" पार्टनर " - बिंदुमाधव खिरे (जुन्या मायबोलीवरून)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

'पार्टनर' या पुस्तकाविषयी मी २००६ मध्ये जुन्या मायबोलीवर लिहिलं होतं. थोडं संपादित करून पुन्हा तुमच्यासाठी...
--------------------------------------------------------------
पार्टनर हे पुस्तक म्हणजे एका ' रोहित ' नावाच्या दहावी इयत्तेत शिकणार्‍या मुलाची Diary आहे. मुळात रोहित हा होमोसेक्शुअल आहे.

शाळेत तो फ़ारसा कोणातही Mix होऊ शकत नाही. त्याला त्याच्याच वर्गातला जतिन नावाचा देखणा मुलगा खूप आवडत असतो. जतिन मुळात Stereotype ( विरुद्धलिंगी आकर्षण असणारा ) ज्याला Normal असं ही म्हणू. ( कारण होमोसेक्शुअल असणं हे आपल्या सोसायटीमधे Abnormal किंवा Unnatural मानलं जातं ) जतिनचं देखणेपण हे मुख्य आकर्षण. त्याचं इतर मुलिंशी बोलणं, किंवा मुलिंनी त्याच्याशी केलेली लगट पण त्याला आवडत नाही. कारण रोहितचं जतिनवर So called प्रेम असतं. मुलिंची चेष्टा, बायकांची घाणेरडी चित्र पहाणं, चोरून सिगरेटी ओढणं हे सगळे उद्योग जतिन करत असतो कारण त्याच्या वयाला ते स्वाभाविक आहे, पण रोहितला ते आवडत नाही, कारण मुळात त्याला स्वतःला मुलं आवडतात. आपण जतिनवर पराकोटीचं प्रेम करतोय आणि आपण त्याच्यासाठी काहीही करू शकतो असं रोहितला वाटतं. दहावीचं वर्षं संपल्यावर देखील रोहितला थोडी धाकधूक वाटते की आता वेगवेगळ्या College मधे गेलो तर जतिन भेटणार नाही. पण सुदैवाने ते एकाच college मध्ये Admission घेतात.

दरम्यानच्या काळात बरंच काही घडतं, रोहितला उलगडा होतो की आपण होमोसेक्शुअल आहोत, आपल्याला मुली नाही पण मुलं आवडतात. त्याच्या वैयक्तिक भावविश्वात पण भरपूर उलाढाली होतात. अनिकेत नावाचा एक मुलगा पण त्याच्या आयुष्यात येतो, पण तो निव्वळ रोहितचा उपयोग करून घेतो. त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेतो. हे पैसे रोहितने वारंवार घरून चोरलेले असतात. इथे परत त्याला आपण अनिकेतसाठी पण काहीही करू शकतो असं वाटतं म्हणूनच त्याच्या हातून ही चोरी घडते. एके दिवशी जेव्हा रोहित पैसे देण्याचं नाकारतो तेव्हा अनिकेत त्याला थोबाडीत देऊन त्याच्या घरच्यांना त्याच्या Homosexuality बद्दल सांगेन अशी धमकी देतो. ते संबंध अनिकेत कडून फ़क्त शारिरीक पातळीवरचे असल्याने तो रोहितच्या आयुष्यातून निघून जातो. जाता जाता रोहितला प्रचंड शिव्या पण देतो. आणि त्याच्या लैंगिकतेची चेष्टा करतो रोहित मात्रं उध्वस्त होतो. मनात आत्महत्येचे विचारही येतात पण धाडस होत नाही, मग एका मठात बाबांची सेवा करण्यासठी जातो. तिथेही त्याला जाणिव होते की तिथले लोक स्वतःच्या शरिराला मारून जगतात. प्रत्यक्षात शरीरसुख ही माणसाची मुलभूत गरज आहे हे त्याला जाणवतं.

रोहितच्या पालकांना रोहितच्या लैंगिकतेविषयी काहीही माहीती नसते. पण त्याच्या मनोविश्वात होणार्‍या उलाढालींमुळे अभ्यासावर परिणाम हा होतोच. मग परिक्षेत मार्क्स कमी मिळणं ओघानच आलं. तो एका छोट्या Garage मध्ये नोकरी करायला लागतो, तिथे ही त्याल राजू नावाचा एक मुलगा आवडायला लागतो. पण तो त्याला कधीच ते सांगत नाही.

दरम्यान रोहितच्या खोलीत त्याच्या आईला Homo Love नावाचं मासिक मिळतं, त्याच्याबदाल विचारणा केली असता रोहीत मान्य करतो की तो Homosexual आहे. त्यावरून घरात वादळं होतात. आई वडील रोहीतचा विचार करण्या ऐवजी एकमेकांना दोष देत बसतात. आई त्याची पत्रिका एका ज्योतिषाला दाखवते तो म्हणतो की त्याचं लग्न नक्की होणार, आणि एकदा लग्न झालं की सगळं काही ठिक होईल.

रोहीतची आई त्याला Psycheatrist कडे पण घेऊन जाते पण तो स्वतःच इतका Insensitive आणि सनातनी असतो की हा एक आजार आहे आणि त्यातून रोहीत बरा झाला पाहिजे असं त्याचं धोरण असतं. समलैंगिक माणसाची लैंगिकता कोणत्याही औषधोपचारांनी बदलता येत नाही.

Garage मधल्या मुलांच्या संगतीने,हातात पैसे येऊ लगल्याने शिवाय स्वताःत एकटेपणा वाढल्याने आणि आईवडीलांकडून पण Support न मिळाल्याने रोहित दारू प्यायला शिकतो. एकदा असाच दारूच्या नशेत तो अनिकेतने दाखवलेल्या अड्ड्यावर जातो तिथे एक माणूस त्याला ठाण्यात चलण्यासाठी धमकी देतो आणि त्याच्याकडचे सर्वं पैसे, सोन्याची चेन इत्यादी लूटून घेतो. स्वतःच्या लैंगिकतेविषयी इतकी असुरक्षित भावना रोहितच्या मनात असते की तो माणूस खरंच पोलीस होता का याची खातरजमा ही तो करत नाही

इतका वाईट अनुभव येऊनही, आपल्याला कोणीतरी साथीदार असावा, ज्याच्याशी आपली मानसिक जवळीक असेल, शारीरीक जवळीक असेल या भावनेने रोहीत अस्वस्थं असतो. त्यातच पुन्हा त्याचं अड्ड्यावर जाणं होतं आणि कोणत्यातरी माणसाशी जवळीक होते. पुन्हा एकदा जेव्हा जातो तेव्हा त्याला तिथे नरेन भेटतो. नरेन एका NGO साठी काम करत असतो. त्या संस्थेचा एक Gay Support Group पण असतो. नरेन कडून रोहीतला त्याची सर्वं माहीती मिळते. नरेन पण Gay असतो तो रोहीतला ट्रस्ट मध्ये येण्याचं आमंत्रण देतो, पण भीती आणि असुरक्षिततेच्या भावनेमुळे तो तिथे जात नाही. नरेनची आणि रोहीतची अधूनमधून भेट होत असतेच. याच काळात अड्ड्यावर आलेल्या संबंधामुळे रोहीतला गुप्तरोग होतो, आणि त्यावेळी त्याला नरेनची खूप मदत होते. रोहीतला नरेनबद्दल विश्वास वाटतो.

आणि तो एकेदिवशी ट्रस्ट मध्ये जातो. तिथे सगळेच Homosexual असतात. पण त्यांच्यात कुठेही असुरक्षिततेची भावना, भीती रोहीतला आढळत नाही. ओळख करून दिल्यावर रोहीत मी BiSexual आहे असं सांगतो.

ट्रस्ट्चं काम करून, तिथल्या लोकांना भेटून रोहीतमधे एक वेगेळा विश्वास निर्माण होतो, तिथे त्याला ईरफ़ान भेटतो. जो त्याच्या जिवाभावाचा साथीदार बनतो. ईरूला घरून लग्नासाठी जबरदस्त Pressure असतं

दोघं एकत्र वेळ घालवतात,रहातात. रोहीतचा आत्मविश्वास दुणावतो. स्वताःकडे आणि समलैंगिक लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदळतो.

ईरू Software Engineer असल्याने त्याला Project साठी U.S.A. ला जाण्याची संधी येते आणि तो जातो तिथे हे पुस्तक संपतं. पण रोहीतच्या मनातला ईरू अजुनही जिवंत आहे.
----------------------------------------------------------------
पुस्तकाविषयी थोडं सविस्तर बोलायचं झालं तर...
आपण आपल्या सभोवती नेहमी समलैंगिकतेविषयी द्वेष्टेपणाच पाहीला आहे. समलैंगिकतेविषयी लोक उघडपणे चर्चा करत नाहीत. तो एक आजार, एक अनैसर्गिक गोष्टं आहे असं मानतात. पण समलैंगिकता ही पुर्णंपणे नैसर्गिक आहे. कित्येक प्राणी, पक्षी आहेत ज्यांच्यात समलैंगिकता आढळते. उदा. शार्क, पोपट, बगळे, हत्ती, इत्यादी.

ती कोणत्याही औषधोपचारांनी कधीही बदलू शकत नाही. कोणाला हे आकर्षण कधी जाणवायला लागेल हे सांगता येत नाही. शिवाय हे आकर्षण का वाटतं हे ही सांगणं तितकंच कठिण आहे.

हे पुस्तक सर्वांसाठी आहे. समलिंगी, आणि भिन्नलिंगी लोकांसाठी सुद्धा. कारण भिन्नलिंगी लोकांना समलिंगी संबंध हे निव्वळ शारीरीक आकर्षण वाटते. त्यात कुठेतरी भावनिक गुंतवणूक, नातं असतं हे माहीतीच नसतं. आपल्या समाजात लैंगिकता या विषयाचाच इतका बाऊ केला जातो की समलिंगी लोक हे Out होण्या ऐवजी न्यूनगंडाने जास्त पछाडतात, आपण वाईट आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण होते.

आपल्या इथे शाळेतले शिक्षक सुद्धा जीवशास्त्रात जननसंस्थेविषयीचे Topics सफ़ाईने टाळतात. तर लैंगिकतेविषयी उघडपणे कोण बोलेल?

Stereotype म्हणजे Normal मुलगा आणि Non - Stereotype म्हणजे बायकी मुलगा.. Psychiatry मध्ये पुर्वी Homosexuality ला Disorder मानत असत. पण A.P.A. - American Psychiatry Association ने हे मान्य केलं की हा आजार नाही. आणि Disorder च्या यादीतून Homosexuality चं नाव वगळलं.

वरच्या परिच्छेदात काही वाक्य बोल्ड केली आहेत, त्याचा प्रत्येकाचा संदर्भ वेगवेगळा आहे.

समलिंगी लोक हे सुद्धा Normal माणसासारखंच प्रेम करतात. त्यांना त्यांची भावनिक भूक भागवणारं कोणितरी हवं असतं आपण मात्र त्यांची गरज ही शारीरीक मानतो. अनिकेतची धमकी, रोहीतला थोबडीत देणं किंवा Blackmail करण्याचा प्रयत्न हा केवळ सामाजातली असुरक्षितता Reflect करतो. अनिकेतच काय, पण तो लुबाडणारा माणूस पण याच Category मध्ये मोडतो. समलैंगिकता हा रोग आहे आणि तो जावा म्हणून मठात, ज्योतिषाकडे जाणं किंवा समलैंगिक माणसाचं लग्न भिन्नलिंगी माणसाबरोबर लावून देणं हे अघोरी आहे. त्याने त्याच्या कोणत्याच गरजा भागणार नाहीत. आपल्याकडचे बहुतेक समुपदेशक स्वताः सनातनी विचारांचे असल्याने समलैंगिक लोकांना " Normal " करण्याचा त्यांचा हट्ट असतो, जो अत्यंत चुकिचा आहे. माणसाची लैंगिकता ही औषधोपचारांनी बदलता येत नाही.

आपल्या सोसायटीमध्ये Safe Gay Space ची कमतरता आहे. तीच कथा Lesbien आणि Trans Gender लोकांची. त्यांना ही समाजात स्थान नाही, माणूस म्हणून वागणूक दिली जात नाही. समाजात जर समलिंगी जोडपी तयार झाली तर विवाहसंस्थेला हादरा बसेल अशी सनातनी लोकांना भीती वाटते. इथे जर समाजाचा दृष्टिकोन बदलला तरच त्यांना कळेल की या नात्यात समानता हा सर्वात मोठ्ठा Positive Point आहे.

पण प्रश्नं वंशाच्या दिव्याचा पण आहे ना? समलिंगी जोडप्यांकडून तो कसा काय मिळणार?

पुस्तक वाचून जेव्हा मी हा लेख इथे लिहिला होता तेव्हा समलिंगी संबंधांना समाजात कायद्याने मान्यता नव्हती. आज आहे. पण तरिही समाजात अजूनही समलिंगीद्वेष्टे लोक आहेत आणि पोलीसांकडूनही अशा लोकांना खूप त्रास होतो.

जेव्हा मी हे पुस्तक वाचलं नव्हतं तेव्हा मलाही अशा लोकांबद्दल फ़ार Sensitivity नव्हती. मी पण या गोष्टीकडे 'विकृती' म्हणूनच पहात होते. आणि हे पुस्तक करमणूक म्हणूनच वाचायला घेतलं होतं. पण वाचून खाली ठेवताना इतकी जाणीव तरी नक्कीच झाली की यात खरंच काही गैर, वाईट किंवा घाण नाही.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

सामालैन्गीतेबद्दल लोकांना समजलेच पाहिजे....माझ्या ओळखीत एक आहेत त्यांनी त्यांच्या मुलाचे लग्न लावून दिले...त्या मुलीच्या आयुष्याचे काय? शेवटी घटस्फोट...समजायचे ते समजलेच...अशा घटना टाळण्यासाठीसुद्धा माहितीचा उपयोग होतो...

समलिंगी असणे हि विकृती नक्कीच नाही आणि अशा लोकांची कोणी थट्टा करायचेही काहीच कारण नाही. ते नैसर्गिकच आहे जसे कि भिन्नलिंगी आकर्षण....

सुरेख मांडणी केली आहेस दक्षिणा. देशाबाहेर असतो तेव्हा हे सगळं जवळून पहायला , ऐकायला मिळतं.
धार्मिक संस्कृतीप्रधान आशियाई देशांमधे याबाबत नेहमीच शंका घेतली जाते. अन ती अजून काही वर्षे टिकून राहणं हे अगदी स्वाभाविक आहे. यातल्या मुलभूत गोष्टींना कोणी हात घालतच नाही कारण त्यांचा एकांगी वैचारीक बुद्दिला ते पटण्यासारखं नसतं किंवा ते पटवून घेत नाहीत.

सुंदर लेखन. Happy अभिनंदन सुद्धा !

समलिंगी लोकांविषयी नेमके मत देणे अवघड आहे. वास्तविक लैंगिकता ही भावना वंशसातत्याची प्रेरणा आहे. इतकी नैसर्गीक भावना ही ज्यातुन वंशसातत्य निर्माण होणार नाही अश्या दिशेने का व कशी झुकते ?

याला कारण माझ्या मते पुन्हा मागील जन्मात असावे. मनुष्यप्राणी सोडता या आठवणी किंवा संस्कार इतर प्राण्यांच्या पुढच्या जन्मात प्रभावी संक्रमण करताना दिसत नाहीत. अन्यथा समलिंगी ही भावना माकडांच्यात ( मनुष्याशी साधर्म्य असलेला प्राणी ) असल्याचे वाचनात नाही.

मला वाटत जर समलिंगी व्यक्तीला यातुन सुटका हवी असल्यास आजचा लास्ट बर्थ रिग्रेशन हा जगमान्य उपाय प्रभावी ठरु शकेल.

दक्षे खुप छान लिहल आहेस..
पण सेम मी एक असच नाटक पाहील होतो
सुदर्शन रंगमंच ला
"न येती उत्तरे" वेळ मीळाल्यास हे नाटक नक्की बघ खुप छान आहे. हे नाटक संपल्यावर त्या नाटकाचा १० भाग होता म्हणुन दिगर्दशकाने त्या दिवशी एक मानोपचार तज्ञ व दोन समाज सेवक बोलवुन चर्चा केली होती ती खुपच मौलीक होती..... बाकी लेख छानच Happy

दक्षिणा, खुप छान लिहलयसं.

मला आधी वाटलं हा लेख व. पु. काळेंच्या "पार्टनर" या पुस्तकाविषयी आहे.

याच विषयावरचं सचिन कुंडलकर यांचं "कोबाल्ट ब्लु" हे पुस्तकदेखील मस्त आहे.

दक्षे छान लिहीले
काही मुद्दे पटले नाही
विशेषतः
(पुस्तकाविषयी थोडं सविस्तर बोलायचं झालं तर...
आपण आपल्या सभोवती नेहमी समलैंगिकतेविषयी द्वेष्टेपणाच पाहीला आहे. समलैंगिकतेविषयी लोक उघडपणे चर्चा करत नाहीत. तो एक आजार, एक अनैसर्गिक गोष्टं आहे असं मानतात. पण समलैंगिकता ही पुर्णंपणे नैसर्गिक आहे. कित्येक प्राणी, पक्षी आहेत ज्यांच्यात समलैंगिकता आढळते. उदा. शार्क, पोपट, बगळे, हत्ती, इत्यादी. )
मत मात्र लिहीणार नाही

याच आशयाचं चेतन दातारचं '१, माधवबाग' होतं. ते नंतर सचिन कुंडलकरने 'ड्रीम्स ऑफ तालिम' नावाने हिंग्लिश मध्ये आणलं. सचिन कुंडलकरची बरीच नाटकं , लघुपट 'समलैंगिकते'भोवती फिरतात.
पुण्याच्या 'महाराष्ट्र कल्चरल सेंटर' ने 'न ये ती उत्तरे' नावाच्या नाटकाचे प्रयोग केले होते. प्रयोगानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांचा सेशनही छान रंगला होता.
समलैंगिकतेबद्दलच बोलायचं झालं तर कोण कोणाबरोबर झोपतो-बाईबरोबर की पुरुषाबरोबर, या इतक्या वैयक्तिक गोष्टीत अजूनही समाज नाक खुपसतो. आपल्याला सोयीचं वाटेल तेव्हढं नैसर्गिक आणि बाकी अनैसर्गिक मानण्याची वृत्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत हा विषय असाच हॉट केक म्हणून चघळला जाणार. आणि अशारितीने ते वेगळे पडले की मग समान न्याय, समान हक्क या सगळ्यातल्या 'समान' ला काही अर्थच उरणार नाही. कोणाचं सेक्शुअल ओरिएंटेशन काय? यावर 'नॉर्मल्सी' मोजली जाणं हे फार दुर्दैवी आहे.

मला कुणाशीही वाद करायचा नाही कि निंदा ही करायची नाही. आपण सर्व आपापली मते मांडत आहोत जेणेकरुन चर्चा न होणार्‍या विषयाचे किमान ज्ञान वाचकांना व्हावे.

प्राण्यांमधली समलिंगी भावना वादग्रस्त आहे. अद्याप तरी किमान प्राणी तज्ञांनी मान्यता दिली आहे असे वाटत नाही.

पक्षी आणि कीटक यांना यात घेऊ नये कारण हे कितपत स्वतःबाबत जागरुक असतात असा माझा प्रश्न आहे. यातील कावळ्यासारखे बुध्दीमान पक्षी सोडता पक्षांना नर आणि मादी असा भेद ओळखता येतो का ? किटकांना अजिबातच नसावा असा माझा समज आहे.

-- "Homosexual" Animals Do Not Exist

In 1996, homosexual scientist Simon LeVay admitted that the evidence pointed to isolated acts, not to homosexuality:

Although homosexual behavior is very common in the animal world, it seems to be very uncommon that individual animals have a long-lasting predisposition to engage in such behavior to the exclusion of heterosexual activities. Thus, a homosexual orientation, if one can speak of such thing in animals, seems to be a rarity.[11]
Despite the "homosexual" appearances of some animal behavior, this behavior does not stem from a "homosexual" instinct that is part of animal nature. Dr. Antonio Pardo, Professor of Bioethics at the University of Navarre, Spain, explains:

Properly speaking, homosexuality does not exist among animals.... For reasons of survival, the reproductive instinct among animals is always directed towards an individual of the opposite sex. Therefore, an animal can never be homosexual as such. Nevertheless, the interaction of other instincts (particularly dominance) can result in behavior that appears to be homosexual. Such behavior cannot be equated with an animal homosexuality. All it means is that animal sexual behavior encompasses aspects beyond that of reproduction.[12]

दक्षे, अभिनंदन ! एक अतिशय संवेदनशील विषय समर्थपणे हाताळल्याबद्दल. मी वाचलय हे पुस्तक ! Happy

चांगला लेख.
प्राण्याबद्दल फारसे माहिती नाही पण माणासामधे अशा प्रकारचे वर्तन हे सामान्य आहे. मुले वयात येतानाच समलैगिकतेबद्दल मुलांशी संवाद साधल्यास नंतर होणारी बरीचशी फरफट टाळता येते. तसेच योग्य वयात योग्य माहिती मिळाली तर पूर्वग्रहामुळे इतरांच्या बाबतीत त्यांच्या हातून जे अन्याय कारक वर्तन घडू शकते ते ही टाळता येते.
माझ्या मुलाशी मी या विषयावर तो ५ वीत असताना बोलायचे टाळले. खरे तर कसे बोलायचे हे मलाच कळत नव्हते. आम्ही खूप कॉन्झर्वेटिव गावात रहातो. शाळेत सायन्समधे उत्क्रांती शिकवत नाहित असे गाव. ६वी त इतर मित्रांच्या संगतीने गे बद्दल कॉमेंट्स सूरू झाल्या. त्याचे मत बदलायला बराच त्रास झाला.

पुस्तकाची उत्तम ओळख आहे.
समलैगिकता ही काही प्रमाणात जनुकांवर अवलंबून आहे त्यामुळे ती अनैसर्गिक नाही इ. शास्त्रिय कारणमिमांसा पटली तरी त्यांच्याबद्द्ल माझ्या मनात 'रिपल्सिव्ह' भावना येते हेही खरेच. 'मेट्रोसेक्शुअल पोलिटीकल करेक्टनेस'च्या नादात कितीजण मनापासून अशा व्यक्तिंना/संबंधांना मनापासून स्विकारतात याची मला शंका आहे.

पुस्तकाची ओळख सुंदर पद्धतीने दिली आहेस.
संस्कृती आणि संस्काराचा पगडा असा असतो की त्यापलिकडे जे असतं ते अनैसर्गिक वा विकृत वाटतं. त्यामुळेच हा विषय विनोद म्हणून जास्त चघळला गेलाय.
वैयक्तिकरित्या मीही पुर्वी या प्रकाराकडे विकृती म्हणून पहात असे. पण थोड्याफार वाचनानंतर हे लक्षात आलं की दोष त्यांचा नसून आपल्या अज्ञानाचा आहे. पुस्तक लवकरच वाचेन. त्यानंतर यावर विस्ताराने प्रतिक्रिया देता येईल.

हम्म .. चांगला विषय.
मला होमोसेक्शुअल मानसिकता खरे म्हणजे कळत नाही. ती मला अनैसर्गिकच वाटते. पण कमीत कमी मी अश्या लोकांचा तिरस्कार करत नाही.
कित्तेक लोकांना हा विषय तद्दन टाकाऊ आणि तिरस्करणीय वाटतो.
कदाचित ह्या विषयावर थोडे वाचन केल्यास नीट मत बनवता येईल.

ह्याच मुद्द्यावर काही वर्षांपूर्वी 'रमण राघव' नावाच्या नराधमाने सीरिअल किलीन्ग्स केल्या होत्या. त्याला वाटायचे कि अख्खा समाज त्याला समलैंगिक बनण्ण्याचा प्रयत्न करतोय.
मुद्दा हाच की ह्या विषयाचे कित्तेक कंगोरे आहेत. पुढच्या काळात आपली इच्छा असो वा नसो ... आपल्याला ह्या विषयावर विचार / अभ्यास करावा लागेल.
टाकाऊ म्हणून हा विषय डावलता येणार नाही.

PS .
दक्षिणेचे अभिनंदन

सुरेख लिहलंय.
नुकतंच याच विषयावर 'heath ledger' या महान अभिनेत्याचा 'Brokeback Mountain' हा उत्कृष्ट सिनेमा पाहीला. बघाच!
मणिकर्णिका व निळूभाऊ, आपल्या प्रतिक्रियांशी बर्‍यापैकी सहमत!

'Brokeback Mountain' मस्त म्हणजे मस्त होता ...
त्या हीथ लेजर ने काय कडक काम केलेय त्यात !

Pages