झेन कथा- २... नदी आणि सुंदर तरूणी

Submitted by ठमादेवी on 9 March, 2011 - 03:08

तांझन आणि एकिडो हे दोन झेन धर्मगुरू भर पावसात चिखल भरलेल्या रस्त्यावरून जात होते... समोर एक नदी होती, ती भरून गेली होती आणि किमोनो घालून चाललेल्या एका सुंदर तरूणीला ती ओलांडता येत नव्हती. तांझनने तिला आपल्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि नदी पार केली... ती तरूणी त्याचे आभार मानून निघून गेली. एकिडो काहीच म्हणाला नाही. शेवटी रात्री त्याने विषय काढलाच,

आपण धर्मगुरू आहोत आणि आपल्याला स्त्रियांच्या, विशेषतः सुंदर स्त्रियांच्या जवळ जाण्याची परवानगी नाही... तू त्या मुलीला उचलून का घेतलंस?

तांझनने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, अरे, मी तर तिला तिथेच सोडून सुद्धा दिलं... तू तर इथपर्यंत घेऊन आलायस आणि अजूनही घेऊन फिरतो आहेस!!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झकास............आता मायबोलीवर दुसर्‍यांचे विचार *कित्ती छान आहे नै हे* करत मान्डणारे कीर्तनकार वाढतील Biggrin

सगळेजण काय "तुम्ही लिहित रहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत" type प्रतिक्रिया टाकताय? माधव यांनी ठमादेवींना "लिहु नका" असं सांगितलं नाही आहे, फक्त योग्य ठिकाणी लिहा एवढच म्हटलं आहे.

Admin-team चा हा लेख जरूर वाचा: इथेच का नको

मदत समितीने देखिल याबाबतीत व्यवस्थित मार्गदर्शन केले आहे: मायबोलीवर नवीन साहित्य कसे लिहावे?
या लिंक वर जाण्यास वेळ नसल्यास तेथिल सर्वात महत्वाचा मुद्दा: कृपया लक्षात ठेवा: मायबोलीवर गुलमोहर विभागात केवळ स्वतः लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.

ठमादेवी, इट्स एव्हरीवन्स बिझनेस व्हेन यु राईट ऑन पब्लिक फोरम्स.
बाकी ऊपक्रम छान असण्याबद्दल अजिबात वाद नाही.
हेमापआशेपो.

उपनिश्स्सदातल्या दोन गुरशिष्यांबबबाबतही हीच कथा आहे. बाई चतुर दिसते आहे. झेन गुरु, नाथ संप्रदायी, ऋषीमुनी सगळ्यांच्या पाठीवरुन ही बाई फिरलेली दिसते आहे.. Proud

आणि १०० वर्षानी हीच कथा बापूजी , चाचाजी आणि लेडी माउंटबॅट्न यांच्या नावानेही सहज खपून जाईल.. Proud

निंबुडा, कोणती ती कथा?
>>>
सेम वरचीच कथा फक्त २ झेन धर्मगुरुंच्या जागी गोरखनाथ (किंवा मच्छिंद्रनाथ) व त्यांचा शिष्य अशी जोडगोळी होती.

भरदुपारी मद्यप्राशन केल्याबद्दल माझ्या हक्काच्या बायकोसमोर दिलगीर आहे.

१. कंप्लीट भंकस आहेत झेन कथा! त्यातून बोध घेत बसण्यापेक्षा ऑफीसचे काम केलेलेही बरे!

२. याच्या कोणत्याही लिंक नाही जोडल्या त्री चालेल कारण स्वप्नसुंदरी (मायबोलिला ज्ञात - ड्रीमगर्ल या नावाने) यांच्या म्हणण्याप्रमाणे या सर्व कथांचे एक पुस्तक ऑलरेडी येऊ घातलेले आहे.

-'बेफिकीर'!

इकडे तिकडे टीपी करण्यापेक्षा ऑफिसचं काम करावं हा बोध तुम्हाला मिळाला बेफि... झेन कथेचं उद्दिष्ट साध्य झालं... मला आणखी काय हवं? प्रत्येकाला यातून वेगवेगळा बोध होतो... तुम्हाला हा साक्षात्कार झाला... भरून पावले मी... Happy

मला एक समजत नाही, भंकस केल्यानंतर इथे स्मायली कशाला देत बसतात. आता आत्या, माम्या, काकवांना जमवू नका आणि मी स्वतंत्र आहे हेही म्हणू नका.

पत्रकारिता हा माझ्यामते अधिक बरा व्यवसाय आहे. विश्वासघात आणि झेनकथा असले प्रकार करण्यापेक्षा!

ठमादेवी छान आहे कथा.. Happy
बाकिच्या वाचल्या नाहियेत अजुन, पण बर्‍याच आहेत असं वाटतय. वाचतो लगेच..

आणि १०० वर्षानी हीच कथा बापूजी , चाचाजी आणि लेडी रोजी माउंटबॅट्न यांच्या नावानेही सहज खपून जाईल..

Proud

आणि १०० वर्षानी हीच कथा बापूजी , चाचाजी आणि लेडी रोजी माउंटबॅट्न यांच्या नावानेही सहज खपून जाईल.. >>

त्यानंतर हिच कथा मंदार, जामोप्याच्या नावनेहि खपु शकते.आणी त्यातील एकिडो कोण हेहि सांगायची गरज नाहि Biggrin

एकिडो का तांझन... ?? गणु, बाई बघून नंतर मी ठरवेन मी कोण ते . तु आपला उगा चिंता करु नकोस .. Proud

गणु, बाई बघून नंतर मी ठरवेन मी कोण ते . तु आपला उगा चिंता करु नकोस >>
तुम्च्याकडुन हेच अपेक्षित होते Lol

सह्ही !!!

तात्पर्य : उचला अन सोडुन द्या !!
मला वाटते zen हाच " USE and THROW " ह्या जॅपनीज संस्कृतीचा आद्य प्रणेता असावा Proud

उचला अन घरी न्या!

ही आमची प्रथा आहे भारतीय!

डिस्क्लेमर्सः

१. मायबोली प्रशासन 'बेफिकीर' यांच्या मताशी सहमत असू शकतच नाही.

२. कोणत्याही सुंदर तरुणीने 'बेफिकीर' यांना भेटू नये.

३. आणि नदीकाठी, नदी ओलांडता येत नाही व मदत हवी म्हणून तर अजिबात भेटू नये.

उचला अन घरी न्या!

ही आमची प्रथा आहे भारतीय!

>>>> इथेच तुम्ही भारतीयांनी मार खाल्ला ना

भेटली ती उचली अन नेली घरी
स्त्रीमुक्ती चळवळ आली दारी Proud

अ‍ॅडमिन,
इथल्या पण बेफिकिराच्या दारु ढोसलेल्या आणि इतर अयोग्य प्रतिक्रियांना वॉर्निंग द्या/ उडवा.

दिपांजली, बेफिकिरांना ते समजत नाहि. त्यांना त्यात पुरुषार्थे वाटतो. बाकि त्यांच्या कथांमधुन त्यांची मानसिकता दिसतेच!

Pages