एक फुल........एक हाफ !!!!!!!!!!!

Submitted by भालचन्द्र on 19 March, 2011 - 12:29

सुपर मून, हुताशनी पौर्णिमेचा चंद्र : १९-०३-२०११ !!!!!

P1000163.JPGअष्टमीचा चंद्र : १३-०३-२०११ !!!!!

P1000136.JPG

गुलमोहर: 

भालचंद्र. मनापासून आभार. आज तूमच्यामूळे बघता आला. आमच्याकडे आज मुसळधार पाऊस आहे. चंद्रच काय सूर्यही नाही दिसला.

दोनहि प्रचि छान आहेत्....काल मी पण गच्चित गेलेलो पण रूफ शेड असल्यामुळे चद्रदर्शन कहि झाले नाहि...धन्यवाद

सुपर्ब! काल मी पेणच्या आसपास चंद्र उगवताना पाहिला..... विरुध्द बाजूने जाणार्‍या ट्रक्सच्या अधूनमधून डोकावत होता. जिप्स्याच्या चंद्रासारखा - आटीव बासुंदीच्या रंगाचा!

मस्तच एकदम... मला मुळ फोटो आणि झब्बु दोन्ही आवडले. चंद्र १८ नी १९ ला सारख्याच स्थितीत दिसतोय.

पण कालचा चंद्र मला तरी खुप जवळ आल्यासारखा मोठ्ठा वाटला नाही. १८ वर्षांपुर्वी इतका जव्ळ आलेला असे टीवीवाले ओरडुन सांगत होते पण साधारण १०-१२ वर्षांपुर्वी चंद्र असाच एकदा जवळ आलेला. मी तेव्हा नेरूळला होते राहायला. संध्याकाळी येताना चंद्र पाहिला आणि तो नेहमीपेक्षा खुप मोठ्ठा दिसतोय असे वाटले. दुस-या दिवशी पेपरात वाचले काल चंद्र खुप जवळ आलेला असे. तेव्हा टीवीवर कुठल्याही गोष्टीची ब्रेकिंग न्युज होत नसे.

भालचंद्र, तुमच्या नावातच चंद्र आहे.! तुम्ही काढलेले फोटो, आणि जिप्सीचा झब्बू पण चांगला आहे.

दोघांचे फोटो खुप छान.... मी तर पौर्णिमेला रायगडावर होतो....
सगळा किल्ला चंद्रप्रकाशात उजळुन निघाला होता.... रात्री १ वाजेपर्यंत भटकत होतो...

माझ्या कॅमेर्‍याने दगा दिला नसता तर मी ही एखादा झब्बु दिला असता... Sad

आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !!

कांदापोहे >>मला जरा कॅमेराचे सेटींग सांगा बर..कुठला कॅमेरा? >>

Camera: Panasonic Lumix FZ35, 12mp
Full Moon: Manual mode, f: 8.0, Exposure: 1/10 sec, ISO 80, Focal length 949mm (at reduced resolution 3.0 MP)
Half Moon: Manual mode, f: 6.3, Exposure: 1/160 sec, ISO 400, Focal length 949mm (at reduced resolution 3.0 MP)