प्रति तास (युनिफॉर्म वेग). दोन्ही गाड्या एकाच रुळांवर (ट्रॅकवर) धावत आहेत.

एक पक्षी सीएसटीहुन सुटलेल्या गाडीच्या इंजीनावर बसला आहे. तो ज्या क्षणी गाडी सुरु होते त्या क्षणी सिकंदराबादकडे उडायला सुरुवात करतो. पक्ष्याचा वेग १२० किमी प्रति तास. ज्या क्षणाला तो पक्षी सिकंदराबादकडुन येणार्‍या गाडीपाशी पोचतो त्या क्षणी उलटा वळुन परत त्याच वेगाने मुंबईकडुन येणार्‍या गाडीकडे उडायला सुरुवात करतो.

ह्या दोनही आगगाड्या एकमेकांना धडकेपर्यंत तो पक्षी असा पुढे मागे उडत राहतो. तर, ज्यावेळी ह्या दोन्ही गाड्या एकमेकांवर आदळतील त्या क्षणापर्यंत त्या पक्षाने किती अंतर कापले असेल?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

----------------ऊत्तर -----
***
***
***
****
*******

गाड्या धडकतील ती जागा ६०० किमी , ६ तास CST पासून.
म्हणून पक्षी जाइल ६ * १२० = ७२० किमी.

उत्तर चुकीचे वाटते आहे...
==================
फुकट ते पौष्टीक

पुणेकर चे उत्तर बरोबर आहे असे वाटते
CST वाली गाडी १० वाजता १०० कि. मी. अंतर धावली असेल. म्हणजे १० वाजता दोन्ही गाड्यातले अंतर ९०० कि. मी.
दोन्ही गाड्यांचा एकूण वेग १०० + ८० = १८० कि. मी. /तास
म्हणजे १० वाजल्यानंतर ५ तासात त्या गाड्या एकमेकाला धडकतील. CST पासून पक्ष्याने उडायला सुरुवात केल्यानंतर ६ तासात. म्हणजे पक्षी ६ X १२० = ७२० कि. मी. अंतर कापेल. (दोन्ही गाड्यांची गाडीची लांबी ० कि. मी. आहे असे गृहित धरून)

पुणेकरचे, येकखु चे उत्तर बरोबर.. तसे सोपे कोडे आहे हे.. पण बरेच जण सिरिज मांडायला लागतात हे सोडविण्यासाठी..

माझी नेहमीची चूक.. वाचले नाही नीट.. पुणेकरचे आणि येकीखुचे उत्तर एकदम बरोबर आहे.
==================
फुकट ते पौष्टीक

या कोड्याचा एक आणखी भाग आहे... प्रश्न असा की पक्ष्याच्या फेर्‍या किती झाल्या ?

    ***
    Three Laws of Thermodynamics, 'God and you play dice' style : (1)You can't win. (2)You can't break even. (3)You can't even get out of the game.

    एक पूर्ण फेरी सिकंदराबादच्या गाडीपर्यत (६६० कि.मी.) आणि तिथून मागे फिरल्यावर ६० कि.मी. उलट दिशेत. Happy

    जर दोन्ही गाड्यांचा वेग समान असेल आणि समजा पक्षाचा वेग त्याच्या दुप्पट असेल आणि दोन्ही गाड्या एकाच वेळी सुटत असतील, तर गणिती सूत्र कसे मांडता येईल? म्हणजे सिरीज कशी होइल?

    पक्षाच्या शून्य फेर्‍या होतील. कारण पक्षी ताशी १२० च्या वेगाने उडायचा प्रयत्न करू लागला तर पाच मिनिटात अतिश्रमाने तो झीट येऊन पडेल किंवा वातावरणाशी घर्षण होऊन त्याचे पंख जळतील आणि तो खाली पडेल Happy

    पक्षाच्या शून्य फेर्‍या होतील. कारण पक्षी ताशी १२० च्या वेगाने उडायचा प्रयत्न करू लागला तर पाच मिनिटात अतिश्रमाने तो झीट येऊन पडेल किंवा वातावरणाशी घर्षण होऊन त्याचे पंख जळतील आणि तो खाली पडेल>>>>>>>>>>>
    Rofl
    सगळ्यात जास्त लॉजिकल उत्तर
    टन्या, बाबारे अशी गणित घालुन का भिती घालतो आहेस.
    मेंदुला मस्तपैकी गंज चढलाय. गणित बघुन भिती वाटली रे. Happy

    .............................................................

    खुल्यानो रेल्वे एकाच रुलावरुन का धावतिल....... गाड॑ काय झोपलाय काय ?

    माल गाङी का प्यासेन्जर ते पण म्हाइत पायजेल की?

    Total speed of approach = 180
    Total distance covered = 1000
    Time passed before trains meet = 1000/180
    speed of bird = 120
    Distance covered in 1000/180 hours = 120 * (1000/180) = (2/3) * 1000 = 666.67 Km
    No series needed.

    sorry one train is one hour late hence istance is 900

    Total speed of approach = 100 + 80
    Total distance covered = 900
    Time passed before trains meet = 900/180 = 5
    speed of bird = 120
    Distance covered in 5 hours = 120 * (5 + 1) = 720 Km
    येडाकाखुळा and punekar are right