पेपर डोसा

Submitted by सीमा on 21 March, 2011 - 10:57
लागणारा वेळ: 
१ दिवस
लागणारे जिन्नस: 

३ वाट्या तांदुळ
१ वाटी उड्दाची डाळ
१ चमचा तुरीची डाळ
१ चमचा मेथी
तेल , मीठ

क्रमवार पाककृती: 

तांदुळ , उडदाची डाळ , तुरीची डाळ स्वच्छ धुवून घ्यावेत.
तांदुळ आणि उडदाची डाळ स्वतंत्र भीजत घालावी. भीजत घालताना दोन्हीपैकी कशातही तुरडाळ आणि मेथीचे दाणे घालावेत.
रात्रभर भीजवुन सकाळी मिक्समध्ये लागेल तसे पाणी घालुन ग्राइंड करावे.
एकत्र करुन फर्मेंट करायला ठेवावे.
भारतात ४/५ तासात पीठ चांगल फुगत. मीठ घालावे. लागल तर अजुन पाणी घालुन योग्य कन्सिस्टंन्सी करुन घ्यावी.
जाड बीडाचा तव्यावर , तवा तापला कि थोडे पाणी अगोदर शिंपडुन , नंतर तेल घालुन पातळ डोसे घालावेत.(घालताना वाटी आतुन बाहेर फिरवत आणावी.) बाजुला तेल/बटर सोडावे. खालुन लालसर झाला कि काढावा.
नॉन स्टिक वर केला तर डोसा थोडा जास्त वेळ गॅस वर ठेवावा.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

डोसा क्रिस्पी नको असेल तर जाड घालता येईल. मला वाटत याच खर स्किल डोसा घालण्यावर आहे.
मी आईचच प्रमाण वापरुनही तिच्यासारखा अल्टिमेट होत नाही.

dosa1.jpg

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे छोटे? भोवळ आली.. माझे नॉर्मल दोसे म्हण्जे 'मिनी दोसे'... आजच कळलं.. Uhoh Sad

करुन बघायला पाहीजे डाळ घालुन..

सीमा
दोसे एकदम मस्त दिसताहेत, हे छोटे म्हणजे माझे तर मायक्रो दोसेच म्हणायला लागेल. Happy
प्रतिसादातली फोटोची लिंक कट करुन वर टाक पाककृतीत फोटो.

मी गोव्यात पणजीच्या कामतमधे "फॅमिली डोसा" नावाचा अतिसुंदर प्रकार खाल्ला होता. म्हणजे फॅमिली किती लोकांची आहे ते बघून, एका टेबलवर किती लोक बसू शकतात ते ठरवून मग संपूर्ण टेबल भरेल एवढा मोठ्ठा थोरला डोसा त्यांना सर्व्ह करायचा. अफलातून काम होतं ते! आम्ही ६ जण होतो, तर त्यांनी आम्हाला टेबल लावून दिलं, आणि मग ६ जण आपापल्या बाजूने खाऊ शकतील असा डोसा दिला!!

अर्थात काहीतरी खास दिवस होता तो बहुतेक "कामत" चा. नंतर कधीच नाही बघितला हा प्रकार. एका दिवसापुरताच असावा. बहुतेक १९८९-९० साली असेल.

छान क्रुती. मला डोसा खुप आवड्तो. उडद डाळी ला काय substitute / पर्यायी असेल ? माझ्या इथे उडद डाळ मिळत नाही. पण हे वाचुन डोसा करावे वाटत आहे.मुग डाळ वापरु का ?

डोसे हमखास पातळ आणि तरीही चिकटू नयेत म्हणून हे करून पहा. माझी खात्रीची पध्दत. आधी तवा चांगला तापल्यावर त्यात चांगलेशे दोन तीन चमचे तेल घालून एक जाड डोसा करून घ्यावा. त्याचं काय करायचं ते प्रत्येकानं ठरवावं. आता तवा पातळ डोश्यांकरता सिध्द झालाय. या तव्यावर आधी तेल न घालता, साधारण मध्यम चमच्यातून अथवा वाटीतून पीठ घालावं. ते मध्यापासून नेमका दाब देत गोल गोल पसरवत न्यावं. मध्यभागी किंचित जाड राहिलं तरी चालेल पण आजूबाजूला चांगलं पातळ पसरावं. मग यावर अर्धा चमचा वगैरे तेल बाजूबाजूने आणि एखाद्-दोन थेंब मध्येमध्ये असं सोडावं. झाकण ठेऊन एखाद मिनिट ठेवलं न ठेवलं तर उघडून दोनेक थेंब साजूक तूप सोडावं. छान सोनेरी रंग आला की साईड साईडनी उचलत आख्खा डोसा कालथ्यावर पेलावा.
डिसक्लेमर : तरीही डोसे मोडल्यास मी जबाबदार नाही. यात स्कील फॅक्टर धरला नाहीये ना! Wink Proud

मी डोसे करताना ३ वाटी उकडा तांदूळ, २ वाटी साधा तांदूळ व दीड वाटी उडीद डाळ व मेथ्या वापरते. डोसे एकदम कुरकुरीत होतात.
तुरदाळ घालून सीमाच्या पद्धतीने डोसे करुन बघायला हवेत.
एकदम क्रिस्पी दिसतायेत.

Pages