मी यापूर्वी मोलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमी या विषयावर लिहिलेल्या लेखावरून हे एक श्रीमंत माणसांचं खूळ आहे अशी समजूत होणं साहजिक आहे. आणि थोड्या प्रमाणात ते खरंही आहे. अजूनतरी बाहेर जाऊन हे पदार्थ खायचे असतील तर ते सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचं आहे.
पण या विषयात होणार्या काही नवीन प्रयोगांमुळे काही अवघड समस्यांना उत्तरं मिळतील अशी शक्यता निर्माण झाल्या आहेत. सध्या तरी या चाचण्या प्रायोगिक तत्वावर असल्यामुळे व्यवहारात हे प्रयोग आर्थिकदृष्ट्या किती फायदेशीर ठरतील हे अजून ठरायचे आहे. यातल्या काही प्रयोगांची माहिती इथे लिहतो. योगायोगाची गोष्ट (किंवा नसेलही) हे तीनही प्रयोग मी ज्याच्या हातचे पदार्थ खाल्यामुळे मला या विषयाची गोडी लागली त्या होमारो कांटू (Homaro Cantu) याच्याशी निगडित आहेत. त्याचं बालपण अत्यंत गरीबीत गेलं आणि वयाची ६ ते ९ वर्षे तो होमलेस होता. याच अनुभवातून जगातला कुपोषणाचा, भुकेचा प्रश्न कसा सोडवता येईल याचा तो पाठपुरवठा करतो आहे.
१) होमारोने केलेला पहिला प्रयोग म्हणजे त्याने एक बर्गर तयार केला. पण हा बर्गर गायीच्या मांसाचा (बीफ) नसून गाय जे खाते त्यापासून तयार केलेला आणि पूर्ण शाकाहारी होता. याच प्रकाराने त्याने चीकन नगेट्स केले जे कोंबडीच्या मांसाचे नसून कोंबडी जे खाते त्या खाद्याचे आणि पूर्ण शाकाहारी होते. आणि हे दोन्ही पदार्थ त्याने अतिशय चवदार करून दाखवले. ज्यांना ते काय आहेत हे माहित नव्हते अशांनी ते पुन्हा खायला मागितले.
नैसर्गिक अन्नसाखळीतला प्रत्येक प्राणी जेंव्हा त्यावर अवलंबून असणार्या प्राण्यासाठी अन्न बनवतो (शरीरात मांस/चरबी तयार करून) तेंव्हा घटकपदार्थातली काही उपलब्ध उर्जा नष्ट होते. व्हावीच लागते कारण ती उर्जा तो प्राणी त्याचे आयुष्य जगण्यासाठी वापरतो. त्यामुळे अन्नसाखळीत उर्जेची घनता जरी वाढत गेली तरी एकूण उपलब्ध उर्जा कमी होते. कोंबडीने खालेल्या अन्नातली काही उर्जा कोंबडी जगण्यासाठी वापरते तर काहीचे मांसात रुपांतर होते. पण जर आपण अन्नसाखळीतली एक कडी वापरलीच नाही तर तेवढ्याच वजनाच्या अन्नात जास्त उर्जा मिळू शकेल. आणि काही कोंबड्यात जितक्या लोकांचे जेवण होऊ शकते (भुकेसाठी, चवीसाठी नाही ) त्यात जास्त लोक भूक भागवू शकतील.
म्हणजे कोंबडी न खाता , कोंबडी जे खाते ते खायचं? हो त्याची चव जर चिकनसारखी लागली तर काय फरक पडतो? मटन न खाता मटनासारखा लागणारा पण गवतापासून तयार केलेला पदार्थ खायचा, मधली बकरी आउट !
हा प्रयोग फक्त उर्जा वाचवण्यासाठी काय शक्य आहे हे चाचपण्यासाठी केला होता. अशा प्रकारे अन्नसाखळीतली एक कडी नाहिशी केल्यामुळे शरिरावर, निसर्गावर काय परिणाम होऊ शकतात ते अजून माहिती नाही.
(उपलब्ध उर्जा हा ढोबळ मानाने वापरलेला शब्द आहे. प्रत्यक्ष वस्तुमान किंवा उर्जा बदलत नाही. पण उष्मागतिकीच्या दुसर्या नियमाप्रमाणे एन्ट्रॉपी वाढते आणि अन्नसाखळीतल्या वरच्या जिवाला उपलब्ध उर्जा कमी होते).
२) होमारोच्या दुसरा प्रयोगाचा मुख्य घटक म्हणजे म्हणजे पश्चिम आफ्रिकेत १७२५ मधे पहिल्यांदा सापडलेली एक प्रकारची बोरे. ही बोरे पहिल्यांदा खाल्ली तर नंतर ४०--४५ मिनिटे पदार्थाच्या चवी बदलतात. यात असलेल्या Miraculn या रसायनामुळे हे होते. सर्वसामान्य माणसाला ही बोरे खाल्यावर बहुतेक सगळ्या गोष्टी गोड लागतात. कॅन्सरग्रस्त रुग्णांना, ज्यांना केमोथेरेपीतून जावे लागते त्यांना अन्न जात नाही. सारखी शिसारी येते. पण त्यांनी जर ही बोरे खाल्ली तर त्यांना परत सगळे अन्न चवदार लागते. हे तेवढ्यापुरते असले(१ तास) तरी त्यामुळे त्यांना घटलेले वजन भरून आणण्यासाठी हे महत्वाचे ठरते. काही औषध कंपन्या, होमारोचा सल्ला घेऊन हे द्रव्य वेगळे करून त्याचे औषध करायच्या प्रयत्नात आहेत. ही बोरे नेटवर उपलब्ध आहेत.
होमारो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात एक गमतीचा प्रयोग यशस्वीपणे करतो आहे. तो दररोज मुलींना न्याहारी अगोदर ही बोरे खाऊ घालतो. ती खाल्ल्यावर गोड नसलेले (पण पौष्टीक पदार्थ) मुली आवडीने खातात.
३) याच बोरांचा उपयोग करून इतर काही पदार्थ चवदार करता येतील का याच्याही चाचण्या चालू आहेत. उदा. आफ्रीकेत काही प्रकारचे गवत मुबलक मिळते जे पौष्टीक असते. पण त्याची चव माणसांना अजिबात आवडत नाही त्यामुळे त्याचा अन्नासाठी उपयोग होऊ शकत नाही. पण जर आपण या नैसर्गिक मुबलक मिळणार्या गोष्टी चविष्ट करू शकलो तर जगाच्या एका मोठ्या भागातले अन्नाचे दुर्भिक्ष कायमचे नष्ट होऊ शकेल. आपल्या देशातही कदाचित असे गवत किंवा झाडे असतील. त्यावर संशोधन झाले तर आपल्या देशातला कुपोषणाचा प्रश्न सुटायला मदत होऊ शकेल. होमारोच्या प्रयोगावरून स्फूर्ती घेऊन इतरही अनेकजण यात नवीन प्रयोग करत आहेत.
भविष्यात कधीतरी तेंव्हाचा चिनूक्स, अन्न वै प्राण: लिहेल, तेंव्हा त्यात मोलेक्युलर गॅस्ट्रॉनॉमीचा मोठा वाटा असेल यात शंका नाही. कदाचित हा शब्द नसेल पण यातल्या प्रयोगातून यशस्वी झालेले पदार्थ नक्कीच असतील.
म्हणजे सध्या आपण खातो त्या सगळ्या गोष्टी केंव्हातरी भूतकाळात कुणितरी केलेल्या मोलेक्युलर गॅस्ट्रॉनॉमीचा परिणाम आहेत, नाही का? त्या व्यक्तीला ही संज्ञा माहिती नसेल पण माणसाची प्रयोगशिलता आणि नवीन उपद्व्याप करायची खाज आज पिढ्यानपिढ्या चालूच आहे.
मग "मॉलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमी खूळ किंवा वरदान" न म्हणता , "मॉलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमी , पिढ्यांपिढ्यांचा वारसा" असे म्हणणे योग्य होईल.
मिरॅकल बेरी
मिरॅकल बेरी व्हाईटहाऊसमधे
http://muse.mberry.us/2010/04/mberry-at-the-white-house/
खूपच नावीन्यपूर्ण माहिती. या
खूपच नावीन्यपूर्ण माहिती. या विषयावर प्रथमच वाचायला मिळाले.
धन्यवाद.
या बोरांबद्दल इथेही वाचनात
या बोरांबद्दल इथेही वाचनात आले होते.
होम, या माहितीपटात सांगितल्याप्रमाणे, उत्पादन झालेले जवळजवळ ५० टक्के धान्य हे बीफ, पोर्क, चिकन आदीच्या निर्मितीत खर्च होते आणि त्यासाठी प्रचंड प्रमाणात पाणी व उर्जा लागते. ते टाळता आले तर चांगलेच आहे कि.
छान आहे हा भाग. आवडला.
छान आहे हा भाग. आवडला.
खुपच मस्त भाग. आणि विचार.
खुपच मस्त भाग. आणि विचार.
वेगळी आणि छान माहीती दिलीत!
वेगळी आणि छान माहीती दिलीत! धन्यवाद!
मी पण आधी कसले नवीन खूळ
मी पण आधी कसले नवीन खूळ म्हणुन विक्ष्चार करत होतो... पण आता दुसरी बाजू पण नीट कळली... एक वेगळा विचार मिळाला!
ह्यातील एका सर्विंग ने पोट
ह्यातील एका सर्विंग ने पोट भरते का? का घरी जाउन पिठले भात खावा लागेल?
सुपरसाइज मी वाले पब्लिक किती मॉगॅ प्लेटा खाईल?
अपरक्रस्ट मधील लोकांना ठीक आहे असे वाट्ते. कधीतरी मजा म्हणून
मॉगॅची सरप्राइज व डिलाइट व्हॅल्यूच जास्त आहे. हे पोट्भरीचे खाणे नव्हे असे वाट्ते आहे.
हा प्रकार कधी वाचनात आला
हा प्रकार कधी वाचनात आला नव्हता..... मस्त्च.... आणि धन्यवाद.... यावर एक मस्त "उद्योजक करीअर" होउ शकते... आणि प्रचंड स्कोप दिसतोय मला तर....
उत्पादन झालेले जवळजवळ ५० टक्के धान्य हे बीफ, पोर्क, चिकन आदीच्या निर्मितीत खर्च होते आणि त्यासाठी प्रचंड प्रमाणात पाणी व उर्जा लागते.>>>>> १ किलो सोयाबिन, किंव्हा १ किलो गहु यासठी जेव्हढे पाणी लागते त्यापेक्षा २०० पट जास्त पाणि १ किलो बीफ साठी लागते. आणि तेव्हढ्याच प्रोटीन कॅलरीसाठी १८ ते २७ पट जास्त खनिज्तेल (petroleum feed stock) लागतो...
(उपलब्ध उर्जा हा ढोबळ मानाने वापरलेला शब्द आहे. प्रत्यक्ष वस्तुमान किंवा उर्जा बदलत नाही. पण उष्मागतिकीच्या दुसर्या नियमाप्रमाणे एन्ट्रॉपी वाढते आणि अन्नसाखळीतल्या वरच्या जिवाला उपलब्ध उर्जा कमी होते).>>>>> हे किती वर्ष झा लं शिकतोय पण या पर्स्पेक्टीव्ह ने कधी बघितलं नव्हतं....
मला वाटत कार्व्हर ने देखिल बटाटा आणि शेंगदाणा यापासुन खाद्यपदार्थ करायला सुरवात केली तोपर्यंत ते फक्त गुरांचे खाद्य म्हणुन वापरत होते.
आणि गावाकडची बोरे खाल्यावर देखिल पाणी गोड लागते. इन्फॅक्ट मी आता आठवतोय, कि काय खाउन काय खाल्ले कि चव वेगळी लागते.....
मस्तच...
लेख व माहिती दोन्ही आवडले.
लेख व माहिती दोन्ही आवडले. धन्यवाद.
छान माहिती. होमारोंची बोरे
छान माहिती.
होमारोंची बोरे कुठे मिळतील?
मॉर्निन्ग्स्टारचे असे काही प्रॉडक्ट्स आहेत. - http://www.morningstarfarms.com/products_chikn-nuggets.aspx
निवांत, बोरे, आवळा, हिरवी चिंच खाऊन पाणी प्याले की पाणी गोड लागते. लहानपणी मुद्दाम प्यायले जायचे.
पहिला भाग वाचला तेव्हा
पहिला भाग वाचला तेव्हा फक्त..नवीन प्रयोगांचे खूळ एवढंच वाटलं होतं, हा भाग आवडला वेगळाच विचार..
होमारोंची बोरे इथे मिळतील
होमारोंची बोरे इथे मिळतील
आवडली माहिती.
आवडली माहिती.
मस्त माहिती. धन्यवाद.
मस्त माहिती. धन्यवाद.
चांगली माहिती. तो व्हिडीओ पण
चांगली माहिती. तो व्हिडीओ पण आवडला.
धन्यवाद अजय, मी लेखातली लिंक
धन्यवाद अजय, मी लेखातली लिंक पाहिलीच नाही.
(धाकट्याने भाज्या खाल्ल्या तर मोठे काम होईल.)
सुंदर... कोंड्याचा मांडा
सुंदर...
कोंड्याचा मांडा करणार्याना शुभेच्छा !
अजय, कोंबड्या आणि गायी जे
अजय, कोंबड्या आणि गायी जे खातात ते आपण पचवु शकुच असे नाही. उदा. गवतातील सेल्युलोज मध्ये एक रेणु आपण खातो त्या पालेभाज्यांमधील सेल्युलोजच्या तुलनेत उलट्या बाजुला असतो (different handedness). याचमुळे बरे नसले की बरेचदा कुत्रे-मांजरीपण गवत खाऊन पोट साफ करतात. अशा गोष्टींबद्दल काय केल्या जाते? गायींच्या पोटात असलेल्या मायक्रोऑरगॅनीजम्सची त्यांना मदत होते. आपल्याला तेच उपयोगी पडतील असेही नाही.
मी आजच वाचला हा लेख
मी आजच वाचला हा लेख ..
ह्याआधी फूड नेटवर्क वर बघितले होते थोडे प्रयोग आणि शिकागो च्या ह्याच किंवा आणि कुठल्या दुसर्या restaurant बद्दल माहिती ..
इंटरेस्टींग आहे .. पण मलाही ecology बद्दल प्रश्न आहे .. ह्याची दुसरी बाजू दिसतेय आणि जिथे problem situations आहेत तिथे नक्कीच ह्याचा उपयोग कळतोय ..
डॉ. कल्याण गंगवाल यांनी
डॉ. कल्याण गंगवाल यांनी शाकाहाराचा प्रचार करत आयुष्य वेचल. मोलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमी म्हणल की वजन येत याच प्रचारात.
मी अनेक वर्ष शाकाहारी होतो. व्हिटामीन ई च्या डिफिशियन्सी मुळे मला जे काही त्रास झाले त्याच नीट डायग्नोसीस झाल नाही. पुढे कधीतरी मासे खायला लागल्यावर सगळ सुरळीत झाल.
मासे माश्यांनाच खातात आणि पुथ्वीवरच मानव निर्मीत कोणतही अन्न समुद्रातल्या किंवा नदीतल्या माशांना घालुन वाढवता येत नाही.
सबब मोलेक्यूलर गॅस्ट्रॉनॉमी या विषयातुन मत्स्याहार बाजुला काढला आहे का ?
अतिशय रोचक माहिती.
अतिशय रोचक माहिती.
मस्त ! हा आहार शस्त्राचा भाग
मस्त ! हा आहार शस्त्राचा भाग म्हनाता येइल कि माय्क्र्रो- बायोलोजिचा ?
छान माहिती. मलाही हे खुळच
छान माहिती.
मलाही हे खुळच वाटत होते पण आता जरा वेगळा विचार केला जाईल.
शिवाय नुसत अगर अगर वगैरे घालुन पदार्थ नविन रुपात सादर करणे एवढेच असेल तर त्यात पौष्टिकपणा किती हाही प्रश्न पडलाच होता.
बोरे, आवळा, हिरवी चिंच खाऊन पाणि गोड>> हो. हो. मज्जा यायची.
खुप गोड पदार्थ खाऊन मग गोड चहा प्यायला तर चहा कडु लागतो.
ते मिरॅकल फ्रुट इथे काहीवेळा सुपर मार्केट मधे बघितलं आहे. दोन इवल्याशा बेरी १००००येनला. त्याची किंमत बघुनच ते जादुई आहे याची खात्री पटली आणि घेतलं नाही
आसलि काहि बोर वगरे
आसलि काहि बोर वगरे पुन्न्याप्र्य्नत तरि नहि आलि.
गाजरावर पानि कदु लागते.
जूनि गोश्त आहे.
अस्चिग ने मांडलेला मुद्दा
अस्चिग ने मांडलेला मुद्दा अगदी योग्य आहे. आपण काही अन्नपदार्थ पचवू शकत नाही. त्यासाठी आपल्या पचनसंस्थेचा योग्य विकास झाला नाही. त्यामुळे गाय किंवा कोंबडी जे खाते ते आपण पचवू शकणार नाही.
यावरच्या काही नवीन
यावरच्या काही नवीन पुस्तकांबद्दल वाचलं-
Who needs a lab when you have a kitchen?
पुस्तकांबद्दल अजून माहिती इथे मिळेल-
http://modernistcuisine.com/books/modernist-cuisine/
>>>> मधली बकरी आउट ! <<<<
>>>> मधली बकरी आउट ! <<<<
धन्यवाद
चान्गली माहिती
मी पण बघतो, आता कुणाकुणाला "आऊट्ट" करता येतय ते!
http://www.npr.org/blogs/thes
http://www.npr.org/blogs/thesalt/2015/04/18/400413881/late-chicago-chef-...
गेल्याच आठवड्यात बातमी ऐकली तेव्हा या धाग्याची आठवण आली होती.