वळु

Submitted by mansmi18 on 23 June, 2008 - 20:14

नुकताच "वळु" पाहिला.

मला काही खास वाटला नाही. अगदी खुप कौतुक होण्यासारखे यात काय होते ते कळले नाही.

दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावन्त, भारती आचरेकर, मोहन आगाशे यासारखे दिग्गज कलाकार फुकट घालवले गेले असे माझे मत आहे. मी हा चित्रपट आवडावा या तयारीने बसलो होतो. असे सगळीकडे डोक्यावर घेतलेले चित्रपट पाहताना ते आवडायचे प्रेशर असते. पण प्रयत्न करुनही मला हा चित्रपट काही विशेश वाटला नाही.

कोणीतरी पोस्ट केले आहे कि "वळुचे सगळीकडे कौतुक होत असताना इकडे तोंड आंबट"
पण एखादा चित्रपट एवढा आवडला नाही तर सगळे म्हणतात म्हणुन चांगला म्हणायचा का?

कोणी सांगेल का हा चित्रपट एवढा ग्रेट कुठल्या द्रूष्टीने आहे?(कदाचित आम्हाला कळला नाही??)

धन्यवाद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी वळू पाहिला, पाहताना एंजॉय केला. चित्रपटाला कथा अशी नाही. पण एक एक पात्र अतिशय चांगल्या पद्धतीने रेखाटले गेले आहे आणि पडद्यावर मांडले गेले आहे. उदा. अमृता सुभाषचे पात्र. तसेच सतिश तारे चे पात्र. अशा व्यक्ती मी माझ्या गावी पाहिल्या आहेत. मुख्य म्हणजे चित्रपट पाहताना मला असे वाटले नाही की मी प्रभावळकरांना किंवा अमृता सुभाशला पहात आहे. असे वाटले की ती प्रत्यक्षातली माणसेच पडाद्यावर दिसत आहेत.

Pages