भोग दुर्दैवाचे ..... (तृतीयपंथी)

Submitted by पुरंदरे शशांक on 22 March, 2011 - 02:13

भोग दुर्दैवाचे ..... (तृतीयपंथी)

४-५ वर्षांपूर्वीची गोष्ट ....... पुण्यातील एका प्रख्यात endocrinologist समोर रीतसर appointment घेउन नुकताच त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसतोय तोच.....
धाडकन दरवाजा उघडून... एक महिला आत आली.....माझ्या आधी येऊन गेलेली.....ग्रामीण भागातील, कावर्‍या - बावर्‍या चेहर्‍याची........
"माझ्या पोराला आता खरंच काही इलाज करता यायचा नाही का हो ?"
मी अवघडून उभा राहिलो व बाहेर जायला निघालो.
डॉ. नी खुणेनेच मला बसायला सांगितले. डॉ. चांगले professional असले तरी त्या महिलेशी सह्रदयतेने १-२ मिनिट बोलले.
त्या संवादातून मला थोडा- फार जो काही बोध झाला त्यामुळे मी हादरूनच गेलो होतो.
ती महिला बाहेर गेल्या गेल्या माझा प्रश्नांकित चेहरा बघून डॉ. (जे आमचे चांगले मित्रही आहेत) पुटपुटले....काय करणार...भोग असतात एकेकाचे......
"तुमची हरकत नसेल तर जरा सांगणार का त्या महिलेच्या अडचणी विषयी ?" माझी उत्कंठा शिगेला पोचलेली.
" हरकत कसली? ती बाई विजापूर जवळच्या कुठल्याशा खेडयातून आलेली आहे. तिचे मूल आता १२ - १३ वर्षांचे आहे -त्याच्या करता आली आहे."
"पण नक्की problem काय आहे ?"
"ते मूल... ना धड पुरुष ना धड स्त्री...थोडक्यात तृतीय पंथी किंवा सामान्य भाषेत - "हिजडा".."
मला चक्करच यायची बाकी होती.
डॉ. पुढे सांगत होते की मूल जन्मल्या -जन्मल्या डॉ व प्रशिक्षित नर्ससेस असे मूल ओळखू शकतात. हे शहरातच शक्य असते. खेड्यात तेही दुर्गम असेल तर सामान्य लोक काय करणार बिचारे?
मी कसाबसा धीर एकवटून विचारले "पण समजा ओळखलेच असे मूल तर त्याचे भवितव्य काय ?"
"काही ऑपरेशन व औषधोपचाराने त्याला "ती" किंवा "तो" बिरूद लागते. पण अर्थातच ती असेल तर गर्भ धारणा होऊ शकत नाही व "तो " असेल तरी नपुंसकच"
पुढे ते म्हणाले - आम्ही फ़क्त एवढेच करू शकतो की वरवर पुरुष असेल तर स्त्रियांसारखी स्तनांची वाढ अथवा वरवर स्त्री असेल तर दाढी येणे असा प्रकार रोखू शकतो.
डॉ. पुढे काय काय सविस्तर, शास्त्रीय माहिती सांगत होते ते ऐकायला माझे चित्तच थार्‍यावर नव्हते.
त्या बाईचे ते आतापर्यंत मुलगा म्हणून वाढवलेले मूल आता स्त्री सारखे दिसू लागले....एव्हढेच माझ्या नजरेसमोर येऊ लागले.
एक "हिजडा" कसा निर्माण होतो हे कटु, जळजळीत वास्तव मला पहिल्यांदाच कळत होते.
आपण नक्की कोण - स्त्री का पुरुष ? ही identity गमावलेली व्यक्ती माझ्या मनातून पुसता पुसली जाईना..........
आपल्या समाजात अशा व्यक्तींकडे काय नजरेने बघतात, त्यांचे काय हाल होतात या सगळ्या गोष्टी आठवून ही समोर दिसलेली घटना मनाची फ़क्त चिरवेदना देणारी जखम होऊन राहिली........
भोग दुर्दैवाचे......एवढेच आपण म्हणणार......

स्वाती २ यांनी दिलेली ही खालील लिन्क पाहिल्यास बर्‍याच मूलभूत शंकांचे निरसन होईल.
http://en.wikipedia.org/wiki/Intersexuality

तसेच डॉ. प्रज्ञा / रुणुझुणु आपल्याला मार्गदर्शन करायला आहेतच.

शांती सुधा यांनी दिलेली ही लिंक -
ही इ-सकाळ मधील बातमी. याच विषयावर आहे.

http://www.esakal.com/esakal/20110810/5174501571479533691.htm

गुलमोहर: 

मुलांच्या बाबतीत कोणी ओळखू शकेल.. मुलींच्या बाबतीत कसे कळणार? आणि ह्याला काही वैज्ञानिक परिमाण नाही? Uhoh

कुणी वैद्यकीय पेशातील व्यक्ती स्पष्टीकरण देईल काय?

मी देखील कुणा वैद्यकीय पेशातील तज्ञाच्या स्पष्टीकरणाकरताच हे लिहीले होते.
त्या घटनेचा impact मनावर एवढा जोराचा होता की त्या डॉ.च्या सविस्तर सांगण्याकडे माझे पूर्ण दुर्लक्ष झाले होते.
ते मूल आपली identity गमावून बसले होते याचा मलाच फार जोराचा शॉक बसला होता.
डॉ. प्रज्ञाकडे याची लिंक पाठवतो, ती सांगू शकेल.

इटस ओके. आहेत तर माणसंच. Happy
अवघड आहे. अशक्य नाही.

मी हल्लीच हापिसातील गे/लेस्बियन/बायसेक्शुअल/ट्रान्सजेंडर नेटवर्कचे काम सुरू केले आहे. पहिले काम म्हणजे इतर लोकांना बायसपासून परावृत्त करणे. त्यांची मेडिकल रियालिटी/ ओरियेंटेशन काही असू देत. आपल्या वर्तनात फरक पडता कामा नये. असो.

आपल्याला त्यांच्याबद्दल काय वाट्त ह्या पेक्षा त्यांना स्वतः बद्दल काय वाट्त हे जास्त महत्वाच . त्यांना समजाऊन घेऊन माणुस म्हनुन जगण्याची उमेद देण गरजेच , एखादीच लक्ष्मी ईथे नाव कमावते .बाकीच्यांना टाळी वाजवुन भिक मागत नाहीतर शरिरविक्रय करत जगाव लागत , समाज ह्यांच्याप्रती आपली मानसिकता कधी बदलेल का?

'मी' मराठीवर कांचन अधिकारींचा एक टॉक शो पाहिला होता. वेगवेगळे अभ्यासपुर्ण विषय असायचे. त्यामधे एकदा हिजडे, त्यांच्याबद्द्ल माहिती, समस्या अशी सगळी माहिती होती. त्यातही लक्ष्मीला बोलावलं होतं. ती इतकी स्मार्ट आहे ना. graduate आहे आणि आशिया मधल्या या समाजाची प्रतिनिधी आहे. काही तरी चेअरमन वगैरे. तिने त्यांच्या समस्या इतक्या छान मांडल्या कि माझा एका रात्रीत दॄष्टिकोनच बदलुन गेला. ज्या लोकांकडे बघुन भिती, किळस आणि कधी हसुही यायचं, त्या लोकांबद्दल मला इतकी extreme सहानुभुती वाटते ना. मी माझ्या मुलाला ही थोडक्यात समजावुन सांगितलं, त्याला पण वाईट वाटतं या लोकंबद्द्ल. मी तर समजते कि या टॉक शोचा purpose fulfill झाला. कमीत कमी २ लोकांना बदललं त्यांनी.

मला परत मिळाला तर पहायचा आहे तो शो आणि ग्रुपमधल्या मुर्ख मुलांना पण दाखवायचा आहे. हे लोक म्हणजे विनोदाचा विषय बनवुन टाकला आहे सगळ्यांनी. त्यात भर अतिमुर्ख सिनेमावाल्यांची.

त्यांच्यावर निसर्गाने केलेल्या अन्यायाची जाणिव ठेउन, त्यांना कमीत कमी माणुस म्हणुन तरी वागवायला हवं आपण. पण जिथे त्यांना त्यांचे आई-वडिलच टाकुन देतात, तिथे बाकी समाज काय पत्रास ठेवणार त्यांची. लक्ष्मीने त्यांच्या नोकर्‍यांच्या समस्येबद्दल इतकं छान सांगितलं होतं ना कि त्यांना १ काय १०रुपयांची भिक देतानाही हात मागे होत नाही. ती त्यांना भीक नाही, तर आपल्या एक थोबाडीत असते. नोकरी मिळणार नाही, म्हणुन ते शिक्षणात ही रस घेत नाहीत. शिक्षित किंवा अशिक्षित, त्यांचं उत्पन्नाचं साधन शेवटी एकच असतं. Sad

मी खुप तळमंळीने लिहीते आहे कारण तो टॉक शो इतका चटका लावुन गेला ना. काय करु या लोकांसाठी हे कळत नाही. शिवाय समाजाची आणि प्रत्यक्ष या लोकांची ही (पिढ्यान पिढ्या चालत आलेली) भीती आहेच मनात. खोटं कशाला सांगु?

सध्या मी माझा एकच खारीचा वाटा (माझा नवरा मला मुर्ख म्हणतो आणि माझे मित्रमैत्रिणी टर उडवतात), तरीही मी camp मधे दिसणार्‍या अशा व्यक्तीकडे बघुन smile देते. तो ही मला दुरूनच सलाम करुन किंचितसं smile देउन जातो. त्याने मला कधीही भीक मागितली नाही.

आणि शशांक तुम्ही अशा एका अस्पर्श विषयावर थोडं का होइना लिहायची हिम्मत केलीत म्हणुन तुमचं अभिनंदन. हा कुठे तरी कोपर्‍यात पडलेला, विसरुन गेलेला विषय परत एकदा बोलायला मिळाला. माझ्या ग्रुपमधे तर हा विषय फक्त चेष्टेसाठीच चर्चिला जाउ श़कतो. माझ्या सहानुभुतीमुळे मला ' बाबी आमटे' म्हटलं जातं. Sad

कांचन बाईंचे ही आभार कि त्यांनी ह्या शापित लोकांना त्यांच्या शोमधे जागा दिली आणि कमीत कमी २ माणसांचं मत तरी बदलवुन टाकलं.

देव करो आणि निसर्ग आपलं काम कधीही न चुकवो.

या विषयावर साधी चर्चादेखील होऊ शकली नाही पहिले ३-४ दिवस........यावरुनच आपल्याला काय वाटते या मंडळींबद्दल हे सहज लक्षात येऊ शकेल.
रैना - तुझे याबाबतचे काम खूप कौतुकास्पद आहे, जरा सविस्तर लिहिणार का ?
मनीमाऊ - तू दिलेली माहितीही खूप महत्वाची व आपल्या जाणीवा जागृत करणारी आहे. यु ट्युब किंवा तत्सम ठिकाणी कुठे अशी मुलाखत, माहिती मिळू शकेल का ? खूप उपयुक्त ठरेल हे सर्व आपणा सर्वांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी - असे वाटते.
सर्वांचे मनापासून आभार.

उम्म्म... शंकाच आहे असेल का? दोन भागाचा, प्रत्येकी ४५ मि. किंवा १ तासाचा कार्यक्रम होता. यु ट्युबवर असतात का असे लांबलचक कार्यक्रम?

आपल्याकडे समाजसेवा फार ठराविक विषयापुरती मर्यादित आहे. आता फारच फार तर, एड्स, वेश्या, त्यांची मुले. ह्या लोकांना पण समाजाच्या सहानुभुतीची गरज आहे, हे सगळ्यांना पटायला हवं आहे.

की मूल जन्मल्या -जन्मल्या डॉ व प्रशिक्षित नर्ससेस असे मूल ओळखू शकतात.>>> हे मला अजिबातच कळलं नाही आणि म्हणून पटलं नाही. ह्या फिल्डमधले जाणकार समजावतील का?

नैसर्गिकरित्या न-निश्चितलिंगी म्हणून जन्माला येणे ही घटना तशी दुर्मिळ आहे. यातूनच मग बाह्यलक्षणं मुलाची असली तरी 'आतून' आपण स्त्री आहोत (किंवा उलट) असे वाटत राहते. मफतलाल फॅमिलीमध्ये मध्यंतरी बरेच वाद निर्माण झाले होते. तेव्हा अतुल्य मफतलालची बहीण ही आता लिंगबदल करून अजय मफतलाल झाली आहे यावर बरेच काही लिहून आले होते. त्या व्यक्तीकरता हे किती क्लेशदायक असेल. Sad

आपल्याला रस्त्यावर जे तृतियपंथी दिसतात ते बरेचदा पुरुष असतात आणि त्यांना जबरदस्तीने तसे बनवले असते. फार मागे 'दक्षता' मासिकात प्रमोद नवलकरांनी या विषयावर बरेच लिहिले होते.

स्वाती - खूपच माहितीपूर्ण लिंक दिली आहेस - त्याकरता विशेष आभार.
ज्या कोणाला याविषयी वैद्यकीय माहिती हवी असेल त्यांनी जरुर ही लिंक पहावी.
या लोकांच्या पुनर्वसनासंबंधी काही माहिती असल्यास कृपया लिहावे ही विनंती, कारण वर म्हटल्याप्रमाणे ती ही माणसेच आहेत, काही मंडळींना जरी या पुनर्वसनाचा फायदा झाला तरी चांगलेच आहे. समाजात सुधारणा हळुहळूच होत असते. काही वर्षांनंतर समाजात यांच्याकडे कोणी वेगळ्या नजरेने पहाणार नाही अशीच आशा करुयात.
सर्वांचे मनापासून आभार.

रैना, मनिमाउ

पोस्टस् आवडल्या व पटल्यादेखील.

माझा एक मित्रही ह्याच क्षेत्रात काम करतो. नक्की माहिती मिळवून टाकतो.

या लेखाचे शीर्षक जरा गोंधळात टाकणारे आहे, म्हणुन आधी लक्ष दिले नाही.

मामींनी लिहिल्याप्रमाणे, नैसर्गिकरित्या (शारिरिक दृष्ट्या ) स्त्री वा पुरुषही नसलेली व्यक्ती क्वचितच जन्माला येते. शरिर एका लिंगाचे आणि मानसिकता दुसर्‍या लिंगाची, हा एक वेगळा प्रकार आहे. तसेच हार्मोन्समधल्या इमबॅलन्समूळे स्त्रीला दाढी मिशा व पुरुषाला मोठे स्तन, हा हि वेगळा प्रकार आहे.

पण मोठ्या शहरात, हे हिजडे दिसतात, ते मूळता पुरुषच असतात. एक पंथ म्हणून वयात येण्यापुर्वीच त्यांची एक गावठी शस्त्रक्रिया केली जाते. आणि आयूष्यभर ते तसे जीवन जगतात. (आपल्याकडे जोगत्यांच्या बाबतीत तसे काही केले जात असेल, असे ऐकले नाही.)

त्यांचा पंथ कठोर असतो. त्यांचे सर्वच विधी, अगदी अंतिमसंस्कारही वेगळे असतात.
त्यांच्या सर्व मूलभूत इच्छा अपूर्ण राहिल्याने, त्यांच्या वाणीत ताकद असते असा समज आहे. म्हणुन काहि समाजात त्यांना आशिर्वाद देण्यासाठी बोलावतात.

मुंबईत मात्र, पैसा कमवायचा सोपा मार्ग, म्हणून काही मुलांनी, तशी शस्त्रक्रिया न करता, स्त्रीवेश धारण करुन, पैसे मागायला सुरवात केली होती, पण त्या दोन गटात प्रचंड मारामारी झाली.

कमाल आहे ? शस्रक्रियेने व औषध उपचाराने संपुर्ण पुरुषाची स्त्री किंवा स्त्रीचा पुरुष करणे शक्य आहे ( शारिरीक रित्या ) तर अपुर्ण पुरुषाचे किंवा स्त्रीचे पुर्ण स्त्री किंवा पुरुषात रुपांतर करणे इतक अवघड असत का?

मानसिकतेतला बदल घडवणे कोणा मानसोपचार तज्ञाला अवघड आहे का ? माझ्या मते समाज कल्याण खाते किंवा अशासकिय संस्था याबाबत प्रयत्न करतील तर हा एक चर्चेचा विषय न रहाता उपचारांचा राहील.

असे उपचार मिळणे ही अश्या व्यक्तींची गरज आहे आणि पुर्ण पुरुषाला जबरदस्तीने हिजडा बनवणे हा कायद्याच्या कक्षेत गुन्हा मानुन अश्या गुन्हेगारांना शिक्षा देणे आवश्यक आहे.

शस्रक्रियेने व औषध उपचाराने संपुर्ण पुरुषाची स्त्री किंवा स्त्रीचा पुरुष करणे शक्य आहे<<<
यामधे केवळ बाह्यस्वरूपच बदलले जाते. स्त्री वा पुरूष झाल्यावर त्यात्याप्रमाणे प्रजननक्षमता निर्माण होत नाही.

किंचित विषयांतर... बरोक ऑपेराच्या काळात युरोपात ठराविक वरच्या पट्टीत गायले जावे यासाठी मुलग्यांचा आवाज फुटायच्या आधीच १०-१२ व्या वर्षात खच्चीकरण केले जाई. मग तो मुलगा कायमच स्त्रीपार्टी म्हणून ऑपेरामधे गात असे. त्यांना कास्त्रातो (अनेकवचन - कास्त्राती) असे म्हणले जाई. फारिनेल्ली या नावाची एक फिल्म आहे याच प्रकारच्या एका ऑपेरा गायकाविषयी.

शशांक, विपु वाचल्यावर मी हा धागा पाहिला.
खूप सेन्सिटिव विषय आहे हा. तृतीयपंथींना पाहिल्यावर बहुतेकांच्या मनात भिती, घृणा असंच काहीतरी येतं.
पण मनाच्या जाणिवा जाग्या ठेवून विचार केला तर खरंच खूप वाईट वाटतं.
मानवी शरीराचा अभ्यास केल्यावर निसर्गासमोर अक्षरशः नतमस्तक व्हावंसं वाटतं. इतक्या गुंतागुंतीच्या रचना, प्रक्रिया एका विशिष्ट तालात आयुष्यभर घडत असतात.....all systems acting in unison...like an orchestra !
कधीकधी मात्र production defects होतात, आणि मग हे असे प्रकार घडतात.
त्याला psudohermaphroditism & true hermaphoditism असं म्हणतात.
बर्‍याचदा जेनेटीक म्युटेशन्समुळे असं होतं. मग बाहेरून स्त्री, आणि आतील इंद्रिये पुरुषाची किंवा ह्याच्या उलट घडतं.
काहीवेळा 5,alpha reductase नावाच्या एन्झाईमच्या कमतरतेने असं होतं.( this is again genetic problem)
कारण काहीही असलं तरी ह्या सगळ्या प्रकारात अर्थातच त्या व्यक्तीचा काहीच दोष नसतो. त्यामुळे त्यांचं आयुष्य सुकर बनवण्यासाठी समाजाकडून नक्कीच प्रयत्न व्हायला हवेत.
रैना, मनिमाऊ तुमचं खरंच अभिनंदन.
नीरजाने म्हटल्याप्रमाणे, शस्त्रक्रियेनंतरही ह्यांच्यात प्रजननक्षमता निर्माण होऊ शकत नाही....
मनिमाऊ, तो टॉकशो तुला परत पहायला मिळाला तर प्लीज इथे शेअर कर.

प्रज्ञाच्या म्हणजेच डॉ. च्या हाती सूत्रे आली हे अगदी योग्य झाले, सर्व शंकाचे निरसन आता होऊ शकेल. या चर्चेतून आपल्या सर्वांना काही नवीन शिकता आले व या मंडळींबद्दलची घृणा जाऊन त्यांना काही मदत करता आली तर खूपच मिळवले असे म्हणता येईल.

पण मोठ्या शहरात, हे हिजडे दिसतात, ते मूळता पुरुषच असतात. एक पंथ म्हणून वयात येण्यापुर्वीच त्यांची एक गावठी शस्त्रक्रिया केली जाते >>>
यासाठी मुलग्यांचा आवाज फुटायच्या आधीच १०-१२ व्या वर्षात खच्चीकरण केले जाई >>

मोघल राजवटीत देखील खच्चीकरण केले जाइ (खोजे ) असे वाचले आहे.

रैना तुझे मनापासून कौतुक. मलाही तुझे काम सविस्तर ऐकायला आवडेल.
मनिमाउ तुझ्याही पोस्टस् आवडल्या. मी ही तो टॉक शो पाहिलेला आणि आवडलेला.
मुळात हा विषय ईथे मांडल्याबद्दल शशांक यांचे अभिनंदन!!
>>त्यांची मेडिकल रियालिटी/ ओरियेंटेशन काही असू देत. आपल्या वर्तनात फरक पडता कामा नये. >> हेच सर्वात महत्त्वाचं आहे. लोकांची मानसिकता बदलायला हवी.

गे, लेस्बियन , ट्रान्स वेस्टिजम... या लोकांचे शरीर नॉर्मल असते. पण त्याना लैंगिक सुखासाठी तसे अनैसर्गिक मार्ग स्वीकारावे वाटतात, हे मानसिक असते. इथे अनैसर्गिक हा शब्द वापरलेला आहे. आता याला अ‍ॅबनॉर्मल म्हणायचं का इल लिगल म्हणायचं हे ज्या त्या देशाचा कायदा ठरवतो.. यांचा आणि हिजड्यांचा अर्थाअर्थी फारसा संबंध नाही, त्यांचात 'संबंध' घडत असतील फार्फार तर एवढेच ! Happy

माणसा ची लैंगिक ओळख ही या गोष्टींवर ठरते .. १. शारीरीक २. मानसिक ३. लैंगिक अवयवावरुन ठरणारे ४. हार्मोनवरुन ठरणारे ...

वर उल्लेख केलेले लोक हे २ नंबर अ‍ॅबनॉर्मल आणि इतर ३ नॉर्मल असणारे असतात, हे आता लक्षात आलेले असेलच. शास्त्रीय भाषेत याना सेक्शुअल परवर्जन असे म्हणतात. ( यांच्याशिवाय सॅडिस्ट, मेसोचिस्ट, पीपिन्ग टॉम,पिडोफिलिक. . असे अजुन बरेच प्रकार आहेत. ) पण हे लोक ' हिजडे' या प्रकारात येत नाहीत. हे सर्व प्रकार कायद्यानुसार अनैसर्गिक लैंगिक संबंध - अननॅचरल सेक्शुअल ऑफेन्सेस या प्रकारात येतात व आय पी सी ३७७ अंतर्गत शिक्षेला पात्र असतात. यातुन गे-लेस्बियन वगळावे म्हणून सध्या त्या लोकांची चळवळ सुरु आहे.

हिजड्यांच्यामध्ये वरच्या ४ गोष्टींमधील कुठल्याच गोष्टीत ताळमेळ नसतो. जन्मजात जे हिजडे असतात, त्यांच्या गर्भावस्थेतच हर्मोन लेवल बिघडतात. त्यामुळे बाह्य जननेंद्रिये आणि अंतर्गत जनन इंद्रिये यांची वाढ विचित्र पद्धतीने होते. म्हणजे १. अर्धवट वाढलेले लिंग, आणि पोटात मात्र ओवरी, किंवा २. योनी सदृश्य भाग आणि आत मात्र वृषण. बाह्य बदलही विचित्र असतात, पण हे काही वेळेला पुबर्टीनंतर लक्षात येते.

पुरुषाना हिजडे बनवले जाते, त्यात पुरुषाचे वृषण आणि लिंग तोडले जाते.. त्यामुळे पुरुषी हार्मोन बंद होतात. जखम भरताना तिथे योनी सदृश्य भाग तयार होतो आणि इतर बदलही स्त्री सारखे होतात..

काहीकाही आजारांमध्ये स्त्रीची ओवरी काढली तर किंवा काही कारणाने पुरुषी हार्मोनची मात्रा वाढली तर, तिला दाढीमिशा येतात. पुरुषानाही वृषाण कॅन्सरसाठी सर्जरी केली तर स्त्रीत्वाचे बाह्य बदल दिसतात. कमी पडणारे हार्मोन औषधाद्वारे देऊन हे टाळता येते. हेदेखील हिजडे या प्रकारात मोडत नाही. पण हार्मोन कमीजास्त झाले तर शरीरात कसे आणि का बदल घडून येत असतील, याचा अंदाज यावा म्हणून इथे याचा उल्लेख करावासा वाटला. मानसिक, लैंगिक दृष्ट्या ते नॉर्मलच असतात.

<<इटस ओके. आहेत तर माणसंच. स्मित
अवघड आहे. अशक्य नाही.
मी हल्लीच हापिसातील गे/लेस्बियन/बायसेक्शुअल/ट्रान्सजेंडर नेटवर्कचे काम सुरू केले आहे. पहिले काम म्हणजे इतर लोकांना बायसपासून परावृत्त करणे. त्यांची मेडिकल रियालिटी/ ओरियेंटेशन काही असू देत. आपल्या वर्तनात फरक पडता कामा नये. असो.>>
हे जे रैनाने म्हटले आहे किंवा मनिमाऊचा जो दृष्टिकोन आहे तसा विचार करण्याची जास्त गरज आहे असे वाटते.
निसर्गाने ज्यांच्यावर असा अन्याय केलेला आहे त्यांबाबत आपण काय मदत करु शकतो या दिशेने विचार व्हावा असे वाटते. बाह्यांगाने ते कसे का असेनात पण माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहणे खूप जरुरीचे आहे.
चांगल्या पद्धतीने विचार मंथन चालू आहे याकरता सर्वांचे मनापासून आभार.

माझ्या बर्‍याच शंकांची उत्तरे जामोंच्या आणि प्रज्ञाच्या पोस्टमधे मिळाली.

आता तुम्ही म्हणताहात ते शशांक. या abnormality बद्दल नुसत्या चर्चा करण्यापेक्षा या लोकांना मदत करणे. बेसिक माहिती तर सगळ्यांना आहे. पण पुढे काय? मदत काय आणि कशी करायची याबद्द्ल चर्चा व्हायला हव्यात. वेगवेगळी सजेशन्स यायला हवीत.

लक्ष्मीने कार्यक्रमा मधे सांगितलं होतं की, या लोकांकडे इतक्या विचित्र नजरेने बघितलं जातं कि त्यांना कोणी इछा ( हा शब्द काही लिहिता येत नाही मला) असली तरी नोकरीवर ठेवु शकत नाही. विचार करा हो, एका दुकानाचा सेल्समन जर 'छ' असेल, तर जायला भीती वाटेल ना. बरं तिने म्हटल्याप्रमाणे, जरी असे जॉब्स, जिथे लोकंशी संपर्क येत नाही, जसे की कॉल सेंटर, तिथे त्यांना घ्यायचे म्हटले तरी, शिक्षणाचा अभाव. कोणी कशी मदत करायची? बरं प्रौढ साक्षरता वर्गात तरी यांना जागा देइल का कोणी?
कोणी कशाला ? मी गप्पा मारते आहे, पण उद्या अशा एखाद्याला शिकवायचे म्हटले तरी माझी ततपप होइल. तर सुरुवात करायला लागेल, मनातली भिती काढुन टाकण्यापासुन. त्यांना माणुस सम़जुन संवाद

शिखंडी म्हणजे अर्जून नाही. तो अंबेचा पुनर्जन्म होता. तो पुरुषच होत, पण चोप्रांच्या महाभारतात त्याचे विकृत चित्रण झाले होते.

Pages