माझ्या शिक्षकांच्या लकबी

Submitted by गजानन on 13 March, 2011 - 10:56

आपल्या शिक्षकांच्या गमतीशीर लकबी, सवयी लिहिण्यासाठी हा धागा.

जुन्या मायबोलीवर तो इथे होता. http://www.maayboli.com/hitguj/messages/644/90465.html?1127323309

अ‍ॅडमिनटीम - कृपया या गप्पांच्या पानाचे धाग्यात रुपांतर करावे ही विनंती. या ग्रूपात धागा उघडण्याची सोय मला दिसत नाहीय.
( पण आधी काही धागे उघडलेले दिसताहेत.)

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे इंग्लिशचे सर ( १० वीचे) एक गंमत करायचे... पूर्वीच्या काळच्या मराठी पिक्चरमध्ये हिरो हिरॉइन गाणी म्हणायला उसाच्या फडात पळायचे.. त्यामुळे इंग्लिशच्या धड्यात कुठेही जोडप्याचे नाव आले की सर म्हणायचे.. गेले फडात !

शंकर अँड गौरी.... गेले फडात ! Happy

सर उद्गार चिन्हाला म्हणायचे दंड अँड पिंड ! उद्गारवाचक वाक्य उच्चारुन ते नंतर शेवटी म्हणायचे दंड अँड पिंड..

वॉट ए नाइस गर्ल यु आर.. दंड अँड पिंड ..

गेले फडात आणि दंड अँड पिंड हे कोरसमध्ये असायचे.

ही माझ्या गुरुवर्यांची लकब नाही पण एक सर ह्याबद्दल फेमस होते. मागच्या बेन्चवर बसून टवाळक्या करणार्‍या तीघांच्या ग्रुपला उद्देशून असलेल त्यांच आवडीचं वाक्य म्हणजे "एनी बोथ ऑफ यू थ्री, प्लीज गेटाउट"

दुसरही अत्यंत आवडतं असं की "यू ब्ल्यू शर्ट, प्लीज गेट अप, व्हॉट ईज युअर नेम ? व्हॉटेव्हर इट मे बी, प्लीज गेटाउट" बरं हे वाक्य अजिबात पॉज न घेता. त्यामुळे सर, माय नेम ईज ची जुळवाजुळव करायलाही वेळ नाही मिळायचा. Happy

आमचे एक शिक्षक होते. आम्हाला भूगोल शिकवायचे. ते वर्गात आल्यावर वर्ग शांत असणार. पण मग हळूहळू गलका वाढत जाणार. सर आपल्याच शिकवण्याच्या नादात. सर शिकवताहेत. पोरं आपापसात बोलत आहेत. पोरांचा आवाज हळूहळू वाढत जाणार. तो चांगला मोठा होईपर्यंत सर आपले शिकवतच राहणार. आणि मग एकदम कोणाच्या लक्षातही यायच्या आत चपळाईने आपला लवचिक छडीधारी हात चालवत फटाफट मिळेल तिथे छडीचे चटके मारत सगळ्या वर्गात चक्कर टाकायचे. मग एकदम 'अयाई ऽऽ', 'आई गं ऽऽ', 'स्स ऽऽ' असे आवाज यायचे आणि अर्ध्या मिनिटात वर्ग पुन्हा चिडीचूप शांत व्हायचा. वर्ग आणि सर एकमेकांना काही झालेच नाही असे दाखवत पुन्हा शिकवणे चालू राही. Proud

आम्हाला ईंग्लिशचे सर होते बागल नावाचे, ते वर्गात कोणी विनाकारण आल्तु-फालतु बोलताना दिसल कि दरवेळी १५ मिनीट वगैरे प्रवचन द्यायचे. कि तुमच्या पालकांनी किती कष्ट घेऊन तुम्हाला ईथे पाठवलय आणि तुमच काय चाललय. एकदा त्यांच्या सकाळच्या सत्रातल्या तासाला दोन मुली हसत होत्या मागच्या बेंचवर बसुन तेंव्हा ते म्हणले "हसायला काय झालं? काय मॉर्निंग शो ला आला अहे का?"

आमचे रसायनशास्त्र Theory चे एक प्रोफेसर इतकं रटाळ बोलायचे की वर्गात लक्ष लागायचे नाही (त्यात वर्गातल्या मुली पण बोर होत्या)... त्यामुळे FY वाले विद्यार्थी त्यांची टर उडवत तास घालवायचे.
SY ला हे प्रोफेसर Practical पण घ्यायचे. Practical च्या वेळी मात्र त्या माणसाच्या Chemistry च्या ज्ञानाने सगळे थक्क होत असत. कुठलीही Test fail झाली तर नुसतं Testtube कडे बघून ते नक्की काय चुकलंय ते सांगू शकायचे. मग SY चे विद्यार्थी त्यांच्या तासाला शांतपणे बसून ऐकून घ्यायचे.

TY ला जाईपर्यंत या प्रोफेसरांविषयी इतका आदर वाढलेला असायचा की ते कसंही बोलत असले तरी वर्ग शांत असायचा..

<< कुठलीही Test fail झाली तर नुसतं Testtube कडे बघून ते नक्की काय चुकलंय ते सांगू शकायचे. >>
Test Tube Baby विषयीपण ? Wink

आमचे Chemistry चे सर लॅबमध्ये असताना blowpipe ला गावरान भाषेत जोरात 'फुकणी' म्हणायचे.

"ए, जरा ती फुकणी आण रे इकड...."

9 th pasun aamhala bhumiti..( gometry) sathi sir aale le.. naav tyanche B.N.PATIL.. pan te shikavtana itake banaun shikavat ki aamhi tyanna BANNYA. sir..mhanunach bolaycho..te boltana pan vichitra bolayche...jase ki " eka pratalat ek bindu aahe" he vakya he ase mhanayche.." ek ani akach pratalatil ek ani ekach bindu aahe.."

to EK AANI EKACH ha shabd asa kaahi lakshat rahilaa aamchya sagalyanchya ki itaki varshe zalyavar dekhil koni PRATAL , BINDU ha shabd bolale ki tondatun EK ANI EKACH PRATAL shabd baher padtay...

शेवाळे सर रॉक्स!! सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, राहुरी (जि. नगर) :
"काय आरामाला आलात इथे? घरुन कापुस आणा आणि वाती वळा वाती!! "

मराठीचे सर अर्धचंद्र आणि अनुस्वाराला 'घमेलं आणि दगड' म्हणायचे.

ब्लो पाईपला आम्ही पण फुकणी म्हणायचो! (रच्याकने..१२वीला बायो लॅबमधे बेडकाचं डिसेक्शन करतांना त्याच्या युरीनरी ब्लॅडरमधे ब्लो पाईप घालुन फुंकावं लागायचं ... याक्व!!! )

मला एक ८ वीत भालेराव सर होते ईतीहास शिकवित विनोदही खुप करायचे
परंतु कोण जाणे मी आणी माझा सहमित्र नितीन दोघानाही आमी खोड्या करायचो म्हणुन रोज अगदी नेमाने दरवाज्या जवळ उभे करायचे त्या पिरेडला. आम्ही त्यातही आनंदी होतो. अगदी तिथुनही टवाळक्या करत होतो.

१२वीला बायो लॅबमधे बेडकाचं डिसेक्शन करतांना त्याच्या युरीनरी ब्लॅडरमधे ब्लो पाईप घालुन फुंकावं लागायचं .

मला असलं काही केल्याचं आठवत नाही. ( हे वाक्य 'माझे' समजुन वाचावे, ' बेडकाचे' समजुन नव्हे.)

हे जरा अतीच आहे, पण पोस्टतोय...नको असल्यास सांगा, पोस्ट उडवतो.

१२वीला गणित शिकवायला एक सर होते, इंटिग्रेशन हा त्यांचा फेव्हरेट टॉपीक. इंटिग्रेशनच एखादं इक्वेशन ते लिहायचे आणि त्यातला "I" शब्द सगळ्यात शेवटी लिहायचे. आणि लिहिताना जोरात म्हणायचे (वर्गातल्या मुला-मुलींदेखत)

"हि रिकामी जागा आहे ना तिथे I घालायचं"

मस्त धागा Happy

शाळेतल्या इंग्लिशचे सर शिकवता शिकवता पँट च्या खिशातला रुमाल काढून स्वतःच्या तोंडासमोर धरायचे आणि पूर्णपणे उलगडून झटकत झटकत परत घडी घालायचे. असं २-३ दा करून मग रुमाल परत पँट च्या खिशात. Wink तितक्या वेळेत आम्हाला त्यांचा चेहरा दिसत नसे. ते जे शिकवत आहेत ते नुसतेच ऐकत असू. Happy

१० वीच्या इंग्लिशच्या क्लासच्या सरांना सर्व विद्यार्थ्यांना काही ना काही नावे ठेवायची सवय होती. माझे आडनाव सकळकळे म्हणून मला सर्वज्ञ म्हणायचे. एका मुलाला बद्रुद्दीन अँड कंपनी म्हणून नाव ठेवले होते. का ते माहीत नाही. एक मुलगा एकला लाल रंगाचा शर्ट घालून आला तर त्याला "हमाल आला" म्हणून म्हणाले.

८ वीच्या इंग्लिशच्या क्लासच्या सरांना अध्यात्मिक शिकविण्याची आवड होती. तर वर्गात सर्व मुलांना "आनंद द्या हो, आनंद घ्या हो" हे गीत चालीत म्हणून दाखवत बसायचे. त्याच क्लास मधले भौतिक शास्त्राचे सर थोड्या थोड्या वेळानंतर "पटतंय???? नक्की???" असं विचारत रहायचे.

८वीत ऑफ तासाला वर्गावर येणार्‍या सरांना/मॅडमना बुलेटीन सर्/मॅडम म्हटले जायचे. असे का ते माहीत नाही. Uhoh तर एक वयस्कर सर शाळेत होते. ते कुठल्याच वर्गाला शिकवायला नव्हते. फक्त अशा ऑफ तासांना बुलेटीन सर म्हणून त्यांना पाठवले जात असे. ते वर्गात येत आणि झोपा काढत. कुणी त्यांचा आवाज कसा आहे ते ऐकलेही नसेल कधी. यायचे, शिक्षकासाठीच्या डेस्क वर बसायचे आणि डोके ठेवून घोरत पडायचे व तास संपल्याची घंटा झाली की निघून जायचे. Biggrin

अजून बरेच किस्से आहेत. सावकाशीने टायपेन. Happy

सोमण म्हणून एक सर शाळेत संस्कृत आणि मराठी शिकवीत. त्यांना जांभया भारी येत असत. त्यांनी प्रत्येक तासाला किती जांभया दिल्या ते तास चालू असताना आम्ही सर्व मुले मोजत असू आणि तास संपला रे संपला की तो आकडा जोरजोरात ओरडत असू. Wink

धम्माल धागा आहे :d

प्रो. बोळ्यांनी FAच्या पहिल्या लेक्चरला काही Model Entries लिहून दिल्या होत्या... पुढे प्रत्येक problem समजून सांगतान म्हणायचे... "आता Now, check up ur model entries".

पाचवित असताना संत सरांचा पहिलाच तास मराठीचा असायचा... दुपारचे अधिवेशन असल्याने झोप अनावर व्हायची... ज्याला डुलकी लागायची त्याच्या डोक्यात-पाठीत-डोक्यात असा तबला बडवत असत.

PT आणि NCCच्या काटदरे सरांच "भिकारXX" हे ब्रिदवाक्य होतं.

शाळेत सायन्स च्या पाध्ये मॅडमना "हे प्पा" (हे पहा) असे म्हणायची जाम सवय होती.

चित्रकलेच्या मॅडमना वारंवार "बोलू नका" म्हणायची सवय होती. त्या अनुनासिक बोलत असत त्यामुळे त्यांचे "बोलू नका" आम्हाला "बोनु बोका" असे ऐकू यायचे Biggrin

एका मॅडमना सतत "साहजिकच" असा शब्द उअच्चारायची सवय होती. पण उच्चार मात्र "साजिकच" असा करत असत. नको तिथे कुठेही अकारण "साजिकच" असे त्या बोलत. उदा. शिवराय पोटात असताना जिजाबाई शिवनेरी गडावर राहत होत्या. साजिकच शिवरायांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. Uhoh

डिप्लोमाला EM (electric machines) असा विषय होता. त्या विषयाचे सर्वज्ञ सर बुटकेसे, गोरे व गोबर्‍या गालांचे होते. त्यांना आम्ही ससा नाव ठेवले होते. वागायला खूप छान होते. शिकवायला खूप खास नाही पण बरे होते. ते शिकवताना आम्ही रनिंग नोट्स काढल्याच पाहिजेत असा त्यांचा दुराग्रह असे. बघावं तेव्हा "लिहा, लिहा" चा घोष करत असत. वर्गात त्यांनी प्रश्न विचारल्यावर आपल्याला उत्तर येत असल्यावर आपण हात वर केला की उत्तर सांगायला एखाद्या विद्यार्थ्याला उठून उभे रहायला सांगायच्या ऐवजीही "लिहा, लिहा" असे म्हणून हाताने लिहायची अ‍ॅक्शन करून दाखवत असत.

निंबुडा.. 'बोनु नका'>>>

मी_आर्या,
'बोनु नका' नव्हे 'बोनु बोका' Rofl

६वीत असतांना...साबळे सर, इंग्रजीचे! अतिशय गरीब माणुस... पण शिक्षा करतांना इतके का कठोर व्हायचे कुणास ठाऊक?
"घरचा अभ्यास केला नाही? नयने, उद्या ४था लेसन २ वेळेस लिहुन आणायचा, प्रश्नोत्तरांसहीत!!"

रात्रभर लिहुन लिहुन बोटं दुखुन यायची... कारण इतरही अभ्यास असायचाच.

दुस-या दिवशी आम्ही भीत भीत " सर, झालाय लिहुन ..फक्त लास्ट पॅराग्राफ राहिलाय सर... !! "
साबळे सरः "काय? पुर्ण नाही झाला ना?ठीकै..उद्या तीन वेळेस लिहुन आण."
रोज एकेकाने शिक्षा वाढत जायची. असं करत करत मी अर्धा डझन पुर्ण केलं होतं. Happy

एकदा माझा फाउंटन पेन (बोटांनी धरतो त्या जागी) गळत होता. म्हणुन मी त्याला कागद गुंडाळुन गुंडाळून (तो भरला की फेकायचा) लिहित होते.
साबळे सर भर वर्गात म्हणाले," अरे व्वा! नयनाचा पेन कपडे घालतो."

Lol धमाल आहे! आमचे १ काझी म्हणुन एकदम देखणे सर होते, इंजीनियरींग ला. त्यांच्याकडे पांचट मुली उगाआअच टक लाऊन बघायच्या पण ते इतके साधे होते की अगदी बावरून जायचे, त्या ओघात स्लिप ऑफ टंग ठरलेली.
मग आम्ही त्यांच्या चुका मोजायचो, वेरि गुड ला, वेडि गुर्र, "आय विल टेल यु लेटर इन डीटेल" ला "आय विल टेर यु डेटर ईन लिटेल" ..... टेकनिक ला टेनिकल वगैरे काहिही व्हायचे त्यांच्याकडुन! खूप हशा व्हायचा, मग अजूनच कावरे बावरे व्हायचे!

मस्त किस्से आहेत एकेकाचे.
माझ्या शिक्षकांच्या काही लकबी असल्या तरी बहुतांशी, उत्तम शिक्षक होते.

आम्हाला महाजन म्हणून एक वृद्ध प्रोफेसर होते, त्यांनी पूर्ण वर्षभर आम्हाला अकाऊंट्स खुर्चीवर बसून शिकवले. त्यांनी कधीही फळ्यावर काही लिहिले नाही. पहिल्यांदा विचित्र वाटायचे कारण एखादे अकाऊंट किंवा बॅलन्स शीट पूर्णपणे डोळ्यासमोर असल्याशिवाय ते समजणे कठीण असते. पण त्यांची हातोटी (?) विलक्षणच होती. आम्हाला विषय समजायला कधी त्रास झाला नाही.

मग लिहिन आणखी.

Pages