बेफिकीरी

Submitted by विशाल कुलकर्णी on 17 March, 2011 - 07:23

जुनी म्लान तत्वे हवीशी कुणाला?
उगा भ्याड आदर्श पाळा कशाला?

असे सोडली लाज त्यांनी गड्यांनो
कशी खंत वाटेल लोभी मनाला?

म्हणे लोकशाही जनांचीच भाषा
हवी मात्र खुर्ची पुढारी 'बुडा'ला... (बुड : पार्श्वभाग)

इमानी मतीला नको तो 'हवाला'
हवी झोप थोडी सुखाची जिवाला

पुन्हा सांगतो आज आम्ही जगाला
नको 'अर्थ' ऐसा विषारी अम्हाला!

नको ती अमीरी नको वा गरीबी
अता बेफिकीरीच मागू 'हरा'ला !

विशाल

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नको ती अमीरी नको वा गरीबी
अता बेफिकीरीच मागू 'हरा'ला !
हा शेर फार विस्कळीत झाला आहे. पहिल्या ओळीत 'वा' चे प्रयोजन काय?
दुसर्‍या ओळीत 'हरा'ला म्हणजे काय? (शंकर की काय?)
एका शेरात तुम्ही 'अम्हाला' केले आहेत अगदी माधव ज्युलियन यांच्याप्रमाणे. सध्या तरी तसे प्रचलित नाही. असो.

अर्थात, गझलेलाच तुम्ही 'बेफिकीरी' अशा अर्थाने नाव दिल्यामुळे असे थोडेफार व्हायचेच. Lol

इमानी मतीला नको तो 'हवाला'
हवी झोप थोडी सुखाची जिवाला
हा शेर आवडला...!

छान

विशालराव, आवडली नाही.

टीकात्मक सूर आहे. बुड वगैरे शब्द गझलेत ऑड वाटतात (वैयक्तिक मत)....द्विपदी ह्या 'शेर' वाटत नाहीत.

कमी आधिक बोललो असल्यास क्षमस्व!!

विश्ल्या,

इमानी मतीला नको तो 'हवाला'
हवी झोप थोडी सुखाची जिवाला>> या ओळी मनापासुन आवडल्या.

तसं विदीपांशीही सहमत.

धन्यवाद मंडळी Happy

जोशीसाहेब, तो वा अमीरी नको किंवा गरीबीही नको या अर्थाने वापरला आहे.
'हर' शंकरालाच उद्देशून आहे, कारण ती कलंदर वृत्ती त्याच्याकडेच असते Happy

>>>जोशीसाहेब, तो वा अमीरी नको किंवा गरीबीही नको या अर्थाने वापरला आहे.<<<
विशाल, मग ते....
अमीरी नको वा नको ती गरीबी
किंवा
नको ती अमीरी, नको ती गरीबी
असे करता येईल.

इमानी मतीला नको तो 'हवाला'
हवी झोप थोडी सुखाची जिवाला

छान शेर.

धन्यवाद मंडळी....
मी इतके दिवस गझलेच्या वाटेला गेलो नव्हतो. इतका उशीर का केला मी याचे मलाच आश्चर्य वाटतेय. उगाचच एक भिती होती मनात. नाही जमले तर तज्ञ मंडळी काय म्हणतील? पण इथे उलट अनुभव येतोय. इथे कोणीही नावे ठेवत नाहीये तर चुका सुधारण्याचे मार्ग सांगताहेत.
खुप खुप आभार सगळ्यांचे !! मायबोलीवर येणे सार्थक झाल्यासारखे वाटतेय आता. Happy

नको ती अमीरी नको वा गरीबी
अता बेफिकीरीच मागू 'हरा'ला !
हा शेर फार विस्कळीत झाला आहे. पहिल्या ओळीत 'वा' चे प्रयोजन काय?
दुसर्‍या ओळीत 'हरा'ला म्हणजे काय? (शंकर की काय?)
एका शेरात तुम्ही 'अम्हाला' केले आहेत अगदी माधव ज्युलियन यांच्याप्रमाणे. सध्या तरी तसे प्रचलित नाही. असो.

अर्थात, गझलेलाच तुम्ही 'बेफिकीरी' अशा अर्थाने नाव दिल्यामुळे असे थोडेफार व्हायचेच.:हाहा:

=============================================================

श्री अजय जोशी,

आपला वरील प्रतिसाद मला टीकात्म वाटला. तसेच, ती टीका विशाल यांच्या गझलेवरील टीकेपेक्षा माझ्यावरची वैयक्तीक टीका वाटली. मी तंत्रशुद्ध गझल रचतो. तसेच, भरीचे शब्द टाळून गोटीबंद व 'अर्थातच लयबद्धही' गझल रचतो. हे येथे व इतरही स्थळांवर (आपल्याप्रमाणेच) बर्‍याच जणांना ज्ञात आहे. तेव्हा सदर गझलेतील एखादा शेर व त्यातील (अनुभवानेच टाळता येण्याजोग्या) चुकांचा उल्लेख करून 'बेफिकीरी'च शीर्षक आहे म्हंटल्यावर असे होणारच हे जाहीर फोरमवर म्हणणे यातून असे सूचित होऊ शकते की बेफिकीर ही व्यक्ती अशुद्ध, भरीचे शब्द असलेल्या गझला रचते. हे असे प्रतिसाद टाळणे शक्य होत असल्यास जरूर टाळावेत. कारण मी स्वतः तसे करत नसल्यामुळे मला ते माझ्या बाबतीत कुणी केलेलेही आवडत नाही. मला जर एखाद्या व्यक्तीच्या लेखनावर / व्यक्तीवर टीका करायची असली तर मी त्या व्यक्तीच्या लेखनाखालीच ते लिहितो.

आता आपण असे म्हणू शकता की 'तुम्ही हे स्वतःवर उगीचच ओढवून घेत आहात व बेफिकीरी या शब्दाचा अर्थ काळजीच न करणे असा असल्यामुळे मी विशाल यांना तसे लिहीले'. 'त्यांनी भरीच्या शब्दांची काळजीच केली नाही' असे मला म्हणायचे होते असे आपण जरूर म्हणू शकाल.

मात्र तुम्हाला व मला ओळखणार्‍या सर्वांना 'त्यात दुसरा काही हेतू आहे की काय' असे जाणवेल हे तुम्हालाही मनातल्या मनात समजेलच! त्यावर वेळ घालवत नाही.

गझलेच्या क्षेत्रात आपण सगळेच नवखेच आहोत. एकमेकांना माहिती शेअर करून जमेल तसे लिहीणे इतकेच सर्वांच्या हातात आहे. चुका (स्वतःला दुसर्‍याच्या लेखनात जाणवत असतील तर) दाखवून द्यायची एक चांगली शैलीही उपलब्ध आहेच! तिचा वापरही सगळेच करू शकतात.

===============================================
विशालराव, मला ही गझल आवडली नाही. क्षमस्व! खालील ओळी आवडल्या.

उगा भ्याड आदर्श पाळा कशाला

हवी झोप थोडी सुखाची जिवाला

ही गजल न आवडण्याची अनेक कारणे आहेत व ती अर्थातच वैयक्तीकच आहेत. मात्र आपण गझल रचत आहात व शुद्ध गझल रचत आहात ही गोष्ट सगळ्यांनाच खूप आवडत आहेच. मी आपल्याला मैत्रीपुर्ण शुभेच्छा देतो.

=======================================================

जे चांगले आहेत त्यांच्याशी असावे चांगले
हे सूत्रही थोडे चुकीचे वाटते हल्ली मला

- 'बेफिकीर'!

<<<धन्यवाद मंडळी....
मी इतके दिवस गझलेच्या वाटेला गेलो नव्हतो. इतका उशीर का केला मी याचे मलाच आश्चर्य वाटतेय. उगाचच एक भिती होती मनात. नाही जमले तर तज्ञ मंडळी काय म्हणतील? पण इथे उलट अनुभव येतोय. इथे कोणीही नावे ठेवत नाहीये तर चुका सुधारण्याचे मार्ग सांगताहेत.
खुप खुप आभार सगळ्यांचे !! मायबोलीवर येणे सार्थक झाल्यासारखे वाटतेय आता.

>>>
विशाल,
ही रुबाई तुझ्याचसाठी-

ना कुणी एककल्ली
ही नसे श्वानगल्ली
हे सख्या, सोड चिंता
लाव तू प्रेमवल्ली !

रामकुमार

बेफिकीर,
>>>आता आपण असे म्हणू शकता की 'तुम्ही हे स्वतःवर उगीचच ओढवून घेत आहात व बेफिकीरी या शब्दाचा अर्थ काळजीच न करणे असा असल्यामुळे मी विशाल यांना तसे लिहीले'. 'त्यांनी भरीच्या शब्दांची काळजीच केली नाही' असे मला म्हणायचे होते असे आपण जरूर म्हणू शकाल. <<<

म्हणायचेय काय? तसेच आहे. हा मुद्दा लिहिताना मीसुद्धा तुम्ही जसा विचार केलात तसाच विचार केला होता की याचा असाही अर्थ होवू शकेल. पण त्यासाठी मला जे लिहायचे आहे ते मी का टाळावे?
उद्या तुम्ही असेही म्हणाल की तुमचे टोपणनाव 'बेफिकीर' असल्याने ही गझल तुमच्यावरच लिहिली आहे म्हणून...

.... आणि या संकेतस्थळावर आणखी कोणाला असे वाटले असल्यास त्याने स्पष्टपणे सांगावे.

(... आणि बेफिकीर, तुम्ही जे वैयक्तिक वैयक्तिक म्हणता आहात त्याबद्दल मी इथे आत्ता बोलत नाही. पण वेळ आल्यावर जरूर बोलेन. माझ्यादृष्टीने आत्ता ती योग्य वेळ नाही.)

.... आणि हो

ते गोटीबंद वगैरेबद्दल .....सध्या नको! कारण आत्ता माझा गोट्या खेळायचा अजिबात मूड नाहीये! Lol

काही हरकत नाही, मूड होईल तेव्हा खेळा, बघायला नक्की येईन! Lol

आपण अनेक वर्षे म्हणत आहात की 'वेळ आली की मी बोलेन', हे कशाबद्दल म्हणता काही समजत नाही. असो, अवांतर प्रतिसादाबद्दल दिलगीर!

-'बेफिकीर'!

इमानी मतीला नको तो 'हवाला'
हवी झोप थोडी सुखाची जिवाला>> छान आहे हे.. Happy

बेफिकीरजी,
गझल बिनधास्त वाटली ! >>>>

तुम्हाला विशालजी असे म्हणायचे आहे का ? का विशाल आता बेफिकीर झाले ? मग बेफिकिर कुठे गेले ? मग बेफिकिरांना आता विशाल म्हणायचे का ? Biggrin

ही एक गझल आहे, गझल रचण्यासाठी काही 'किमान' 'बौद्धिक' परिश्रम आवश्यक असतात. येथे राजकारण आणणे (म्हणजे गझलेच्या बाबतीत राजकारण आणणे) (आता 'हे गझलेच्या बाबतीत नव्हतेच' असे म्हणायला वाव आहे म्हणा) (तरीही गझलेवरच्या प्रतिसादांमध्ये राजकारण आणणे) हे अयोग्य आहे असे माझे (पुन्हा) 'वैयक्तीक' मत आहे.