भोग दुर्दैवाचे ..... (तृतीयपंथी)
४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट ....... पुण्यातील एका प्रख्यात endocrinologist समोर रीतसर appointment घेउन नुकताच त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसतोय तोच.....
धाडकन दरवाजा उघडून... एक महिला आत आली.....माझ्या आधी येऊन गेलेली.....ग्रामीण भागातील, कावर्या - बावर्या चेहर्याची........
"माझ्या पोराला आता खरंच काही इलाज करता यायचा नाही का हो ?"
मी अवघडून उभा राहिलो व बाहेर जायला निघालो.
डॉ. नी खुणेनेच मला बसायला सांगितले. डॉ. चांगले professional असले तरी त्या महिलेशी सह्रदयतेने १-२ मिनिट बोलले.
त्या संवादातून मला थोडा- फार जो काही बोध झाला त्यामुळे मी हादरूनच गेलो होतो.
ती महिला बाहेर गेल्या गेल्या माझा प्रश्नांकित चेहरा बघून डॉ. (जे आमचे चांगले मित्रही आहेत) पुटपुटले....काय करणार...भोग असतात एकेकाचे......
"तुमची हरकत नसेल तर जरा सांगणार का त्या महिलेच्या अडचणी विषयी ?" माझी उत्कंठा शिगेला पोचलेली.
" हरकत कसली? ती बाई विजापूर जवळच्या कुठल्याशा खेडयातून आलेली आहे. तिचे मूल आता १२ - १३ वर्षांचे आहे -त्याच्या करता आली आहे."
"पण नक्की problem काय आहे ?"
"ते मूल... ना धड पुरुष ना धड स्त्री...थोडक्यात तृतीय पंथी किंवा सामान्य भाषेत - "हिजडा".."
मला चक्करच यायची बाकी होती.
डॉ. पुढे सांगत होते की मूल जन्मल्या -जन्मल्या डॉ व प्रशिक्षित नर्ससेस असे मूल ओळखू शकतात. हे शहरातच शक्य असते. खेड्यात तेही दुर्गम असेल तर सामान्य लोक काय करणार बिचारे?
मी कसाबसा धीर एकवटून विचारले "पण समजा ओळखलेच असे मूल तर त्याचे भवितव्य काय ?"
"काही ऑपरेशन व औषधोपचाराने त्याला "ती" किंवा "तो" बिरूद लागते. पण अर्थातच ती असेल तर गर्भ धारणा होऊ शकत नाही व "तो " असेल तरी नपुंसकच"
पुढे ते म्हणाले - आम्ही फ़क्त एवढेच करू शकतो की वरवर पुरुष असेल तर स्त्रियांसारखी स्तनांची वाढ अथवा वरवर स्त्री असेल तर दाढी येणे असा प्रकार रोखू शकतो.
डॉ. पुढे काय काय सविस्तर, शास्त्रीय माहिती सांगत होते ते ऐकायला माझे चित्तच थार्यावर नव्हते.
त्या बाईचे ते आतापर्यंत मुलगा म्हणून वाढवलेले मूल आता स्त्री सारखे दिसू लागले....एव्हढेच माझ्या नजरेसमोर येऊ लागले.
एक "हिजडा" कसा निर्माण होतो हे कटु, जळजळीत वास्तव मला पहिल्यांदाच कळत होते.
आपण नक्की कोण - स्त्री का पुरुष ? ही identity गमावलेली व्यक्ती माझ्या मनातून पुसता पुसली जाईना..........
आपल्या समाजात अशा व्यक्तींकडे काय नजरेने बघतात, त्यांचे काय हाल होतात या सगळ्या गोष्टी आठवून ही समोर दिसलेली घटना मनाची फ़क्त चिरवेदना देणारी जखम होऊन राहिली........
भोग दुर्दैवाचे......एवढेच आपण म्हणणार......
स्वाती २ यांनी दिलेली ही खालील लिन्क पाहिल्यास बर्याच मूलभूत शंकांचे निरसन होईल.
http://en.wikipedia.org/wiki/Intersexuality
तसेच डॉ. प्रज्ञा / रुणुझुणु आपल्याला मार्गदर्शन करायला आहेतच.
शांती सुधा यांनी दिलेली ही लिंक -
ही इ-सकाळ मधील बातमी. याच विषयावर आहे.
http://www.esakal.com/esakal/20110810/5174501571479533691.htm
(No subject)
@दक्षिणा, धन्यवाद!
@दक्षिणा, धन्यवाद!
ही इ-सकाळ मधील बातमी. याच
ही इ-सकाळ मधील बातमी. याच विषयावर आहे.
http://www.esakal.com/esakal/20110810/5174501571479533691.htm
खूप धन्यवाद शांती सुधा,
खूप धन्यवाद शांती सुधा, चांगली मुलाखत आहे - जिद्द वाखाणण्यासारखी आहे तिची.
Pages