आनंदाची वाट
भाग ३
भाग १ http://www.maayboli.com/node/24514#new
भाग २ http://www.maayboli.com/node/24533
आम्ही सप्टेंबर मध्ये नाशिकला आलो.आल्याबरोबर पहिल्या प्रथम नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाईंडशी संपर्क साधला.त्या शाळेत गेलो.त्यांना वरचेवर भेट दिली व परिचय वाढवला .त्यांना मराठी पुस्तके हवी होती. हिची मातृभाषा कानडी -त्यामुळे शुध्द्लेखनाचा व व्याकरणाचा मोठा प्रश्न होता.मराठीचा अभ्यास करून व गरज पडेल तिथे माझी मदत घेऊन तो अडसरही दूर केला.इथेही पुस्तके देण्यास सुरुवात झाली.फरिदाबाद चालूच होते/आहे.त्या मुलांबद्दलची आस्था एक आकांत,पॅशन झाली होती.
एके दिवशी सायंकाळी अचानक फोन वाजला.आवाजावरून व उच्चारा वरून वयस्क वाटणारे एक दक्षिण भारतिय सद्गृहस्थ हिला भेटू इच्छित होते.प्रत्यक्ष भेटीतच हेतू सविस्तरपणे सांगणार होते.
ठरल्या वेळेस रात्री ८ वा मध्यमवयीन पण अकाली वार्धक्य आलेले ते गृहस्थ घरी आले.वार्धक्या कडे झुकलेले दिसत असूनही त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रसन्नता अन दुर्दम्य सकारात्मकता अन आशा वाद जाणवत होता.ते नाशिकच्या एका खूप मोठ्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट होते,आय आय टी मधून एम टेक झाले होते,त्याना दोन अपत्ये.एक मुलगा व एक मुलगी,२० व २२ वर्षांची. वयाच्या दहाव्या वर्षी एका पाठोपाठ "ट्युब व्हिजन" नावाच्या एका दुर्धर व्याधीने या मुलाना अंधत्व आले होते.या मुलांना स्वावलंबी करण्यास शिक्षण हा एकच पर्याय आहे याची त्यांची खात्री पटली होती-नव्हे निग्रह होता.त्यांच्या डोळ्यासमोर हेलन कीलर्,मोझर्ट्,मिल्टन अन वेद मेह्ता यांच्या सारख्या दि:गजांचे आदर्श होते अन या लोकांचा आदर्श ठेवून त्यांना आपल्या मुलाना ज्ञानदानातून दृष्टीदान करायचे होते,
त्यांच्या या ध्येयवादास साथ देणारी,तेवढीच अट्टाहासी,ताकदीची,निग्रही,ब्रेल जाणणारी व त्या मुलांच्या व्यथा जाणणारी शिक्षिका त्यांना हवी होती.त्याना मदतीचा नेतृत्वाचा हात हवा होता.
त्यांची मुले मॅट्रिक झाली होती अन आता बी ए ला प्रवेश घेऊ इच्छित होती करेस्पाँडन्स कोर्स द्वारा.
त्यांच्या घरचे वातावरण देव देव करीत "तोच तारणारा,त्याच्याच मनात हे होते तर आपण काय करणार्"असे अन्ध विश्वासाने अन हताशेने भरले अन भारलेले होते.ताईत्,गंडे,अन प्राक्तन यांचे वर्चस्व मानणारे घरातील बाकीचे होते.
याच्या विपरित शिक्षण हा एकमेव उपाय्,आत्मविश्वास अन स्वावलंबन ही एकच या मुलांचे उर्वरीत जीवन संपन्न करण्याची गुरुकिल्ली आहे असा संकल्प सोडणारे वडील होते.
या सर्व प्रस्तावाचा अर्थ अन परिणाम काय ,आपणही फक्त बी ए च आहोत्,तेही १९७६ सालच्या -याचा यत्किंचित विचार न करता,हा एक इश्वरी संकेत अन आपल्या ध्येयास नवीन दिशा देण्याची संधी आहे एवढाच विश्वास ठेवून हीने हो म्हटले.अंतर्मनाच्या एका सकारात्मक सादेस तिने तितकाच प्रामाणिक प्रतिसाद दिला होता.
एका कठिण अन तितक्याच संपन्न प्रवासाची सुरुवात इथून झाली. आता आयुष्य एक नवे वळण घेत होते.
सर्व पुस्तके घरी आणली.इंग्रजी,इतिहास्,राजकीय विज्ञान यांचा २५ वर्षापूर्वीचा अभ्यासक्रम्,शिकविण्याची पध्दत यात जमीन आसमानाचा फरक होता.त्यात हे सर्व त्या अंध मुलाना शिकवायचे होते श्राव्य माध्यमातून्.वयाच्या ५१ व्या वर्षी बी ए च्या पहिल्या वर्षाचा अभ्यास करायचा होता.अख्खा कोर्स डोळस मुलांसाठी तयार केला होत IGNOUने.
नवीन कोर्स्,वयाची पन्नाशी,त्या विषयाच्या सर्व धड्यांचे श्राव्य ध्वनी फितीमध्ये परिवर्तन करणे(म्हणजे धडा वाचून टेप्रेकॉर्ड करणे),त्या टेपवर ब्रेल मध्ये विषयाची पट्टी डकवीणे,त्या मुलांना ऐकविणे,ते जे बघू शकत नाहीत वा समजू शकत नाहीत ते समजाविणे ,उत्तरे त्यांच्याकडून ब्रेलमध्ये लिहून घेणे,असाईनमेंट मंडळाकडे पाठविणे इ असंख्य नवीन गोष्टी ती उत्साहाने करीत होती.याच बरोबर ही सर्व वाटचाल त्यांच्या घरातील अंधश्रध्देची निराशादायी वातावरण असूनही चालू ठेवायची होती.सामान्य व्यक्तिस हताश करणार्या या बाबी ती दुर्लक्षित होती,दुर्दम्य उत्साहाने हसत होती,त्या मुलांना हसवत होती.त्यांना अवगत नसलेले अनेक अनुभव त्याना समजावत होती.त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक ती बनली होती.ती त्या मुलाना रागवायची,रमवायची.
घरातील कामे उरकल्यावर रात्री ९-३० ते १२ पर्यन्त सातत्याने नोट्स काढायची,रेकॉर्डिंग करायची-उत्साहाने,नियमितपणे,कंटाळा न करता.सतत ३ वर्षे!!!
या सर्व मेहेनतीचे गोड फळ मिळाले आहे .दोन्ही मुले दुसर्या श्रेणीत बी,ए झालीत्.आता कंप्युटर शिकताहेत्,आईचा अन्ध विश्वास कमी झालाय्,बाबा कृत कृत्य झालेत्.अन या मार्गावर आनंदाने ही मार्गस्थ आहे.तिच्या म्हणण्याप्रमाणे "मन्जिले और भी है"
इति-अजून इति नाही

खुपच कौतुकास्पद व पुढील
खुपच कौतुकास्पद व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Pages