वळु

Submitted by mansmi18 on 23 June, 2008 - 20:14

नुकताच "वळु" पाहिला.

मला काही खास वाटला नाही. अगदी खुप कौतुक होण्यासारखे यात काय होते ते कळले नाही.

दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावन्त, भारती आचरेकर, मोहन आगाशे यासारखे दिग्गज कलाकार फुकट घालवले गेले असे माझे मत आहे. मी हा चित्रपट आवडावा या तयारीने बसलो होतो. असे सगळीकडे डोक्यावर घेतलेले चित्रपट पाहताना ते आवडायचे प्रेशर असते. पण प्रयत्न करुनही मला हा चित्रपट काही विशेश वाटला नाही.

कोणीतरी पोस्ट केले आहे कि "वळुचे सगळीकडे कौतुक होत असताना इकडे तोंड आंबट"
पण एखादा चित्रपट एवढा आवडला नाही तर सगळे म्हणतात म्हणुन चांगला म्हणायचा का?

कोणी सांगेल का हा चित्रपट एवढा ग्रेट कुठल्या द्रूष्टीने आहे?(कदाचित आम्हाला कळला नाही??)

धन्यवाद.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सहमत..हाईपच्या मानाने बोर वाटला.. माजलेला बैल खूप शांत वाटतो.. अमृता सुभाष्,प्रभावळकरांचे काह्ही काम नव्हते, जेव्हढं आधी म्हटलं आहे, की वळू पकडायला अवघड जाईल वगैरे प्रत्यक्ष पकडताना काही दिसले नाही.. इझिली ५-१० पावलांवरून इंजेक्षन मारलं.. आणि तो डुरक्या , एव्हढा सगळा लोंढा आवाज करत येत असताना शांत पणे जवळ यायची वाट पाहत थांबला होत !! ई.ई...
कदाचित आवडाय्च्या अपेक्षेने बसल्यामुळे मेजर अपेक्षाभंग झाला! .. लक्ष्याचे चित्रपट समोर ठेऊन जर बघितला असता तर आवडला असता कदाचित.. नाही आवडला..
जिवन्याचं काम खूप आवडलं मात्र..

खरय. डुरक्याचे काम खरेतर निट झालेच नाही. तो माजलेला वळु न वाटता उगीच बांधलेला बैल वाटला. पण तो बैल आहे मस्त. लांबनरुंद. काही असह्य पिजे मारलेत, खास करुन दिलीप प्रभावळकरला वाया घातलय. आणि सारख अतुल चे ते शिट शिट डोक्यात जात. ईंग्रजाळलेला दाखवायला शिव्याच तोंडात द्यावात असे का बर वाटत लोकांना.
एकंदरीत तो पिक्चर बरा आहे ईतकच. अति चांगला (हाईप) मात्र नक्कीच नाही.

तो सिनेमा फक्त त्या वळूबद्दल नाहीच आहे. तो वळू म्हणजे एक प्रतीक आहे. प्रत्येकाच्या मनात असलेल्या एका मुक्त स्वैर आचरण करायच्या इच्छेचं! त्यातली पात्रं जर तुम्ही नीट पाहिली तर कळेल..आबा आणि आण्णांमधली उगीच असलेली चढाओढ, डॉ़क्युमेंटरी काढताना प्रत्येकाची आपलंच घोडं पुढे दामटण्याची घाई.. शेवट अमॄता सुभाष चं तिच्या हीरो बरोबर पळून जाणं हे त्याचंच एक चिन्ह होतं. आणि मुळात अतुलला हे काम मनापासून करायचंच नसते तो ते एक अतिशय फालतू काम समजून जातो. पण गावात पोहोचल्यावर त्याला जे माणसांच्या निरनिराळ्या स्वभावाचे कंगोरे दिसतात त्यामुळे त्याच्या कडक स्वभावात आलेला मॄदूभाव हे त्याच्या गावात येताना असलेल्या आणि जाताना असलेल्या expressions वरून स्पष्ट होते.
दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावन्त, भारती आचरेकर, मोहन आगाशे यासारखे दिग्गज कलाकार फुकट घालवले गेले >>>>
मला असं अजिबात वाटत नाही, उलट कोणतीही भूमिका इतकी सहज करून दाखवून लोकांना आपण काही विशेष केले आहे असे न वाटणे यात तर त्यांचे अभिनय सामर्थ्य आहे!! अवघाची संसार मधली आसावरी आणि वळू मधली अमॄता सुभाष यात जमीन आस्मानाचा फरक आहे.पण त्या दोघीही भावतात मनाला!
मला तर हा सिनेमा खूप आवडला. ग्रामीण भागाचे आणि त्यांच्या समस्यांचे इतके हलके फुलके दर्शन क्वचितच पाहयला मिळते.
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

एखादा चित्रपट आवडणं अथवा न आवडणं ही अतिशय वैयक्तिक बाब आहे, अन ती अनेक गोष्टींवर अवलंबून असते. उदा. आवडीचा नट, अथवा गाणी , किंवा उताम पटकथा, अभिनय इ.
मात्र चित्रपट आवडला/न आवडला याची कारणं निदान स्वतःला तरी पटण्यासारखी असावीत.'वळू' हा एक मराठी चित्रपट आहे. त्यामुळे 'ज्युरासिक पार्क' किंवा 'किंगकाँग' मध्ये दाखवतात तसं माजलेला बैल सगळं काही उध्वस्त करतो आहे, आणि मग अतुल कुलकर्णी समस्त कुसावडेकरांची सुटका करतो अशी जर अपेक्षा असेल, तर मग सगळंच बोंबललं. मनेका गांधी, Animal Welfare Board इ. प्रकार अस्तित्वात असतात, SFX वापरण्याइतका मराठी सिनेमा श्रीमंत नाही. खरा माजलेला बैल आणि प्रभावळकर, चंद्रकांत गोखले एका फ्रेममध्ये असणं शक्य नाही.
एखाद्या कलाकाराचा चित्रपटावरील प्रभाव आणि भूमिकेची लांबी यांचा अजिबात संबंध नसतो. आणि जर तो रजनीकांत/कमल हसन/मोहनलाल यांचा चित्रपट नसेल तर प्रेक्षकांचाही त्याच्याशी संबंध नसावा.
प्रभावळकर, सावंत, आचरेकर यांच्या अभिनयाविषयी तक्रार आहे का? नाही.
त्यांच्या भूमिकांत ते शोभत नाहीत का? शोभतात. उलट धमाल करतात.
मग तक्रार कशाबद्दल?
'तिथे प्रभावळकर कशाला, कोणीही चाललं असतं', असं मागे मी इथेच वाचलं होतं. हे 'कोणीही' म्हणजे कोण? या चित्रपटातील प्रत्येक कलाकार एक व्यक्तिरेखा होऊनच वावरतो. देहबोली, बोलण्याची ग्रामीण ढब हे सगळं अस्सल आहे. त्यामुळे सिनेमा संपल्यावर ही सगळी मंडळी व्यवस्थित लक्षात राहतात. आणि तेही भटजी, तानी, संपी, आबा, फॉरेष्ट अशा रूपातच. सिनेमाच्या सुरूवातीला 'बायामानसाचे फोटू नसतात काढायचे' म्हणणार्‍या आजीबाई असोत किंवा फॉरेष्टची वेंधळी सेक्रेटरी, सगळीजणं आपापल्या भूमिकेत एकदम फिट्ट.
'वळू'तली माणसं प्रत्याक्षातही असतातच की. मिरासदार, माडगूळकर, शंकर पाटील यांच्या पुस्तकांतून ते भेटतात. किंवा आपल्या आसपास वावरत असतात. माझ्या लहानपणी आजी आम्हाला तिच्या गावी घेऊन जायची. विदर्भातलं एक अतिशय छोटं खेडं. तिथे संध्याकाळी सात-साडे सातला जेवणं झाली की माझ्या पणजोबांकडे अड्डा जमायचा. बरेचसे गावकरी असायचे. गावातली भांडणं, उखाळ्यापाखाळ्या अशी निर्मळ चर्चा चालायची. आणि 'गोदरी' हा विषय अधूनमधून असायचाच. 'गोदरी' म्हणजे हागणदारी. आजीही आम्हाला गोदरीतल्या गमतीजमती सांगायची. त्यामुळे 'वळू'त येणारे हे संदर्भ मला अजिबात खटकले नाहीत.
या चित्रपटातली भाषासुद्धा तितकीच अस्सल आहे. शब्द खाली पडू न देणे, 'वशट' सारखे खास शब्द, मधूनच बेमालूम घूसखोरी करणारे इंग्रजी शब्द, त्या शब्दांवर ग्रामीण मराठीचा संस्कार झाल्याने तयार होणारे भन्नाट शब्द, असं मिश्रण असलेली अतिशय अकृत्रिम भाषा. कदाचित मुंबई म्हणजेच महाराष्ट्र आणि पुणेरी मराठी हीच प्रमाण मराठी असं समजणार्‍यांना ही भाषा पचनी पडणार नाही. पण संवाद अतिशय उत्तम आहेत, हे खरं.
हत्ती-मुंगीचे विनोद, 'जाऊबाई, जाते-नका बाई जाऊ' यांसारखे संवाद म्हणजे पीजे, असा माझा समज आहे. अशोक सराफ, लक्ष्या, जाधव्-अनासपूरे-नार्वेकर यांच्या चित्रपटात हा प्रकार आढळतो. 'वळू'मध्ये 'पीजे' कुठे हे मला हा चित्रपट तीनदा बघूनही लक्षात आलेले नाही. यात कुठेही ओढूनताणून केलेले, पांचट अथवा अश्लील विनोद नाहीत.
'शीट' या शब्दाचा आणि इंग्रजाळलेलं असण्याचा संबंध नाही. जसं 'च्यायला' तसं 'शीट'. वैताग आला की अपसूक तोंडातून 'शीट' हा शब्द बाहेर पडतो. कुणालाही ही शिवी वाटणार नाही. हल्ली ५-६ वर्षांच्या मुलांच्या तोंडी फकारान्त शब्द असतात. ते शब्दसुद्धा हल्ली त्यांचा 'शिवी' हा दर्जा गमावून बसले आहेत.
सगळ्यात वाईट म्हणजे या चित्रपटातून संदेश शोधत राहणे. नाही ना दिसला तुम्हाला 'संदेश', मग असू द्या. नुसता विनोदी चित्रपट म्हणून एंजॉय करा. माझ्या एका मित्राने अतुल कुलकर्णीची मुलाखत घेतली होती. त्यानेसुद्धा हेच सांगितलं. त्यांना 'एक ऑफिसर बैल पकडतो' या कथासूत्रावर सिनेमा काढायचा होता. यात संदेश कसला आणि 'पटकथेचं वांगं' कसं काय झालं बुवा?
उत्तम छायाचित्रण (जे फक्त पालेकर आणि सुमित्रा भावेंच्याच सिनेमात दिसतं), celtic प्रभाव असणारं सुरेख पार्श्वसंगीत, आणि अतिशय प्रगल्भ अशी सिनेमॅटिक भाषा. सुंदर फ्रेम्स.
मला 'वळू' आवडला. 'कैरी', 'ध्यासपर्व', 'वास्तुपुरूष', 'नितळ', 'टिंग्या' इतकाच आवडला. माझ्या काही मित्रांना 'पार्टनर', 'अपना सपना मनी मनी', 'क्या कूल है हम' आवडले होते. माझ्या एका मैत्रिणीने 'मै प्रेम की दिवानी हूं' ८ वेळा बघितला आहे. सगळा आपखुषीचा मामला. तीन तास आनंदात गेले, डोक्याला काही खाद्य मिळालं की बास्स.

पूर्ण सहमत चिनॉक्स!! मस्त! मला आणि तुला बहुधा एकच सांगायचं होतं ..
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...

चिनॉक्स : तुझ्या पोस्टस् शी पुर्णपणे सहमत. मी सुद्धा २-३ वेळा चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहिला आणि प्रत्येक वेळेस मला आवडला. मला पण असं कुठेच जाणवलं नाही, की ओढून ताणून कुठलाही प्रसंग चितारला आहे. in fact सध्याच्या trend नुसार, एक दोन ठिकाणी गाणी सुद्धा घुसडणे शक्य होते, पण ते केलेलं नाहिये. अतुल, दिलिप प्रभावळकर, निर्मिती सावंत, मोहन आगाशे, भारती आचरेकर ह्या नावाजलेल्या कलाकारांनी आपापल्या भुमिका (मग त्या कितीही छोट्या का असेना) खुपच मन लावून केल्याचं जाणवतं.

  ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
  Dream is not what you see in sleep
  But it is the thing which does not let you sleep

  विनोदी चित्रपट बघताना लोकान्ची ग.ब.लो. हसण्याची अपेक्शा असते, ती वळु पुर्ण करत नाही.
  किम्बहुना दिग्दर्शकालाही ते अपेक्शित नसावे.पण बर्‍याचजणाना त्यामुळे पैसे वसुल झाले असे वाटत नाही.
  ग्रामीण लोकान्च्या स्वभावातील बेरकीपणा आणि साधेपणामुळे जी काही विनोद निर्मिती होते ती सरदार jokes types नसते. त्यामुळे मग सगळ्यानाच विनोदी वाटेल असे नाही .कारण corelate नसेल करता येत तर पु.ल.चे विनोदही नाही हसवु शकत्(माझ्या काही उच्चभ्रु मैत्रीणी आहेत ,त्याना खरच कळत नाहीत नक्कि का आणि कुठे हसायचे ,कारण typical middle class लोकच corelate करु शकतात त्या लिखणाशी ) .
  मी पहिल्यान्दा पाहिला त्या आधी इथले परिक्शण वाचुन गेले होते, त्यामुळे त्याच चुका शोधत बसले.
  पण दुसर्‍यान्दा बघताना मात्र त्यातला collage effect जाणवला आणि जास्त आवडला.इथे बरेच जणाना documetryche बोलणे नाटकी वाटले, पण शहरी लोक गावात गेले की असच जरा जास्त शुध्द बोलतात प्रभाव पाडण्यासाठी. त्यामुळे तेही फारसे खटकले नाही

  माझ्या एका मित्राने अतुल कुलकर्णीची मुलाखत घेतली होती. त्यानेसुद्धा हेच सांगितलं. त्यांना 'एक ऑफिसर बैल पकडतो' या कथासूत्रावर सिनेमा काढायचा होता. यात संदेश कसला आणि 'पटकथेचं वांगं' कसं काय झालं बुवा? >>>
  चिन्मय,
  अगदी ह्याच कारणामुळे मी बघीतला. त्यातुन संदेश बिंदेश अशी अपेक्षा ठेवलीच न्हवती आणि तिथेच जमला नाही. तो बैल वळु वाटतच नाही. तो बारच फुसका वाटतो त्यामुळे खास करुन पकडन्याचे सिन्स बघताना निराशा झाली लोकांची ईतकेच. निदान माझी तर झालीच. ४ पावला वर बैल दोन वेळा असतो आणि लोक घाबरतात हे पटत नाही आणि फक्त तेवढ्याच सिन्स साठी.
  बाकी चित्रपट म्हणुन तो चांगलाच आहे. मी ही दोन वेळा बघीतलाय. भाषा, प्रसंगातुन काही उच्च विनोद, चपखल पात्र, ग्रामीन ढंग, राजकारण, मधुर संगीत हे सर्व मस्तच आहे यात वाद नाही त्यामुळेच दुसरेंदा पाहीला.

  वळु हा चित्रपट त्या बैलावर नसुन साधारण मावळ प्रातांतल्या जीवनाबद्दल आहे.
  बैल हा फक्त नावापुरता चित्रपटात आहे. उगाच आपल गावकडे जावुन आल्यासारखे वाटते चित्रपट बघुन झाल्यावर. त्यामुळे चांगला आहे.
  .
  .
  .
  .
  टिंग्या ईतका नाही आवडला, एकही वाक्य धड मराठीत नाही हा भला मोठा drawback. एकतर अती गांवडळ नाहीतर अती ब्राम्हणी.
  चित्रपट संपल्यावर एखाद्याचे मराठी खराब व्हायचे.

  म्हणजे नेमक काय माणसा? वरही वाचले की वळु प्रतिक आहे? आणि जिवना बद्दल काय दाखवल आहे हे सांगशिल का?

  मग वळु पकडायला तो ऑफीसर का जातो? ऑफीसर वापस गेल्यावर माणसांमधील "वळु" जातो काय? तो प्रतिकच असेल तर त्याला कसे पकडले जात?

  की पिक्चर आवडल्यामुळे आपणच त्याला प्रतिक माणत आहोत?

  माझ्यामते तरी ते प्रतिक नाही तर खरा वळु म्ह्णजे बैलच आहे व त्याला पकडताना कशी धांदल / गडबड उडते ते त्या पिक्चर मध्ये दिसत कारण सर्व प्रसंग त्या अनुषंगानेच आहेत, ईकडचा तिकडचा फाटपसारा नाही त्यामुळे ते प्रतिक आहे / बैलाला महत्व नाही हे मला कळल नाही.

  ऐडीट - गावाचे जिवन दिसते म्हणुन चांगला आहे असा तुला म्हणायच का? कारण गावतले जिवन टिंग्यात जास्त चांगले दाखवीले आहे.

  --------------------
  Pil Seung

  माणसा, तु कुठे बघितलास वळु ? मला पण बघायचा आहे.

  नाही हो, चित्रपटातुन दिग्दर्शकाला काही उपदेश द्यायचा नाहीय. आता कसे सांगु.
  .
  Apologies for english,
  Its movie without any moral, there is no story.
  Have you read that story about counting monkeys instead of donkeys. there was no moral for that story, it was simple a short story.
  its a peek in rular life; which gives you glimps of some rituals, thoughts from rular life. valu is also similar to that story.
  or for that matter my short story पैशाचे भुत.
  .
  .
  .
  टिंग्या कदाचीत विदर्भातील लोकांना आपला वाटेल, मावळातल्या लोकांना नाही.
  .
  सिंड्रेला एका मित्राकडुन मिळाला, देईल तुला नंतर.

  ह्म्म.. वरचा उहापोह वाचला.. केदारजोशीची मतं मला पटत आहेत. वरवर पाहता, हा पिक्चर फक्त माजलेला बैल, आणि त्याला पकडायला गेलेला ऑफिसर इतकाच आहे.. माणसातील वळु वृत्ती वगैरे संदेश बिंदेश द्यायचा असेल तर निदान मला तरी काही ते झेपलं नाही.. किती लोकांनी 'वळू' हा प्रतिक म्हणून पाहीला आणि त्यांना त्या चित्रपटात त्या प्रव्रुत्तीवर काय म्हणायचे आहे, ते पूर्णपणे कळले? कदाचित कळलेही असेल.. मला ते प्रतिक वगैरे प्रकार कन्फ्युजिंग वाटला, आणि पिक्चर पाहताना फक्त बैल, आणि त्याला पकडायचे ऑफिसरचे प्रयत्न आणि युक्ती इतकंच दिसतं!

  आणि तसं असेल तर ते मला आवडलं नाही.. वळूला पकडण्याचा सीनच आवडला नाही.. का ते वर लिहीलेच आहे. आणि हो म्हणूनच मला डॉक्युमेंट्री हा प्रकार ओढूनताणून आणलेला वाटतो.. मूळ पिक्चर बैल पकडण्यावर आहे, त्याच्या डॉक्युमेंट्री वर नाही... मी मराठी पिक्चर कडूनच काय हिंदी कडूनही ज्युरासिक पार्क वगैरे सारख्याची अपेक्षा करणार नाही.. पण हा 'माजलेला' बैल आहे!! निदान माजला आहे हे तरी कळावं!? नुस्ताच पळत गेला, म्हणजे माजला असं होत नसावं.. उदा. जोधा अकबर मधला हत्ती थोड्याफार प्रामाणात तरी माजलेला आहे हे कळते.. डोळ्यातले हिंस्त्र भाव वगैरे.. तसे नक्कीच दाखवता आले असते..

  आणी अजुन एक.. मला तरी प्रभावळकर्,निर्मिती सावंत, अमृता सुभाष या पिक्चरमधे आवडले नाहीत! ते धमाल करतात असे तर अजिबातच वाटले नाही.. प्रभावळकर हे पुजारी दाखवलेत.. 'धर्माच्या' नावाने सोडलेल्या बैलाबद्द्ल त्यांचे मत काय, तर त्यांच्या पोटाच्या प्रॉब्लेमशीच रिलेटेड!! किती किळसवाणा प्रकार आहे.. सतत लोटा घेऊन चाललाय.. मला ते ही विनोदी वाटलं नाही, आणि आवडलंही नाही...

  असो... ही माझी मतं आहेत.. पिक्चर 'बघायला' चांगला वाटतो(सिनेमाटोग्राफी म्हणायचं का त्याला..?) , गावातलं वातावरण, जिवन्याचे काम, तो मोहन आगाशे च्या विरूद्ध असणारा त्याचे काम ई. गोष्टी मला आवडल्या.. तरीही हाईपच्या मानाने पिक्चर बोर !

  >>प्रभावळकर, सावंत, आचरेकर यांच्या अभिनयाविषयी तक्रार आहे का? नाही.
  त्यांच्या भूमिकांत ते शोभत नाहीत का? शोभतात. उलट धमाल करतात.
  मग तक्रार कशाबद्दल?<<
  अजिबात शोभत नाहीत. धमाल बिमाल तर मुळीच वाटत नाहीत. इथे कुणी तक्रार करत नाहीये. पण आवडलं नाही तर आवडलं नाही हेच म्हणणार. त्यावर तक्रार करून नका म्हणायचा कुणालाच अधिकार नाही.
  >>'तिथे प्रभावळकर कशाला, कोणीही चाललं असतं', असं मागे मी इथेच वाचलं होतं. हे 'कोणीही' म्हणजे कोण?<<
  कोणीही याचा अर्थ सेलेबल नाव नसलेला कुणीही नवशिक्या नट. पादण्याचे हावभाव आणि लोटा घेउन धावत सुटणे यात कुणाला प्रचंड विनोद वाटत असेल तर वाटो. पण हे करण्यासाठी प्रभावळकरांच्या सारख्या मोठ्या नटाला वाया घालवायची काहीच गरज नव्हती. नुसतीच मोठी नावं घेऊन त्यांच्या कामाला काही न्याय मिळणार नसेल तर एकतर दिग्दर्शकाला त्यांचा उपयोग करून घेता आला नाही किंवा केवळ मोठ्या नावांचा सोस(पब्लिसिटीसाठी बरं पडतं!) म्हणून ही नावं आहेत असं समजायला काही हरकत नाही. हे पटत नाही. तर पटत नाही.

  >>यात संदेश कसला आणि 'पटकथेचं वांगं' कसं काय झालं बुवा?<<
  ते कसं झालं ह्याबद्दल बर्‍यापैकी स्पष्टीकरण मी माझ्या मूळ लेखात दिलं आहेच. अजून हवं असेल तर सांगते. संदेश बिंदेशाबद्दल मी काही बोललेलेही नाहीये आणि ती अपेक्षाही नाहीये. पण दिग्दर्शकाचा फोकस काय आहे? त्याला मेटाफोर (रूपक) म्हणून वळू वापरायचा आहे की धम्माल ग्रामीण कॉमेडी करायची आहे हेच कळत नाहीये. वळू हा गावाचा देवाला सोडलेला बैल असतो. बाकीचे बैल खच्ची करून शेतावर कामाला असतात. वळू हा ब्रिडिंगसाठी सोडलेला बैल असतो. आणि तो माजणं. त्याचा उपद्रव होणं. त्यामुळे सगळं वातावरण त्याच्याविरोधी होणं. गावातली एक म्हातारी आणि एक वेडी यांनी वळूच्या बाजूनी असणं ही सगळी परिस्थिती एक खूप मोठं रूपक बनून येउ शकते. एका सीनमधे आपल्याला वाटतं की हे रूपक घेऊन काहीतरी भाष्य केलं जाणारे किंवा रूपकाच्या माध्यमातून सद्यपरिस्थितीला समांतर केलं जाणार आहे. ही मुळातली अपेक्षा नाही. चित्रपटातली दृश्येच ही अपेक्षा निर्माण करतात. पण पुढे याचं काहीच होत नाही. हे सगळे धागेदोरे तसेच सुटून जातात. आणि आपल्या हातात toilet jokes वर हसणं(ओढूनताणून) एवढंच उरतं. तिथेही ते कमी पडतात म्हणजे अस्सल गावरान कॉमेडी होऊ शकत नाही (ही अपेक्षा पण चित्रपटामुळेच निर्माण होते). तिथेही हात राखून गोष्टी केलेल्या दिसतात. मग हा प्रश्न येतो की या उमेश ला, गिरिश ला नक्की काय करायचं होतं? परिस्थितीशी समांतर रूपक की धम्माल ग्रामीण कॉमेडी. कारण या दोन्ही डगरींवर पाय ठेवून ना धड इकडे ना धड तिकडे अशी सिनेमाची गत झालीये. साधारण यालाच 'पटकथेचं वांगं' म्हणतात आमच्या भाषेत.

  टिंगल शब्द चुकीचा होता. मान्य. त्याबद्दल क्षमस्व पण तुमच्या संपूर्ण पोस्टचा सूर वळू या सिनेमाबद्दल 'आवडला नाही' या शिर्षकाखाली मत व्यक्त करणे हे कसे चुकीचे आहे असाच जाणवतो. ते कशासाठी ते कळले नाही. तुम्हाला आवडला तर का आवडला याबद्दल लिहा. कदाचित एखादा नवीन मुद्दा मला लक्षात येईलही. मला आवडला नाही तर का आवडला नाही हे मी लिहिले आहे. ते मत चुकीचे आहे आणि त्यामुळे खरंतर चित्रपट चांगलाच आहे हे दाखवायचा अट्टाहास का?

  दुसरं असं की वळूबद्दल इतकं बोलण्याचं कारण म्हणजे 'गिरणी'वाल्या उमेशने ही फिल्म केलेली असते. आंडूपांडूने नाही.
  अजून एक नक्की की या सिनेमामुळे मराठी सिनेमात व्यवसायाच्या पातळीवर काही नवे पायंडे पडले. जे स्वागतार्ह आहेतच. आणि ही व्यवसायाची संधी 'काळूबाईच्या नावानं चांगभलं' ते 'माहेरची साडी' असल्या कोणाच्या पदरात न पडता 'वळू'च्या पदरात पडली हि सुद्धा चांगली गोष्ट आहे पण तरी मूळ चित्रपटाबद्दल जे मत आहे ते आहेच.

  -नी
  http://saaneedhapa.googlepages.com/home

  दुसरं असं की वळूबद्दल इतकं बोलण्याचं कारण म्हणजे 'गिरणी'वाल्या उमेशने ही फिल्म केलेली असते. आंडूपांडूने नाही.
  हे ही खरे आहे पण कपॅसिटीचे लोकही सगळ्या उड्या सारख्याच उंचीच्या मारतात असेही नाही. त्याला अनेक कारणे असू शकतात. विजय आनन्द सारखा जबरदस्त दिग्दर्शक काही वेळा इतके फडतूस पिक्चर देई की ते बहुद्हा तिसर्‍या असिस्टन्टने दिग्दर्शित केले असावेत असे वाटे. सुभाष घई सध्या अशाच पाट्या टाकतोय्.डेविड लीन अन स्पिलबर्ग म्हणजे केवळ अत्त्युच्च दर्जा एवढे रेप्युटेशन हे ठेवू शकत नाहीत हाच त्याचा अर्थ....

  नमस्कार,

  वळु तितकासा खास न वाटलेला मी एकटाच नाही हे बघुन जरा बर वाटले.:)

  हा वाईट चित्रपट आहे असे मी म्हटले नाही. एखादा चित्रपट जेव्हा डोक्यावर घेतला जातो तेव्हा तो का असा प्रश्न मनात उभा राहणे साहजिकच आहे.
  प्रत्येकाच्या मनात वळु असतो असे कहितरि स्पष्टीकरण वाचले वर! नाही झेपले बुवा आपल्याला.

  जाउ द्या..या चित्रपटाने एका मराठी दिग्दर्शकाला मोठया बानरचे दोन चित्रपट मिळाले ना..आपल्याला त्यातच समाधानः) सॉरी दोन नाही तीन ..अमिताभचा चित्रपट सुद्धा मिळाला आहे..

  धन्यवाद!

  'वळू'च्या विरोधातही काही आहेत, सडेतोड परीक्षण करीत आहेत, हे बघून खरोखर बरं वाटलं. अशा सजग लोकांमुळे फक्त 'अमिताभ' आहे, म्हणून घेतला डोक्यावर- असं तरी कमीत कमी यापुढे होणार नाही. अन अशा लोकांमुळेच सिनेमावाल्यांवर वचक राहून वाटेल ते डोक्यावर ते आता थापणारही नाहीत.
  पण जरा थोडा वेगळा विचार केला तर? मिरासदारांच्या अन शंकर पाटलांच्या कथा आपण सर्वांनी वाचल्याच आहेत. मला असं वाटतं, की या कथांमधली पात्रे हेच खरे महाराष्ट्राचे प्रतिनिधी आहेत. हाच वर्ग बहूसंख्य आहे, अन या वर्गाला बुध्दीवादी लोक काय विचार करतात, हे समजण्याची अजिबात शक्यता नाही. त्याचं राहणीमान, बोलण्याची - रागलोभ दाखविण्याची पध्दत पुर्ण वेगळी आहे. या पध्दतींमध्ये अनेक वेळा आपल्याला घाणेरडे वाटतील, असे शब्द, हावभाव इ. आहेत. पण कोणाला कसेही वाटले तरी, तीच त्यांची पध्दत आहे.
  त्यांच्या संथ, अन काहीही फारसे न घडणार्‍या जीवनामध्ये अगदी अ आणि अ गोष्टीचाही मोठा इश्यू होऊ शकतो. कोसलातला नायक गावाकडे आल्यानंतर नेमाड्यांनी तिथलं केलेलं वर्णन अतिशय प्रातिनिधिक आहे. गावात नवीन आलेली जत्रा, प्रचारफेरी, नवीन मास्तर, अनाहूत वेडा, नवीन पाहूणा यामूळेही गावात कशी खळबळ उडते हे वरील सिध्दहस्त लेखकांच्या लेखणीनं दाखवलंच आहे. आणि त्यात काहीही काल्पनिक वाटत नाही, इतक्या वास्तववादी त्या कथा वाटतात.
  वळूची कथाकल्पना हीच आहे. त्यात मुळात वळूच काय पण 'डॉक्यूमेंटरी' ही निमित्तमात्रच आहे. (डॉक्यूमेंटरी वरून आठवलं, 'चकाट्या' मधली 'नवीन रस्ता' ही कथा कुणी वाचली आहे का? अगदी अगदी!). त्यानिमित्ताने गावाकडचा बेरकीपणा, गावंढळपणा, नवीन गोष्टीसाठी खुप उत्साहित होण्याचा प्रकार, एकमेकांची उणीदूणी हेरून प्रसंग आला की (नाही आला तरी ओढून-ताणून!) बाहेर काढणे, सरपंचासारख्या व्यक्तीने आपला 'नेहमीच' आब राहण्यासाठी केलेल्या हास्यास्पद (आपल्या दृष्टीने) क्रिया, गावातल्या अगदी फालतू कारणासाठी झालेल्या 'हमरीतुमरी' या सर्वांचा 'कोलाज' (हा शब्द वरती कुणीतरी वापरलाय.. छान वापरलाय!) उमेश-गिरीशने करायचा प्रयत्न केलाय, असं मला वाटतं.
  प्रभावळकर काय, आगाशे काय, कुलकर्णी काय, सावंत काय- यांच्याजागी कुणीही असतं तर काय झालं असतं माहिती नाही. पण त्यांच्या अस्तित्वामुळे या ग्रामीण कथेला जरा झुकतं माप मिळालंय, हे खोटं का? अन त्याच्या संपन्न अनुभवाचा वळूला फायदाच तसा झालेला. (आठवा- प्रभावळ्करांचे देवळातले प्रसाद देण्यासाठी 'फारेश्ट इकडे या' हे सांगणे- हे उदाहरणादाखल, पण अशा बर्‍याच जागा सांगता येतील.) अन यानिमित्ताने 'साडी अन पीजे' मध्ये अडकलेल्या मराठी सिनेमाला वेगळं वळण लागेल असं वाटत नाही? 'वजीर' किंवा 'श्वास' मुळे जशी शक्यता निर्माण झाली होती तशी?
  मिरासदार, माडगूळ्कर, शंकर पाटील यांच्या कथांत दिसणार्‍या सशक्त मराठी नायकाच्या ऐवजी पांचट विनोद आम्हाला मराठी सिनेमात बघायला लागतो, अशी तक्रार आम्ही इतके दिवस करीत होतो. आता काय?
  संदेश वगैरे, अन वळू हे प्रत्येकाच्या मनातल्या 'बंडाचे प्रतीक' हेही घडीभर बाजूला ठेवा. पण वरील विचार करता, वळू हा सशक्त सिनेमा आहे हे नक्की..
  अर्थात, हे माझे मत ब्वा!

  वर वाचले की वळू फारच शांत वाटतो. माजलेला वाटत नाही त्यामुळे पकडण्याची दृष्ये जमली नाहीत.
  लोकहो, आमच्या गावात असाच एक माजलेला वळू होता. देवाला सोडलेल्या गायीच्या पोटी जन्मला होता त्यामुळे गळ्यात कधी दावे पडलेच नव्हते. वळूमधल्या वळूपेक्षाही चांगलाच धिप्पाड होता. त्याचाही त्रास वाढला होता. म्हणजे माणसावर शक्यतो धावायचा नाही. पण बैलगाडी चाललेली दिसली कि तो बिथरायचा. मोठी बैलगाडी सहज चाकात शिंग घालून उलटवायचा. मोठी दहशत झाली होती त्याची. शिवाय बैलगाडी उलटवल्यावरही शांतपणे दुसरी कडे निघून जायचा. धावपळ अजिबात नाही. ऐनवेळी गावाच्या शिवरात फिरतानाही शांतपणे फिरायचा. मात्र त्याच्या दहशतीने त्याच्या जवळ कुणी जायचे नाही. अगदी त्याला पकडतानाही तो जवळपास असूनहि त्याच्या अफाट ताकदीमुळे दोन दिवस त्याच्या जवळ कुणी जायला मागत नव्हते. नुसते बाजुबा़जूने राहायचे.
  बाकी वळू मला आवडला. विषेश कथाबिज नसताना गावातील वेगवेगळ्या स्तरांवरील लोकांचे कांगोरे अचूक टिपलेत. हे काम अप्रतिम!!! तोच सिनेमा आहे.

  वळू मध्ये मला फक्त ते गाव, तिथली घरं, अमृता सुभाषचा परिवेष आणि ज्योती सुभाष ची ऍक्टींग.... इतकंच आवडलं.

  वळू मध्ये मला फक्त ते गाव, तिथली घरं, अमृता सुभाषचा परिवेष आणि ज्योती सुभाष ची ऍक्टींग.... इतकंच आवडलं. >>>>>>>>>

  नशीब दक्षिणा तुला काहीतरी आवडलं तरी.... आमचा तर इथले काही रिव्ह्यू वाचून या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम अन फ्रेम तद्दन भिकार असावी असं वाटलं होतं!

  ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------हितगुज दॅट इ़़ज....
  पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
  गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

  आम्ही पण काल पाहीला वळू, साजिराशी सहमत....

  वळु मी पहिल्याच आठवड्यात बघितला होता.... बिल्कुल अपेक्शा न ठेवता गेलेलो कदाचित त्यामुळे असेल खुप आवडला...
  अतुल कुलकर्णी सोडुन बाकी सगळ्यांची काम मस्त झालियत....
  जिवन्या सगळ्यात मस्त!
  मोहन आगाशे आणि नंदू माधव पण जबरदस्त!
  पण सगळ्यात मजा आणतात ते शिवा आणि अम्रुता सुभाष... एकदम टिपिकल!
  त्या शिवाला बघुन तर मला माझा एक मित्र आठवला... एकदम हुबेहुब.... आणि आमच्या सगळ्या कॉमन मित्रांना पण तोच आठवला Happy

  एकुणात आशय वगैरे न शोधता बघितला तर चित्रपट एकदम खुसखुशीत!

  पहिल्या हाफ मध्ये दाखवलेला गाव,
  जिवन्याच कॅरेक्टर आणि तो अभिनेता,
  अमृता सुभाष काहिवेळा (अर्थात तिचे एकुण प्रसंग फारच कमी आहेत म्हणा.)
  हे एवढच आवडल वळुमध्ये.
  पण एकुणातच टिपिकल मराठी चित्रपटापेंक्षा (आणि बर्‍याच सो कॉल्ड विनोदी चित्रपटांपेक्षा) बराच बरा आहे.
  बाकी गाव जस दाखवल आहे त्याला तोड नाही.
  काहि काहि डायलॉग मस्तच. जस कि आबाच्या गटातला एक माणुस जिवन्याकडे जावुन म्हणतो कि आमचा बंब गेला होता गावाला Happy
  दुसरा म्हणजे पाणी आणताना अमृता सुभाष आणि दुसरी अभिनेत्री आहे त्यावेळी ती म्हणते गावात जणु सगळेच माजलेत Happy

  वळु फारच छोटा वाटला राव. Sad
  तो मजबुत हवा होता अजुन. कमीत कमी नंदिबैल असतो तेवढा भव्य तरी हवा होता.
  बाकी ते प्रसंग शुट करणे कठीण होते म्हणुन तेवढ थ्रिल्ल आल नाहि वळु पकडताना.
  कॅरेक्टर्स नीट उभा राहत नाहीत अपवाद जिवन्या. कॅरॅक्टर्सची थोडी गर्दी कमी केली असती तरी चालल असत. सर्वाना न्याय मिळाला असता.
  हे माझ मत झालं.
  कदाचित त्याच्या आधी मी टिन्ग्या पाहिल्याने मी जास्त अपेक्षा ठेवल्या असतील.
  टिन्ग्या जबरा आहे. खुप आवडला.

  माला वळु पाहायचा आहे.पअण यु-त्युब वर तो डीलीटेड दाखावात आहे.
  आजुन कोणत्या साईटस आहेत का?

  मी वळू ३ वेळा पाहिला...........

  मला खुप छान वाटला....
  आणि त्यानंतर घरच्यांना दाखवला,,सगळ्यांना पण आवडला!

  मला ओके वाटला वळु.
  पण सिनेमात वळु खरच माजलेला असतो का?? कारण वळुच्या नावाखाली दाखवलेल्या गोष्टी खर्यातर गावकर्यांनीच केलेल्या दाखवल्यात. त्यामुळे जेव्हा जेव्हा डुरक्या दाखवलाय तेव्हा शांत उभा असलेला दाखवलाय.
  असो.
  सिंड्रेला, देशातुन येताना वळुची सिडी आणल्ये तुला देइन पहायला.

  मला वळु आवडला..
  आशु अन चिनुक्स शी सहमत..

  विनोदी पिक्चर करायचा का डॉक्युमेंटरी या संभ्रमात दिग्दर्शक पडल्यासारखा वाटतो. बाकी गावाकडचं वातावरण आणि संवाद authentic आहेत.

  Pages